[ ZP Kolhapur Bharti 2024 ] जिल्हा परिषद कोल्हापूर येथे भरती निघालेली आहे. सदरील भरतीची जाहिरात जिल्हा परिषद कोल्हापूर यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या भरती मधून 689 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. ग्रामविकास विभागाच्या विविध योजनांचा प्रचार आणि प्रसिद्धी करणे, विविध ग्रामपंचायत आणि पंचायत समितीच्या विभागांमध्ये डेटा एन्ट्री ऑपरेटर, ग्रामीण पाणीपुरवठा, बांधकाम विभागा कडील कामे यांसारख्या विविध कामांसाठी विविध उमेदवारांची निवड करण्यासाठी सदरील भरतीचे आयोजन केलेले आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची पद्धत आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच उमेदवारांना कळवण्यात येईल. जिल्हा परिषद कोल्हापूर येथील भरतीसाठी उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी.
बँकिंग कार्मिक चयन संस्था ( IBPS ) अंतर्गत भरती.
- [ ZP Kolhapur Bharti 2024 ] जिल्हा परिषद कोल्हापूर येथील भरती मधून 689 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
- जिल्हा परिषद कोल्हापूर येथील भरती मधून ग्रामविकास विभागाच्या विविध योजनांचा प्रचार आणि प्रसिद्धी करणे, विविध ग्रामपंचायत आणि पंचायत समितीच्या विभागांमध्ये डेटा एन्ट्री ऑपरेटर, ग्रामीण पाणीपुरवठा, बांधकाम विभागा कडील कामे यांसारखी कामे वेळेवर पूर्ण करण्याकरिता उमेदवारांची नेमणूक करण्यात येणार आहे.
- भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून 12 वी पास, डिप्लोमा उत्तीर्ण, पदवी उत्तीर्ण, पदव्युत्तर उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
- सदरील भरती मधील एकूण रिक्त जागांपैकी 72 लोकांची निवड जिल्हा परिषद कार्यालयात केली जाणार आहे.
- मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना अंतर्गत सदरील भरती आयोजित करण्यात आलेली आहे.
- सदरील भरतीसाठी इच्छुक असलेल्या युवक-युवतींनी महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागाच्या वेबसाईटवरील जाहिरात पाहून अर्ज करायचा आहे.
- कोल्हापूर जिल्हा परिषदेतील एकूण जागांपैकी 5% जागांसाठी सदरील भरतीचे आयोजन केलेले आहे.
- कोल्हापूर जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या योजनांचा प्रचार करण्यासाठी उमेदवारांची कमतरता पडत असल्यामुळे सदरील भरतीचे आयोजन केलेले आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, गोंदिया येथे भरती.
[ ZP Kolhapur Bharti 2024 ] जिल्हा परिषद कोल्हापूर येथील भरतीसाठी उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.
- [ ZP Kolhapur Bharti 2024 ] सदरील भरती मधून निवड केल्या जाणाऱ्या उमेदवारांची नेमणूक कंत्राटी पद्धतीने सात महिन्यासाठी करण्यात येईल.
- मुख्यमंत्री लाडका भाऊ योजनेअंतर्गत सदरील भरतीचे आयोजन करण्यात आलेले आहे.
- सदरील भरतीसाठी अर्ज करण्याकरिता उमेदवारांनी येथे क्लिक करा.
- 12 वी पास उमेदवारांसाठी वेतन 6000 रुपये प्रतिमहा असणार आहे.
- आयटीआय / पदविका उत्तीर्ण उमेदवारांसाठी दरमहा 8000 रुपये वेतन असणार आहे.
- पदवीधर / पदव्युत्तर उमेदवारांसाठी दरमहा 10,000 रुपये वेतन असणार आहे.