CBSE Bharti 2024 | केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ येथे विविध पदांसाठी भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदरील भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 एप्रिल 2024 ही आहे. असिस्टंट सेक्रेटरी ( ऍडमिनिस्ट्रेशन ), असिस्टंट सेक्रेटरी ( अकॅडमिक ), असिस्टंट सेक्रेटरी ( स्किल एज्युकेशन ), असिस्टंट सेक्रेटरी ( ट्रेनिंग ), अकाउंट ऑफिसर, जूनियर इंजीनियर, जूनियर ट्रान्सलेशन ऑफिसर, अकाउंटंट, जूनियर अकाउंटंट या सर्व पदांसाठी सदरील भरती होणार आहे. तरी पात्रताधारक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्याद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. सदरील भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचा.
- केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ येथील भरती 118 पदांसाठी होणार आहे.
- केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ मार्फत घेण्यात येणाऱ्या भरती मधील पदांची नावे खालील प्रमाणे.
CBSE Bharti 2024 | केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ येथील भरतीसाठी रिक्त पदे आणि शैक्षणिक पात्रता खालील प्रमाणे.
- असिस्टंट सेक्रेटरी ( ऍडमिनिस्ट्रेशन )
- असिस्टंट सेक्रेटरी ( अकॅडमिक )
- असिस्टंट सेक्रेटरी ( स्किल एज्युकेशन )
- असिस्टंट सेक्रेटरी ( ट्रेनिंग )
- अकाउंट ऑफिसर
- जूनियर इंजीनियर
- जूनियर ट्रान्सलेशन ऑफिसर
- अकाउंटंट
- जूनियर अकाउंटंट
- असिस्टंट सेक्रेटरी ( ऍडमिनिस्ट्रेशन ) या पदासाठी उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी मिळवलेली पाहिजे. उमेदवार पदवीधर पाहिजे.
- असिस्टंट सेक्रेटरी ( अकॅडमिक ) या पदासाठी उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी पाहिजे. त्याचप्रमाणे उमेदवार B.Ed असला पाहिजे. उमेदवाराने NET / SLET पदवी मिळवलेली पाहिजे.
- असिस्टंट सेक्रेटरी ( स्किल एज्युकेशन ) या पदासाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी मिळवलेली पाहिजे.
- असिस्टंट सेक्रेटरी ( ट्रेनिंग ) या पदासाठी उमेदवाराकडे संबंधित विषयात मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी मिळालेली पाहिजे. त्याचप्रमाणे उमेदवाराकडे B.Ed आणि NET / SLET पदवी पाहिजे.
- अकाउंट ऑफिसर या पदासाठी उमेदवाराकडे इकॉनोमिक, कॉमर्स, अकाउंट्स, फायनान्स, बिझनेस स्टडीज, कॉस्ट अकाउंटिंग या विषयामध्ये मिळवलेली पदवी पाहिजे. किंवा पदवीधर उमेदवाराने SAS / JAO हा कोर्स पूर्ण केला पाहिजे. किंवा उमेदवाराकडे वरील विषयांपैकी कोणत्याही एका विषयात पदव्युत्तर पदवी पाहिजे. किंवा उमेदवाराने एमबीए फायनान्स मधून पूर्ण केले पाहिजे किंवा उमेदवार चार्टर अकाउंटंट असावा.
- जूनियर इंजीनियर या पदासाठी उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून बॅचलर ऑफ इंजीनियरिंग किंवा बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी ( स्थापत्य ) यापैकी कोणतीही एक पदवी पाहिजे.
- जूनियर ट्रान्सलेशन ऑफिसर या पदासाठी उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून इंग्रजी विषयासह हिंदी मधून पदव्युत्तर पदवी मिळवलेली पाहिजे. उमेदवाराला कामाचा तीन वर्षाचा अनुभव पाहिजे किंवा हिंदी / इंग्रजी अनुवाद मध्ये डिप्लोमा किंवा प्रमाणपत्र मिळाले पाहिजे.
- अकाउंटंट या पदासाठी उमेदवाराकडे इकॉनॉमिक्स, कॉमर्स, अकाउंट, फायनान्स, बिझनेस स्टडी, कॉस्ट अकाउंटिंग या विषयांमध्ये पदवी मिळवलेली पाहिजे. उमेदवाराचे इंग्रजी टायपिंग संगणकावरती 35 शब्द प्रतिमिनिट आणि हिंदी टायपिंग 30 शब्द प्रतिमिनिट पाहिजे.
- जूनियर अकाउंटंट या पदासाठी उमेदवार अकाउंटन्सी, बिझनेस स्टडी, इकॉनोमिक, कॉमर्स, इंटरप्रीटर शिप, फायनान्स, बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन, टॅक्सेशन, कॉस्ट अकाउंटिंग यापैकी कोणत्याही एका विषयातून 12 वी पास झालेला पाहिजे.उमेदवाराचे इंग्रजी टायपिंग संगणकावरती 35 शब्द प्रतिमिनिट आणि हिंदी टायपिंग 30 शब्द प्रतिमिनिट पाहिजे.
- असिस्टंट सेक्रेटरी ( ऍडमिनिस्ट्रेशन ) आणि अकाउंट ऑफिसर या पदासाठी उमेदवाराचे वय 18 ते 35 वर्षे पाहिजे.
- असिस्टंट सेक्रेटरी ( अकॅडमिक ), असिस्टंट सेक्रेटरी ( स्किल एज्युकेशन ), असिस्टंट सेक्रेटरी ( ट्रेनिंग ), जूनियर ट्रान्सलेशन ऑफिसर आणि अकाउंटंट या पदांसाठी उमेदवाराचे वय 18 ते 30 वर्षे पाहिजे.
- जूनियर इंजीनियर या पदासाठी उमेदवाराचे वय 18 ते 32 वर्षापर्यंत पाहिजे.
- जूनियर अकाउंटंट या पदासाठी उमेदवाराचे वय 18 ते 27 वर्षापर्यंत पाहिजे.
- 11 एप्रिल 2024 रोजी उमेदवाराचे भरतीसाठी आवश्यक असणारे वय पूर्ण झाले पाहिजे. एससी / एसटी कॅटेगिरी च्या उमेदवारांना पाच वर्षे वयामध्ये सूट दिलेली आहे. तर ओबीसी उमेदवारांसाठी तीन वर्षे वयामध्ये सूट दिलेली आहे.
- सदरील भरती मध्ये पदावर ती नियुक्त होणाऱ्या सर्व उमेदवारांना नियमानुसार मासिक वेतन मिळेल.
- सदरील भरती मध्ये पदावर ती नियुक्त होणाऱ्या सर्व उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत राहील.
- सदरील भरती मध्ये 1 ते 5 पदाकरिता 1500 रुपये प्रवेश शुल्क आहे. तर 6 ते 9 पदासाठी 800 रुपये प्रवेश शुल्क आहे.
- एससी / एसटी / अपंग / माजी कर्मचारी / महिला या सर्वांसाठी परीक्षा शुल्क नाही.
- सदरील भरतीसाठी पात्र उमेदवारांनी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्या वेबसाईट वरून अर्ज करायचा आहे.
- केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्याद्वारे अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 एप्रिल 2024 देण्यात आलेली आहे.
- भरती करिता अर्ज करण्यापूर्वी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्याद्वारे प्रसिद्ध झालेली जाहिरात काळजीपूर्वक वाचा. जाहिरात पहा
- सदरील भरतीसाठी अर्ज करण्याकरिता केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्याद्वारे ऑनलाइन पोर्टल देण्यात आलेले आहेत. त्याद्वारे उमेदवारांनी अर्ज करावा. अर्ज करा 2 ते 4 अर्ज करा 1 & 5 ते 9
CBSE Bharti 2024 |केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ येथील भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खालील सूचना वाचा.
- केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ येथील भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.
- केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्याद्वारे ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याची कोणतीही पद्धत दिलेली नाही त्यामुळे कोणताही उमेदवाराने ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू नये.
- सदरील भरती करिता उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज भरत असताना कोणत्याही स्वरूपाची माहिती चुकीच्या पद्धतीने टाकू नये. जर उमेदवाराने स्वतःबद्दल कोणतीही माहिती चुकीची दिली. तर त्या उमेदवाराचा अर्ज कोणत्याही टप्प्यावर बाद करण्याचा पूर्णपणे अधिकार केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्याकडे राहील.
- 11 एप्रिल 2024 ही सदरील भरती करिता अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
- केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
CBSE Bharti 2024 | केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ येथील रिक्त पदांसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांनी खालील महत्त्वाच्या सूचना वाचाव्यात.
- सदरील भरतीसाठी [ CBSE Bharti 2024 ] ज्या उमेदवारांनी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ यासाठी ऑनलाइन अर्ज केलेला आहे त्या उमेदवारांपैकी योग्य उमेदवाराची निवड केली जाईल.
- केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्याद्वारे अर्ज केलेल्या कोणत्याही उमेदवाराला TA / DA देण्यात येणार नाही. याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
- केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्याद्वारे घेण्यात येणाऱ्या परीक्षेमध्ये कोणत्याही उमेदवाराने अनुचित प्रकार केला तर त्या उमेदवारावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
- परीक्षा केंद्र ठरवण्याचे काम केंद्रीय शिक्षण महामंडळ यांच्या द्वारे करण्यात येईल. त्यामुळे कोणीही या प्रक्रियेमध्ये हस्तक्षेप करू नये.
- सदरील भरती संदर्भात अधिक माहिती आणि परीक्षेचा अभ्यासक्रम जाणून घेण्यासाठी उमेदवारांनी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्या संकेतस्थळाला भेट द्यायची आहे.
CBSE Bharti 2024 | केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ येथील भरतीसाठी उमेदवारांकरिता महत्त्वाच्या सूचना खालील प्रमाणे.
- परीक्षेपूर्वी उमेदवाराचे बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन करावे लागणार आहे. त्यामुळे उमेदवाराने परीक्षा केंद्राच्या ठिकाणी दोन तास अगोदर पोहोचणे आवश्यक आहे. जर काही कारणामुळे उमेदवार शेवटच्या मिनिटाला परीक्षा स्थळी पोहोचला तर त्या उमेदवाराचा परीक्षेचा वेळ वाया जाणार आहे.
- कोणत्याही प्रकारचे साहित्य, पट्टी, पेन्सिल बॉक्स, कंपास, हॅन्ड बॅग, पर्स, कसल्याही प्रकारचा पेपर, खाद्यपदार्थ, पाणी, मोबाईल फोन, हेडफोन, कॅल्क्युलेटर, धातूच्या वस्तू, इलेक्ट्रॉनिक वस्तू यापैकी कोणतीही गोष्ट उमेदवाराला परीक्षेला घेऊन बसता येणार नाही.
- जर उमेदवाराला परीक्षा केंद्रावर प्रवेश करताना हॉल तिकीट संदर्भात विचारले तर उमेदवाराने हॉल तिकीट दाखवावे. परीक्षेच्या ड्युटीवर असणाऱ्या स्टाफला उमेदवाराचे ओळखपत्र तपासण्याचा पूर्णपणे अधिकार आहे. त्यामुळे उमेदवाराने स्टाफला सहकार्य करावे. ज्या उमेदवारांकडे वैध हॉल तिकीट किंवा ओळखपत्र नसेल अशा उमेदवाराला परीक्षा केंद्रावर बसू दिले जाणार नाही.
- परीक्षा केंद्रावर प्रत्येक बेंचवर परीक्षा क्रमांक उमेदवारांसाठी टाकलेला असेल. त्या परीक्षा क्रमांक नुसारच उमेदवाराने परीक्षेसाठी बसायचे आहे. जर कोणत्याही उमेदवाराने त्याला दिलेल्या जागेवर न बसता दुसरीकडे बसून पेपर देण्याचा प्रयत्न केला तर अशा उमेदवाराला बाद करण्यात येईल.
- परीक्षा केंद्रावर उमेदवाराला ज्या पदासाठी परीक्षा घेण्यात येणार आहे त्या पदाचीच प्रश्नपत्रिका मिळेल. जर कोणत्याही उमेदवाराला त्याने अर्ज केलेल्या पदाच्या व्यतिरिक्त दुसऱ्या पदाची प्रश्नपत्रिका मिळाली तर त्याने लगेच पर्यवेक्षकांच्या हि बाब लक्षात आणून द्यावी.
- परीक्षेला बसलेला उमेदवार परीक्षा केंद्र प्रमुखाला प्रथमोपचारासाठी किंवा इतर काही अडचण असेल तर परीक्षा हॉल मध्ये बोलू शकतो.
- ज्या उमेदवारांना केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्याद्वारे घेण्यात आलेल्या निवड चाचणीसाठी उपस्थित राहता येणार नाही. आशा उमेदवारांसाठी पुन्हा सदरील चाचणी घेण्यात येणार नाही. याची त्या उमेदवारांनी नोंद घ्यावी.
- सदरील भरती करिता उमेदवाराने परीक्षा केंद्रावर स्वखर्चाने यावे परीक्षा केंद्रावर येण्यासाठी उमेदवाराला केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्याकडून कोणत्याही प्रकारचे मानधन देण्यात येणार नाही.
- उमेदवाराने परीक्षेच्या दिवशी परीक्षा केंद्रावर येताना खालील कागदपत्रे बरोबर घेऊन येणे आवश्यक आहे. जर उमेदवार खालील दिलेले कागदपत्रे परीक्षा केंद्रावर घेऊन आला नाही तर त्याला परीक्षा केंद्रावर आतमध्ये जाऊ दिली जाणार नाही.
- पासपोर्ट साईज फोटो आवश्यक आहे. अर्जाबरोबर जो पासपोर्ट साईज फोटो जोडलेला त्या पद्धतीचाच फोटो परीक्षा केंद्रावर जाताना घेऊन जावे. गरज पडली तर हजेरी पुस्तकावर फोटो चिकटवावा लागेल.
- पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन, मतदान कार्ड, आधार कार्ड यापैकी कोणतेही एखादे वैध ओळखपत्र उमेदवाराकडे असेल तर उमेदवाराने परीक्षा केंद्रावर घेऊन यावे. याव्यतिरिक्त जर रेशन कार्ड पासपोर्ट साइज फोटो सोबत असेल तर घेऊन यावे.
- अपंग उमेदवाराला अपंगांसाठी मिळणाऱ्या संविधान चा लाभ घ्यायचा असेल तर त्या उमेदवाराकडे अपंगत्वाचे केंद्र शासनाकडून किंवा राज्य शासनाकडून मिळालेले प्रमाणपत्र सोबत घेऊन यावे.
- जर अपंग उमेदवाराला स्वतःचा लेखक परीक्षेसाठी आणायचा असेल. तर त्याने त्या लेखकास संदर्भातील संपूर्ण माहिती अगोदरच परीक्षा स्थळी द्यायची आहे.
[ CBSE Bharti 2024 ] केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या शैक्षणिक संस्थेमधील कोणत्याही प्रकारच्या भरती संदर्भात माहिती मिळवण्यासाठी आमच्या नोकरी 1st या वेबसाईटला नक्की भेट द्या. भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.