[ Vitamin D Deficiency ] व्हिटॅमिन डी ची कमतरता म्हणजे काय ?
[ Vitamin D Deficiency ] मानवी शरीरात व्हिटॅमिन डी ची गरज ही हाडांच्या वाढीसाठी आणि बळकटीसाठी आहे. आहारातून काही प्रमाणात व्हिटॅमिन डी शरीराला मिळू शकते पण व्हिटॅमिन डी चा मुख्य स्रोत ही सूर्याची किरणे आहेत. शरीरात व्हिटॅमिन डी चे प्रमाण कमी झाल्यावर त्याला व्हिटॅमिन डी ची कमतरता असे म्हणतात . व्हिटॅमिन डी हे शरीरासाठी अधिक उपयुक्त आहे, त्यामुळे शरीरातील विविध क्रिया पार पाडण्याचे काम होते. शरीरात कॅल्शियम चे शोषण होण्यासाठी , हाडांचे आरोग्य, शरीरातील सूज कमी करण्यासाठी व्हिटॅमिन डी मोठ्या प्रमाणात आवश्यक आहे. कोलेस्ट्रॉल पासून व्हिटॅमिन डी बनवले जाते. मानवी शरीर जेव्हा सूर्य किरणांच्या संपर्कात येते तेव्हा कोलेस्ट्रॉल पासून व्हिटॅमिन डी बनवले जाते.
कॅल्शियम चे शोषण करण्यापासून करण्यापासून पचवण्यापर्यंत चे काम व्हिटॅमिन डी करते. शरीरातील पेशी पोषण करण्यासाठी आहारातून कॅल्शियम मिळवणासाठी व्हिटॅमिन डी चा महत्वाचा रोल असतो.
काही खाद्य पदार्थामध्ये व्हिटॅमिन डी उपस्थित असतो जसे कि दूध, याच्या व्यतिरिक्त मांसाहारी खाद्यपदार्थात जसे कि मासे, मांस, अंडी त्याच प्रमाणे डेअरी उत्पादनात सुद्धा व्हिटॅमिन डी उपलब्ध असते. केवळ आहारातून पुरेश्या प्रमाणात व्हिटॅमिन डी मिळवणे शक्य नाही. त्यासाठी सूर्य किरणांचा सुद्धा उपयोग केला पाहिजे . व्हिटॅमिन डी च्या कमतरतेमुळे थकवा जाणवतो, हाडे दुखायला लागतात, पाठ दुखायला सुरुवात होते, अशक्तपणा जाणवतो, जखम बरी होण्यासाठी जास्त वेळ लागतो, केस गळायला सुरु होतात, मांसपेशी दुखतात इत्यादी समस्या निर्माण होतात.
[ Vitamin D Deficiency ] व्हिटॅमिन डी च्या कमतरतेचे निदान रुग्णाच्या लक्षणांवरून करण्यात येते. याच्या व्यतिरिक्त रक्ताची तपासणी केल्यानंतर शरीरात व्हिटॅमिन डी चे प्रमाण किती आहे हे समजते. सामान्य पातळी पेक्षा व्हिटॅमिन डी चे प्रमाण कमी असल्यास त्याला व्हिटॅमिन डी ची कमतरता आहे असे सांगितले जाते. आणि त्यानुसार पुढील उपचार ठरवला जातो. व्हिटॅमिन डी च्या कमतरते साठी सप्लिमेंट्स चांगला पर्याय ठरू शकतो. सप्लिमेंट्स चा वापर करून व्हिटॅमिन डी ची कमतरता दूर करता येऊ शकते. सप्लिमेंट किती आणि कोणते घ्यावे यासाठी डॉक्टरांशी संपर्क साधा. व्यक्तीचे वय, व्हिटॅमिन डी ची पातळी पाहून डॉक्टर औषध देतात.
वय | पुरुष | महिला | गर्भवती | स्तनपान करणाऱ्या महिला |
० ते १२ महिने | ४०० IU (१० mcg ) | ४०० IU (१० mcg ) | ||
१ ते १३ वर्षे | ६०० IU (१५ mcg ) | ६०० IU (१५ mcg ) | ||
१४ ते १८ वर्षे | ६०० IU (१५ mcg ) | ६०० IU (१५ mcg ) | ६०० IU (१५ mcg ) | ६०० IU (१५ mcg ) |
१९ ते ५० वर्षे | ६०० IU (१५ mcg ) | ६०० IU (१५ mcg ) | ६०० IU (१५ mcg ) | ६०० IU (१५ mcg ) |
५१ ते ७० वर्षे | ६०० IU (१५ mcg ) | ६०० IU (१५ mcg ) | ||
७० वर्षा पुढे | ८०० IU (१५ mcg ) | ८०० IU (१५ mcg ) |
[ Vitamin D Deficiency ] व्हिटॅमिन डी कमतरतेची लक्षणे
कायम संतुलित आहार घेऊन सातत्याने शरीरात व्हिटॅमिन डी ची पातळी संतुलित ठेवता येऊ शकत नाही. आपल्या संतुलित आहारातून आणि दररोजच्या भोजनातून आपल्याला केवळ १०% व्हिटॅमिन डी मिळते. उर्वरित ९०% व्हिटॅमिन डी आपल्याला सूर्याच्या किरणांपासून मिळते.जर तुम्ही फक्त व्हिटॅमिन डी युक्त आहार घेत असाल तरीसुद्धा तुम्हाला व्हिटॅमिन डी ची कमतरता भासू शकते. त्यामुळे फक्त व्हिटॅमिन डी युक्त आहार घेणे गरजेचे नसून सूर्याच्या किरणांच्या संपर्कात राहणे गरजेचे आहे.
जर तुमची जीवनशैली अशी असेल कि तुम्ही सूर्याची किरणे घेऊ शकत नसाल तर खालील लक्षणे तुमच्या मध्ये दिसायला सुरुवात होऊ शकते.
- निराश राहणे – निराश किंवा उदास राहणे त्याच प्रमाणे चिडचिडेपणा येणे ही व्हिटॅमिन डी च्या कमतरतेची लक्षणे आहेत.
- वजन वाढणे – जर तुमचे वजन अचानक वाढले जात असेल किंवा शरीराची जाडी वाढत असेल तर तुमच्या शरीरात व्हिटॅमिन डी ची कमतरता असण्याची शक्यता आहे. वजन कमी असणाऱ्या लोकांपेक्षा वजन जास्त असणाऱ्या लोकांमध्ये व्हिटॅमिन डी ची आवश्यकता जास्त असते. जर तुमच्या शरीरातील मांसपेशी घण आणि मजबूत असतील तरी सुद्धा तुमचे वजन जास्त असेल तरीही तुम्हाला व्हिटॅमिन डी ची आवश्यकता आहे.
- सतत वायरल इन्फेकशन होणे – मानवी शरीराची रोग प्रतिकार क्षमता कमी झाल्यानंतर सतत वायरल इन्फेकशन होत असते. व्हिटॅमिन डी मुळे रोग प्रतिकार शक्ती वाढते . त्यामुळे सतत होणाऱ्या संक्रमणा विरुद्ध लढता येते.
- थकवा जाणवणे – थकवा जाणवणे हे बऱ्याच आजारांचे लक्षण असू शकते. त्याच प्रमाणे व्हिटॅमिन डी च्या कमतरते मुळे सुद्धा शरीरात थकवा जाणवू शकतो.
- जखम लवकर न भरणे – शरीरावरती झालेली जखम किंवा ऑपरेशन मुळे झालेली जखम बरी होण्यासाठी जर खूप वेळ लागत असेल तर तुम्हाला व्हिटॅमिन डी ची कमतरता असू शकते.
- हाडांची वाढ न होणे – व्हिटॅमिन डी ची आवश्यकता हाडांच्या विकासासाठी खूप महत्वाची आहे. कारण व्हिटॅमिन डी मुळे शरीरात कॅल्शियम निर्माण होते. हाडांची घनता टिकवून ठेवण्यासाठी कॅल्शियम ची आवश्यकता असते. कॅल्शियम च्या कमतरे मुळे फ्याक्चर होण्याची शक्यता जास्त असते.
- पचना संबंधी विकार – व्हिटॅमिन डी पचनतंत्र मजबूत करण्याचे काम करत असते. जर शरीरात व्हिटॅमिन डी ची कमतरता असेल तर पचन संबंधी विकार होऊ शकतात.
- हाडे आणि सांधे दुखणे – व्हिटॅमिन डी ची कमी ही हाडांच्या आरोग्यावर परिणाम करते. त्याचप्रमाणे व्हिटॅमिन डी च्या कमतरतेमुळे हाडांचे दुखणे वाढते. खास करून गुढगे आणि पाठ दुखायला लागते.
- डोक्यत घाम येतो – व्हिटॅमिन डी च्या कमतरते मुळे सतत डोक्यात घाम येत असतो. खासकरून नवजात बालकांमध्ये हे लक्षण दिसते . व्हिटॅमिन डी च्या कमतरतेची हे सुरुवातीचे लक्षण आहे.
- केस गळने – केस गळती ही साधारणपणे तणाव आणि अनुवांशिकते मुळे होत असते. पण व्हिटॅमिन डी ची कमतरता हे एक केस गळतीचे कारण आहे.
[ Vitamin D Deficiency ] व्हिटॅमिन डी कमतरतेची कारणे
मानवी शरीर व्हिटॅमिन डी मिळवण्यासाठी आहार आणि सूर्याची किरणे यांचा उपयोग करते. तुमच्या शरीरात व्हिटॅमिन डी ची कमी विविध कारणांमुळे होऊ शकते. त्यातील काही करणे खालील प्रमाणे.
- आहाराच्या माध्यमातून पुरेसा व्हिटॅमिन डी न मिळणे.
- व्हिटॅमिन डी युक्त आहाराचे शरीरात शोषण न होणे .
- सूर्याची किरणे पुरेश्या प्रमाणात न घेणे.
- लिव्हर आणि किडनीच्या माध्यमातून व्हिटॅमिन डी संपूर्ण शरीरात प्रसारित न होणे.
- इतर आजारांवर उपचार करत असताना औषधांच्या सेवनामुळे व्हिटॅमिन डी तयार न होणे आणि प्रसारित न होणे.
[ Vitamin D Deficiency ] व्हिटॅमिन डी च्या कमतरतेचा धोका वाढण्याची कारणे
काही लोकांमध्ये व्हिटॅमिन डी च्या कमतरतेचा धोका खूप जास्त असतो त्यापैकी काही खालील प्रमाणे
- पोटाची किंवा आतड्याची सर्जरी झालेले लोक
- ऑस्टियोपोरोसिस या हाडाच्या आजाराच्या रुग्णांमध्ये
- किडनी आणि लिव्हर च्या दीर्घ कालीन आजारापासून ग्रसित असलेले रुग्ण
- स्तनपान करणाऱ्या नवजात बालकांमध्ये व्हिटॅमिन डी ची कमतरता जाणवते कारण आईच्या दुधामध्ये व्हिटॅमिन डी चे प्रमाण कमी असते.
- ५ वर्षा पेक्षा कमी वय असणाऱ्या बालकांमध्ये व्हिटॅमिन डी ची कमतरता जाणवते.
- शरीराच्या स्थूल पणामुळे ग्रसित असणाऱ्या व्यक्ती मध्ये व्हिटॅमिन डी ची कमतरता असते.
- थायरॉईड या आजारापासून ग्रसित असणाऱ्या व्यक्ती
- टीबी चे पेशंट
- कॅन्सर आजाराचे पेशंट
- एचआयव्ही एड्स आणि इतर संक्रमणापासून उपचार घेणाऱ्या व्यक्ती
- ६५ वर्ष पेक्षा जास्त वय असणाऱ्या व्यक्ती . कारण व्यक्तीचे वय जसे वाढेल तसे सूर्यप्रकाशात येऊन सुद्धा पुरेश्या प्रमाणात व्हिटॅमिन डी तयार होत नाही.
- गोऱ्या लोकांपेक्षा सावळे लोक सुर्य प्रकाशापासून कमी व्हिटॅमिन डी तयार करतात.
- मोठ्या आतड्याच्या संबंधात आजार असणाऱ्या लोकांमध्ये व्हिटॅमिन डी चे प्रमाण कमी असते .
[ Vitamin D Deficiency ] व्हिटॅमिन डी च्या कमी पासून कसे वाचावे ?
व्हिटॅमिन डी युक्त आहार घेणे आणि दररोज १५ ते २० मिनिट सूर्य किरणात बसने यामुळे व्हिटॅमिन डी ची कमी पूर्ण केली जाऊ शकते. दररोज सूर्य किरणात बसल्यामुळे व्हिटॅमिन डी ची कमतरता होण्याची संभावना कमी असते. याव्यतिरिक्त जीवन शैलीत बदल केल्यामुळे सुद्धा सुधारणा होऊ शकते. अधिक माहितीसाठी खालील माहिती वाचा.
- आपले वजन प्रमाणात नियोजित ठेवा त्यासाठी दररोज आवश्यक व्यायाम करा. दररोज सूर्य प्रकाश शरीरावर घ्या.
- जर पोट, लिव्हर, आणि किडनी संबंधी आजार असतील त्यावर योग्य उपचार घेऊन आजार बरा करावा.
- व्हिटॅमिन डी च्या सप्लिमेंट चा उपयोग करा. खासकरून वृद्ध व्यक्ती आणि नवजात स्तनपान करणाऱ्या बालकांना व्हिटॅमिन डी च्या सप्लिमेंटचा खुराक द्यावा.
- जर परिवारात कोणाला अनुवांशिक हाडा संबंधी रोग असतील तर डॉक्टरांच्या सल्ल्या नुसार उपचार घ्यावा.
[ Vitamin D Deficiency ] व्हिटॅमिन डी चे जास्त प्रमाण असलेले पदार्थ
- कॉड लिव्हर तेल ( माश्याच्या लिव्हर चे तेल )
- पेडवे मासा
- रावस मासा
व्हिटॅमिन डी चे अन्य काही पदार्थ
- अंडी
- दूध
- मशरूम
- पनीर
- लिव्हर
- डेअरी पदार्थ
- सोयाबीन
- संत्री
व्हिटॅमिन डी साठी तपासणी
रुग्णांची लक्षणे, सवयी आणि आधी घेतलेले उपचार यामुळे व्हिटॅमिन डी च्या कमतरते साठी रक्ताची तपासणी केली जाते.
- व्हिटॅमिन डी च्या कमतरतेची लक्षणे दिसायला लागल्यावर रक्ताची चाचणी करावी.
- व्हिटॅमिन डी ची तपासणी हि एक रक्ताची केली जाणारी तपासणी आहे. यामुळे शरीरातील व्हिटॅमिन डी ची पातळी समजते.
- व्हिटॅमिन डी ची तपासणी करण्या आधी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
- वर्षातील डिसेंबर महिन्यात शरीरातील व्हिटॅमिन डी चे प्रमाण सर्वात कमी असते. या काळात व्हिटॅमिन डी ची तपासणी करावी
- मानवी शरीरातील व्हिटॅमिन डी ची सामान्य पातळी ही २० ng/ml ते ५० ng/ml असते. २० ng/ml पेक्षा कमी व्हिटॅमिन डी ची पातळी हि कमतरता दर्शवते .
[ Vitamin D Deficiency ] अन्य काही व्हिटॅमिन डी च्या निगडित तपासण्या.
- कॅल्शियम ची पातळी
- किडनी फंक्शन टेस्ट
- मोठ्या हाडाचा एक्स-रे
- बोन डेन्सीटोमीटर