DRDO Bengaluru Bharti 2024 | संरक्षण संशोधन आणि विकास संस्था यांच्यामार्फत भरती जाहीर करण्यात आलेले आहे. सदरील भरतीची जाहिरात DRDO बंगळूर द्वारे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. एकूण 88 जागांसाठी ही भरती होणार आहे. उमेदवारांनी भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करायचा आहे. 17 मार्च 2024 ही ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. पदवीधर शिकाऊ प्रशिक्षणार्थी आणि डिप्लोमा शिकाऊ प्रशिक्षणार्थी या पदांसाठी भरती होणार आहे. पात्रता धारक आणि इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज जाहिरात काळजीपूर्वक वाचल्यानंतर भरावा. अर्ज करू पाहणाऱ्या उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी.
- संरक्षण संशोधन आणि विकास संस्था या संस्थेची भरती ही 88 जागांकरिता होणार आहे.
- पदवीधर शिकाऊ प्रशिक्षणार्थी आणि डिप्लोमा शिकाऊ प्रशिक्षणार्थी या पदांकरिता DRDO, बंगळूर यांच्याकडून ही भरती होणार आहे.
DRDO Bengaluru Bharti 2024 | संरक्षण संशोधन आणि विकास संस्था, बंगळूर यांच्यामार्फत घेण्यात येणाऱ्या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता आणि अटी खालील प्रमाणे आहेत.
- पदवीधर शिकाऊ प्रशिक्षणार्थी या पदाकरिता उमेदवाराकडे वैधानिक विद्यापीठाद्वारे किंवा संसदेच्या कायद्यानुसार मान्यताप्राप्त असलेल्या विद्यापीठातून अभियांत्रिकी शाखेची किमान प्रथम श्रेणी पदवी असणे आवश्यक आहे.
- डिप्लोमा शिकवू प्रशिक्षणार्थी या पदाकरिता उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून प्रथम श्रेणी ची डिप्लोमा पदवी किंवा समकक्ष पदवी उमेदवाराकडे असणे आवश्यक आहे.
- सदरील भरती करिता अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे कमीत कमी 18 वर्षे पूर्ण असले पाहिजे.
- सदरील भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 8000 रुपये ते 9000 रुपये इतका पगार मिळेल.
- संरक्षण संशोधन विकास संस्था, बंगळूर येथील भरतीसाठी निवड झालेल्या उमेदवारांकरिता नोकरीचे ठिकाण हे बंगळूर असेल.
- संरक्षण संशोधन विकास संस्था, बंगळूर येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकरिता कोणत्याही प्रकारची परीक्षा शुल्क नाही.
- उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करत असताना संस्थेद्वारे दिले गेलेल्या संकेतस्थळावरून अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.
- सदरील भरती करिता अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 मार्च 2024 ही आहे.
- अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी प्रसिद्ध केलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. जाहिराती वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
- इच्छुक उमेदवार संस्थेच्या ऑनलाइन पोर्टल वरून सदरील भरती करिता अर्ज करू शकतात. अर्ज करा.
DRDO Bengaluru Bharti 2024 | संरक्षण संशोधन आणि विकास संस्था येथील भरतीसाठी खालील नियम वाचा.
- डीआरडीओच्या या भरती करिता उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करायचे आहेत.
- ऑफलाइन अर्ज करण्याची कोणतीही पद्धत संरक्षण संशोधन आणि विकास संस्था यांच्यामार्फत राबवले नाही.
- सदरील भरती करिता ऑनलाइन अर्ज करत असणाऱ्या उमेदवारांनी आपली वैयक्तिक माहिती, शिक्षण, आपल्याला मिळालेले आतापर्यंतचे गुण, जन्मतारीख, नाव इत्यादी सर्व प्रकारची माहिती बरोबर भरावी. यामध्ये काही जर चूक झाली तर संरक्षण संशोधन आणि विकास संस्था जबाबदार राहणार नाही.
- 17 मार्च 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
- संरक्षण संशोधन आणि विकास संस्था येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी जाहिरात डाऊनलोड करून काळजीपूर्वक वाचावी.
DRDO Bengaluru Bharti 2024 | संरक्षण संशोधन आणि विकास संस्था येथील भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांनी खालील सूचना वाचा.
- संरक्षण संशोधन आणि विकास संस्था येथील भरतीसाठी अर्ज केलेले उमेदवारच पात्र राहतील.
- TA / DA देण्याचा निर्णय संरक्षण संशोधन आणि विकास संस्था, बंगळूर यांनी रद्द केला आहे. याची खबरदारी करणाऱ्या उमेदवारांनी घ्यावी.
- सदरील भरती मध्ये उमेदवाराने कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार केला. तर त्याच्यावरती संरक्षण संशोधन आणि विकास या संस्थेमार्फत कायदेशीर कारवाई केली जाईल.
- डीआरडीओ बंगळूर येथे प्रशिक्षणार्थी पदाच्या जागा कशाप्रकारे भरायच्या याची पूर्ण प्रक्रिया संस्थेद्वारे ठरवण्यात येईल.
- इच्छुक उमेदवारांनी अर्ज केल्यानंतर संस्थेच्या संकेतस्थळाला भेट देऊन तेथील सर्व नियम व अटी वाचून घ्याव्यात.
DRDO Bengaluru Bharti 2024 | संरक्षण संशोधन विकास संस्था येथील भरतीसाठी महत्त्वाच्या अटी खालीलप्रमाणे.
- भरती करिता अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी https://nats.education.gov.in/ फक्त या लिंक द्वारे अर्ज करायचा आहे. अर्ज 17 मार्च 2024 या तारखेच्या आत मध्ये करायचा आहे.
- या भरती करिता अर्ज करणारा उमेदवार भारतीय नागरिका असणे गरजेचे आहे
- अर्ज करण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत उमेदवाराचे वय हे कमीत कमी 18 वर्षे असले पाहिजे.
- 2020 या शैक्षणिक वर्षामध्ये पास झालेल्या उमेदवारांनाच भरतीसाठी अर्ज करण्यात येईल. 2020 च्या अगोदर पास झालेल्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार नाही.
- या भरती करिता घेण्यात येणारी प्रवेश परीक्षा पास होणाऱ्या उमेदवारांनाच या भरती करिता अर्ज करण्यात येईल.
- अर्ज केलेल्या उमेदवारांकडे प्रोव्हिजनल डिग्री सर्टिफिकेट असणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे ओरिजनल डिग्री सर्टिफिकेट ज्या दिवशी उमेदवाराला मिळेल त्यादिवशी संस्थेमध्ये पडताळणीसाठी द्यायचे आहे.
- उमेदवाराला मिळालेले मार्क हे मार्कशीट वरती टक्केवारीच्या रूपामध्ये असले पाहिजे. जर हे मार्क CGPA मध्य असतील तर त्याचे रूपांतर विद्यापीठाच्या आणि महाविद्यालयाच्या नियमानुसार टक्केवारी मध्ये करून घ्यायचे आहे. यासाठी वापरण्यात येणारा फॉर्मुला विद्यापीठ आणि महाविद्यालयाकडून मिळवायचा आहे.
- जाहिरातीमध्ये दिलेल्या शैक्षणिक पात्रतेच्या उमेदवाराचे शिक्षण जर अधिक झालेले असेल तर त्यास या भरती करिता अर्ज करता येणार नाही.
- दिलेली शैक्षणिक पात्रता पूर्ण झाल्यानंतर उमेदवाराला जर एक वर्ष किंवा त्याहून अधिक कामाचा अनुभव असेल तर असा उमेदवार सुद्धा या भरतीसाठी पात्र होणार नाही.
- अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी जर याआधी कोणत्याही संस्थेमध्ये प्रशिक्षणार्थी म्हणून काम केले असेल. किंवा सध्या प्रशिक्षणार्थी म्हणून काम करत असेल तर असा उमेदवार ही भरतीसाठी पात्र राहणार नाही.
- प्रशिक्षणार्थी कायदा, 1961 प्रमाणे उमेदवाराला भरती मध्ये आरक्षण मिळेल.
- उमेदवार मागील एक वर्षापासून ज्या पत्त्यावर ती राहत आहे आणि त्याचा कायमस्वरूपी असणारा पत्ता या दोन्ही जवळील पोलीस स्टेशन मधून स्वतःचे पोलीस वेरिफिकेशन केलेले सर्टिफिकेट उमेदवाराने जमा करावे.
- अर्ज करणाऱ्या उमेदवाराने स्वतःचे फिजिकल फिटनेस सर्टिफिकेट जाहिरातीमध्ये दिल्याप्रमाणे बनवून घ्यावे. आणि अर्जासोबत ते जोडावे.
- भरतीसाठी निवड झालेल्या उमेदवारांनी संस्थेमध्ये सामील होण्याच्या दिलेल्या तारखे दिवशी जर हजरी लावली नाही. तर उमेदवाराला सदरील भरती मध्ये रस नाही असे समजून उमेदवारा सोबत तेही संभाषण न करता त्याची निवड रद्द करण्यात येईल.
- निवड झालेल्या उमेदवारांकरिता प्रशिक्षणार्थी पदाचा कालावधी हा एक वर्षाचा राहील.
- प्रशिक्षणार्थी कायदा, 1961 नुसार निवड झालेल्या उमेदवाराने संस्थेसोबत एक वर्ष प्रशिक्षणार्थी म्हणून काम करणे बंधनकारक आहे.
- निवड झालेला उमेदवार प्रशिक्षणार्थी पदावर ती काम करत असताना. संस्थेच्या लक्षात आले की संबंधित उमेदवाराच्या कागदपत्रांमध्ये त्रुटी आहे किंवा उमेदवार निवड प्रक्रिया तील अटींमध्ये बसत नाही. तर उमेदवाराचे प्रशिक्षणार्थी पद कधीही रद्द होऊ शकते.
- उमेदवाराकडून कोणत्याही प्रकारचा चुकीचा प्रकार कामावरती काम करत असताना घडला तर त्याला पदावरून दूर करण्याचा हक्क संस्थे कडे आहे.
- सदरील भरती मधील प्रशिक्षणार्थी पदाच्या जागा कमी किंवा जास्त करण्याचा संपूर्ण अधिकार हा संस्थेकडे आहे.
- कागदपत्रे पडताळणीच्या वेळेस सर्व उमेदवारांनी आपली मूळ कागदपत्रे आणि त्यांच्या सेल्फ अटेस्टेड फोटो कॉपी बरोबर आणणे गरजेचे आहे. उमेदवारांनी खालील सर्व कागदपत्रे पडताळणीच्या वेळेस घेऊन यावी.
- दहावीचे मार्कशीट आणि प्रमाणपत्र
- प्रत्येक वर्षाच्या परीक्षेत पास झालेल्या चे प्रमाणपत्र. सेमिस्टर आणि वर्षानुसार आवश्यक आहेत.
- पदवी / डिप्लोमा प्रमाणपत्र किंवा प्रोव्हिजनल पदवी प्रमाणपत्र
- जातीचा दाखला
- उमेदवार जर अपंग असेल तर अपंगत्वाचा दाखला.
- EWS प्रमाणपत्र.
- आधार कार्ड
- सध्याचे दोन पासपोर्ट साईज फोटो.
- पोलीस वेरिफिकेशन प्रमाणपत्र.
- जाहिरातीमध्ये दिल्याप्रमाणे फिटनेस प्रमाणपत्र.
- निवड झालेल्या उमेदवाराला कोणत्याही प्रकारचा प्रवासाचा खर्च किंवा राहण्याचा खर्च अथवा कोणत्याही प्रकारचा भत्ता देण्यात येणार नाही.
- निवड झालेल्या उमेदवारा व्यतिरिक्त कोणत्याही व्यक्तीला संस्थेमध्ये प्रवेश देण्यात येणार नाही.
- जर उमेदवारांना कोणत्याही प्रकारची अडचण असेल तर त्यांनी संस्थेच्या मेल आयडी वरती ई-मेल करावा.मेल आयडी – apprentice.cell@gov.in
DRDO Bengaluru Bharti 2024 | संरक्षण संशोधन आणि विकास संस्था येथील प्रशिक्षणार्थी भरती मध्ये खालील शाखेच्या जागा रिक्त आहेत.
- इलेक्ट्रॉनिक आणि कम्युनिकेशन इंजीनियरिंग या शाखेच्या एकूण 10 जागा पदवीधर प्रशिक्षणार्थी पदाकरिता आहेत.
- कॉम्प्युटर सायन्स इंजीनियरिंग या शाखेच्या एकूण 10 जागा पदवीधर प्रशिक्षणार्थी पदासाठी रिक्त आहेत.
- मेकॅनिकल इंजिनिअरिंग या शाखेतील एकूण पाच जागा पदवीधर प्रशिक्षणार्थी पदासाठी रिक्त आहेत.
- इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग या शाखेतील एकूण तीन जागा पदवीधर प्रशिक्षणार्थी पदासाठी रिक्त आहेत.
- इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन इंजीनियरिंग या शाखेच्या एकूण 15 जागा डिप्लोमा प्रशिक्षणार्थी पदासाठी रिक्त आहेत.
- कॉम्प्युटर सायन्स इंजीनियरिंग या शाखेच्या एकूण 17 जागा डिप्लोमा प्रशिक्षणार्थी पदाकरिता रिक्त आहेत.
- मेकॅनिकल इंजिनिअरिंग या शाखेच्या एकूण 15 जागा डिप्लोमा प्रशिक्षणार्थी या पदासाठी रिक्त आहेत.
- इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग या पदाच्या एकूण 10 जागा डिप्लोमा प्रशिक्षणार्थी या पदाकरिता रिक्त आहेत.
- सिविल इंजीनियरिंग या शाखेच्या एकूण तीन जागा डिप्लोमा प्रशिक्षणार्थी पदासाठी रिक्त आहेत.
DRDO Bengaluru Bharti 2024 | संरक्षण संशोधन आणि विकास संस्था येथील प्रशिक्षणार्थी भरती मध्ये अर्ज करण्याची प्रक्रिया खालील प्रमाणे.
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवाराने नियम व अटी काळजीपूर्वक पहाव्यात.
- प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण योजना भारत सरकार याच्या ऑनलाइन पोर्टल वरती उमेदवारांनी स्वतःला रजिस्टर करायचे आहे.
- ज्या उमेदवारांना डिप्लोमा प्रशिक्षणार्थी या पदासाठी अर्ज करायचा आहे त्यांनी संस्थेच्या संकेतस्थळावरून करावा.
अर्ज केलेल्या उमेदवारांची निवड ही रिक्त असलेल्या पदांच्या संख्येवरून ठरवण्यात येईल. त्याचप्रमाणे यामध्ये बऱ्याच नियम व अटी असतील. त्या नियम व अटी ना उमेदवार पात्र असला पाहिजे. उमेदवाराच्या शालेय गुणांवरून आणि त्याचे कागदपत्र पडताळणीनंतर संबंधित पदासाठी उमेदवाराची निवड करण्यात येईल.
प्रशिक्षणार्थी पदा प्रमाणेच सरकारी खात्यातील नोकर भरती संदर्भात सर्व अपडेट्स आपल्या मोबाईल वरती मिळवण्याकरिता आमची वेबसाईट नोकरी फस्ट ला भेट द्या. भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.