[ ZP Ratnagiri Bharti 2024 ] जिल्हा परिषद रत्नागिरी येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात जिल्हा परिषद रत्नागिरी यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदरील भरती मधून 03 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. डेटा एंट्री ऑपरेटर, मेडिकल कॉर्डिनेटर, अकाउंटंट कम क्लार्क या पदांसाठी उमेदवाराची निवड केली जाणार आहे. सदरील भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 1 ऑगस्ट 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. जिल्हा परिषद रत्नागिरी येथील भरतीसाठी उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.
पशु चिकित्सा विभाग येथे 10वी / 12वी पास उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी.
- [ ZP Ratnagiri Bharti 2024 ] जिल्हा परिषद रत्नागिरी येथील भरती मधून 03 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
- जिल्हा परिषद रत्नागिरी येथील भरती मधून डेटा एंट्री ऑपरेटर, मेडिकल कॉर्डिनेटर, अकाउंटंट कम क्लार्क या पदांसाठी सदरील भरती मधून योग्य उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
- मेडिकल कोऑर्डिनेटर या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून MBBS / BAMS / BHMS / BDS ही पदवी मिळवलेली पाहिजे. उमेदवाराकडे रजिस्ट्रेशन व संगणक हाताळण्याचे कौशल्य पाहिजे.
- अकाउंटंट कम बिलिंग क्लार्क या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून वाणिज्य शाखेची पदवी मिळवलेली पाहिजे. उमेदवाराला अकाउंटिंग चे सर्व ऑनलाईन व्यवहार व टायपिंग ज्ञान असणे आवश्यक आहे. अनुभवी उमेदवाराला प्राधान्य देण्यात येईल.
- डाटा एन्ट्री ऑपरेटर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून 12 वी परीक्षा उत्तीर्ण केली पाहिजे. उमेदवाराकडे संगणक हाताळण्याचे कौशल्य पाहिजे त्याचबरोबर इंग्रजी टायपिंग 300 श.प्र.मी आवश्यक आहे.
- मेडिकल कोऑर्डिनेटर या पदासाठी दरमहा 28,000 रुपये वेतन असेल.
- अकाउंटंट कम क्लार्क या पदासाठी 18,000 रुपये दरमहा वेतन असणार आहे.
- डाटा एन्ट्री ऑपरेटर या पदासाठी दरमहा 18000 रुपये वेतन असणार आहे.
- सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 21 ते 38 वर्षापर्यंत पाहिजे.
- सदरील भरती मधील पदांवरती कोणत्याही प्रकारच्या आरक्षण लागू नाही.
- भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- सदरील भरती मधील पदे निव्वळ 11 महिन्याच्या कंत्राटी स्वरूपात भरली जाणार आहेत.
- अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी अर्जासोबत स्वतःचा बायोडाटा आणि सेल्फ अटेस्टेड कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.
- मिळालेल्या अर्जा मधून अर्ज छाननी केली जाईल व मुलाखतीसाठी उमेदवारांना बोलावण्यात येईल.
- जिल्हा परिषद रत्नागिरी यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
सोलापूर विद्यापीठ येथे नोकरीची सुवर्णसंधी.
[ ZP Ratnagiri Bharti 2024 ] जिल्हा परिषद रत्नागिरी येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.
- [ ZP Ratnagiri Bharti 2024 ] 19 जुलै 2024 या तारखेपासून अर्ज करायला सुरुवात झालेली आहे.
- 1 ऑगस्ट 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. या तारखेला दुपारी 3:00 वाजेपर्यंत अर्ज स्वीकारले जातील.
- 1 ऑगस्ट 2024 या तारखेनंतर मिळालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.