[ DSSSB Bharti 2024 ] दिल्ली अधीनस्थ सेवा निवड मंडळ येथे भरती.

[ DSSSB Bharti 2024 ] दिल्ली अधीनस्थ सेवा निवड मंडळ येथे विविध पदांसाठी भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात दिल्ली अधिनस्थ सेवा निवड मंडळ यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. 18 एप्रिल 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख संस्थे कडून देण्यात आलेली आहे. बुक बाईंडर, डेटा एंट्री ऑपरेटर ग्रेड – ए, स्वीपर, चौकीदार, ड्रायव्हर / स्टाफ कार ड्रायव्हर, प्रोसेस सर्वर, शिपाई / ऑर्डली / डाक शिपाई या पदांसाठी सदरील भरती होणार आहे. भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी दिल्ली अधीनस्थ सेवा मंडळ यांच्याद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचायची आहे. सदरील भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खालील महत्त्वाच्या सूचना वाचाव्या.

DSSSB Bharti 2024

  • दिल्ली अधीनस्थ सेवा मंडळ येथील भरतीसाठी 142 जागा रिक्त आहेत.
  • दिल्ली अधीनस्थ सेवा मंडळ येथील भरती मधील रिक्त पदे खालील प्रमाणे आहेत.

[ DSSSB Bharti 2024 ] दिल्ली अधीनस्थ सेवा निवड मंडळ येथील भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि वयाची अट खालील प्रमाणे.

  1. बुक बाईंडर – 01 जागा
  2. डेटा एंट्री ऑपरेटर ग्रेड – ए – 02 जागा
  3. स्वीपर – 12 जागा
  4. चौकीदार – 13 जागा
  5. ड्रायव्हर / स्टाफ कार ड्रायव्हर – 12 जागा
  6. प्रोसेस सर्वर – 03 जागा
  7. शिपाई / ऑर्डली / डाक शिपाई – 99 जागा
  • बुक बाइंडर या पदासाठी उमेदवाराने मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण केली पाहिजे. किंवा उमेदवाराकडे पुस्तक बंधनाचे ज्ञान असणे आवश्यक आहे. सदरील कामाचा अनुभव असलेल्या उमेदवाराला प्राधान्य देण्यात येईल.
  • डेटा एन्ट्री ऑपरेटर ग्रेड – ए या पदासाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून 12 वी परीक्षा किंवा समतुल्य परीक्षा उत्तीर्ण केली पाहिजे. ( पदवीधर उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल ) आयटी / संगणक कोर्स पूर्ण केलेल्या उमेदवाराला किंवा संगणकाबद्दल ज्ञान असणाऱ्या उमेदवाराला प्राधान्य देण्यात येईल. उमेदवाराला कमीत कमी एक वर्षाचा डाटा एन्ट्री चा अनुभव असणे आवश्यक आहे.
  • स्वीपर या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून मॅट्रिक परीक्षा किंवा समतुल्य परीक्षा पास केलेल्या प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
  • चौकीदार या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून मॅट्रिक परीक्षा किंवा समतुल्य परीक्षा पास केलेल्या प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
  • ड्रायव्हर / स्टाफ कार ड्रायव्हर या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे LVM चे ड्रायव्हिंग लायसन्स असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे मान्यताप्राप्त विद्यापीठातून मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण केलेल्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. ड्रायव्हिंग क्षेत्रामध्ये दोन वर्ष निष्कलंक कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे.
  • प्रोसेस सर्वर या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे LVM चे ड्रायव्हिंग लायसन्स असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे मान्यताप्राप्त विद्यापीठातून मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण केलेल्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. ड्रायव्हिंग क्षेत्रामध्ये दोन वर्ष निष्कलंक कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे.
  • शिपाई / ऑर्डली / डाक शिपाई या पदासाठी उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून मॅट्रिक परीक्षा पास किंवा समतुल्य परीक्षा पास केलेल्या चे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 वर्षे ते 27 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे. सरकारद्वारे ठराविक उमेदवारांना वया मध्ये देण्यात येणारी सूट लागू आहे.
  • दिल्ली अधीनस्थ सेवा निवड मंडळ येथील भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना 21,700 रुपये ते 81,100 रुपये प्रतिमहा पगार देण्यात येईल.
  • सदरील भरतीसाठी पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांकरिता नोकरीचे ठिकाण दिल्ली असणार आहे.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडून ₹100 शुल्क आकारण्यात येईल. त्याचप्रमाणे एससी, एसटी, ओबीसी, महिला या प्रवर्गातून अर्ज करणाऱ्या उमेदवारांकरिता परीक्षा शुल्क नाही.
  • सदरील भरतीसाठी पात्र उमेदवारांनी अर्ज करण्याकरिता दिल्ली अधीनस्थ सेवा निवड मंडळ यांच्या संकेतस्थळावरून अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.
  • 18 एप्रिल 2024 ही दिल्ली अधीनस्थ सेवा निवड मंडळ यांच्याद्वारे अर्ज करण्यासाठी देण्यात आलेली शेवटची तारीख आहे.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी दिल्ली अधीनस्थ सेवा निवड मंडळ यांच्याद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात काळजीपूर्वक पाहायचे आहे. जाहिरात -1, जाहिरात-2
  • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी दिल्ली अधीनस्थ सेवा निवड मंडळ यांच्याद्वारे देण्यात आलेल्या लिंक द्वारे अर्ज करावा. अर्ज करा.

[ DSSSB Bharti 2024 ] दिल्ली अधीनस्थ सेवा निवड मंडळ येथील भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खालील सूचना वाचाव्यात.

  • दिल्ली अधीनस्थ सेवा निवड मंडळ येथील भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • दिल्ली अधीनस्थ सेवा निवड मंडळ यांच्याकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याची कोणतीही पद्धत राबवण्यात आलेली नाही. त्यामुळे उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा नाही.
  • उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज भरत असताना काळजीपूर्वक भरायचा आहे. उमेदवारांनी स्वतःची संपूर्ण माहिती जसे की जन्मतारीख, संपूर्ण नाव, पत्ता, शैक्षणिक पात्रता इत्यादी गोष्टी बरोबर लिहायच्या आहेत. अर्ज भरताना कोणत्याही प्रकारची चुकी झाली आणि उमेदवाराचा अर्ज रद्द करण्यात आला तर याला दिल्ली अधीनस्थ सेवा निवड मंडळ जबाबदार राहणार नाही.
  • 18 एप्रिल 2024 या तारखेनंतर मिळालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. सदरील तारीख ही अर्ज करण्याची शेवटची तारीख.
  • दिल्ली अधीनस्थ सेवा निवड मंडळ येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी संस्थे कडून प्रसिद्ध केलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचायची आहे.

[ DSSSB Bharti 2024 ] दिल्ली अधीनस्थ सेवा निवड मंडळ येथील भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांनी खालील सूचना वाचाव्यात.

  • दिल्ली अधीनस्थ सेवा निवड मंडळ येथील भरतीसाठी ज्या उमेदवारांनी अर्ज केलेले आहेत ते उमेदवारच भरतीसाठी पात्र असतील. पात्र उमेदवार मधूनच योग्य उमेदवाराची निवड करण्यात येईल. अर्ज न करणाऱ्या उमेदवाराला भरती मध्ये पात्र होता येणार नाही.
  • दिल्ली अधीनस्थ सेवा निवड मंडळ यांच्याकडून भरतीसाठी येणाऱ्या कोणत्याही उमेदवाराला TA/DA देण्यात येणार नाही. याची सर्व उमेदवारांनी दक्षता घ्यावी.
  • दिल्ली अधीनस्थ सेवा निवड मंडळ येथील भरती मध्ये परीक्षा केंद्रावर अनुचित प्रकार करणाऱ्या उमेदवारांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
  • दिल्ली अधीनस्थ सेवा निवड मंडळ यांच्याद्वारे सदरील भरतीच्या परीक्षा केंद्र ठरवण्यात येईल. उमेदवाराने दिलेल्या वेळेमध्ये परीक्षा केंद्रावर उपस्थित राहणे आवश्यक आहे.
  • सदरील भरतीसाठी आवश्यक अभ्यासक्रम दिल्ली अधीनस्थ सेवा निवड मंडळ यांच्या संकेतस्थळावर दिलेला आहे उमेदवारांनी संकेतस्थळ काळजीपूर्वक वाचावे.
[ DSSSB Bharti 2024 ] दिल्ली अधीनस्थ सेवा निवड मंडळ येथील भारतीय संदर्भात अधिक माहिती खालील प्रमाणे.
  • सदरील भरतीसाठी उमेदवाराने पोस्टाद्वारे केलेले अर्ज किंवा समक्ष पत्त्यावर उपस्थित राहून केलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
  • सदरील भरती मधील पदाचे नाव, रिक्त पदे, शैक्षणिक पात्रता, अनुभव, वेतन, वय मर्यादा यासंदर्भातील संपूर्ण माहिती जाहिरातीमध्ये दिलेली आहे.
  • आंधळेपणा, डोळ्यांनी कमी दिसणे, बहिरेपणा, कानाने कमी ऐकू येणे, ऍसिड अटॅक, लोकोमोटर डिसेबिलिटी, ऑटिझम, इंटेलेक्चुअल डिसेबिलिटी, मेंटल इलनेस , मल्टिपल डिसेबिलिटी या सर्व प्रकारांच्या उमेदवारांना अपंगत्व म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. आशा उमेदवारांकरिता भरती मध्ये वैयक्तिक तरतूद केलेली आहे.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करणारा उमेदवार भारताचा नागरिक असणे आवश्यक आहे.
  • शैक्षणिक पात्रता, वय मर्यादा, अनुभव यांसाठी दिलेल्या अटींमध्ये उमेदवार पात्र ठरला पाहिजे. तरच उमेदवारांनी अर्ज करावा.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी DSSSB च्या पोर्टल वरती रजिस्ट्रेशन करायचे आहे. रजिस्ट्रेशन करण्यासाठी उमेदवारांनी https://dsssbonline.nic.in/ या वेबसाईटवर जाऊन रजिस्ट्रेशन करायचे आहे.
  • सदरील भरतीसाठी [ DSSSB Bharti 2024 ]  रजिस्ट्रेशन करण्याची पद्धत Annexure – 1 मध्ये दिलेली आहे. सदरील भरतीसाठी केलेले रजिस्ट्रेशन एकदाच करायचे आहे. रजिस्ट्रेशन करताना तयार केलेला युजरनेम आणि पासवर्ड उमेदवारांनी इथून पुढे अर्ज भरण्यासाठी लॉगिन करण्याकरिता वापरायचा आहे. जर उमेदवाराने एकापेक्षा जास्त रजिस्ट्रेशन केलेली असेल. आणि परीक्षा देताना लक्षात आल्यानंतर उमेदवाराचा अर्ज रद्द करण्यात येईल.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी 20 मार्च 2024 पासून ऑनलाइन पद्धतीने https://dsssbonline.nic.in/ या वेबसाईट द्वारे अर्ज करायचा आहे.
  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याचे नियम उमेदवारांनी काळजीपूर्वक जाहिरातीमधून वाचावेत आणि त्यानंतरच अर्ज करायला सुरुवात करावी.
  • ऑनलाइन अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी वेबसाईट वरती जास्त लोड आल्यामुळे तांत्रिक अडचणींमुळे अर्ज भरला जाऊ शकत नाही. त्यामुळे उमेदवारांनी अशा प्रकारच्या धोका टाळण्याकरिता अर्ज भरायला सुरू झाल्यापासूनच अर्ज करायला सुरुवात करावी.
  • भरती मध्ये रिक्त पदांच्या जागा कमी जास्त करण्याचा किंवा भरती मध्ये बदल करण्याचा किंवा भरती रद्द करण्याचा पूर्णपणे अधिकार दिल्ली अधीनस्थ सेवा निवड मंडळ यांच्याकडे आहे.
  • सदरील भरती मध्ये निवड होण्यासाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षांचे पेपर चे रीचेकिंग करणे किंवा रीवल्युएशन करणे यांसारखी कोणतेही सुविधा देण्यात आलेली नाही. याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
  • स्किल टेस्ट, ड्रायव्हिंग टेस्ट पदानुसार या टेस्ट घेण्याचा अधिकार दिल्ली अधीनस्थ सेवा निवड मंडळ यांच्याकडे आहे.
  • जर सदरील भरती मध्ये एखादा प्रश्न चुकीचा विचारला गेलेला असेल. तर तो प्रश्न रद्द केला जाईल आणि इतर प्रश्नांमध्ये उमेदवारांनी किती गुण मिळवले आहेत त्याचे मूल्यांकन केले जाईल.
  • सदरील भरती मधून योग्य उमेदवाराची निवड करण्याचा पूर्णपणे अधिकार दिल्ली सेवा निवड मंडळ या संस्थे आहे.
  • सदरील भरती साठी कट ऑफ ठरवण्याचा अधिकार दिल्ली सेवा निवड मंडळ यांच्याकडे राहील.
  • इतर प्रवर्गातील उमेदवारांकरिता कट ऑफ वाढू शकतो कारण इतर प्रवर्गामध्ये रिक्त असणाऱ्या जागा आणि त्यानुसार उमेदवारांनी केलेले अर्ज आणि त्यांना मिळालेले गुण यातून कट ऑफ ठरवला जाईल.
  • सदरील भरती मध्ये दोन किंवा त्यापेक्षा अधिक उमेदवारांना जर समान गुण मिळाले तर अशा उमेदवारांमधून ज्या उमेदवारांचे वय जास्त आहे आशा उमेदवारांची निवड केली जाईल. जा उमेदवारांची जन्मतारीख समान आहे आशा उमेदवारांमधून अल्फाबेट प्रमाणे निवड करण्यात येईल.

[ DSSSB Bharti 2024 ] भारतातील आणि महाराष्ट्रातील पब्लिक सेक्टर मधील संस्थांमध्ये रिक्त पदांसाठी निघालेल्या भरत्या यांची माहिती मिळवण्याकरिता नोकरी 1st या वेबसाईटला नक्की भेट द्या. भेट घेण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a Comment