Bombay High Court Bharti 2024 | बॉम्बे उच्च न्यायालय येथे भरती.

Bombay High Court Bharti 2024 | बॉम्बे उच्च न्यायालय येथे विविध पदांसाठी भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात बॉम्बे उच्च न्यायालय यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. 10 एप्रिल 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. सदरील भरती ही सफाई कामगार पदासाठी होणार आहे. सदरील भरतीसाठी उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्यापूर्वी बॉम्बे उच्च न्यायालय यांच्याद्वारे जाहीर करण्यात आलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि त्यानुसारच अर्ज करावा. सदरील भरतीसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी.

Bombay High Court Bharti 2024

  • बॉम्बे उच्च न्यायालय येथील भरती 06 जागांसाठी होणार आहे.
  • सफाई कामगार या पदासाठी बॉम्बे उच्च न्यायालय यांनी भरती काढलेली आहे.

Bombay High Court Bharti 2024 | बॉम्बे उच्च न्यायालय येथील भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि वयाची अट खालील प्रमाणे.

  • सफाई कामगार या पदासाठी अर्ज करणारा उमेदवार भारताचा नागरिक असावा. अर्ज करणारा उमेदवार किमान चौथी पास असावा. उमेदवाराला मराठी आणि हिंदी भाषा नीता वाचता येणे गरजेचे आहे. अर्ज करणाऱ्या उमेदवाराला शौचालय आणि स्नानगृह स्वच्छतेचा अनुभव असावा. त्याचप्रमाणे कार्यालयाची स्वच्छता याबाबतचा अनुभव असावा.
  • सफाई कामगार या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 38 वर्षे असावे. त्याचप्रमाणे एससी आणि एसटी प्रवर्गातील उमेदवारांकरिता वयामध्ये पाच वर्षाची सूट राहील.
  • सफाई कामगार या पदासाठी बॉम्बे उच्च न्यायालय या ठिकाणी नियुक्त झाल्यानंतर उमेदवाराला नियमानुसार वेतन मिळेल.
  • सदरील भरती मध्ये सफाई कामगार पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण छत्रपती संभाजी नगर राहील.
  • सफाई कामगार या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून परीक्षा शुल्क ₹200 बॉम्बे उच्च न्यायालय यांच्याकडून आकारण्यात येणार आहे.
  • सदरील भरतीसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांनी पत्राद्वारे किंवा स्पीड पोस्ट द्वारे आपला अर्ज दिलेल्या पत्त्यावर पोहोचवायचा आहे.
  • बॉम्बे उच्च न्यायालय यांच्याकडून अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 एप्रिल 2024 ही आहे.
  • सदरील भरतीसाठी बॉम्बे उच्च न्यायालय यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी सर्वप्रथम काळजीपूर्वक जाहिरात वाचावी. जाहिरात पहा.
  • “प्रबंधक (प्रशासन), मुंबई उच्च न्यायालय, खंडपीठ औरंगाबाद, जालना रोड, छत्रपती संभाजीनगर – ४३१ ००९” या पत्त्यावर उमेदवाराने स्वतःचा अर्ज पाठवायचा आहे.

Bombay High Court Bharti 2024 | बॉम्बे उच्च न्यायालय येथील भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचावी.

  • बॉम्बे उच्च न्यायालय येथील भरतीसाठी उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची कोणतीही पद्धत बॉम्बे उच्च न्यायालय यांच्याकडून राबविण्यात आलेली नाही. त्यामुळे उमेदवारांनी कोणत्याही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू नये.
  • अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी अर्जामध्ये स्वतःची संपूर्ण माहिती काळजीपूर्वक लिहायची आहे. जर स्वतःची माहिती लिहिताना उमेदवाराकडून काही चुकले आणि उमेदवाराचा अर्ज बाद करण्यात आला तर त्याला बॉम्बे उच्च न्यायालय जबाबदार राहणार नाही.
  • बॉम्बे उच्च न्यायालय यांच्याकडून 10 एप्रिल 2024 ही ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख देण्यात आलेली आहे.
  • बॉम्बे उच्च न्यायालय यांच्यामार्फत घेण्यात येणाऱ्या भरतीसाठी उमेदवारांनी प्रसिद्ध केलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

Bombay High Court Bharti 2024 | बॉम्बे उच्च न्यायालय येथील भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांकरिता सूचना खालील प्रमाणे.

  • बॉम्बे उच्च न्यायालय येथील भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांपैकी योग्य उमेदवाराची निवड करण्यात येईल.
  • बॉम्बे उच्च न्यायालय येथील भरतीसाठी कोणत्याही उमेदवाराला TA / DA देण्यात येणार नाही याची सर्व उमेदवारांनी दक्षता घ्यायची आहे.
  • बॉम्बे उच्च न्यायालय येथील भरतीच्या प्रक्रियेमध्ये कोणत्याही उमेदवारा द्वारे अनुचित प्रकार करण्यात आला तर त्या उमेदवारावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
  • सदरील भरतीसाठी परीक्षा केंद्र आणि परीक्षेची वेळ ही मुंबई उच्च न्यायालय यांच्याकडून ठरवण्यात येईल त्यामुळे उमेदवाराने दिलेल्या वेळेत दिलेल्या ठिकाणात हजर राहणे आवश्यक आहे.
  • सदरील भरतीसाठी आवश्यक अभ्यासक्रम बॉम्बे उच्च न्यायालय यांच्या संकेतस्थळावर दिलेला आहे. उमेदवारांनी संकेतस्थळाला भेट देऊन अधिक माहिती मिळवावी.
Bombay High Court Bharti 2024 | बॉम्बे उच्च न्यायालय भरती येथील भरती संदर्भात अधिक माहिती खालील प्रमाणे.
  • Bombay High Court Bharti 2024 | मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या आस्थापनेवर ” सफाई कामगार” या पदासाठी निरोगी, इच्छुक आणि पात्र उमेदवारांची नेमणूक करणे आहे.
  • सदरील भरती मध्ये सफाई कामगार पदावर झालेली नियुक्ती जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून दोन वर्षांकरिता राहील.
  • सफाई कामगार या पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवाराला 16,600 रुपये ते 52,400 रुपये इतके वेतन राहील.
  • सदरील भरतीच्या जाहिराती च्या शेवटी अर्जाचा नमुना दिलेला आहे त्या अर्जाच्या नमुन्यामध्ये उमेदवाराने स्वतःचा अर्ज तयार करावा त्यासोबत आवश्यक कागदपत्रे स्वयं स्वाक्षरी केलेली जोडावेत आणि 10 एप्रिल 2024 रोजी 6:00 वाजेपर्यंत दिलेल्या पत्त्यावर पोहोचवावेत.
  • उमेदवारांनी स्पीड पोस्ट व्यतिरिक्त इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज करू नये. तारीख निघून गेल्यानंतर दिलेल्या पत्त्यावर मिळालेल्या अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
  • सदरील भरतीसाठी न्यायालयीन कर्मचारी किंवा शासकीय कर्मचारी यांना वयाची कोणतीही अट नाही. आशा उमेदवारांनी त्यांच्या कार्यालयाद्वारे अर्ज करावा.
  • भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला हिंदी आणि मराठी भाषा वाचता, लिहिता आणि बोलता आलेले पाहिजे.
  • भरतीसाठी योग्य उमेदवार याच्याकडून करार केला जाईल. सदरील उमेदवार करार करण्यासाठी सक्षम असावा.
  • संघ लोकसेवा आयोग, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, न्यायालय लोकसेवा आयोग या संघांच्या भरतीच्या परीक्षांसाठी उमेदवाराला कायमस्वरूपी अदाखल केलेले नसावे. कोणत्याही न्यायालयाने उमेदवाराला नैतिक पतनाच्या गुन्ह्यांमध्ये दोषी ठरवलेले नसावे.
  • अर्ज करणाऱ्या कोणत्याही उमेदवारावर ती फौजदारी गुन्हा दाखल नसावा किंवा असला तरी तो गुन्हा प्रलंबित नसावा. न्यायालयाने उमेदवाराला फौजदारी गुन्ह्यांमध्ये दोषी ठरवलेली नसावे.
  • अर्ज करणाऱ्या उमेदवारांपैकी जे उमेदवार शासकीय किंवा न्यायालयीन कर्मचारी आहेत आशा उमेदवारांवर ती कोणत्याही प्रकारची विभागीय चौकशी प्रलंबित नसावी.
  • 28 मार्च 2006 नंतर उमेदवाराला जन्माला आलेल्या अपत्यांची संख्या दोन पेक्षा जास्त नसावी.
  • सदरील भरती मधील पदांसाठी उमेदवारांकडून किमान पात्रता असणे आवश्यक आहे. त्यामुळे किमान पात्रता असलेल्या उमेदवारांना सदरील भरतीसाठी बोलवण्यात येईल.
  • भरतीतील उमेदवारांची अल्प सूची तयार करण्यात येईल. तयार करण्यात आलेल्या अल्प सूची मध्ये उमेदवाराचे नाव आले म्हणून उमेदवाराची निवड पक्की झाली असे नाही.
  • अल्प सूची तयार करताना उमेदवारांची कमीत कमी पात्रता तपासण्यात येणार आहे. किमान पात्र असणाऱ्या उमेदवारांना प्रात्यक्षिक परीक्षेसाठी बोलावण्यात येणार आहे.
  • भरतीसाठी निवड करताना उमेदवाराची प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यात येईल. प्रात्यक्षिक परीक्षा ही 30 मार्काची असेल. उमेदवाराला पास होण्याकरिता 15 मार्क मिळणे आवश्यक आहे.
  • भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची शारीरिक कार्यक्षमता चाचणी घेण्यात येईल. या चाचणीचे एकूण 10 गुण असतील.
  • वरील परीक्षा झाल्यानंतर उमेदवाराची तोंडी मुलाखत घेण्यात येईल या तोंडी मुलाखतीचे एकूण 10 गुण असतील. लेखी परीक्षा आणि तोंडी परीक्षा यांची मिळून 50 गुण होतील.
  • सदरील भरतीसाठी आवश्यक पात्रता जाहिरातीमध्ये दिलेली आहे. ती पात्रता पाहून पात्र उमेदवारांनी सदरील भरतीसाठी अर्ज करायचा आहे. त्यानंतर उमेदवारांनी दिलेल्या नमुना नुसार भरलेला अर्ज चेक करायचा आहे. यानंतर उमेदवाराच्या कोणत्याही तक्रारीचा दावा उच्च न्यायालयाकडून ऐकला जाणार नाही.
  • विवाहित महिलांनी लग्नानंतर बदललेल्या नावाने अर्ज करण्यापेक्षा त्यांच्या शालेय कागदपत्रांमध्ये जे नाव आहे त्या नावानुसार अर्ज करायचा आहे. नाव बदललेल्या व्यक्तींनी शाळेतील नावानुसार अर्ज करायचा आहे.
  • सफाई कामगार या पदासाठी उमेदवार कमीत कमी चौथी पास असला पाहिजे. उमेदवाराला इयत्ता चौथी मध्ये मिळालेले गुण अर्जामध्ये लिहिणे आवश्यक आहे. जर उमेदवाराला इयत्ता चौथी मध्ये किती गुण मिळाले हे माहीत नसेल तर त्याने 50% गुण मिळाले असे लिहावे.
  • राज्य शासनाच्या इतर कोणत्याही सरकारी खात्यामध्ये काम करणाऱ्या उमेदवाराला त्याच्या कार्यालयीन प्रमुखाकडून ना हरकत दाखला घेणे आवश्यक आहे. आणि नियुक्तीच्या वेळेस उच्च न्यायालय यांना सादर करणे गरजेचे आहे.
  • अर्ज केलेल्या उमेदवारांनी अर्जामध्ये स्वतःचा चालू ईमेल आयडी आणि चालू मोबाईल नंबर नोंदवायचा आहे यामुळे खरंच पडल्यावर उमेदवाराशी ई-मेल च्या द्वारे किंवा थेट मोबाईलच्या द्वारे संपर्क करण्यात येईल.
  • उमेदवाराने अर्ज पाठवत असताना अर्ज लिफाफा मध्ये बंद केल्यानंतर लिफाफे च्या वरती ” सफाई कर्मचारी पदासाठी अर्ज” असे लिहिणे गरजेचे आहे.
  • उमेदवाराला अर्जामध्ये फोटो चिकटवणे करिता जागा देण्यात आलेली आहे त्या जागेमध्ये उमेदवाराने स्वतःचा नवीन काढलेला कलर फोटो पासपोर्ट साईज चिकटवायचा आहे.
  • मुंबई उच्च न्यायालय यांच्याद्वारे देण्यात आलेल्या अर्जाच्या नमुन्या मध्येच उमेदवारांनी स्वतःचा अर्ज लिहायचा आहे. त्याचप्रमाणे उमेदवाराचा अर्ज जर सदरील नमुन्यात नसेल किंवा अपूर्ण भरलेला असेल तर अशा उमेदवाराचा अर्ज बाद करण्यात येईल.
  • सदरील भरतीसाठी अर्ज भरत असताना उमेदवारांनी कोणत्याही पद्धतीचा शुल्क भरायचा नाही. अर्ज भरल्यानंतर उमेदवारांची अल्प सूची तयार करण्यात येईल त्या अल्प सूची मधील उमेदवारांनी “Registrar High Court Bench at Aurangabad” या नावाने कोणत्याही राष्ट्रीय बँकेमधून डिमांड ड्राफ्ट बनवून जमा करायचा आहे.
  • सदरील भरतीसाठी उमेदवारांची निवड प्रक्रिया सुरू झाल्यानंतर अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी ठरल्यास किंवा अर्जामध्ये कोणत्याही पद्धतीची माहिती अपूर्ण दिलेली असल्यास कोणत्याही टप्प्यावर उमेदवाराचा अर्ज रद्द करण्यात येईल.
  • ” मुंबई उच्च न्यायालय, खंडपीठ औरंगाबाद, जालना रोड, छत्रपती संभाजी नगर – 431 009″ या पत्त्यावर उमेदवारांची प्रात्यक्षिक परीक्षा, शारीरिक चाचणी आणि तोंडी परीक्षा घेण्यात येईल.
  • लहान कुटुंब प्रतिज्ञापत्र, चारित्र्यसंपन्न ते विषयीचे प्रमाणपत्र, ना हरकत प्रमाणपत्र, पासपोर्ट साईज एक फोटो, पाच रुपयांचे तिकीट, शैक्षणिक गुणपत्रके, जन्मतारखेचा दाखला, दिव्यांगचा दाखला, अनुभवाचे प्रमाणपत्र, महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र, नाव बदलण्याचे राजपत्र, न्यायालय प्रशासनाने विचारलेले इतर सर्व दस्तावेज उमेदवाराकडे असणे आवश्यक आहेत.

Bombay High Court Bharti 2024 | मुंबई उच्च न्यायालय येथे निघणाऱ्या भरती संदर्भात अधिक माहिती मिळवण्याकरिता आमच्या नोकरी फस्ट या वेबसाईटला नक्की भेट द्या. भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a Comment