[ Benefits of Ashwagandha ] अश्वगंधाचे चमत्कारी फायदे

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

[ Benefits of Ashwagandha ] अश्वगंधा जगभरात प्रसिद्ध असणाऱ्या गुणकारी वनस्पती पैकी एक आहे. आयुर्वेदाच्या जगामध्ये अश्वगंधाला एक विशेष महत्व प्राप्त झाले आहे. दिवसभरातील तणावापासून मुक्त होणेसाठी, शरीरात ऊर्जा वाढविण्यासाठी, मन एकाग्रतेसाठी लोक अश्वगंधाचा उपयोग करत आहेत. आज आपण अश्वगंधा औषधी वनस्पतीचे फायदे समजून घेणार आहोत.

[ Benefits of Ashwagandha ] अश्वगंधाचे फायदे खालीलप्रमाणे

१) मानसिक आरोग्य ठीक नसल्यास सुधार करते

अश्वगंधा ही नैराश्य, चिंता या सारख्या मानसिक आजारांची लक्षणे कमी करण्यासाठी फायदेशीर औषधी आहे. एका वैज्ञानिक प्रयोगामध्ये चिंता आणि नैराश्य या आजारांच्या रुग्णांवर अश्वगंधाचा प्रयोग करण्यात आला. त्यामुळे रुग्णांना काय फायदा झाला हे पाहण्यात आले. या प्रयोगामधील रुग्णांना दररोज १००० मिलिग्रॅम अश्वगंधा असे १२ आठवडे देण्यात आले. त्यामुळे रुग्णांना इतर औषधांपेक्षा अधिक फायदा झाल्याचे पाहण्यात आले. यामध्ये चिंता आणि नैराश्य असणाऱ्या रुग्णांची लक्षणे अधिक सुधारलेली दिसली.

‘बायपोलार डीसीस ‘ या आजारातील रुग्णांना अश्वगंधा च्या सेवनामुळे बराच आराम मिळतो. आयुर्वेदिक शास्त्र अनिद्रा,मानसिक आजार त्याचप्रमाणे शारीरिक समस्यांना सुद्धा ठीक करू शकते. अश्वगंधा आणि शिलाजीत यांच्या एकत्रित सेवनामुळे मानसिक स्वास्थ्य सुधारण्यासाठी खूप लाभ होऊ शकतो.

२) तणाव कमी करण्यास मदत करते.

अश्वगंधाच्या वापरामुळे तणाव कमी होऊन मेंदू शांत होतो. एका अभ्यासानुसार असे सांगण्यात आले आहे कि दररोज अश्वगंधाचे  २४० मिलिग्रॅम इतके सेवन केल्यांनतर शरीरातील तणाव मोठ्याप्रमाणात कमी होतो. मानवी शरीरात कॉर्टिसॉल नावाचा तणाव निर्माण करणारा हार्मोन आहे. अश्वगंधाच्या सेवनामुळे कॉर्टिसॉल चे प्रमाण खूप कमी होते. एखादा अश्वगंधा चे सेवन करायला तुम्ही सुरुवात केले तर तुम्हाला समजेल कि तुमच्या शरीरावर काय परिणाम होत आहेत.

३) मैदानी खेळातील सक्षमता वाढवते.

मैदानी खेळ जसे कि क्रिकेट, खो-खो, कबड्डी आणि इतर खेळामध्ये खेळाडू ची सक्षमता वाढवण्यासाठी अश्वगंधाचा उपयोग केला जातो. खेळाडूंसाठी अश्वगंधा एक वरदान प्रमाणे काम करते. एका प्रयोगामध्ये १० पुरुषांना आणि महिलांना १२० मिलिग्रॅम ते १२५० मिलिग्रॅम अश्वगंधा दररोज देण्यात आला.  परिणामी त्यांचे शारीरिक सामर्थ्य सुधारलेले दिसले. अश्वगंधाच्या वापरामुळे व्यायाम करताना ताकद आणि ऑक्सिजन चा उपयोग वाढतो.

एका प्रयोगात तर असे सुद्धा दिसून आले आहे कि खेळाडू आणि सामान्य व्यक्तीच्या शरीरातील ऑक्सिजन चे प्रमाण हे अश्वगंधाच्या सेवनामुळे वाढलेले आहे. व्यायाम करताना शरीरात शोषण केलेल्या ऑक्सिजन ला मॅक्स. ऑक्सिजन असे म्हणतात. हृदय आणि फुफुसाच्या निरोगी राहण्यासाठी आवश्यक असतो.

खेळाडू लोक आणि सामान्य लोक यांच्यामध्ये VO२ या घटकाची आवश्यकता असते . कमी VO २ असणाऱ्या लोकांमध्ये मृत्यू होण्याची शक्यता जास्त असते. शरीरातील VO २ प्रमाण जास्त असेल तर आजार होण्याची शक्यता कमी असते. या व्यतिरिक्त अश्वगंधा मांसपेशी मजबूत करण्यासाठी मदत करते. एका प्रयोगामध्ये स्वयंसेवकांना दररोज ६०० मिलिग्रॅम अश्वगंधा दिला गेला त्यानंतर त्यांना ८ आठवडे कठोर व्यायाम करण्यास सांगितले परिणामी अश्वगंधा सेवन करणाऱ्या स्वयंसेवकांनी जास्त मांसपेशी बळकट केल्या होत्या अन्य अश्वगंधा सेवन न करणाऱ्या व्यक्तींच्या तुलनेत.

४) रक्तातील साखरेचे प्रमाण संतुलित ठेवण्यास मदत करते.

मधुमेह असणाऱ्या रुग्णांना किंवा रक्तातील साखरेचे प्रमाण जास्त असणाऱ्या रुग्णांना अश्वगंधाचा मोठ्या प्रमाणात सकारात्मक उपयोग होतो. खूप अभ्यासानुसार आणि प्रयोगानुसार हे सिद्ध झाले आहे कि अश्वगंधा रक्तातील साखरेचे प्रमाण, लिपिड, इन्सुलिन आणि तणाव इत्यादींना कमी करण्याचे काम करते.

विठापेरीन ए अश्वगंधाचा उपयोग मधुमेहाच्या रुग्णांना फायदेमंद आहे. अश्वगंधा हे मधुमेह विरोधी एक गुणकारी औषध आहे जे रक्तातील ग्लुकोज चे प्रमाण कमी करण्यासाठी मदत करते.

५) डोक्याची प्रक्रिया सुधारण्यासाठी मदत करते.

जास्त विचार करणे, नैराश्य आणि इतर मानसिक समस्यांमुळे डोक्याची काम करण्याची क्षमता कमी होते अश्या वेळेस हि प्रक्रिया सुधारण्यासाठी अश्वगंधाचा उपयोग फायदेमंद ठरतो. बऱ्याच वेळेस वयोमानानुसार व्यक्तीची बुद्धी कमी चालते , मेंदूची प्रक्रिया सुरळीत चालू ठेवण्यासाठी अश्या व्यक्ती मध्ये अश्वगंधाचा प्रयोग केला जातो.

[ Benefits of Ashwagandha ] अश्वगंधाच्या सेवनामुळे खालील क्रियांमध्ये सकारात्मक प्रभाव पडतो
  • ध्यान
  • दैनंदिन कामकाज
  • नियोजित कामामध्ये
  • वेळेत काम उरकण्यात

आठ आठवडे एका व्यक्तीवर ६०० मिलिग्रॅम अश्वगंधा देऊन प्रयोग करण्यात आले यामध्ये अश्वगंधा सेवन करणार व्यक्ती अश्वगंधा सेवन न करणाऱ्या पेक्षा अधिक सर्रास असलेले दिसले. त्याच्यातील सुधारलेले गुण खालील प्रमाणे

  • ध्यान वाढले
  • गोष्टी लक्षात ठेवण्याचे प्रमाण वाढले
  • काम करण्याची गती वाढली
  • यौन शक्ती वाढली

६) ताकत आणि मांसपेशी वाढण्यासाठी मदत

अश्वगंधाच्या नियमित वापरामुळे ताकत आणि मांसपेशी वाढण्यासाठी मदत होते. अश्वगंधा शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी मदत करते आणि मांसपेशी ची शक्ती वाढवण्यास मदत करते. अश्वगंधाच्या सेवनामुळे पुरुषांच्या मांसपेशी ची वाढ झालेले लक्षात आले आहे. यासाठी पुरुषांच्या दंडाचे छातीचे मोजमाप घेण्यात आलेले होते. त्यामध्ये वाढ झालेली लक्षात आले.

७) सूज कमी करण्यास मदत करते

शरीरातील आंतरिक आणि बाहेरील भागात आलेली सूज कमी करण्यासाठी अश्वगंधा चा उपयोग केला जातो. अश्वगंधा व्यतिरिक्त अन्य औषधी वनस्पतींचा उपयोग शरीरातील सूज कमी करण्यासाठी केला जातो.

२०२१ मध्ये कोरोना काळात एक प्रयोग केला गेला त्यामध्ये कोरोना पिढीत रुग्णांना दिवसातून दोन वेळा ०.५ ग्राम अश्वगंधा आणि इतर आयुर्वेदिक औषधी दिल्या गेल्या . काही दिवसातच रुग्णांमध्ये सुधारणा दिसायला लागली.

इतर दिल्या गेलेल्या औषधी वनस्पती

  • १ ग्रॅम गिलोय घनवटी
  • ०.५० ग्रॅम तुलसी घनवटी
  • २ ग्रॅम सासवरी

८) झोप वाढवण्यासाठी मदत करते

[ Benefits of Ashwagandha ]अश्वगंधा पावडर च्या दररोज च्या सेवनामुळे झोप चांगली लागण्यास मदत होते. झोपेच्या बऱ्याच समस्यांवर रामबाण उपाय म्हणून आयुर्वेदातील काही औषधी वनस्पतींचा उपयोग होतो .

झोपेत सुधारणा झाली कि नाही हे पाहण्यासाठी वय वर्षे ६५ ते ८० वर्षाच्या दरम्यान च्या ५० व्यक्तींवर अश्वगंधाचा उपयोग करण्यात आला. त्यामध्ये १२ आठवडे दररोज ६०० मिलिग्रॅम अश्वगंधा देण्यात आला. त्या व्यक्तींमध्ये झोपेचा दर्जा पूर्वीपेक्षा सुधारलेला लक्षात आला. मानसिक सतर्कता वाढली.

Benefits of Ashwagandha

[ Benefits of Ashwagandha ] अश्वगंधाच्या वापरामुळे झोपे बरोबर इतर गोष्टीत झालेला सकारात्मक बदल खालील प्रमाणे

  • या औषधामुळे झोपेचा दर्जा सुधारतो त्याचप्रमाणे झोप न लागणाऱ्या रुग्णांना अश्वगंधा प्रभावशाली आहे.
  • आयुष्यातील ध्येय मिळवण्यासाठी अश्वगंधाचा उपयोग फायदेशीर ठरू शकतो .
  • चिंता आणि तणाव कमी करण्यासाठी मदत करतो.

९) पुरुषांमध्ये प्रजनन क्षमता वाढवते

अश्वगंधा पुरुषाच्या शरीरातील टेस्टेस्टेरॉन हार्मोन वाढवते आणि  त्यांची प्रजनन क्षमता वाढवते. अश्वगंधाचा अर्क असलेल्या टॅबलेट चे सेवन केल्यांनतर शरीरातील सेक्स हार्मोन्स चे प्रमाण वाढायला सुरु होते. त्यामुळे प्रजनन क्षमता वाढते . अश्वगंधाच्या नियमित सेवनामुळे शरीरातील पुरुषांच्या वीर्यातील शुक्राणूंचे प्रमाण वाढते . त्याच प्रमाणे वीर्याचे प्रमाण वाढवून प्रजननाला मदत करते.

१०) शरीरातील सांधे  दुखणे कमी करते

आयुर्वेदातील अश्वगंधा हि नैसर्गिक रित्या दुखणे कमी करण्यासाठी काम करते. अश्वगंधा मध्ये अँटी-इंफ्लामेंटरी गुण आहेत त्यामुळे गाठी पासून निर्माण होणाऱ्या सर्व समस्या पासून आराम मिळतो. आणि सांधे दुखी कमी होते. काही अभ्यासातून हे सिद्ध झाले आहे कि अश्वगंधा हि सांधेदुखी वरती गुणकारक उपचार म्हणून काम करते. सांधेदुखी पासून आराम मिळवण्यासाठी अश्वगंधा गुणकारी ठरलेला आहे.

११) कॅन्सरच्या उपचारावर मदत करते

कॅन्सर चा उपचारावरती अश्वगंधाचा उपयोग करता यावा यासाठी संशोधक संशोधन करत आहेत. काही अभ्यासातून असे लक्षात आले कि अश्वगंधा काही कॅन्सर च्या प्रभावाला रोकु शकतो. यासाठी काही जनावरांवर प्रयोग करण्यात आले त्यामध्ये फुफुसाच्या आणि मेंदूच्या गाठी वरती त्याचा चांगला परिणाम जाणवला .

१२) अल्झायमर च्या उपचारासाठी मदत करते

न्यूरोडीजनरेटिव्ह आजारामुळे डोक्यात नुकसान होत असते . हे नुकसान थांबवण्यासाठी अश्वगंधाचा वापर केला जातो. उदाहरण म्हणजे पार्किंगसन आणि अल्झायमर आजारात अश्वगंधाचा वापर सकारात्मक होतो. जस जसे हे आजार वाढतात तसे मेंदू मधील दोन भागांचा संपर्क तुटला जाऊ शकतो त्यामुळे स्मृती कमी होऊ शकते. याप्रकारच्या स्थितीपासून वाचण्यासाठी अश्वगंधाचे सेवन केले जाते.

[ Benefits of Ashwagandha ] अश्वगंधाच्या नियमित वापरामुळे खालील आजारांत सकारात्मक बदल दिसतात

  • रक्त दाबाचा स्तर नियंत्रित राहतो.
  • हृदयातील दुखणे कमी होते
  • हृदयाच्या रोगापासून वाचवते
  • कोलेस्ट्रॉल लेव्हल कमी करते.

एका अभ्यासात असे सुद्धा सिद्ध झाले आहे कि अश्वगंधा मुले हृदय आणि फुफुसाचे कार्य सुधारते आणि सुरळीत चालते .

१३) पांढऱ्या केसांच्या समस्ये बाबत गुणकारी

[ Benefits of Ashwagandha ] आजच्या युगात अनियमित आणि सकस आहार न घेतल्यामुळे कमी वयातच पांढऱ्या केसांची समस्या उद्भवू शकते. या अकाली पांढरे होणाऱ्या केसांसाठी अश्वगंधा गुणकारी ठरत आहे. अश्वगंधा मध्ये असणाऱ्या गुणकारी घटकामुळे केसांच्या कोशिकांना पोषण मिळते त्यामुळे त्यांचा चांगला विकास होते. केस पांढरे होण्याच्या समस्ये मागे अजून एक महत्वाचे कारण आहे ते म्हणजे तणाव , तणावामुळे सुद्धा केस गळने, पांढरे होणे यासारखे प्रकार घडताना दिसतात. अश्वगंधाच्या सेवनामुळे तणाव कमी होतो आणि त्यापासून निर्माण होणाऱ्या समस्या सुद्धा कमी होतात.

१४) डोळ्यांची दृष्टी वाढते .

२ ग्रॅम अश्वगंधा , २ ग्रॅम आवळा आणि १ ग्राम जेष्ठमध याचे चुर्ण बनवून दररोज सकाळी आणि संध्याकाळी पाण्याबरोबर सेवन केल्यामुळे डोळ्याची ताकद वाढते . आणि डोळ्यांना आराम मिळतो.

१५) खोकल्यासाठी अश्वगंधाचा उपयोग

अश्वगंधाची १० ग्रॅम मुळे त्यामध्ये १० ग्रॅम खडीसाखर मिसळून ४०० मिलिग्रॅम पाण्यात गरम करा. पाणी आतून २५% मिश्रण राहिल्यावर गॅस बंद करा. हे मिश्रण रोज थोडे थोडे घेतल्यावर खोकला आणि कफ च्या समस्या कमी होतात.

अश्वगंधा हि एक निसर्गात मिळणारी औषधी वनस्पती आहे. याचे वापरण्याचे स्वरूप वेगवेगळे आहे. यामध्ये झाडाचे पान, खोड, फळ, बिया यांचा उपयोग केला जातो.

[ Widal Test ] विडाल टेस्ट बद्दल माहिती

 

Leave a Comment