MAFSU Bharti 2024 | महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर येथे भरती.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

MAFSU Bharti 2024 | महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठनागपूर येथे 67 जागांसाठी भरती निघालेली आहे. या भरतीची जाहिरात महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठनागपूर द्वारे प्रसिद्ध झालेली आहे. 18 मार्च 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. सहयोगी प्राध्यापक आणि समकक्ष या पदासाठी सदरील भरती होणार आहे. या भरती करिता उमेदवाराने आपला अर्ज ऑफलाइन पद्धतीने भरायचा आहे. पत्राद्वारे दिलेल्या पत्त्यावर अर्ज पोहोच आहे. अर्ज करण्यापूर्वी इच्छुक उमेदवाराने महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठनागपूर द्वारे प्रसिद्ध केलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. आणि त्यानंतरचा अर्ज करावा. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी खालील माहिती वाचा.

MAFSU Bharti 2024

  • महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाची भरती ही 67 जागांकरिता होणार आहे.
  • सदरील भरती मध्ये सहयोगी प्राध्यापक आणि समकक्ष या पदांची भरती होणार आहे.

MAFSU Bharti 2024 | महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ,नागपूर या भरती मधील पदांसाठी शैक्षणिक पात्रता आणि अटी खालील प्रमाणे.

  • सदरील भरती करिता उमेदवारा जवळ पदव्युत्तर पदवी असणे गरजेचे आहे.
  • या भरती करिता अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 40 वर्षापर्यंत असले पाहिजे. मागासवर्गीय उमेदवारांना पाच वर्ष वयाची सूट राहील.
  • महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ,नागपूर द्वारे घेण्यात येणाऱ्या भरती मधून सहयोगी प्राध्यापक आणि समकक्ष या पदासाठी निवड होणाऱ्या उमेदवारांना 1,31,400 रुपये ते 2,17,100 रुपये इतके मासिक वेतन देण्यात येईल.
  • निवड झालेल्या उमेदवाराचे नोकरीचे ठिकाण आहे नागपुर ( महाराष्ट्र) हे असेल.
  • सदरील भरतीसाठी प्रवेश शुल्क 2000 रुपये राहील. राखीव प्रवर्गासाठी ₹1000 प्रवेश शुल्क राहील.
  • इच्छुक उमेदवारांनी सदरील भरतीसाठी अर्ज करण्याकरिता पत्राद्वारे जाहिरातीत दिलेल्या पत्त्यावर अर्ज करावा.
  • 18 मार्च 2024 ही महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ,नागपूर येथील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  • सदरील भरतीसाठी महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ,नागपूर द्वारे जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. जाहिरात पहा
  • इच्छुक उमेदवारांनी स्वतःचा अर्ज “The Registrar, Maharashtra Animal and Fishery Sciences University, Futala Lake Road, Nagpur- 440 001 (M.S.).” या पत्त्यावर पत्राद्वारे पाठवायचा आहे.

MAFSU Bharti 2024 | महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ,नागपूर येथील भरतीसाठी खालील नियम वाचा.

  • या भरतीसाठी उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • या भरती करिता ऑनलाइन अर्ज करण्याची कोणती पद्धत महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ द्वारे राबवण्यात आलेली नाही.
  • सदरील भरतीसाठी उमेदवाराने अर्जामध्ये आधार कार्ड वरील स्वतःचे नाव लिहावे. त्याचबरोबर जन्मतारखेच्या दाखल्यावरील जन्मतारीख लिहावी. स्वतःची इतर खाजगी माहिती उमेदवारांनी बरोबर लिहावी. जर काही चूक झाली तर त्यास महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठनागपूर जबाबदार राहणार नाही.
  • 18 मार्च 2024 ही ऑफलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  • महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ,नागपूर द्वारे प्रसिद्ध केलेली जाहिरात अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. आणि त्यानंतरचा अर्ज करावा.

MAFSU Bharti 2024 | महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ,नागपूर येथील भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांनी खालील सूचना वाचा.

  • महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ याद्वारे घेण्यात येणाऱ्या भरतीसाठी अर्ज केलेले उमेदवार पात्र असतील.
  • TA / DA कोणत्याही उमेदवाराला देण्यात येणार नाही. अशी घोषणा महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ,नागपूर यांच्याद्वारे केलेली आहे. याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
  • सदरील भरती करिता उमेदवारा कडून कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार झाला. तर त्या उमेदवारावर महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ द्वारे कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
  • या भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांसाठी परीक्षा केंद्राचे ठिकाण ठरवण्याचा अधिकार महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ,नागपूर यांच्याकडे आहे.
  • सदरील भरतीसाठी आवश्यक माहिती जाहिरातीत दिलेल्या संकेतस्थळावरती उपलब्ध आहे.
MAFSU Bharti 2024 | महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, मुंबई येथे अर्ज भरण्याची प्रक्रिया खालील प्रमाणे नागपूर
  • सदरील भरतीसाठी उमेदवाराने आपला अर्ज दिलेल्या नमुन्या प्रमाणे भरायचा आहे. त्याचबरोबर स्वतःच्या सहीने ट्रू कॉपी केलेले डॉक्युमेंट्स अर्जाबरोबर जोडायचे आहेत. या प्रमाणपत्रात उमेदवारांची शैक्षणिक कागदपत्रे, अनुभवाचा दाखला, जन्माचा दाखला, 10वी बोर्ड सर्टिफिकेट, शाळा सोडल्याचा दाखला, डोमासाईल सर्टिफिकेट, जातीचा दाखला, नॉन क्रिमिलेयर दाखला, कास्ट व्हॅलेडीटी सर्टिफिकेट इत्यादी प्रमाणपत्रांचा सहभाग आहे.
  • 18 मार्च 2024 या तारखेला सायंकाळी 6 वाजेपर्यंत उमेदवारांनी आपले अर्ज पोहोचवावे. यावेळी नंतर आलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
  • उमेदवारांनी अर्ज हाताने न लिहिता संगणकाच्या सहाय्याने टायपिंग करून दिलेल्या फॉरमॅटमध्ये लिहायचा आहे. याची साइज A4 ही असणार आहे.
  • अर्ज करणारा उमेदवार महाराष्ट्र पशु आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठ येथील कर्मचारी असेल तर त्यांनी सुद्धा दिलेल्या नियमावली नुसारच भरतीसाठी अर्ज करावा. त्याचबरोबर स्वतः विद्यापीठाचे कर्मचारी आहोत याचे प्रमाणपत्र बरोबर जोडावे. जर कर्मचारी असणाऱ्या उमेदवाराने नियमाचे पालन केले नाही तर त्याचा अर्ज कोणत्याही प्रतिपादक करण्यात येऊ शकतो.
  • जमा करत असताना उमेदवाराने लिफाफा मध्ये अर्ज बंद करून. लिफाफे च्या वरती कोणत्या पदासाठी अर्ज करत आहोत. त्या पदाचे नाव लिहायचे आहे.
  • जर पात्र उमेदवाराला एकापेक्षा अधिक पदांसाठी अर्ज करायचा असेल तर त्याने प्रत्येक पदासाठी सेपरेटर जमा करावा.
  • नियम व अटी मान्य असणाऱ्या उमेदवारांनी तसेच भरतीसाठी पात्र उमेदवारांनी विद्यापीठाच्या https://mafsu.ac.in/ या वेबसाइटवरून अर्जाचा नमुना डाऊनलोड करून घ्यायचा आहे.
  • ई-मेल द्वारे आणि फॅक्स द्वारे मिळालेले अर्ज हे ग्राह्य धरले जाणार नाहीत. अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी याची नोंद घ्यावी.
  • अर्धवट भरलेले अर्ज विद्यापीठाकडून कोणत्याही क्षणी बाद करण्यात येऊ शकतात.
  • अर्जामध्ये उमेदवाराचा फोटो लावण्यासाठी जागा देण्यात आलेली आहे. त्या जागेत उमेदवाराने स्वतःचा पासपोर्ट साईज फोटो चिकटवायचा आहे.
  • सदरील पदांच्या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव उमेदवारा कडे नसेल तरीही उमेदवाराने अर्ज केलेला असेल तर त्याचा अर्ज बाद करण्यात येईल.
  • सदरील पदासाठी वयाची मर्यादा जाहिरातीमध्ये देण्यात आलेली आहे. त्या मर्यादेपेक्षा जास्त वय असणाऱ्या उमेदवारांचा अर्ज विद्यापीठाकडून बाद केला जाऊ शकतो.
  • जर अर्ज केलेला उमेदवार सदरील पदासाठी नियुक्त करण्यात आला. तर त्याचा उमेदवारीचा काळ हा नोकरी सुरू केल्यापासून दोन वर्षाचा राहील.
  • सदरील भरतीमध्ये पदांची संख्या कमी करणे किंवा वाढवणे हे सर्वस्व विद्यापीठाच्या हातात राहील. किंवा ही संपूर्ण भरती रद्द करणे विद्यापीठाकडे राहील. जर असा कोणताही निर्णय विद्यापीठाने घेतला तर तो निर्णय विद्यापीठाच्या https://mafsu.ac.in/ या संकेतस्थळावरती जाहीर करण्यात येईल. त्यासाठी उमेदवाराने अर्ज केल्यानंतर संकेतस्थळ पाहणे गरजेचे आहे.
  • महाराष्ट्र सरकार द्वारे महिला, खेळाडू, अनाथ, अपंग यांच्याकरिता देण्यात आलेले आरक्षण या भरतीमध्ये दिलेले आहे. या आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी उमेदवारांनी योग्य कागदपत्रे अर्जासोबत जोडणे गरजेचे आहे.
  • जातीय आरक्षणातून कोणत्याही उमेदवाराची निवड करण्यात आली तर त्या उमेदवाराकडे जातीचा दाखला आणि जात पडताळणी प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे.
  • अर्ज करणाऱ्या महिला उमेदवारांना महाराष्ट्र शासनाकडून मिळणाऱ्या महिलांच्या आरक्षणाचा लाभ घ्यायचा असेल तर अर्ज करण्याच्या वेळेस आपण महाराष्ट्र राज्याचे नागरिक आहोत असे अर्जामध्ये नमूद करावे.
  • अर्ज केलेल्या उमेदवारांची पदासाठी निवड करण्यात आली तरीसुद्धा रिक्त पदे केव्हा भरायची? याचा पूर्ण हक्क विद्यापीठाकडे असेल. निवड झाल्यानंतर विद्यापीठ ही भरती रद्द सुद्धा करू शकते.
  • अर्ज केलेल्या उमेदवारांना ज्यादिवशी मुलाखतीसाठी बोलावण्यात येईल त्यादिवशी त्याने स्वतःच्या खर्चाने मुलाखतीच्या ठिकाणी यावे.
  • पदावर नियुक्त झालेल्या उमेदवाराची बदली ही विद्यापीठांतर्गत येणाऱ्या संस्था आणि सर्व महाविद्यालय यापैकी कोठेही होईल.
  • उमेदवार पदावर नियुक्त करण्याच्या वेळेस जर उमेदवाराने सादर केलेली अर्जामधील माहिती आणि कागदपत्रे यात काही खोटे निघाले तर त्या उमेदवाराला पदावरून दूर करण्यात येईल. तसेच त्याच्यावर कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता सुद्धा आहे.
  • निवड झालेल्या उमेदवारासाठी करिता अपॉइंटमेंट लेटर हे त्याच्या ईमेल आयडी वरती येईल. किंवा त्याने नमूद केलेल्या त्याच्या पत्त्यावर पत्राद्वारे पाठवण्यात येईल. जर दिलेला ई-मेल आयडी चुकीचा असेल आणि त्यामुळे अपॉइंटमेंट लेटर उमेदवारांपर्यंत पोहोचले नाही तर त्याची जबाबदारी विद्यापीठाकडे राहणार नाही.
  • अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडून घेण्यात येणारी प्रवेश शुल्क ₹2000 आणि मागास उमेदवाराकडून घेण्यात येणारे ₹1000 हे कोणत्याही परिस्थितीत उमेदवाराला परत मिळणार नाहीत.
  • उमेदवाराचा अर्जाचा शुल्क हा डिमांड ड्राफ्ट द्वारे स्वीकारला जाईल. डिमांड ड्राफ्ट हा कोणत्याही राष्ट्रकूट बँकेतून तयार केलेला असावा. उमेदवाराने “Comptroller, Maharashtra Animal and Fishery Sciences University, Nagpur” या नावाचा डिमांड ड्राफ्ट तयार करायचा आहे. तयार केलेला डिमांड ड्राफ्ट अर्जासोबत लिफाफा मध्ये ठेवायचा आहे.
  • अर्ज केलेल्या उमेदवारांमध्ये अपंग उमेदवार, अनाथ उमेदवार, जुन्या सेवेतील कर्मचारी यांना भरतीच्या प्रवेश शुल्कामध्ये सवलत देण्यात येईल. राखीव प्रवर्ग असणारा शुल्क या उमेदवारांनी भरावा.
  • कोणत्याही उमेदवाराने जर एकापेक्षा जास्त अर्ज केले तर प्रत्येक अर्जासाठी वैयक्तिक अर्ज फी उमेदवाराला भरावी लागेल.
  • चेक, कॅश, आयपीओ आणि एनईएफटी यापैकी कोणत्याही माध्यमाद्वारे उमेदवाराची तिची प्रवेश शुल्क विद्यापीठाद्वारे स्वीकारली जाणार नाही.
  • सदरील भरतीसाठी एकूण 67 जागा रिक्त आहेत. त्यापैकी 44 जागा ह्या खुल्या प्रवर्गासाठी आहेत. 20 जागा ह्या महिलांसाठी आहेत. तीन जागा ह्या खेळाडूं करीत आहेत.
  • सहाय्यक प्राध्यापक (Faculty of Veterinary Science) या पदासाठी एकूण 55 जागा आहेत. सहाय्यक प्राध्यापक (Faculty of Dairy Technology) या पदासाठी एकूण पाच जागा आहेत. सहाय्यक प्राध्यापक (Faculty of Fishery Science) या पदासाठी एकूण 7 जागा आहेत.

महाराष्ट्रातील आणि देशातील सरकारी विद्यापीठांमध्ये आणि महाविद्यालयांमध्ये निघालेल्या विविध पदांच्या भरत्यांच्या अपडेट साठी उमेदवारांनी आमच्या नोकरी फस्ट या वेबसाईटला भेट द्यावी. भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a Comment