SSC Bharti 2024 | कर्मचारी निवड आयोगामार्फत 2049 जागांसाठी भरती

SSC Bharti 2024 | कर्मचारी निवड आयोग म्हणजेच स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 2049 जागांसाठी भरती जाहीर केली आहे. ही पदे भरण्यासाठी कर्मचारी निवड आयोगामार्फत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या जाहिरात मध्ये अर्ज करण्याची अंतिम तारीख 18 मार्च 2024 ही आहे. लॅब अटेंडंट, लेडी मेडिकल अटेंडंट, मेडिकल अटेंडंट, नरसिंग ऑफिसर, फार्मासिस्ट, फील्ड मॅन, डेप्युटी रेंजर, जूनियर टेक्निकल असिस्टंट, अकाउंटंट, असिस्टंट प्लांट प्रोटेक्शन ऑफिसर यांसारख्या पदांकरिता ही भरती होणार आहे. तरी पात्रता धारक उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करायचा आहे. कर्मचारी निवड आयोगाच्या भरती मध्ये अर्ज करण्यासाठी लागणारी पात्रता खालील प्रमाणे

SSC Bharti 2024

  • कर्मचारी निवड आयोगाची भरती ही 2049 जागांसाठी होणार आहे.
  • स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत घेण्यात येणाऱ्या भरतीतील पदांची नावे खालील प्रमाणे.

SSC Bharti 2024 | कर्मचारी निवड आयोगामार्फत उपलब्ध रिक्त पदे

  1. लॅब अटेंडंट
  2. लेडी मेडिकल अटेंडंट
  3. मेडिकल अटेंडंट
  4. नरसिंग ऑफिसर
  5. फार्मासिस्ट
  6. फील्ड मॅन
  7. डेप्युटी रेंजर
  8. जूनियर टेक्निकल असिस्टंट
  9. अकाउंटंट
  10. असिस्टंट प्लांट प्रोटेक्शन ऑफिसर
  • 10वी उत्तीर्ण / 12 वी उत्तीर्ण / पदवीधर पदवी आणि त्यावरील पदवी किंवा समतुल्य ही शिक्षणाची पात्रता कर्मचारी निवड आयोग मार्फत निघालेल्या भरती करिता आहे.
  • 1 जानेवारी 2024 रोजी 18 ते 25/27/30/35/37/42 वर्षे पूर्ण पाहिजेत. SC/ST च्या उमेदवारांसाठी पाच वर्षे सूट आहे. तर ओबीसीच्या उमेदवारांसाठी तीन वर्षे सूट आहे.
  • कर्मचारी निवड आयोग मार्फत निघालेल्या 2049 जागांच्या भरती मधून निवडून आलेल्या उमेदवारांना नियमानुसार वेतन मिळेल.
  • कर्मचारी निवड आयोगामार्फत निवडून आलेल्या उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत राहील.
  • या भरती करिता घेण्यात येणाऱ्या परीक्षेसाठी शुल्क हे ₹100 राहील. [ SC/ST/PWD/ExSM/ महिला- शुल्क नाही ]
  • पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यासाठी कर्मचारी निवड आयोगाच्या संकेतस्थळावरती अर्ज करावा. अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
  • या भरती करिता 18 मार्च 2024 ही कर्मचारी निवड आयोगामार्फत दिलेली अंतिम दिनांक आहे.
  • सदरील भरती करिता अर्ज करण्या अगोदर कर्मचारी निवड आयोगामार्फत प्रसिद्ध झालेली जाहिरात पहा
  • सदरील भरती करिता अर्ज करण्यासाठी कर्मचारी निवड आयोगाने लिंक दिली आहे त्यासाठी येथे क्लिक करा

SSC Bharti 2024 | कर्मचारी निवड आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या भरतीसाठी खालील नियम वाचा

  • सदरील भरती करिता ऑनलाइन अर्ज करायचा आहे.
  • ऑफलाइन अर्ज करण्याची कोणतीही पद्धत कर्मचारी निवड आयोगामार्फत राबवलेली नाही.
  • अर्ज भरत असताना आपली वैयक्तिक माहिती जसे की जन्मतारीख, नाव, पत्ता, शिक्षण इत्यादी बरोबर आहे का तपासावे. ही माहिती चुकल्यास कर्मचारी निवड आयोग त्यास जबाबदार राहणार नाही.
  • 18 मार्च 2024 अर्ज करण्याची अंतिम दिनांक आहे.
  • कर्मचारी निवड आयोग मार्फत घेण्यात येणाऱ्या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी जाहिरात पहावी.

SSC Bharti 2024 | कर्मचारी निवड आयोग भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांनी खालील सूचना पहा

  • कर्मचारी निवड आयोग भरतीसाठी अर्ज केलेले उमेदवार परीक्षेसाठी पात्र असतील.
  • होणाऱ्या परीक्षेसाठी कोणत्याही प्रकारचा TA / DA न देण्याचा निर्णय कर्मचारी निवड आयोगाचा आहे.
  • परीक्षा केंद्रावर अनुसूचित प्रकार करणाऱ्या उमेदवारांवर परीक्षा केंद्राद्वारे व कर्मचारी निवड आयोगामार्फत कायदेशीर कारवाई केली जाईल.
  • परीक्षा केंद्र हे कर्मचारी निवड आयोगाद्वारे ठरवण्यात येईल. परीक्षा केंद्रावर येताना आयोगाने दिलेले हॉल तिकीट घेऊन येणे बंधनकारक आहे.
  • वरील परीक्षेसाठी आवश्यक अभ्यासक्रम कर्मचारी निवड आयोगाच्या संकेतस्थळावरती दिलेला आहे.

SSC Bharti 2024 | कर्मचारी निवड आयोग भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया खालील प्रमाणे

  1. सदरील भरतीसाठी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. त्यासाठी दिलेल्या लिंक वरती क्लिक करा – https://ssc.gov.in/login
  2. लिंक वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला गव्हर्मेंट ऑफ इंडिया, स्टाफ सिलेक्शन कमिशन असे हेडिंग डाव्या कोपऱ्यात दिसेल. त्याचप्रमाणे लॉगिन करण्यासाठी एक अर्ज दिसेल. त्यामध्ये कॅंडिडेट आणि ॲडमिन असे दोन ऑप्शन्स असतील त्यातील कॅंडिडेट हा ऑप्शन सिलेक्ट करावा. यामध्ये तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड विचारला जाईल. जर तुम्ही अगोदरच रजिस्ट्रेशन केले असेल तर तुम्ही लॉगिन करू शकता. पण नवीन कॅंडिडेट ने सुरुवातीला स्वतःला रजिस्टर करणे गरजेचे आहे. त्यासाठी त्याने रजिस्टर नाव येथे क्लिक करावी.
  3. रजिस्टर नाव येथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला वन टाइम रजिस्ट्रेशन करण्याकरिता प्रक्रिया दिलेली दिसेल. त्यामध्ये चार स्टेप्स असतील. पहिली म्हणजे पर्सनल डिटेल, दुसरी पासवर्ड क्रिएशन, तिसरी ॲडिशनल डिटेल, चौथी डिक्लेरेशन. या चार प्रक्रिया पार पाडून तुम्हाला कर्मचारी निवड आयोग ला रजिस्ट्रेशन करता येते.
  4. त्यानंतर रजिस्ट्रेशन करण्यासाठी कंटिन्यू वरती क्लिक करावी. क्लिक केल्यानंतर पहिल्यांदा तुम्हाला तुमच्या पर्सनल डिटेल्स भरण्यासाठी एक फॉर्म दिसेल. त्यामध्ये तुम्ही तुमचे नाव, आधार कार्डचा नंबर, तुम्ही काही नावात बदल केला असेल तर तो बदल, लिंग, जन्मतारीख, वडिलांचे नाव, आईचे नाव, इयत्ता 10वी कोणत्या बोर्डातून पास झाला. त्या बोर्डाचे नाव, तुमचा रोल नंबर, 10वी पास वर्ष, आतापर्यंत घेतलेले उच्च शिक्षण, मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी एवढी माहिती भरावी लागते.
  5. यानंतर सेव आणि नेक्स्ट वरती क्लिक करा. त्यानंतर तुम्ही पासवर्ड क्रिएशन या प्रक्रियेला सुरुवात करतात. येथे तुम्हाला तुमचा पासवर्ड सेट करायचा आहे. पासवर्ड टाकताना त्यामध्ये कमीत कमी एक कॅपिटल लेटर, एक स्मॉल लेटर, एक अंक आणि एक चिन्ह यांचा समावेश असावा. म्हणजे तुमचा पासवर्ड स्ट्रॉंग बनतो.
  6. यानंतर तुम्ही पुन्हा सेव आणि नेक्स्ट वरती क्लिक करा. म्हणजे तिसऱ्या प्रक्रियेस तुम्ही सुरुवात कराल. या प्रक्रियेत तुम्हाला तुमची ॲडिशनल डिटेल भरायची आहे. यामध्ये उमेदवाराने आपली नॅशनॅलिटी, आपला राहता पत्ता, आपले आत्तापर्यंतचे झालेले सर्व शिक्षण याबद्दलची माहिती द्यायची आहे. हे भरून झाल्यानंतर पुन्हा सेव आणि नेक्स्ट वरती क्लिक करायची.
  7. आता तुम्ही रजिस्ट्रेशनच्या चौथ्या प्रक्रियेमध्ये म्हणजेच शेवटच्या टप्प्यात आहात. यामध्ये आपण दिलेली माहिती बरोबर दिलेली आहे. याचे डिक्लेरेशन द्यायचे असते. तेव्हा दिलेल्या अटी मान्य करून रजिस्टर बटनावर क्लिक करावी.
  8. यानंतर कर्मचारी निवड आयोगाने अर्ज भरण्यासाठी दिलेल्या लिंक वरती क्लिक करावी. आणि आता बनवलेल्या युजरनेम आणि पासवर्ड च्या साह्याने आपला अर्ज भरावा.
SSC Bharti 2024 | कर्मचारी निवड आयोग बद्दल माहिती खालील प्रमाणे

कर्मचारी भरती आयोग ही भारत सरकारची एक संस्था आहे. जिचा उपयोग वेगवेगळ्या सरकारी पदांसाठी कर्मचारी नेमण्यासाठी केला जातो. कर्मचारी भरती आयोगालाच स्टाफ सिलेक्शन कमिशन असे म्हणतात. त्याचप्रमाणे एसएससी या शब्दाने त्याला संबोधले जाते. या संस्थेची स्थापना 4 नोव्हेंबर 1975 रोजी झाली आहे. आज ही संस्था सुरू होऊन एकूण 48 वर्षे झाले आहेत. ही सरकारी संस्था आहे या संस्थेचा उपयोग ग्रुप सी आणि ग्रुप बी मधील पदे भरण्यासाठी केला जातो. कर्मचारी भरती आयोगाचे मुख्य कार्यालय हे नवी दिल्ली येथे आहे. या संस्थेचे चेअरमन हे एस. किशोर हे आयएएस अधिकारी आहेत. कर्मचारी आणि प्रशिक्षण विभागाच्या नियंत्रण खाली कर्मचारी भरती आयोग काम करत असते. कर्मचारी भरती आयोगाचे वार्षिक बजेट हे 426 कोटी इतके आहे.

13 भारतीय भाषांमधील कर्मचारी निवडण्याचा निर्णय कर्मचारी भरती आयोगाने घेतलेला आहे. यामध्ये उर्दू, तमिळ, मल्यालम, तेलगू, कन्नड, आसामी, बंगाली, गुजराती, कोकणी, मणिपुरी, मराठी, ओडिया आणि पंजाबी या व्यतिरिक्त हिंदी आणि इंग्रजी भाषेचा सुद्धा समावेश आहे.

कर्मचारी भरती आयोग हे चेअरमन आणि इतर दोन सदस्यांच्या द्वारे चालवले जाते. यांच्या व्यतिरिक्त संस्थेमध्ये एक डायरेक्टर, एक डेप्युटी सेक्रेटरी, दोन जॉइंट डायरेक्टर, चार डेप्युटी डायरेक्टर यांसारखा एकूण 550 लोकांचा स्टाफ आहे. आयोगाचे मुख्य ऑफिस हे नवी दिल्ली येथे आहे. त्याचप्रमाणे आयोगाची इतर कार्यालय प्रयागराज, कोलकत्ता, गुवाहाटी, मुंबई, बेंगलोर, चेन्नई, छत्तीसगड, रायपुर या ठिकाणी आहेत.

सध्याच्या काळात बहुतांश विद्यार्थी एमपीएससी आणि यूपीएससी ची तयारी करत असतात. किंवा बँक च्या एक्झाम ची तयारी करत असतात. या परीक्षेत यशाचे प्रमाण हे खूपच कमी आहे. कारण या परीक्षा खूपच अवघड असतात. त्याच्या तुलनेत स्टाफ सिलेक्शन कमिशन ची परीक्षा खूपच सोपी असते. या परीक्षेच्या द्वारे ग्रुप बी आणि ग्रुप सी च्या विविध पोस्ट भरल्या जातात. स्टाफ सिलेक्शन कमिशन मधून निवड झालेल्या उमेदवाराला पगार सुद्धा चांगला मिळतो. मासिक पगार 25000 किंवा त्याहून अधिक असतो.

त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना खाजगी क्षेत्रात कमी पगार आहे त्यांनी सुद्धा या परीक्षेची तयारी केली पाहिजे. या पदांसाठी जास्त शिक्षणाची सुद्धा आवश्यकता नाही 12 वी उत्तीर्ण असणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा स्टाफ सिलेक्शन कमिशन च्या परीक्षेला बसता येते. त्यासाठी वयाची अट आहे. वय वर्ष 18 ते 27 पर्यंत असणे गरजेचे आहे. ओबीसी साठी वय हे 30 वर्षापर्यंत आहे.

ही परीक्षा दोन टप्प्यांमध्ये घेतली जाते. पहिला टप्पा हा 200 गुणांचा असतो. यामध्ये चाचणीचे स्वरूप हे संगणकावर आधारित असते. यासाठी वेळ 60 मिनिटात इतका असतो. चुकीच्या उत्तरांना मायनस मार्किंग पद्धत असते. एखादे उत्तर चुकले तर अर्धा मार्क कट केला जातो. यामध्ये 50 गुणांचे चार भाग असतात. त्यामध्ये सामान्य ज्ञान, इंग्रजी, सामान्य बुद्धिमापन, कॉन्टिटी एटीट्यूड यांची प्रत्येकी 50 गुण असणारी चाचणी असते. त्याचे एकूण गुण 200 इतके असतात. दुसऱ्या टप्प्यामध्ये उमेदवाराची कौशल्य चाचणी असते. पहिल्या टप्प्यामध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना दुसऱ्या परीक्षेसाठी प्रवेश दिला जातो.

SSC Bharti 2024 | एसएससी परीक्षांचे प्रकार खालील प्रमाणे आहेत.

  • SSC CHSL (Combined Higher Secondary Level Exam)
  • SSC CGL ( Combined Graduate Level Exam )
  • SSC JE (Junior Engineer )
  • SSC MTS ( Multitasking Staff )
  • SSC CAPF (Central Police Organization )
  • SSC GD (General Duty )
  • SSC Stenographer
  • SSC JHT

नोकरी संदर्भातील अपडेट साठी आमच्या वेबसाईटला भेट द्या – CLICK HERE 

 

Leave a Comment