[ Standard Oil and Rockefeller ] स्टॅंडर्ड ऑइल आणि रॉकफेलर

[ Standard Oil and Rockefeller ] स्टॅंडर्ड ऑइल आणि रॉकफेलर यांची यशोगाथा.

[ Standard oil and Rockefeller ] आजच्या किमतीनुसार 15,000 कोटी डॉलर्स इतकी संपत्ती असलेला जॉन डेव्हिडसन रॉकफेलर हा इतिहासातील सर्वात श्रीमंत माणूस समजला जायचा. रॉकफेलर याने तयार केलेलं स्टॅंडर्ड ऑइल हे फक्त अमेरिकेतच नव्हे तर संपूर्ण जगाच्या बाजारपेठांवर ती राज्य करत होतं. जॉन डेव्हिडसन रॉकफेलर हा कधी कोणाशी स्पर्धा करत नसत आणि त्याचा स्पर्धेवर विश्वासही नव्हता. सर्व मार्ग वापरून त्याने प्रतिस्पर्धी असणाऱ्या लहान मोठ्या कंपन्या विकत घेतल्या होत्या. आणि स्वतःची मोठी मक्तेदारी निर्माण केली होती.

त्याचा असा स्वभाव हा त्याच्या लहानपणी घडलेल्या घटनांमुळे निर्माण झालेला असावा. कारण त्याचे वडील त्याला कोठेही फिरायला घेऊन जात नसत. आणि किरकोळ कारणावरून त्याला मारहाण करत होते. पुढे जाऊन त्यांची मुले व्यावहारिक आयुष्यात टिकून राहावी यासाठी त्याचे वडील मुलांना मारहाण करत होते. त्यांचे वडील हे बाजारात फसव्या योजना राबवत होते. या फसव्या योजनातून त्यांनी जनतेकडून बरेच पैसे उकळले होते. एकदा तर त्यांनी सर्व प्रकारचे कर्करोग बरे करून देतो असे आव्हान देत लोकांकडून मोठ्या प्रमाणात पैसे उकळले. त्याच्या वडिलांनी पहिले लग्न न मोडता दुसरे लग्न केले. आणि नंतर पहिला बायकोला आणि मुलांना घराबाहेर काढलं.

[ Standard oil and Rockefeller ] क्लिव्हलँड या शहरांमधील एका वस्तीगृहात जॉन रॉकफेलर हा राहत होता . त्याला त्यावेळेस पैशाची गरज भासत त्यावेळेस तो वडिलांकडून व्याजाने पैसे घेत. त्याचे वडील व्याज म्हणून 10% रक्कम आकारात होते. उलट कधीकधी त्याच्याकडून मूर्तीच्या आधीच पैसे माघारी मागत. असे केल्याने जॉन मजबूत होईल असे त्याच्या वडिलांचे म्हणणे होते. जॉन याला सतत आपण काहीतरी नवनिर्माण करावे असे वाटत होते. पण नक्की काय करायचं? हे अजून काही ठरलं नव्हतं. त्याने काही काळे का कंपनीत अकाउंटंट म्हणून काम केलं. त्यानंतर तो वेगवेगळ्या वस्तूंच्या व्यापारात उतरला. त्यातून त्याने बऱ्यापैकी पैसे कमावले.

[ Standard Oil and Rockefeller ] रॉकफेलर यांनी आजपर्यंत केलेली व्यवसाय.

[ Standard oil and Rockefeller ] आता त्याने वस्तूच्या व्यापाराबरोबरच तेलाचा व्यापार करायला ही सुरुवात केली होती. खनिज तेलापासून रॉकेल बनवण्याची पद्धत सॅम्युअल अँड्रूज या व्यक्तीने शोधून काढलेली होती. पेन्सिल वेनिया येथील भूगर्भात त्याकाळी मोठ्या प्रमाणात खनिज तेल होते. त्या ठिकाणी खनिज तेलाचा मोठ्या प्रमाणात साठा आहे हे जेव्हा लोकांना समजले त्यावेळेस पेन्सिल वेनिया या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली लोकांनी दिसेल तिथे जमीन उत्खनन करून तेल शोधायला सुरुवात केली. तेलाचे नवीन नवीन साठे लोकांना सापडू लागले. पहिल्या टप्प्यात 50 विहिरी खोदण्यात आल्या. पुढे वर्षाच्या आतच या विहिरींची संख्या 100 झाली.

बाजारात तेल विक्री जास्त झाल्यामुळे परिणामी तेलाची किंमत ढासळली. जानेवारी 1861 रोजी एका बॅरल ची किंमत 10 डॉलर इतकी होती ती किंमत ढासळून जून पर्यंत फक्त 50 सेंट्स पर्यंत आली आणि डिसेंबर मध्ये तर चक्क 10 सेंट वरती आली. पण नंतर मागणी वाढल्यानंतर खनिज तेलाचे भाव ही वाढायला लागले. या खनिज तेल वरती प्रक्रिया करण्यासाठी आता रिफायनरी ची गरज होती. तीन वर्षात जवळपास लहान-मोठ्या वीस रिफायनरी तेथे उभा राहिल्या होत्या. यामुळे मागणीही वाढली आणि उत्पादनही वाढले. 1859 रोजी एकूण उत्पन्न 5 लाख बॅरेल होते ते वाढून 1862 रोजी 30 लाख बॅरेल इतकं झालं. पुढे जाऊन 1871 रोजी उत्पन्न 55 बॅरेल एवढे झाले. पण किमतीमध्ये होत असणारी सततची घसरण यामुळे बऱ्याच रिफायनरी तोट्या मध्ये जाऊ लागल्या.

[ Standard Oil and Rockefeller ] कच्च्या तेलावर प्रक्रिया करण्याचा उद्योग सुरू.

[ Standard oil and Rockefeller ] जॉन रॉकफेलर याला क्रूड ऑइल वरती प्रक्रिया करण्यात म्हणजेच रिफायनरी व्यवसायात रस होता. पण लहान रिफायनरी जर काढली तर इतरांसारखे आपल्यालाही तोटा सहन करावा लागेल. त्यामुळे त्याने सर्व रिफायनरी एकत्र करून आपली स्वतःची एक रिफायनरी तयार करण्याचा निर्णय घेतला. कारण जेवढे जास्त तेल रिफाइन होईल तेवढा रिफायनरी चा खर्च कमी होईल.

कमी तेल रिफाइंड करण्यासाठी जास्त खर्च लागत होता. त्याने त्याच्या चार ते पाच साथीदाराबरोबर मिळून एक कंपनी सुरू केली. ही कंपनी काही काळ चांगली चालली. पण स्वतःच्या तत्त्वाशी प्रामाणिक असणाऱ्या जॉन ला तेल किंवा पैसा वाया घालवणे पसंत नव्हते. त्यामुळे त्याचे आपल्या पार्टनर बरोबर पटत नव्हते.

कंपनीला वाढवण्यासाठी कर्जाची आवश्यकता होती. त्यामुळे कर्ज घेण्याच्या कारणावरून जॉनचे आणि त्यांच्या साथीदाराचे खटके उडाले. शेवटी वाद इतका विकोपाला गेला की त्यांनी कंपनी विकायचा निर्णय घेतला. यामध्ये त्यांनी आपल्यापैकीच एकाने कोणीतरी मालकी हक्क घ्यावा असे सांगितले. मग निलाव पद्धतीने कंपनी जॉन रॉकफेलर याने विकत घेतली. या कंपनीचे नाव पुढे ‘ रॉकफेलर अँड अँड्रूज’ असे झाले.

आता त्याने आणखी कर्जदार गाठून 10 लाख डॉलर्स भांडवल गोळा केलं. आणि जेवढ्या लहान लहान रिफायनरी होत्या त्या विकत घ्यायला सुरुवात केली. आणि ‘ स्टॅंडर्ड ऑइल’ नावाची एक नवीन कंपनी काढली. त्यानंतर त्याने मार्केटमध्ये एक नवीन स्कीम आणली त्याचं नाव होतं ” साउथ इम्प्रोवमेंट स्कीम” या स्कीम काम होतं की लहान मोठ्या रिफायनरी ला एकत्र करून एक मोठी मक्तेदारी निर्माण करायची. आणि मग काहींना पैसे देऊन तर काहींना धाक दाखवून या स्कीममध्ये जोडलं. अशा बऱ्याच स्पर्धकांना रॉकफेलर ने स्टॅंडर्ड ऑइल च्या मक्तेदारी खाली घेतलं. यामुळे त्याचा उत्पादनातील बराच खर्च कमी झाला होता.

एकदा जॉन रॉकफेलर कंपनीतल्या वेल्डिंग करणाऱ्या कामगारांची पाहत होता. त्यावेळेस त्याने त्याला प्रश्न विचारला की वेल्डिंग करताना तू सोल्डर चे किती थेंब वापरतोस? त्यावेळेस त्याने सांगितले 40 थेंब वापरतो. मग रॉकफेलर ने लगेच त्याला इथून पुढे 38 थेंब वापरायला सांगितले. यामुळे कंपनीचे हजारो डॉलर्स वाचायला लागले.

[ Standard Oil and Rockefeller ] रॉकफेलर यांचे व्यवसायात असणारे लक्ष.

कंपनीतील वेगवेगळ्या अकाउंट वरून पैसे कोठे खर्च झालेले आहेत याच्यावर रॉकफेलर ची नजर असायची. विनाकारण कोठे पैसे खर्च होत असतील तर ते त्याला मुळीच खपत नव्हते. वायफळ खर्च करू नये असा तो अधिकाऱ्यांना दमच देत असे.

अधिकारी निवडताना तो खूप दक्षता घेई. त्यांना शिकवताना ही तो काळजीपूर्वक शिकवत. एकदा अधिकाऱ्याला काम समजून सांगितले की तो सर्व काम त्या अधिकाऱ्यावर सोपवून देत असत. एखाद्या गोष्टीबाबत निर्णय घ्यायचा असेल तर तो सर्व अधिकाऱ्यांना मॅनेजर यांना एकत्र बोलून एकमताने निर्णय घेत. निर्णय घेण्याची ही पद्धत पुढे तशीच स्टॅंडर्ड ओईल या कंपनीत राहिली.

[ Standard oil and Rockefeller ] जॉन रॉकफेलर याच्या बुद्धीने आणि नियोजनामुळे कंपनीची उत्पादन क्षमता आणि नफा दोन्ही गोष्टी खूप मोठ्या प्रमाणात वाढल्या. स्टॅंडर्ड ऑइल चा व्यतिरिक्त असणाऱ्या जवळपास सर्व रिफायनरी या तोट्या मध्ये चालत होत्या. तुम्ही आम्हाला येऊन मिळाला तर ठीक नाहीतर आम्ही तुम्हाला चिरडून टाकू असे रॉकफेलर चे म्हणणे होते. त्यामुळे सर्व लहान लहान रिफायनरी ” साउथ इम्प्रोवमेंट स्कीम” मध्ये सामील होऊ लागल्या.

[ Standard Oil and Rockefeller ] तेलाच्या देवाणघेवाणीसाठी रेल्वेचा वापर.

त्याकाळी रेल्वेने ऑइल ची देवाणघेवाण केली जात होती. याकरिता रेल्वेच्या चार कंपन्या उपलब्ध होत्या. त्या चार ही कंपन्या एकमेकांच्या प्रतिस्पर्धी असल्यामुळे त्यांच्यात मोठ्या प्रमाणात स्पर्धा चालत होती. साउथ इम्प्रोवमेंट स्कीम द्वारे या कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाटाघाटी करून बराच डिस्काउंट मिळवला जाई. डिस्काउंट मिळवण्याच्या नादात ते रेल्वे कंपन्यांना कधीकधी मोठमोठी आश्वासने देतात. आणि ती पूर्ण न झाल्यामुळे रेल्वे कंपन्यांच्या आणि साउथ इम्प्रोवमेंट स्कीम यांच्यात वाद होत असत.

त्यात त्या दोघांच्यात होणारा करार हात तोंडी असल्यामुळे हे वाद आणखीनच वाढत. त्याकाळी एम्पायर आणि पेन हे दोन्हीही रॉकफेलर ला शरण जात नव्हते. त्यांनी रॉकफेलर बरोबर स्पर्धा करण्याचे ठरवले होते. वारंवार विनंती करूनही ते रॉकफेलर ला शरण गेले नाहीत. शेवटी जॉन रॉकफेलर याने पेन सोबत करत असलेला तेल वाहतुकीचा व्यवसाय बंद केला. आणि स्वतःचा रिफायनरी हलवल्या. यामुळे एम्पायर आणि पेन दोघांनाही स्टॅंडर्ड ऑइल ला शरण जावं लागलं.

प्रतिस्पर्धी मंडळींनी स्टॅंडर्ड कंपनीच्या त्रासाला कंटाळून. रिफायनरी पासून पाईपलाईन थेट बंदरापर्यंत केली. हे ज्यावेळेस स्टॅंडर्ड कंपनीच्या लक्षात आले त्यावेळेस त्यांनी पाईपलाईन ज्या जागेतून जात आहे अशी सर्व शेती विकत घेतली. त्यामुळे या कंपन्या शरण आल्या. आता त्या केलेल्या पाईप लाईन स्टॅंडर्ड कंपनीने विकत घेतल्या. असे केल्यामुळे खनिज तेलाचे होणारे नुकसान वाचले.

Standard oil and Rockefeller

[ Standard oil and Rockefeller ] स्टॅंडर्ड ऑइल या कंपनीच्या मनमानी कारभाराला कंटाळून अमेरिकन सरकारने ” अँटी ट्रस्ट” हा कायदा बनवला. त्यानुसार स्टॅंडर्ड ऑइल या कंपनीचे 38 तुकडे करण्यात आले. या सगळ्या तुकड्यांचे मूल्यमापन केले तर ते 50,000 कोटी डॉलर्स इतके होते. आज जगभरात तेलाचे उत्पादन करणाऱ्या सर्वात मोठा सात कंपन्यांना ” सेव्हन सिस्टर्स” असे संबोधले जाते. त्यामध्ये तीन कंपन्या हे स्टँडर्ड ऑइल मधून तयार झालेले आहेत. आज सेव्हन सिस्टर्स मध्ये एक ही कंपनी अमेरिकेची नाही. याचं कारण आहे की जॉन रॉकफेलर याने व्यवसायातून निवृत्ती घेतली.

23 मे 1937 रोजी जॉन रॉकफेलर यांचे वयाच्या 97 व्या वर्षी निधन झाले.

[ Good Year Tyers ] गुडईयर आणि टायर

Leave a Comment