[ AIESL Bharti 2024 ] एअर इंडिया येथे पदवीधर उमेदवारांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी.

[ AIESL Bharti 2024 ] देशातील नामांकित ‘एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्विस लिमिटेड’ येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात एअर इंडिया यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या भरती मधून एकूण 76 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. ‘ प्रादेशिक सुरक्षा अधिकारी आणि सहाय्यक अधिक्षक’ या पदासाठी योग्य उमेदवाराची निवड करण्याकरिता सदरील भरतीचे आयोजन करण्यात आलेले आहे. या भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. एअर इंडिया इंजीनियरिंग सर्विस लिमिटेड येथील भरतीसाठी उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी.

श्री शिवछत्रपती कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, जुन्नर येथे भरती.

  • [ AIESL Bharti 2024 ] एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्विस लिमिटेड येथील भरती मधून 76 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
  • एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्विस लिमिटेड येथील भरती मधून ‘ प्रादेशिक सुरक्षा अधिकारी आणि सहाय्यक अधिक्षक’  या पदासाठी योग्य उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी उत्तीर्ण केलेली पाहिजे. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • या भरती मधून उमेदवारांना सरकारी नोकरी मिळणार आहे.
  • भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत असणार आहे.
  • प्रादेशिक सुरक्षा अधिकारी या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 40 वर्षापर्यंत पाहिजे.
  • सहाय्यक अधिक्षक या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 35 वर्षापर्यंत पाहिजे.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला कोणत्याही प्रकारची शुल्क लागणार नाही.
  • या भरती मधून योग्य उमेदवाराची निवड परीक्षेद्वारे करण्यात येणार आहे.
  • प्रादेशिक सुरक्षा अधिकारी या पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना दरमहा 47,625 रुपये वेतन मिळणार आहे.
  • सहाय्यक अधिक्षक या पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवाराला 27,940 रुपये वेतन मिळणार आहे.
  • सदरील भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • “मुख्य मानव संसाधन अधिकारी,एआय इंजिनिअरींग सर्व्हिसेस लिमिटेड कार्मिक विभाग,दुसरा मजला,सीआरए बिल्डींग,सफदरजंग एअरपोर्ट कॉम्प्लेक्स,अरबिंदो मार्ग,नवी दिल्ली – 110003” या पत्त्यावर इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज पाठवायचे आहेत.
  • एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्विस लिमिटेड यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.

S.T महामंडळ येथे भरती निघालेली आहे. 

[ AIESL Bharti 2024 ] एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्विस लिमिटेड येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.

  • [ AIESL Bharti 2024 ] 24 सप्टेंबर 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  • 24 सप्टेंबर 2024 या तारखेनंतर मिळालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. आणि त्यानंतर अर्ज करावा.

स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत भरती निघालेली आहे. 

Leave a Comment