[ Home Remedies for Tan Removal ] त्वचेवरील टॅनिंग रिमूव करण्यासाठी घरगुती उपाय.

[ Home Remedies for Tan Removal ] उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये सूर्याचा प्रभाव जास्त वाढत असतो. त्याचप्रमाणे थंडीच्या दिवसांमध्ये सुद्धा उन्हामध्ये बाहेर पडल्यानंतर सूर्याचा प्रभाव आपल्याला जाणवतो. सूर्याचे किरण त्वचेवर आल्यानंतर त्वचा काळवंडला सुरुवात होते यालाच स्किन टॅनिंग असे सुद्धा म्हणतात. स्किन टॅनिंग व्हायचे प्रमाण वेगवेगळ्या स्किन टाईप मध्ये वेगवेगळे आहे. सेंसिटिव स्किन टाईप मध्ये स्किन टॅनिंग मोठ्या प्रमाणात झालेली आढळते. बाजारात मिळणाऱ्या सन क्रीम चा उपयोग करून आपण स्किन टॅनिंग थांबवू शकतो. सूर्यापासून निघणार्‍या UV किरणांपासून स्किन टॅनिंग होत असते. बाजारात वेगवेगळे उपचार टॅनिंग कमी करण्यासाठी उपलब्ध आहेत.

[ Home Remedies for Tan Removal ] टॅनिंग वरती व्यवस्थित उपचार घेतल्यानंतर लगेच बरे होते. त्याचप्रमाणे नवीन टॅनिंग होऊ नये म्हणून सनस्क्रीन चा उपयोग करणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे काही घरगुती उपचारांनी सुद्धा स्किन टॅनिंग बऱ्याच प्रमाणात कमी होते. आज आपण टॅनिंग कमी करण्यासाठी घरगुती उपचार पाहणार आहोत.

[ Home Remedies for Tan Removal ] स्किन टॅनिंग म्हणजे काय ?

[ Home Remedies for Tan Removal ] स्किन टॅनिंग ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. यामध्ये सूर्याच्या प्रखर किरणांमध्ये माणसाची त्वचा आल्यानंतर त्वचेतील मेलामिन चे प्रमाण वाढते आणि त्वचा काळी पडते. सूर्याच्या प्रखर किरणांपासून संरक्षण करण्याकरिता मानवी शरीर अशा प्रकारे काम करत असते. जेवढ्या जास्त वेळ तुम्ही सूर्याच्या प्रखर किरणांमध्ये थांबाल तेवढे जास्त आणि अधिक तीव्र तुमच्या शरीरावर टॅनिंग पडेल.

[ Home Remedies for Tan Removal ] स्किन टॅनिंगचे प्रकार खालील प्रमाणे

स्किन टॅनिंग चे एकूण मुख्य तीन प्रकार पडतात.

  1. विलंब टॅनिंग –  या टॅनिंग च्या प्रकारामध्ये उन्हामध्ये बाहेर फिरत असताना त्वचेवर सूर्याची प्रखर किरणे आल्यानंतर लगेच त्वचा काळी पडत नाही. यानंतर काही दिवसांनी त्वचेमध्ये मेलामिन तयार व्हायला सुरुवात होते आणि त्वचेचा रंग काळा दिसायला सुरुवात होतो. या प्रकारामध्ये काळी पडलेली त्वचा पुन्हा पहिल्यासारखी करायला खूप वेळ जातो.
  2. जलद टॅनिंग – उन्हात गेल्यानंतर सूर्याची किरणे थेट त्वचेवर आल्यानंतर त्वचा लगेच काळी पडते याच प्रकाराला जलद टॅनिंग असे म्हणतात. या प्रकारचे ट्रेनिंग तात्पुरत्या स्वरूपाची असते. रक्तवाहिन्यांमध्ये उन्हामुळे तात्पुरत्या स्वरूपात झालेल्या बदलामुळे त्वचा काळी पडते. अशा प्रकारच्या टॅनिंग वरती उपचार न करता सुद्धा काही दिवसात त्वचा पुन्हा पहिल्यासारखे होते.
  3. सतत टॅनिंग – सतत उन्हात काम करणाऱ्या किंवा लागोपाठ दोन-तीन दिवस उन्हामध्ये सूर्याच्या किरणांचा आणि त्वचेचा संपर्क आल्यानंतर त्वचा काळी पडायला सुरुवात होते. अशा प्रकारची झालेली स्किन टॅनिंग ठीक होण्यासाठी कमीत कमी एक आठवडा ते एक महिना पर्यंतचा कालावधी लागतो.

[ Home Remedies for Tan Removal ] चेहऱ्यावरील टॅनिंग कमी करण्याचे घरगुती उपाय खालीलप्रमाणे.

  1. लिंबाचा रस आणि मध यांचा उपयोग –लिंबाचा रस हा खूप जास्त ऍसिडिक असतो त्यामुळे थेट चेहऱ्यावरती लावणे टाळावे. उन्हामध्ये बाहेर जात असताना चेहऱ्यावरती लिंबाचा रस लावल्यानंतर चेहरा खूप जास्त काळा पडू शकतो. चेहऱ्यावरील टॅनिंग कमी करण्यासाठी दोन चमचे लिंबाचा रस आणि त्यामध्ये एक चमचा मध मिक्स करावा त्याचे व्यवस्थित मिश्रण बनवावे. बनवलेले मिश्रण चेहऱ्यावरती लावावे चेहऱ्यावरती लावल्यानंतर 30 मिनिट तसेच वाळत ठेवावे. सदरील मिश्रण चेहऱ्यावर लावल्यानंतर लक्षात ठेवावे की उन्हामध्ये जाऊ नये. त्यानंतर 30 मिनिटानंतर चेहरा थंड पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यावा. अधिक चांगला रिझल्ट दिसण्यासाठी या उपायाचा आठवड्यातून दोन वेळा उपयोग करावा.
  2. दही आणि डाळीच्या पिठाचा उपयोग – चेहऱ्यावरील स्किन टेनिंग कमी करण्यासाठी एक चमचा दही आणि एक चमचा डाळीचे पीठ एकत्र मिक्स करा. तयार झालेले मिश्रण एकजीव करा. आंघोळीला जाण्यापूर्वी संपूर्ण चेहऱ्यावर तयार केलेले मिश्रण एकसारखे लावून घ्या. आणि 20 मिनिट वाळण्यासाठी तसेच ठेवा. दह्यामध्ये प्रोबायोटिक, चांगले फॅट, लॅक्टिक ऍसिड चे प्रमाण असते ते चेहऱ्याला थंडावा देण्याचे काम करते त्याचप्रमाणे चेहरा हायड्रेट ठेवायचे काम करते. आणि डाळीचे पीठ चेहऱ्यावरती एक नवीन ग्लो आणण्याचे काम करते. ज्या व्यक्तींना चेहऱ्यावरील टॅनिंग कमी करायचे आहे अशा व्यक्तींनी या उपायाचा दोन आठवडे उपयोग करावा.
  3. टोमॅटो – बाजारात टोमॅटो लाल आणि हिरव्या कलर मध्ये आढळते. यापैकी लाल कलरची असणारे टोमॅटो खूप जास्त वापरले जाते. अन्नपदार्थात बरोबरच सौंदर्यप्रसाधनांमध्ये सुद्धा याचा उपयोग केला जातो. आज आपण घरगुती उपाय पाहणार आहोत त्यामध्ये लाल टोमॅटो चा उपयोग केलेला आहे. लाल टोमॅटो हे सूर्याची किरणे ब्लॉक करण्याचे काम करते आणि नॅचरल सन क्रीम सारखे काम करते. टोमॅटो मध्ये एंटीऑक्सीडेंट चे प्रमाण जास्त असते हे अँटिऑक्सिडंट फ्री रॅडिकल मुळे झालेले डॅमेज नीट करण्याचे काम करते. चेहऱ्यावरील लाल पणा, चेहऱ्यावरील काळपटपणा कमी करण्याचे काम टोमॅटो करते. टोमॅटो चेहऱ्यावर लावताना टोमॅटोचे लहान लहान तुकडे करून त्याचे मिश्रण बनवावे. बनवलेले मिश्रण चेहऱ्यावरती लावावे चेहऱ्यावरती लावल्यानंतर 20 ते 30 मिनिट वाळण्यासाठी ठेवावे. त्यानंतर चेहरा थंड पाण्याने धुऊन घ्यावा. यामुळे चेहऱ्यावरील स्किन टॅनिंग कमी होईल आणि चेहरा ग्लो करायला सुरुवात करेल.
  4. कोरफड –  आयुर्वेदामध्ये कोरफडीला औषधी वनस्पती असे म्हटलेले आहे. कोरफडी पासून बरीच सौंदर्यप्रसाधने तयार केली जातात. कोरफडीच्या गाभ्यामध्ये अत्यावश्यक घटक असतात. त्यामुळे चेहऱ्यावरील बऱ्याच समस्या कमी होतात. कोरफडीचा उपयोग चेहऱ्यावरील टॅनिंग कमी करण्यासाठी करताना कोरफडीचे पान स्वच्छ धुऊन घ्यावे. धुतलेल्या पानाची साल संपूर्ण काढावी आणि आतील गाभा कापून घ्यावा. कोरफडीच्या गाभ्याचे मिक्सरमध्ये जेल तयार करावे तयार केलेले जेल तुम्ही फ्रिजमध्ये ठेवून दोन आठवड्यापर्यंत वापरू शकता. तयार केलेले जेल चेहऱ्यावरती व्यवस्थित लावावे. लावल्यानंतर 30 मिनिट चेहरा वाळण्यासाठी ठेवावा. चेहरा वाळल्यानंतर कोमट पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यावा. असे आठवड्यातून तीन ते चार वेळा केल्यानंतर चेहऱ्यावरील टॅनिंग हळूहळू कमी व्हायला सुरुवात होते. जर तुम्हाला कोरफडीचे पान मिळत नसेल तर बाजारात कोरफडीचे जेल विकत मिळते. चांगल्या आणि विश्वासू कंपनीचे बघून तुम्ही खरेदी करू शकता.
  5. पपई – सौंदर्य प्रसाधनाची आधारलेल्या उद्योगांमध्ये पपईला एक अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. स्किन पिगमेंटेशन कमी करण्यासाठी पपईतील गाभ्याचा उपयोग आपण करू शकतो. हा उपयोग करत असताना पपईची फोड करून त्यातील गाभा चाकूच्या साह्याने बाजूला करून घ्यावा. मिक्सरमध्ये या गाभ्याचे मिश्रण करावे केलेले मिश्रण चेहऱ्यावर, मानेवर व्यवस्थित लावावे आणि वाळण्यासाठी तसेच ठेवावे मिश्रण पूर्णपणे वाळून झाल्यानंतर चेहरा स्वच्छ पाण्याने व्यवस्थित धुऊन घ्यावा.

[ Home Remedies for Tan Removal ] हातावरील स्किन टॅनिंग कमी करण्याचे घरगुती उपाय.

  1. दही आणि हळद – हातावरती झालेली टॅनिंग कमी करण्यासाठी दही आणि हळद यांचे मिश्रण करून आपण उपयोग करू शकतो. हे बनवण्यासाठी तुम्ही एका लहान बाऊलमध्ये दही घ्या आणि त्यामध्ये अर्धा चमचा हळद टाका दोन्ही एकत्र मिक्स करा. आंघोळ करण्यापूर्वी तयार केलेले मिश्रण हातावरती 20 मिनिट लावा त्यानंतर मिश्रण सुकल्यानंतर कोमट पाण्याने हात धुवून घ्या. टॅनिंग कमी करण्यासाठी कमीत कमी हा उपाय दोन आठवडे सतत करा. यामुळे तुम्हाला हातावरील पिगमेंटेशन मध्ये फरक जाणवेल.
  2. बटाटा – बऱ्याच जणांना बटाटा खाण्यासाठी आवडत नाही. त्यांनी सुद्धा आता आपल्या स्वयंपाक गृहामध्ये बटाटा आणून ठेवावा कारण याचा उपयोग हातावरील पिगमेंटेशन कमी करण्यासाठी केला जाऊ शकतो. Catecholase नावाचे एन्झाईम बटाट्यामध्ये उपलब्ध असते यामुळे त्वचेचा रंग उजळ होण्यास मदत होते. हातावरील टॅनिंग कमी करण्यासाठी तुम्हाला बटाट्याचा इतर कोणत्याही पदार्थांमध्ये मिश्रण बनवण्याची गरज नाही. बटाटा बारीक किसून किंवा मिक्सरमध्ये बारीक करून त्याची पेस्ट बनवावी बनवलेली पेस्ट हातावरती संपूर्ण लावावी. किंवा तुम्ही बटाट्याचे लहान-लहान तुकडे करून तसेच लावू शकता. 20 मिनिट बटाटे हातावरती तसेच ठेवावेत त्यानंतर हात स्वच्छ थंड पाण्याने धुऊन घ्यावा.
  3. डाळीचे पीठ आणि हळद – हळद ही खूप गुणकारी मानली जाते. खास करून जेव्हा तुम्हाला घरगुती उपाय तयार करायचे असतात. बऱ्याच घरगुती उपायांमध्ये हळदीचा उपयोग सांगितलेला असतो. या उपायांमध्ये तुम्हाला डाळीचे पीठ आणि हळद दुधामध्ये एकत्र मिक्स करून त्याची पेस्ट बनवायची आहे. बनवलेल्या पेस्टमध्ये थोडे गुलाब जल टाकायचे आहे. तयार झालेले मिश्रण झोपण्यापूर्वी 20 मिनिटे अगोदर हातावरती संपूर्ण लावावे. आणि दुसऱ्या दिवशी व्यवस्थित धुवावे. असे एक आठवडा केल्यानंतर तुम्हाला चांगले रिझल्ट दिसतील.
  4. बदाम –   तुम्ही वजन वाढण्यासाठी नक्कीच बदामाचा उपयोग केलेला असेल. पण याच बदामाचा उपयोग करून तुम्ही हातावरील टॅनिंग सुद्धा कमी करू शकता. याचा उपयोग करताना तुम्हाला बदाम एक दिवस अगोदर भिजत ठेवावे लागतील. भिजलेले बदाम दुसऱ्या दिवशी दुधामध्ये मिक्स करून मिक्सरमध्ये त्याची पेस्ट बनवावी लागेल. बनवलेली पेस्ट हातावरती लावावी मुळे हाताचे टॅनिंग कमी होण्यास मदत होईल. असे एक आठवडा सातत्याने केल्याने तुम्हाला चांगले रिझल्ट दिसतील.

[ Home Remedies for Tan Removal ] स्किन टॅनिंग होऊ नये म्हणून खालील उपाय करावेत.

Home Remedies for Tan Removal

  1. सन क्रीम चा उपयोग करणे – उन्हामध्ये जाण्यापूर्वी चेहऱ्याला आणि हाताला सन क्रीम वापरावी सन स्क्रीन वापरत असताना SPF 30 ची क्रीम किंवा त्यापेक्षा अधिक SPF असणारी क्रीम वापरावी. सकाळी एकदा सन क्रीम लावल्यानंतर तीन तासाच्या अंतरात पुन्हा परत सन स्क्रीन लावावी. यामुळे त्वचा आणि सूर्यकिरणे यांच्यामध्ये एक सुरक्षारक्षक कवच तयार होईल. आणि स्किन टॅनिंग होणार नाही. जर तुम्हाला पावडर लावायची असेल तर तुम्ही सन क्रीम लावल्यानंतर त्याच्यावरती लावू शकता.
  2. सनग्लासेस आणि फुल शर्ट वापरणे – सनग्लासेस घातल्यामुळे डोळे आणि डोळ्याच्या खालील भाग सूर्यकिरणांपासून बचावला जातो आणि त्यामुळे स्किन टॅनिंग त्या ठिकाणी होत नाही. त्याचप्रमाणे फुल बाह्यांचे शर्ट घातल्यामुळे हातावरती सूर्यकिरणांचा प्रभाव पडत नाही आणि हात टॅनिंग होत नाहीत. त्याचप्रमाणे आज-काल बाजारामध्ये महिलांसाठी सन कोट उपलब्ध आहेत त्याचा उपयोग केल्यामुळे सुद्धा सूर्याच्या किरणांपासून आपला बचाव होतो. आणि त्वचा टॅनिंग होत नाही.
  3. हॅट किंवा कॅप चा उपयोग करणे – उन्हामध्ये जाण्यापूर्वी डोक्यावरती हॅट किंवा कॅप घातल्यामुळे सूर्याची किरणे प्रखरतेने डोक्यावरती आणि चेहऱ्यावर ती लागत नाहीत यामुळे चेहरा टॅन होत नाही. आणि चेहरा काळा पडत नाही.
[ Standard Oil and Rockefeller ] स्टॅंडर्ड ऑइल आणि रॉकफेलर

Leave a Comment