NHM Ahmednagar Bharti 2024 | राष्ट्रीय आरोग्य अभियान, अहमदनगर येथे भरती.

NHM Ahmednagar Bharti 2024 | राष्ट्रीय आरोग्य अभियान अहमदनगर येथे विविध पदांसाठी भरती निघाली आहे. सदरील भरतीची जाहिरात संस्थेद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. 20 मार्च 2024 ही राष्ट्रीय आरोग्य अभियान अहमदनगर येथे अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. वैद्यकीय अधिकारी, दंत शल्य चिकित्सक, ऑडिओलॉजिस्ट, ऑडिओमॅट्रिक असिस्टंट, श्रवण श्रम मुलांसाठी डॉक्टर, सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक, वित्त कम लॉजिस्टिक सल्लागार, एसटीएलएस यांसारख्या पदांकरिता रिक्त जागा आहेत. तरी पात्र उमेदवारांनी आपला अर्ज ऑफलाइन पोस्टाने किंवा समक्ष हजर राहून दिलेल्या पत्त्यावर जमा करायचा आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान अहमदनगर येथील भरतीसाठी लागणारी पात्रता खालीलप्रमाणे.

NHM Ahmednagar Bharti 2024

 • राष्ट्रीय आरोग्य अभियान अहमदनगर येथे 23 जागांसाठी ही भरती होणार आहे.
 • राष्ट्रीय आरोग्य अभियान अहमदनगर द्वारे घेण्यात येणाऱ्या भरतीसाठी ची पदे खालील प्रमाणे.

Table of Contents

NHM Ahmednagar Bharti 2024 | राष्ट्रीय आरोग्य अभियान अहमदनगर येथील रिक्त पदे खालील प्रमाणे.

 1. वैद्यकीय अधिकारी ( 15 वी एफसी )
 2. दंत शल्यचिकित्सक
 3. ऑडिओ लॉजिस्ट
 4. ऑडिओमॅट्रिक असिस्टंट
 5. श्रवण श्रम मुलांसाठी इंटरॅक्ट.
 6. सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक
 7. वित्त कम लॉजिस्टिक सल्लागार.
 8. एसटीएलएस

NHM Ahmednagar Bharti 2024 | राष्ट्रीय आरोग्य अभियान अहमदनगर येथील भरतीसाठी शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे.

 • वैद्यकीय अधिकारी या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे MBBS / BAMS यापैकी शिक्षण पूर्ण झालेले पाहिजे. एमबीबीएस उमेदवार मिळाला नाहीतर BAMS उमेदवाराची निवड करण्यात येईल.
 • दंत शल्यचिकित्सक या पदाकरिता अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे MDS किंवा BDS शिक्षण झाले पाहिजे.
 • ऑडिओलॉजिस्ट या पदाकरिता ऑडिओ लॉजि मध्ये पदवी असणे गरजेचे आहे.
 • ऑडिओ मॅट्रिक असिस्टंट या पदासाठी उमेदवाराकडे टायपिंगचे कौशल्य असावे त्याचप्रमाणे उमेदवार पदवीधर असावा उमेदवाराचा MS-CIT हा कॉम्प्युटर कोर्स पूर्ण झालेला असावा.
 • श्रवण श्रम मुलांसाठी इंटरॅक्ट या पदाकरिता उमेदवाराचा एक वर्षाचा ऑडिओ लॉजि चा डिप्लोमा झाला पाहिजे.
 • सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक या पदासाठी उमेदवार हा संबंधित प्रोग्रामेटिक अनुभवासह MPH/MHA/MBA हेल्थ केअर असलेले कोणतेही वैद्यकीय पदवीधर असावा.
 • वित्त कम लॉजिस्टिक सल्लागार या पदासाठी अर्ज करणारा उमेदवार बीकॉम / एम.कॉम टॅली ERP 9.0 हे शिक्षण पूर्ण झालेला असावा.
 • एसटीएलएस या पदाकरिता उमेदवाराचा वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञानातील डिप्लोमा किंवा प्रमाणपत्र अभ्यासक्रमासह विज्ञानात 10 + 2 किंवा त्याच्या समकक्ष पात्रता पूर्ण झालेली पाहिजे. त्याचप्रमाणे उमेदवाराला दोन वर्षाचा अनुभव प्रतिष्ठित बॅक्टेरियोलॉजिकल प्रयोगशाळेत काम करण्याचा अनुभव असणे गरजेचे आहे. उमेदवाराकडे दुचाकी चालवण्याचा परवाना कायमस्वरूपी असणे गरजेचे आहे.

NHM Ahmednagar Bharti 2024 | राष्ट्रीय आरोग्य अभियान अहमदनगर येथील भरतीसाठी उमेदवाराने खालील नियम वाचावेत.

 • सदरील भरती करिता अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे 18 वर्षे ते 38 वर्षे पर्यंत असले पाहिजे. त्याचप्रमाणे मागास प्रवर्गातील उमेदवाराला वयाच्या अटी मध्ये पाच वर्षाची सूट देण्यात आलेली आहे. मागास प्रवर्गातील उमेदवाराची जास्तीत जास्त वय 43 वर्षे पर्यंत असले पाहिजे.
 • राष्ट्रीय आरोग्य अभियान, अहमदनगर येथे निवड झालेल्या उमेदवारांना मासिक वेतन हे 17,000 रुपये ते 60,000 रुपये इतके मिळेल.
 • सदरील भरती मधून निवड झालेल्या उमेदवारांचे नोकरीचे ठिकाण हे अहमदनगर राहील.
 • राष्ट्रीय आरोग्य अभियान, अहमदनगर येथील भरतीसाठी शुल्क हे ₹300 राहील.
 • सदरील भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यासाठी राष्ट्रीय आरोग्य अभियान अहमदनगर यांनी दिलेल्या पत्त्यावर पत्राद्वारे किंवा समक्ष उपस्थित राहून अर्ज जमा करावा.
 • 20 मार्च 2024 ही राष्ट्रीय आरोग्य अभियान अहमदनगर यांच्याद्वारे अर्ज करण्याची देण्यात आलेली शेवटची तारीख आहे.
 • अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी प्रसिद्ध केलेली जाहिरात सर्वप्रथम काळजीपूर्वक वाचावी आणि त्यानंतरच अर्ज करावा. जाहिरात पहा
 • सदरील भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज “जिल्हा रुग्णालय आवार, अहमदनगर” या पत्त्यावर पाठवावा.
NHM Ahmednagar Bharti 2024 | राष्ट्रीय आरोग्य अभियान, अहमदनगर येथील भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खालील अटी पहा.
 • राष्ट्रीय आरोग्य अभियान, अहमदनगर येथील भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
 • ऑनलाइन अर्ज करण्याची कोणतीही पद्धत राष्ट्रीय आरोग्य अभियान, अहमदनगर यांच्याद्वारे राबवलेली नाही.
 • राष्ट्रीय आरोग्य अभियान, अहमदनगर येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने आपली वैयक्तिक माहिती, जन्मतारीख, पत्ता, शिक्षण, अनुभव यांसारख्या गोष्टी काळजीपूर्वक लिहाव्या. जर यामध्ये काही चुकी झाली तर त्यास राष्ट्रीय आरोग्य अभियान, अहमदनगर जबाबदार राहणार नाही.
 • सदरील संस्थेद्वारे अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मार्च 2024 राहील.
 • राष्ट्रीय आरोग्य अभियान, अहमदनगर यांच्या संकेतस्थळावरती जाहिरातीची पीडीएफ दिलेले आहे. उमेदवाराने ती पीडीएफ डाउनलोड करून वाचावी आणि त्यानंतरचा अर्ज करावा.
NHM Ahmednagar Bharti 2024 | राष्ट्रीय आरोग्य अभियान, अहमदनगर येथील भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांनी खालील सूचना वाचा.
 • राष्ट्रीय आरोग्य अभियान, अहमदनगर येथील भरतीसाठी अर्ज केलेले उमेदवार पात्र असतील.
 • उमेदवाराला अर्ज करण्यासाठी किंवा मुलाखतीला येण्याकरिता कोणत्याही प्रकारचा TA/DA देण्यात येणार नाही. याची नोंद उमेदवाराने घ्यावी.
 • सदरील भरती मध्ये उमेदवाराने सर्व नियमांची जान असताना कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार केला. तर त्या उमेदवारावर ती राष्ट्रीय आरोग्य अभियान, अहमदनगर यांच्याकडून कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
 • सदरील भरतीची प्रक्रिया किंवा उमेदवार निवडण्याची प्रक्रिया राष्ट्रीय आरोग्य अभियान, अहमदनगर यांच्याद्वारे ठरवली जाईल.
 • उमेदवारांनी संस्थेच्या आधुनिक संकेतस्थळावरती भेट देऊन संपूर्ण माहिती वाचावी आणि त्यानंतरच अर्ज करावा.
NHM Ahmednagar Bharti 2024 | राष्ट्रीय आरोग्य अभियान, अहमदनगर येथील भरतीसाठी उमेदवारांकरिता शैक्षणिक पात्रतेची अटी खालील प्रमाणे.
 • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने आपला शैक्षणिक तपशील अचूक आणि काळजीपूर्वक लिहावा.
 • अर्ज सादर करण्याच्या जास्तीत जास्त शेवटच्या दिवशी जाहिरातीमध्ये दिलेली शैक्षणिक पात्रता उमेदवाराची पूर्ण झाली पाहिजे.
 • उमेदवाराला शैक्षणिक पदवी कधी मिळाली ? त्यादिवशीची तारीख म्हणजेच शेवटचा निकाल जाहीर झाल्याची तारीख उमेदवाराने अर्जामध्ये नमूद करावी.
 • अर्ज भरत असताना उमेदवाराने प्रत्येक वर्षाची टक्केवारी लिहू नये. त्यापेक्षा शेवटच्या वर्षात जी टक्केवारी मिळाली ती लिहावी. उमेदवाराने कोणत्याही प्रकारची ग्रेड किंवा इतर दुसरी श्रेणी अर्जामध्ये लिहू नये. त्याऐवजी टक्केवारी स्वरूपात मार्क लिहावे. उमेदवाराने अर्जामध्ये लिहिलेली टक्केवारी आणि प्रमाणपत्रावर ती असलेली टक्केवारी जुळून आली नाही तर उमेदवाराचा अर्ज बाद करण्यात येईल.
 • उमेदवाराच्या शेवटच्या वर्षाच्या मार्कशीट वरती जर ग्रेड अथवा श्रेणी असेल. तर उमेदवाराने संबंधित विद्यापीठाकडून त्याचे टक्केवारीत रूपांतर करून प्रमाणपत्र बनवून घ्यावे.
 • अर्जाची छाननी करताना उमेदवाराने अर्जामध्ये लिहिलेली माहिती लक्षात घेतली जाईल.
 • अर्जाच्या शेवटी जोडण्यात आलेल्या कागदपत्रांची मूळ प्रत कागदपत्र पडताळणीच्या वेळी कागदपत्रांची एक प्रत कार्यालयात जमा करावी.
 • उमेदवाराने अर्ज भरल्यानंतर आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे अर्जासोबत जोडावेत. जर अर्जाबरोबर आवश्यक शैक्षणिक प्रमाणपत्रे नसतील तर उमेदवाराचा अर्ज बाद करण्यात येईल.
 • सदरील पदाकरिता अर्ज केलेल्या उमेदवाराचे सर्व शिक्षण मान्यताप्राप्त विद्यापीठातून झालेल्या असणे अनिवार्य आहे.
NHM Ahmednagar Bharti 2024 | राष्ट्रीय आरोग्य अभियान, अहमदनगर येथील भरतीसाठी खालील अनुभव गृहीत धरला जाईल.
 • सदरील भरती करिता जाहिरातीमध्ये दिलेली शैक्षणिक पात्रता पूर्ण केल्यानंतर चा अनुभव ग्राह्य धरला जाईल. उमेदवाराने शैक्षणिक पात्रता पूर्ण करायच्या अगोदर चा अनुभव अर्जामध्ये नमूद करू नये कारण तो ग्राह्य धरला जाणार नाही.
 • उमेदवारांनी आपला अनुभव लिहिताना पदावर नियुक्त झालेली तारीख आणि पदावरून निवृत्त झालेली तारीख अचूक लिहावी.
 • उमेदवाराने ज्या संस्थेतून किंवा कार्यालयातून अनुभव प्राप्त केला आहे. त्या संस्थेचा किंवा कार्यालयाचे अनुभव प्रमाणपत्र उमेदवाराकडे असणे गरजेचे आहे. अर्जामध्ये नमूद केलेला अनुभव हा अनुभवाचे प्रमाणपत्र असलेल्या कार्यालयाचा असावा. जर अर्जामध्ये प्रमाणपत्र नसलेल्या ठिकाणचा अनुभव नमूद केला असेल तर असा अनुभव ग्राह्य धरला जाणार नाही.
 • अर्जामध्ये नमूद केलेल्या तारखा आणि अनुभव प्रमाणपत्रावरील तारखा यांच्यात तफावत आढळल्यास अनुभव प्रमाणपत्र अवैद्य आहे असे समजले जाईल.
 • उमेदवाराने ज्या पदाकरिता अर्ज केला आहे. त्या पदाचा अनुभव उमेदवाराकडे असला पाहिजे त्याव्यतिरिक्त असलेला अनुभव ग्राह्य धरला जाणार नाही.
NHM Ahmednagar Bharti 2024 | राष्ट्रीय आरोग्य अभियान, अहमदनगर येथील भरतीसाठी खालील प्रक्रियेनुसार गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल.
 • सदरील भरतीसाठी येणाऱ्या अर्जाच्या संख्येनुसार उमेदवाराची निवड कोणत्या पद्धतीने करायची ? याची पूर्णपणे जबाबदारी माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद अहमदनगर यांच्याकडे राहील. त्यांच्या निर्णयानुसार उमेदवारांची मुलाखत किंवा लेखी परीक्षा किंवा दोन्हीही परीक्षा घेण्यात येतील.
 • लेखी परीक्षा घेण्यासंदर्भात चा निर्णय अर्जाच्या संख्येवर अवलंबून आहे.
 • लेखी परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला. तर लेखी परीक्षा संदर्भातील सूचना उमेदवारांना कळविण्यात येतील.
 • सदरील भरतीतील उमेदवाराची निवड फक्त मुलाखतीद्वारे घ्यायची झाल्यास माननीय मुख्याधिकारी यांच्या परवानगीने मुलाखत घेण्यात येईल. मुलाखतीत मिळालेले गुण त्याचबरोबर विद्यार्थ्यांची शैक्षणिक पात्रता, शेवटच्या वर्षात मिळालेले गुण, उमेदवाराचा अनुभव या सर्वांचा विचार करून गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल.
 • जर कोविड-19 किंवा इतर आपत्कालीन परिस्थितीमुळे लेखी परीक्षा आणि मुलाखत घेण्यात आली नाही तर उमेदवाराच्या शैक्षणिक पात्रतेनुसार आणि अनुभवानुसार निवड करण्यात येईल.
 • भरतीसाठी दिलेल्या जाहिरातीमध्ये बदल करण्याचा अधिकार पूर्णपणे माननीय मुख्य अधिकारी जिल्हा परिषद, अहमदनगर यांच्याकडे राहील.
NHM Ahmednagar Bharti 2024 | राष्ट्रीय आरोग्य अभियान, अहमदनगर येथील भरतीसाठी सर्वसाधारण सूचना खालीलप्रमाणे.
 • http://nagarzp.gov.in या संकेतस्थळावरती राष्ट्रीय आरोग्य अभियान, अहमदनगर या भरती संदर्भात महत्त्वाच्या सूचना प्रसिद्ध करण्यात येतील. उमेदवारांनी दिलेल्या संकेत स्थळाला भेट देऊन भरती बाबत अपडेट राहू शकता.
 • सदरील भरती च्या निवड समितीच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांशी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला भरती संदर्भात वैयक्तिक भेटता येणार नाही.
 • जाहिरातीत दिलेल्या रिक्त पदांच्या संख्या कमी जास्त होऊ शकतात. याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
 • सदरील भरती मध्ये भरण्यात येणारी पदे ही कंत्राटी स्वरूपात भरली जाणार आहेत. त्यामुळे या पदाचा आणि राज्य शासनाचा काही संबंध नाही. त्यामुळे उमेदवाराने कायमस्वरूपी नोकरीची हमी बाळगू नये. आणि स्वतःला कायमस्वरूपी कामावरती घेण्याबद्दल मागणी करू नये.

राष्ट्रीय आरोग्य अभियान मार्फत होणाऱ्या महाराष्ट्रातील सर्व भरत्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या नोकरी 1st या वेबसाईटला भेट द्या. भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a Comment