[ HDFC Bank Bharti 2024 ] HDFC बँक येथे भरती.

[ HDFC Bank Bharti 2024 ] HDFC बँक येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात HDFC बँक यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदरील भरती करिता अर्ज भरायला 9 एप्रिल 2024 पासून सुरुवात करण्यात आलेली आहे. 30 मे 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. डाटा एन्ट्री ऑपरेटर या पदासाठी सदरील भरती होणार आहे. या भरती करिता उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. ज्या पात्रता धारक उमेदवाराला सदरील भरती करिता अर्ज करायचा आहे त्यांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात.

HDFC Bank Bharti 2024

  • HDFC बँक येथील भरतीसाठी 45 जागा रिक्त आहेत.
  • HDFC बँक येथील भरती डाटा एन्ट्री ऑपरेटर या पदासाठी होणार आहे.

[ HDFC Bank Bharti 2024 ] HDFC बँक येथील भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि वयाची अट खालील प्रमाणे.

  • सदरील भरतीसाठी अर्ज करणारा उमेदवार कमीत कमी 12 वी पास असावा. त्याचप्रमाणे उमेदवाराकडे डाटा एन्ट्री, केवायसी वेरिफिकेशन, बँकिंग, पिन, ऑपरेटर, बिहेवियर या सर्व स्किल्स असणे आवश्यक आहे.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 वर्षे 33 वर्षापर्यंत असावेत. भरतीसाठी अर्ज करणारा उमेदवार 8 एप्रिल 1994 ते 08 एप्रिल 2004 या कालावधीमध्ये जन्मलेला असावा.
  • HDFC बँक येथील भरती मध्ये पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवाराला प्रतिमहा 14,500 रुपये ते 28,000 रुपये इतका पगार असावा.
  • HDFC बँक येथील भरती मध्ये पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत असेल.
  • सदरील भरतीसाठी परीक्षा शुल्क पाहण्यासाठी उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • HDFC बँक यांच्या अधिकृत संकेतस्थळाद्वारे उमेदवारांनी अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.
  • HDFC बँक यांच्या द्वारे 30 मे 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख देण्यात आलेली आहे.
  • HDFC बँक यांच्या भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी HDFC बँक यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
  • HDFC बँक यांच्या कडून अर्ज भरण्यासाठी ऑनलाइन लिंक देण्यात आलेली आहे त्याच्याद्वारे उमेदवारांनी अर्ज करायचा आहे. अर्ज करा.

[ HDFC Bank Bharti 2024 ] HDFC बँक येथील भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खालील सूचना वाचाव्यात.

  • HDFC बँक येथील भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याची कोणतीही पद्धत HDFC बँक यांच्याकडून देण्यात आलेली नाही. त्यामुळे उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू नयेत.
  • सदरील भरती करिता ऑनलाइन पद्धतीने अर्ज करत असताना उमेदवाराकडून स्वतःची वैयक्तिक माहिती भरताना काही चूक झाल्यास आणि अर्ज रद्द करण्यात आल्यावर त्यास HDFC बँक जबाबदार राहणार नाही.
  • 30 मे 2024 ही वरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख HDFC बँक यांच्याकडून देण्यात आलेली आहे.
  • HDFC बँक येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी संस्थे कडून प्रसिद्ध करण्यात आलेले जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

[ HDFC Bank Bharti 2024 ] HDFC बँक येथील भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांनी खालील सूचना वाचाव्यात.

  • HDFC बँक येथील भरतीसाठी अर्ज केलेले उमेदवार भरतीसाठी पात्र असतील. इतर उमेदवारांना भरती मध्ये सहभागी होता येणार नाही.
  • HDFC बँक यांच्याकडून उमेदवाराला कोणत्याही प्रकारचा TA/DA देण्यात येणार नाही. याची सर्व उमेदवारांनी दक्षता घ्यावी.
  • सदरील भरतीच्या प्रक्रियेमध्ये कोणत्याही उमेदवारा द्वारे अनुचित प्रकार करण्यात आला तर त्या उमेदवारावर HDFC बँक यांच्याकडून कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
  • सदरील भरतीची परीक्षा केंद्र हे HDFC बँक यांच्याकडून ठरवण्यात येईल. त्यामुळे उमेदवारांनी दिलेल्या वेळेमध्ये परीक्षा केंद्रावर हजर राहावे.
  • सदरील भरतीसाठी आवश्यक स्किल आणि संपूर्ण माहिती HDFC बँकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
[ HDFC Bank Bharti 2024 ] HDFC बँक येथील भरतीसाठी महत्त्वाची माहिती खालील प्रमाणे.
  • सदरील भरती संदर्भात अधिक माहिती मिळवण्यासाठी उमेदवारांनी HR PRIYA – 9907049767 यांना संपर्क साधायचा आहे.
  • सदरील भरती करिता अर्ज करण्याकरिता उमेदवारांनी जाहिरातीमध्ये दिलेल्या लिंक वरती क्लिक करायचे आहे.
  • यानंतर नॅशनल करियर सर्विसेस चे संकेतस्थळ ओपन होईल. यामध्ये उमेदवाराला लोगिन करण्याकरिता डिटेल्स विचारले जातील.
  • जर उमेदवाराने याआधी रजिस्ट्रेशन केलेले असेल तर त्याने लॉगिन करून अर्ज भरायला सुरुवात करायची आहे. जर या अगोदर रजिस्ट्रेशन केलेले तर अशा उमेदवारांनी रजिस्ट्रेशन करण्याकरिता न्यू यूजर ऑप्शन वरती क्लिक करायचा आहे.
  • यानंतर उमेदवारांसमोर रजिस्ट्रेशन चा फॉर्म येईल . यानंतर रजिस्टर एज चा ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर उमेदवाराला समोर जॉब सीकर, एम्प्लॉयर, स्किल प्रोव्हायडर, काउंसलर, प्लेसमेंट ऑर्गनायझेशन, गव्हर्मेंट डिपारमेंट यांसारखे ऑप्शन येतील. यामधील जॉब सीकर हा पर्याय आहे उमेदवारांनी निवडायचा आहे.
  • यानंतर उमेदवाराने युनिक आयडेंटिफिकेशन टाईप निवडायचे आहे. यामध्ये UAN Number, E – Shram, पॅन कार्ड, मोबाईल नंबर यापैकी उमेदवारांनी योग्य तो पर्याय निवडायचा आहे.
  • यानंतर उमेदवाराने जन्म तारीख टाकून चेक या पर्यायावर क्लिक करायचा आहे.
  • यानंतर उमेदवारांसमोर रजिस्ट्रेशन फॉर्म येईल. उमेदवाराने भरायचा आहे. यामध्ये उमेदवाराने फर्स्ट नेम, लास्ट नेम, मिडल नेम लिहायचे आहे. यानंतर जेंडर मेल, फीमेल, ट्रांसजेंडर यापैकी पर्याय निवडायचा आहे.
  • यानंतर उमेदवाराने राज्य निवडायचे आहे. उमेदवाराने स्वतःच्या पालकाचे नाव किंवा वडिलांचे नाव लिहायचे आहे. उमेदवाराने आतापर्यंत मिळवलेली सर्वात मोठी शैक्षणिक पदवी निवडायची आहे.
  • यानंतर उमेदवाराने स्वतःचा ई-मेल आयडी लिहायचा आहे. स्वतःचा संपूर्ण मोबाईल नंबर लिहिल्यानंतर. उमेदवाराने पासवर्ड क्रिएट करायचा आहे. तयार केलेला पासवर्ड रि एंटर करायचा आहे.
  • यानंतर उमेदवाराने युजरनेम निवडायचे आहे. यानंतर उमेदवाराने स्वतःचा एम्प्लॉयमेंट स्टेटस निवडायचा आहे. यानंतर उमेदवाराने स्वतःजवळ असणारे कमीत कमी पाच स्किल लिहायचे आहेत.
  • यानंतर उमेदवाराला तुम्ही इंटरनॅशनल जॉब मध्ये इंटरेस्टेड आहेत का ? असा प्रश्न विचारला जाईल उमेदवाराने त्याचे उत्तर हो किंवा नाही मध्ये द्यायचे आहे.
  • यानंतर उमेदवाराने स्वतःचे ऑक्युपेशन निवडायचे आहे. त्यानंतर सिक्युरिटी कोड लिहायचा आहे आणि टर्म्स आणि कंडिशन ॲग्री करून अर्ज सबमिट करायचा आहे.
[ HDFC Bank Bharti 2024 ] HDFC बँक संदर्भात अधिक माहिती खालील प्रमाणे.

HDFC बँक ही भारतातील बँकिंग आणि फायनान्शियल सर्विस देणारी कंपनी आहे. या बँकेचे हेडकॉटर मुंबई येथे आहे. ही भारतातील प्रायव्हेट सेक्टर मधील सर्वात मोठी बँक आहे. जानेवारी 2024 च्या रिपोर्ट नुसार HDFC बँक ही जगातील सहाव्या क्रमांकाची बँक आहे. या बँकेचे मार्केट कॅपिटल लायसन $145 बिलियन इतके आहे. भारतीय शेअर मार्केट मधील तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी कंपनी.

HDFC बँक चे आज एकूण 8,192 शाखा आहेत. त्याचप्रमाणे 20,760 एटीएम बँकेद्वारे उपलब्ध करून दिलेले आहेत. 3836 शहर आणि गावांमध्ये ही बँक आतापर्यंत पोहोचलेली आहे. 737 लोकेशन आणि 214 कार्यालय HDFC सेल्स प्रायव्हेट लिमिटेडच्या अंतर्गत येतात. लक्षद्वीप बेटावरती सुद्धा सदरील बँकेचे ऑफिस आहे.

होलसेल बँकिंग, रिटेल बँकिंग, ऑटो लोण, टू व्हीलर लोन, पर्सनल लोन, तारण लोन, क्रेडिट कार्ड यांसारख्या सुविधा HDFC बँक यांच्याकडून देण्यात येतात. फेब्रुवारी 2000 रोजी HDFC बँक टाइम्स बँक मध्ये संलग्न झालेली आहे. 2008 रोजी सेंतुरियन बँक ऑफ पंजाब ही बँक HDFC बँकेकडून खरेदी करण्यात आली. 95 बिलियन रुपये मध्ये ही बँक खरेदी करण्यात आलेली आहे.

सप्टेंबर 2021 मध्ये कंपनीने पेटीएम सोबत करार करून मोठ्या प्रमाणात क्रेडिट कार्ड आणि विजा कार्ड बाजारामध्ये उतरवले. 4 एप्रिल 2022 रोजी हाउसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन या संस्थेशी एचडीएफसी बँक संलग्न झालेली आहे. यानंतर एचडीएफसी बँक ही जगातील चौथ्या क्रमांकाची मार्केट कॅपिटल असणारी बँक बनलेली आहे. मार्च 2020 मध्ये एचडीएफसी बँक ने येस बँक मध्ये 10 बिलियन रुपये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे.

एचडीएफसी बँकेचे शेअर्स भारतीय शेअर बाजारात बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज यांच्याद्वारे उतरवण्यात आलेले आहेत. अमेरिकेमधील न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंज मध्ये सुद्धा एचडीएफसी बँक चे शेअर्स जेपी मॉर्गन कंपनीद्वारे उतरवण्यात आले आहे.

30 सप्टेंबर 2023 रोजी मिळालेल्या माहितीनुसार एचडीएफसी बँक मधील गुंतवणूकदार फॉरेन इन्व्हेस्टर 52.13 % आहेत. वैयक्तिक शेअर होल्डर 13.66% आहेत. इन्स्टिट्यूशन इन्वेस्टर 30.6 % आहेत. म्युच्युअल फंड इन्वेस्टर 19.71% आहेत. एलआयसी सह इतर इन्शुरन्स कंपनी 8.74% आहेत. एचडीएफसीच्या पेन्शन मॅनेजमेंट स्कीम द्वारे 1.5% शेअर होल्डर आहेत. राज्य आणि केंद्र सरकारद्वारे 0.001 % शेअर खरेदी केलेले आहेत.

2016 मध्ये ग्लोबल बँक मॅक्झिम द्वारे एचडीएफसी बँक ला बेस्ट बँकिंग परफॉर्मर म्हणून अवॉर्ड देण्यात आलेला आहे. 2016 मध्ये नाबार्ड द्वारे एचडीएफसी बँक ला बेस्ट मायक्रो फायनान्स परफॉर्मर म्हणून अवॉर्ड देण्यात आलेला आहे. KPMG स्टडी यांच्याद्वारे बेस्ट बँक, बँक ऑफ द इयर, बेस्ट बँकिंग इन डिजिटल इनोव्हेशन हे अवॉर्ड 2016 मध्ये दिलेले आहेत. जेपी मॉर्गन या संस्थे कडून क्वालिटी रेकग्निशन अवॉर्ड एचडीएफसी बँक ला मिळालेला आहे. 2018 रोजी द इकॉनॉमिक टाइम्स यांच्याकडून कंपनी ऑफ द इयर हा अवॉर्ड मिळालेला आहे.

एचडीएफसी बँकेची स्थापना ऑगस्ट 1994 रोजी झालेली आहे. आज बँकेला 29 वर्ष पूर्ण झालेले आहेत. कंपनीचे मुख्य कार्यालय मुंबई येथे आहे. अथानु चक्रवर्ती हे बँकेचे चेअरमन आहेत. तर शशिधर जगदीशन हे या बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. या बँके द्वारे दरवर्षी 2 लाख कोटी रेवेन्यू केला जातो. 2023 वर्षाचे उत्पन्न 615 बिलियन रुपये इतके झालेले आहे. सदरील बँकेचे टोटल मालमत्ता 25 लाख कोटी इतकी आहे.

एचडीएफसी लाइफ, एचडीएफसी ERGO, एचडीएफसी सिक्युरिटीज, एचडीएफसी Asset मॅनेजमेंट कंपनी, एचडीएफसी म्युच्युअल फंड, एचडीएफसी फायनान्शियल सर्व्हिसेस या एचडीएफसी बँकेच्या उप कंपन्या आहेत.

एचडीएफसी बँक संदर्भात अधिक माहिती मिळवण्याकरिता उमेदवारांनी https://www.hdfcbank.com/ या संकेतस्थळाला भेट द्यायचे आहे. रिस्क मॅनेजमेंट, स्टॉक ब्रोकिंग, वेल्थ मॅनेजमेंट, इंडेक्स फंड, म्युच्युअल फंड, एक्सचेंज ट्रेडेड फंड, खाजगी बँकिंग, सुवर्ण लोन, घर खरेदी लोन यांसारख्या सुविधा सुद्धा एचडीएफसी बँक कडून दिल्या जातात.

[ HDFC Bank Bharti 2024 ] भारतातील आणि महाराष्ट्रातील बँकिंग क्षेत्रामधील निघालेल्या भरती संदर्भात अधिक माहिती मिळवण्यासाठी आमच्या नोकरी फस्ट या वेबसाईटला नक्की भेट द्या. भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

 

Leave a Comment