Nandurbar Police Bharti 2024 | पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आली आहे. नंदुरबार पोलीस येथे पोलीस शिपाई पदाच्या 151 जागा रिक्त आहेत. ही पदे भरण्यासाठी नंदुरबार पोलीस विभागाद्वारे जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या भरतीमध्ये अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2024 ही आहे. 5 मार्च 2024 पासून अर्ज भरण्याची सुरुवात होणार आहे. सदरील भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी नंदुरबार पोलिसांकडून प्रसिद्ध केलेली जाहिरात वाचावी. आणि त्यानंतरचअर्ज करावा. पोलीस भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकरिता लागणारी पात्रता खालील प्रमाणे.
- नंदुरबार पोलीस विभागामार्फत होणाऱ्या भरतीत एकूण 151 जागा रिक्त आहेत.
- नंदुरबार पोलीस विभागामार्फत घेण्यात येणारी भरती पोलीस शिपाई या पदासाठी होणार आहे.
Nandurbar Police Bharti 2024 | नंदुरबार पोलीस विभागामार्फत घेण्यात येणाऱ्या भरती मधील पदांसाठी शैक्षणिक पात्रता आणि अटी खालीलप्रमाणे.
- पोलीस शिपाई या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे शिक्षण किमान 12 वी पास पाहिजे.
- सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 वर्षे ते 28 वर्ष पर्यंत पाहिजे. स्वर्गीय उमेदवारांचे वय कमीत कमी 33 वर्षे पाहिजे. अपंग उमेदवारांकरिता वयाची अट 45 वर्षापर्यंत आहे.
- नंदुरबार पोलीस विभागामार्फत घेण्यात येणाऱ्या भरतीमध्ये पोलीस शिपाई म्हणून निवड झालेल्या उमेदवारांना वेतन नियमानुसार मिळेल.
- पोलीस शिपाई या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांची नोकरीचे ठिकाण हे नंदुरबार ( महाराष्ट्र ) राहील.
- सदरील भरती करिता उमेदवारांना परीक्षा शुल्क 450 राहील. तर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना 350 रुपये राहील.
- नंदुरबार पोलीस विभागामार्फत देण्यात आलेल्या ऑनलाइन पोर्टल द्वारे उमेदवाराने अर्ज करावा. अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.
- नंदुरबार पोलीस भरती करिता अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2024 ही आहे.
- पोलीस शिपाई या पदासाठी नंदुरबार पोलीस विभागाने जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे. जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
- पोलीस शिपाई पदासाठी फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.
Nandurbar Police Bharti 2024 | नंदुरबार पोलीस विभागाद्वारे घेण्यात येणाऱ्या भरतीसाठी खालील नियम वाचा.
- उमेदवाराला या भरती करिता फक्त ऑनलाईन अर्ज करता येणार आहेत.
- उमेदवाराकडून ऑफलाइन पद्धतीने नंदुरबार पोलीस विभागाद्वारे अर्ज मागवण्यात आले नाहीत.
- ऑनलाइन पद्धतीने अर्ज करत असताना उमेदवाराने स्वतःची वैयक्तिक माहिती ज्यामध्ये स्वतःचे नाव, पत्ता, जन्मतारीख यांसारख्या गोष्टी काळजीपूर्वक आणि बरोबर भरायचे आहेत. जर यामध्ये काही चुकी झाली तर नंदुरबार पोलीस विभाग जबाबदार राहणार नाही.
- नंदुरबार पोलीस विभागाद्वारे 31 मार्च 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख देण्यात आली आहे.
- पोलीस विभागामार्फत प्रसिद्ध केलेली जाहिरात उमेदवाराने काळजीपूर्वक वाचावी.
Nandurbar Police Bharti 2024 | नंदुरबार पोलीस भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवाराने खालील सूचना वाचा.
- नंदुरबार पोलीस भरती साठी अर्ज केलेले उमेदवार पात्र असणार आहेत.
- TA / DA कोणत्याही उमेदवाराला देण्यात येणार नाही. असे नंदुरबार पोलीस विभागामार्फत घोषित केले आहे.
- नंदुरबार पोलीस येथील भरती मध्ये शारीरिक चाचणी दरम्यान किंवा लेखी परीक्षेदरम्यान अनुचित प्रकार कोणत्याही उमेदवारांकडून घडला तर त्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल.
- सदरील भरतीसाठी शारीरिक चाचणीचे ठिकाण आणि लेखी परीक्षेचे केंद्र पोलीस विभागामार्फत ठरविण्यात येईल.
- महाराष्ट्र राज्य पोलीस भरती पोर्टल मध्ये सदरील भरती संदर्भात सर्व माहिती दिलेली आहे. उमेदवारांनी संकेतस्थळाला भेट दिल्यानंतरच अर्ज करावा.
Nandurbar Police Bharti 2024 | पोलीस शिपाई भरती पदासाठी उमेदवारासाठी महत्त्वाच्या सूचना खालील प्रमाणे.
- सदरील भरती ही 151 पदासाठी होणार आहे.
- 5 मार्च 2024 ते 31 मार्च 2024 यादरम्यान उमेदवारांनी आपले अर्ज भरायचे आहेत.
- नंदुरबार पोलीस विभागाद्वारे अर्ज करण्यासाठी दोन संकेतस्थळ देण्यात आलेले आहेत. ते पुढीलप्रमाणे https://policerecruitment2024.mahait.org आणि www.mahapolice.gov.in या आहेत.
- अर्ज भरत असताना उमेदवारांनी कोणतीही माहिती चुकीची देऊ नये. असे आढळल्यास उमेदवाराचा अर्ज कोणत्याही टप्प्यावर रद्द करता येईल.
- पोलीस शिपाई भरतीसाठी उमेदवाराची शारीरिक चाचणी आणि लेखी चाचणी घेण्यात येईल. यामध्ये 50 गुण शारीरिक चाचणीसाठी असणार आहेत. घेण्यात येणाऱ्या शारीरिक चाचणी मध्ये पास होण्याकरिता उमेदवाराला कमीत कमी 50 गुण मिळवणे आवश्यक आहे.
- सदरील भरती मधील पोलीस शिपाई पदाकरिता 100 गुणांची लेखी परीक्षा घेण्यात येईल या परीक्षेमध्ये उमेदवाराला कमीत कमी 40% गुण मिळवणे आवश्यक आहे. तरच उमेदवार पास होऊ शकेल. महाराष्ट्रातील सर्व पोलीस घटकांमध्ये पोलीस शिपाई पदाच्या लेखी परीक्षा एकाच दिवशी होणार आहेत.
- शारीरिक चाचणी आणि लेखी चाचणी या दोन चाचण्यांमध्ये उमेदवाराला मिळालेले गुणांच्या आधारे एक गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल. ही यादी तयार करताना प्रत्येक प्रवर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांचा विचार केला जाईल. गुणवत्ता यादीत नाव असणाऱ्या उमेदवाराची मूळ कागदपत्रे पडताळणी करण्यात येतील. ज्या उमेदवाराची कागदपत्र पडताळणी केल्यानंतर सर्व कागदपत्रे योग्य आढळतील. त्या उमेदवाराची गृहविभाग शासन निर्णय दि.10/12/2020 नुसार अंतिम गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल.
- नंदुरबार पोलीस विभागाद्वारे लेखी परीक्षा आणि शारीरिक चाचणी यांची तारीख ठरवण्यात येईल. ठरवलेल्या तारखेला आणि वेळेला उमेदवार जर गैरहजर राहिले तर त्याला या भरतीतून बाद करण्यात येईल. व याची सर्व जबाबदारी स्वतः उमेदवाराकडे राहील.
- सदरील भरती मध्ये आरक्षणानुसार प्रत्येक प्रवर्गातील उमेदवारांना जागा देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे उमेदवाराने अर्ज करताना स्वतःच्या प्रवर्गात किती जागा शिल्लक आहेत हे पाहूनच अर्ज करावा. मागास प्रवर्गातील उमेदवार खुल्या गटासाठी अर्ज करू शकतात. पण खुल्या गटातील उमेदवार मागास प्रवर्गासाठी अर्ज करू शकत नाहीत.
Nandurbar Police Bharti 2024 | नंदुरबार पोलीस भरती या ठिकाणी पोलीस शिपाई पदासाठी आरक्षणानुसार जागा खालीलप्रमाणे.
- अनुसूचित जातीसाठी 30 जागा रिक्त आहेत. त्यापैकी सर्वसाधारण गटासाठी सहा जागा रिक्त आहेत. महिलांकरिता नऊ जागा रिक्त आहेत. खेळाडूं करिता दोन जागा रिक्त आहेत. प्रकल्पग्रस्तांसाठी जागा रिक्त आहेत. भूकंप ग्रस्तांसाठी एक जागा रिक्त आहे. माजी सैनिकांसाठी पाच जागा रिक्त आहेत. अंशकालीन पदवीधर गटासाठी दोन जागा रिक्त आहेत. पोलीस पाल्य करिता एक जागा रिक्त आहे. रक्षक दलाला करिता दोन जागा रिक्त आहेत.
- अनुसूचित जमाती करिता 10 जागा रिक्त आहेत. सर्वसाधारण गटासाठी एक जागा रिक्त आहे. महिलांकरिता तीन जागा रिक्त आहेत. खेळाडूंसाठी एक जागा रिक्त आहे. प्रकल्पग्रस्तांसाठी एक जागा रिक्त आहे. भूकंपग्रस्तांसाठी एक ही जागा नाही. माजी सैनिकां करिता दोन जागा रिक्त आहेत. अंशकालीन पदवीधर गटासाठी एक जागा रिक्त आहे. पोलीस पाल्य करिता एक ही जागा नाही. गृहरक्षक दलाचा एक जागा रिक्त आहे.
- विमुक्त जाती – अ या प्रवर्गासाठी एकूण सात जागा रिक्त आहेत. त्यातील चार जागा सर्वसाधारण गटासाठी आहेत. दोन जागा महिलांसाठी आहेत. खेळाडू, प्रकल्पग्रस्त आणि भूकंपग्रस्त यांच्याकरिता एकही जागा शिल्लक नाही. माजी सैनिकां करिता एक जागा रिक्त आहे. अंशकालीन पदवीधर गटासाठी एक ही जागा नाही. पोलीस पाल्यांसाठी एक ही जागा नाही. गृहरक्षक दलासाठी एक ही जागा शिल्लक नाही.
- भटक्या जाती – ब या प्रवर्गात एकूण जागा तीन आहेत. यातील सर्वसाधारण गटात करिता दोन जागा आहेत. तर महिलांसाठी एक जागा रिक्त आहे. खेळाडू, भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त, माजी सैनिक, पोलीस पाल्य, अंशकालीन पदवीधर, गृहरक्षक दल यासाठी एक ही जागा शिल्लक नाही.
- भटक्या जाती- क या प्रवर्गासाठी एकूण सहा जागा शिल्लक आहेत त्यातील सर्वसाधारण गटाकरिता तीन जागा शिल्लक आहेत. तर महिलांसाठी दोन जागा शिल्लक आहेत. माजी सैनिकांसाठी एक जागा शिल्लक आहे. त्याचप्रमाणे खेळाडू, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अंशकालीन पदवीधर, गृहरक्षक दल, पोलीस पाल्य यांच्यासाठी जागा शिल्लक नाहीत.
- भटक्या जाती- ड या प्रवर्गासाठी एकूण सहा जागा शिल्लक आहेत त्यातील सर्वसाधारण गटाकरिता तीन जागा शिल्लक आहेत. तर महिलांसाठी दोन जागा शिल्लक आहेत. माजी सैनिकांसाठी एक जागा शिल्लक आहे. त्याचप्रमाणे पोलीस पाल्य, खेळाडू, गृहरक्षक दल, भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त,अंशकालीन पदवीधर, गृहरक्षक दल यांच्यासाठी जागा शिल्लक नाहीत.
- विविध मागास प्रवर्गासाठी तीन जागा शिल्लक आहेत. यातील सर्वसाधारण गटासाठी दोन जागा आहेत. तर महिलांसाठी एक जागा आहे. इतर कोणत्याही प्रवर्गासाठी जागा शिल्लक नाहीत.
- इतर मागास वर्गासाठी 59 जागा राखीव आहेत. त्यातील सर्वसाधारण गटासाठी 17 जागा आहेत. महिलांसाठी 18 जागा शिल्लक आहेत. खेळाडूं करिता तीन जागा शिल्लक आहेत. प्रकल्पग्रस्तांसाठी तीन जागा शिल्लक आहेत. भूकंपग्रस्तांसाठी एक जागा शिल्लक आहे. माजी सैनिकांसाठी नऊ जागा शिल्लक आहेत. अंशकालीन पदवीधरांसाठी तीन जागा शिल्लक आहेत. पोलीस पाल्यांसाठी दोन जागा शिल्लक आहेत. गृहरक्षक दलाचे तीन जागा शिल्लक आहेत.
- एसईबीसी साठी 15 जागा शिल्लक आहेत. त्यातील सर्वसाधारण गटासाठी चार जागा शिल्लक आहेत. पाच जागा महिलांसाठी आहेत. खेळाडूं करिता एक जागा आहे. एक जागा प्रकल्पग्रस्तांसाठी आहे. माजी सैनिकांसाठी दोन जागा आहेत. अंशकालीन पदवीधर करिता एक जागा आहे. गृहरक्षक दला करिता एक जागा आहे.
- ईडब्ल्यूएस गटासाठी सहा जागा शिल्लक आहेत. त्यातील तीन जागा सर्वसाधारण गटासाठी आहेत. तर दोन जागा महिलांसाठी आहेत. आणि एक जागा माजी सैनिक करीत आहे.
- खुल्या वर्गाकरिता एकूण सहा जागा आहेत त्यातील तीन जागा सर्वसाधारण गटासाठी आहेत. दोन जागा महिलांकरिता आहेत. एक जागा माजी सैनिकांकरीत आहे.
Nandurbar Police Bharti 2024 | नंदुरबार पोलीस भरतीसाठी आवश्यक सूचना खालील प्रमाणे.
नंदुरबार पोलीस भरती मध्ये उमेदवारांना मदत करण्यासाठी कोणत्याही व्यक्तीने पैशाची व इतर कोणत्याही स्वरूपाची मागणी केली. तर अँटी करप्शन ब्युरो, नंदुरबार यांच्याकडे उमेदवाराने तक्रार करावी. तक्रार करण्यासाठी 02564-230009 या दूरध्वनी क्रमांकावरती संपर्क करावा. किंवा पोलीस भरती समितीचे अध्यक्ष यांच्याशी संपर्क साधून तात्काळ तक्रार करावी.
पोलीस भरती संदर्भात आणि महाराष्ट्रातील आणि देशातील सरकारी संस्थांमधील निघालेल्या भरतीच्या अपडेट साठी उमेदवारांनी आमच्या नोकरी 1st या वेबसाईटला भेट द्यावी. भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.