PCMC Bharti 2024 | पिंपरी-चिंचवड महानगरपालिका येथे भरती निघालेली आहे. सदरील भरतीची जाहिरात पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत द्वारे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदरील भरती करिता अर्ज करण्याची शेवटची तारीख 2 एप्रिल 2024 ही आहे. समुपदेशक या पदासाठी उमेदवारांची भरती करण्याकरिता ही जाहिरात निघालेली आहे. या पदासाठी पात्रता जाहिरातीमध्ये दिलेली आहे. पात्र उमेदवारांनी भरतीसाठी अर्ज करायचा आहे. उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने आपला अर्ज दिलेल्या पत्त्यावरती पोहोचवायचा आहे. अर्ज करण्यापूर्वी इच्छुक उमेदवारांनी प्रसिद्ध केलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि त्यानंतरचा अर्ज करावा. अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील भरती संदर्भातील माहिती काळजीपूर्वक वाचावी.
- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेची सदरची भरती ही 25 जागांकरिता होणार आहे.
- समुपदेशक या पदाकरिता पिंपरी-चिंचवड महानगरपालिके द्वारे भरती जाहीर केलेली आहे.
PCMC Bharti 2024 | पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील भरतीसाठी शैक्षणिक पात्रता आणि वयाची अट खालील प्रमाणे.
- अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून क्लिनिकल किंवा समुपदेशन मानसशास्त्रामध्ये पदवी मिळवलेली पाहिजे.
- समुपदेशक या पदाकरिता अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 35 वर्षे असले पाहिजे.
- पिंपरी-चिंचवड महानगरपालिका येथील भरती [ PCMC Bharti 2024 ] मध्ये समुपदेशक पदाकरिता निवड होणाऱ्या उमेदवाराला प्रति महिना 30,000 रुपये एवढा पगार मिळेल.
- समुपदेशक पदावरती निवड झालेल्या उमेदवारांकरिता नोकरीचे ठिकाण हे पिंपरी-चिंचवड असेल.
- पिंपरी चिंचवड महानगरपालिके द्वारे समुपदेशक पदाकरिता घेण्यात येणाऱ्या भरतीसाठी शुल्क नाही आहे.
- भरतीसाठी पात्र उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने किंवा ई-मेलद्वारे अर्ज करू नयेत. जाहिरातीमध्ये दिलेल्या पत्त्यावर आपला अर्ज ऑफलाइन पद्धतीने पोहोचवावा.
- समुपदेशक पदाकरिता अर्ज करण्याची शेवटची तारीख 2 मार्च 2024 ही पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत द्वारे ठरवलेली आहे.
- समुपदेशक पदाकरिता अर्ज करण्यापूर्वी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत द्वारे प्रसिद्ध केलेली जाहिरात उमेदवारांनी डाउनलोड करून काळजीपूर्वक वाचायची आहे. जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
- सदरील पदाकरिता अर्ज करण्यासाठी “समक्ष जुना ‘ड’ प्रभाग कार्यालय, कर्मवीर भा.पाटील मनपा प्राथ.शाळा, पिंपरीगाव.” या पत्त्यावर उमेदवारांनी आपला अर्ज सादर करायचा आहे.
PCMC Bharti 2024 | पिंपरी-चिंचवड महानगरपालिका येथील भरतीसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांकरिता खालील महत्त्वाच्या सूचना.
- पिंपरी-चिंचवड महानगरपालिका करिता ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- ऑनलाइन अर्ज करण्याची कोणतीही पद्धत पिंपरी चिंचवड महानगरपालिके द्वारे राबवलेली नाही.
- ऑफलाइन पद्धतीने अर्ज करत असताना अर्ज करणाऱ्या उमेदवाराने स्वतःची पूर्ण माहिती काळजीपूर्वक भरायची आहे. त्यामध्ये उमेदवाराचे पूर्ण नाव, जन्मतारीख, शैक्षणिक तपशील, अनुभवाचे प्रमाणपत्र या सर्व गोष्टी बरोबर लिहायचे आहेत. जर यामध्ये काही चुकीचे लिहिले गेले. तर त्याला पिंपरी-चिंचवड महानगरपालिका जबाबदार असणार नाही.
- ज्या उमेदवारांना समुपदेशक पदाकरिता अर्ज करायचा आहे त्यांनी आपला अर्ज 2 एप्रिल 2024 पर्यंत पाठवायचा आहे.
- प्रसिद्ध केलेली जाहिरात उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी काळजीपूर्वक वाचावी आणि त्यानंतरचा अर्ज करावा.
PCMC Bharti 2024 | पिंपरी-चिंचवड महानगरपालिका येथील भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांनी खालील जाहिरात पहा.
- समुपदेशक पदाकरिता पिंपरी-चिंचवड येथील भरतीसाठी अर्ज केलेले उमेदवार पात्र असतील.
- समुपदेशक पदाकरिता कोणत्याही प्रकारचा TA/DA पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत द्वारे उमेदवाराला देण्यात येणार नाही.
- सदरील भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराने भरतीच्या प्रक्रियेमध्ये कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार करू नये. असे आढळल्यास त्या उमेदवारावरती पिंपरी चिंचवड महानगरपालिके द्वारे कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
- सदरील भरती मध्ये समुपदेशक पदाच्या जागा कमी जास्त करण्याचा पूर्णपणे अधिकार पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडे आहे.
- सदरील भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या संकेतस्थळाला भेट द्या.
PCMC Bharti 2024 | पिंपरी चिंचवड महानगरपालिका येथील भरती संदर्भात महत्त्वाची माहिती खालील प्रमाणे.
- सदरील भरती [ PCMC Bharti 2024 ] मध्ये भरण्यात येणाऱ्या समुपदेशक पदाच्या उमेदवारांना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना विविध विषयावरती समुपदेशन करायचे आहे.
- सदरील भरती मधील समुपदेशक हे पद कंत्राटी पद्धतीने भरले जाणार आहे. त्यासाठी 11 महिन्याच्या कंत्राटा नुसार अर्ज करण्यात येईल.
- अर्ज केलेल्या उमेदवाराला किशोरवयीन मुलांसोबत काम केलेल्या कमीत कमी एक वर्षाचा अनुभव पाहिजे.
- उपदेशक म्हणून काम करणाऱ्या उमेदवाराकडे शाळेच्या विद्यार्थ्यांना समुपदेशन केलेल्याचा कमीत कमी एक वर्षाचा अनुभव पाहिजे.
- अर्ज करणाऱ्या उमेदवाराने या अगोदर प्रशिक्षण आणि कार्यशाळा आयोजित केलेल्या पाहिजेत. त्याचप्रमाणे उमेदवाराकडे मराठी भाषेचे ज्ञान आणि संगणकाचे कौशल्य असले पाहिजेत.
- सदरील भरती मध्ये समुपदेशक पदाची 25 पदे भरण्यात येणार आहेत. ही पदे आरक्षणानुसार भरण्यात येतील.
- सदरील भरती मध्ये अनुसूचित जाती साठी तीन जागा शिल्लक आहेत. अनुसूचित जमाती करिता दोन जागा शिल्लक आहेत. विमुक्त जाती- अ साठी एक जागा रिक्त आहे. भटक्या जाती – ब करिता एक जागा शिल्लक आहे. भटक्या जाती – क साठी एक जागा राखीव आहे. भटक्या जाती- ड करिता एक जागा राखीव आहे. विविध मागास प्रवर्गासाठी एक ही जागा शिल्लक नाही. इतर मागासवर्ग करता पाच जागा रिक्त आहेत. आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांकरिता दोन जागा रिक्त आहेत. एसीबीसी करिता दोन जागा रिक्त आहेत. आणि खुल्या वर्गासाठी सात जागा रिक्त आहेत.
- समुपदेशक पदाकरिता उमेदवाराला नियुक्ती पत्र दिल्यानंतर 11 महिन्याकरिता त्याचा कामाचा कालावधी असेल. जर माननीय आयुक्त पिंपरी-चिंचवड महानगरपालिका यांना गरजेनुसार समुपदेशक कमी करायचे असतील तर कालावधी पूर्ण व्हायच्या आधी सुद्धा उमेदवाराला कामावरून कमी करण्यात येईल. त्यासाठी त्याला कोणत्याही प्रकारचे अगोदर निवेदन देण्यात येणार नाही. त्यामुळे कंत्राटी कार्यकाळ पूर्ण व्हायच्या आधीच उमेदवाराला पदावरून राजीनामा द्यावा लागेल. यासाठी उमेदवाराला कोणत्याही न्यायालयात न्याय मागता येणार नाही. याउलट जर समुपदेशक पदाची आवश्यकता वाटली तर 11 महिन्याच्या कार्यकाळा नंतर सुद्धा उमेदवाराला कामावर रुजू ठेवण्यात येईल.
- सदरील समुपदेशक पदाची निवड ही तात्पुरत्या स्वरूपाची आहे. त्यामुळे उमेदवाराला कायमस्वरूपी नोकरीची कोणतीही हमी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका देत नाही. कार्यकाळ संपल्यानंतर उमेदवाराला कायमस्वरूपी पदावरती करता येणार नाही.
- पिंपरी-चिंचवड महानगरपालिका येथे कायमस्वरूपी असणाऱ्या कर्मचाऱ्यांना ज्या सुविधा मिळतात. त्या सुविधा सदरील भरती मधील उमेदवाराला मिळणार नाहीत.
- पिंपरी-चिंचवड येथील समुपदेशक पदाच्या भरती करिता अर्ज केला म्हणजे उमेदवारांची नियुक्ती झाली असे नाही. अर्ज केलेल्या उमेदवाराला निवड प्रक्रियेला सामोरे जावे लागेल. सदरच्या निवड प्रक्रियेमध्ये उमेदवाराने कोणत्याही प्रकारच्या दबाव तंत्राचा वापर करून सूट मिळवण्याचा प्रयत्न केला. तर त्या उमेदवाराचा अर्ज कोणत्याही टप्प्यावरती रद्द होऊ शकतो.
- कायमस्वरूपी च्या उमेदवाराला मिळणाऱ्या वैद्यकीय सुविधा आणि दिवाळीचा बोनस कंत्राटी उमेदवाराला मिळणार नाही.
- उमेदवाराने सदरील भरती करिता स्वतःच्या मनाने अर्ज करू नये. अर्जाचा नमुना जाहिरातीच्या शेवट दिलेला आहे. त्याचप्रमाणे उमेदवाराने अर्ज करायचा आहे. दिनांक 2 मार्च 2024 या तारखेला सकाळी 10 ते सायंकाळी 5:00 वाजेपर्यंत उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावरती समक्ष जाऊन जमा करायचा आहे. पत्राद्वारे / कुरियर द्वारे / ई-मेल द्वारे जमा झालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
- उमेदवाराने आपला अर्ज योग्य वेळेमध्ये जमा करणे बंधनकारक आहे. जर उमेदवाराने आपला अर्ज ठराविक वेळेत जमा नाही केला तर नंतर मिळालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. उमेदवाराने अर्ज दिलेल्या नमुन्यात सादर करावा. जर या व्यतिरिक्त अर्ज मिळाले तर ते ग्राह्य धरले जाणार नाहीत.
- उमेदवाराने आपल्या अर्जाबरोबर आवश्यक असणारे कागदपत्रे, मार्कशीट यांच्या प्रती जोडाव्यात. त्याचबरोबर शाळा सोडल्याचा दाखला, शैक्षणिक पात्रता असणारी प्रमाणपत्रे, अनुभव प्रमाणपत्र, गुणपत्रक, आधार कार्ड, आरक्षण प्रमाणपत्र या सर्वांच्या प्रती जोडाव्यात.
- चुकीचे भरलेले अर्ज किंवा अपूर्ण भरलेले अर्ज हे बाद करण्यात येतील. अर्ज बाद केल्यानंतर त्यासंदर्भातील सूचना उमेदवाराला कोणत्याही प्रकारे देण्यात येणार नाही.
- शैक्षणिक पात्रता ज्या उमेदवारांची पूर्ण असेल त्या उमेदवाराला लेखी परीक्षा देणे आवश्यक आहे. लेखी परीक्षा संदर्भातील माहिती उमेदवाराला ई-मेल द्वारे किंवा मोबाईल द्वारे कळविण्यात येईल.
- लेखी परीक्षा पास झाल्यानंतर उमेदवाराला कौशल्य चाचणी द्यावी लागेल. कौशल्य चाचणी मध्ये पास झालेल्या उमेदवारालाच पुढील प्रक्रियेत सहभागी होता येईल. कौशल्य चाचणी संदर्भातील माहिती उमेदवाराला ई-मेल द्वारे कळवण्यात येईल.
- समुपदेशक या पदाकरिता मुलाखतीला येणाऱ्या कोणत्याही उमेदवाराला पिंपरी चिंचवड महानगरपालिके द्वारे कसल्याही प्रकारचा भत्ता दिला जाणार नाही.
- सध्याच्या भरतीमध्ये कंत्राटी स्वरूपाने काम करत असणाऱ्या उमेदवाराला भविष्यामध्ये महानगरपालिकेमध्ये कोणत्याही स्वरूपाच्या कायमस्वरूपी नोकरीमध्ये हक्क मागता येणार नाही. असे नोटरी एफिडेविट ₹500 च्या स्टॅम्प पेपरवर करण्यात येणार आहे. यामुळे नोकरी संदर्भात उमेदवाराला न्यायालयात दाद मागता येणार नाही.
- सदर ची जाहिरात जर कोणत्याही उमेदवाराला ऑनलाइन पद्धतीने पाहिजे असेल तर क्या उमेदवाराने https://www.pcmcindia.gov.in/ या लिंक वरती जाऊन पहावे.
- सदरची भरती कोणत्याही कारणास्तव रद्द करण्याचा पूर्णपणे अधिकार माननीय आयुक्त पिंपरी-चिंचवड महानगरपालिका यांच्याकडे आहे. त्यामुळे उमेदवाराला कोणत्याही प्रकारचा किती संदर्भाचा जाब विचारता येणार नाही.
- उमेदवाराने अर्ज करताना हा अर्ज प्रति, माननीय आयुक्त, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका यांच्याकडे करायचा आहे. या अर्जाच्या सुरुवातीला उजव्या कोपऱ्यात उमेदवाराने स्वतःचा आयडेंटी साइज फोटो चिकटवायचा आहे.
- त्यानंतर हा अर्ज आपण कशासाठी करत आहोत. तो विषय लिहायचा आहे . विषयामध्ये समुपदेशक या पदावर ती नियुक्ती मिळण्याबाबत असे अर्जात लिहायचे आहे.
- त्यानंतर उमेदवाराने सदरील जाहिरात किती तारखेला आणि कुठे पाहिली यासंदर्भातील माहिती लिहायची आहे. त्यानंतर आपली स्वतःची माहिती सादर करायचे आहे. त्यामध्ये प्रथम क्रमांकाला उमेदवाराने स्वतःचे संपूर्ण नाव लिहायचे आहे. पत्रव्यवहार करिता लागणारा उमेदवाराचा पत्ता उमेदवाराने लिहायचा आहे. उमेदवाराने स्वतःचा चालू भ्रमणध्वनी आणि दूरध्वनी क्रमांक लिहायचा आहे. उमेदवाराकडे असणारा चालू ईमेल आयडी चौथ्या क्रमांकावर लिहायचा आहे. आणि पाचव्या क्रमांकावरती स्वतःची जन्मतारीख लिहायची आहे. उमेदवाराने स्वतः पूर्ण केलेले शैक्षणिक शिक्षण लिहायचे आहे. सातव्या क्रमांकाला उमेदवाराने कोणता अनुभव मिळवलेला आहे त्यासंदर्भात माहिती लिहायची आहे. आठव्या क्रमांकावरती उमेदवाराने स्वतःची जात आणि प्रवर्ग लिहायचा आहे.
महाराष्ट्र राज्यातील संपूर्ण महानगरपालिकेमध्ये कोणत्याही प्रकारची भरती निघाली तर त्या संदर्भातील माहिती मिळवण्याकरिता आमच्या नोकरी फस्ट या वेबसाईटला नक्की भेट द्या. भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.