[ What is CBC Test ] सीबीसी ब्लड टेस्ट हि एक रक्ताची केली जाणारी चाचणी आहे. रक्तातील पेशींचे आरोग्य व्यवस्थित आहे का ? पाहण्यासाठी हि टेस्ट केली जाते. पेशींच्या आरोग्य मध्ये लाल पेशींची शरीरातील पातळी , पांढऱ्या पेशींची शरीरातील पातळी त्याचप्रमाणे प्लेटलेट मोजण्याचे काम सीबीसी टेस्ट मध्ये केले जाते. रोगाचे निदान करण्यासाठी हि टेस्ट मदत करते. लोकांचे स्वास्थ्य कसे आहे पाहण्याकरिता या टेस्ट चा उपयोग केला जातो. सीबीसी टेस्ट केल्यानंतर शारीरिक स्वास्थ बद्दल माहिती मिळते आणि उपचाराच्या दिशेने योग्य ते पाऊल उचलणे शक्य होते.
सीबीसी टेस्ट चे पूर्ण नाव कंप्लीट ब्लड काउंट असे आहे. ही टेस्ट करताना मानवी शरीरातून रक्ताचे नमुने घेतले जातात. ही टेस्ट करण्या अगोदर कोणतेही पात्य पाळण्याची आवश्यकता नाही. डॉक्टरांच्या सल्ल्या नुसार लॅबोरेटरी मध्ये या टेस्ट केल्या जातात. या टेस्ट मध्ये पास होण्यासाठी लाल रक्त पेशींची संख्या ४.७ ते ६.१ मिलियन सेल / एमसीएल असावी लागते तर पांढऱ्या पेशींची संख्या हि ४,५०० ते १०,००० सेल / एमसीएल आणि प्लेटलेट ची संख्या हि १,५०,००० ते ४,५०,००० / डीएल इतकी असावी लागते. रक्ताचे नमुने तपासणी साठी गेल्या पासून २४ तासाच्या आत पेशंटला रिपोर्ट मिळतो.
[ What is CBC Test ] सीबीसी टेस्ट म्हणजे काय ?
सीबीसी टेस्ट केल्यानंतर आपल्याला रक्तातील पेशींचे प्रमाण समजते. त्यामुळे रुग्णाला झालेले आजार, रुग्णाची शारीरिक स्थिती याबद्दल माहिती मिळते. रुग्णाच्या शरीरात कोणत्या आजाराचे संक्रमण झाले असावे याबद्दल समजण्यासाठी केली जाणारी ही प्राथमिक तपासणी आहे. जर पेशींचे प्रमाण कमी-जास्त झाले असेल तर त्यानुसार कोणता आजार झाला असू शकतो याचे अनुमान लावले जाते. रुग्णाच्या लक्षणांना यामध्ये ग्राह्य धरले जाते. त्यानुसार रुग्णाची पुढील तपासणी केली जाते.
सीबीसी तपासणी हि रक्तामधील पेशींची मोजणी करते . यामध्ये रुग्णाच्या रक्ताचा नमुना घेतला जातो आणि लॅबोरेटरी मध्ये तज्ञ व्यक्ती द्वारे तपासाला जातो. रुग्णाच्या आरोग्याचे मूल्यांकन करण्यासाठी हि टेस्ट केली जाते. रुग्णाचे आरोग्य निरोगी करण्यासाठी या टेस्ट चा उपयोग केला जातो. डॉक्टरांना रोगाचे निदान करण्यासाठी आणि उपचारासाठी या तपासणीचा उपयोग होतो.
[ What is CBC Test ] सीबीसी टेस्ट करण्याचा उद्देश
[ What is CBC Test ] जेव्हा कोणताही रुग्ण आपला आजार घेऊन डॉक्टरांकडे जातो तेव्हा योग निदान करण्यासाठी डॉक्टर त्यांना सीबीसी टेस्ट करण्याचा सल्ला देतात. त्याचप्रमाणे रुग्णाचे लक्षण लक्षात घेऊन त्याप्रमाणे सीबीसी व्यतिरित अजून टेस्ट करण्याचा सल्ला सुद्धा दिला जातो. सीबीसी टेस्ट कोणत्या रुग्णांना करण्याचा सल्ला देतात . त्यांची लक्षणे खालील प्रमाणे
- जखम झाल्यामुळे मोठ्याप्रमाणात रक्तस्त्राव झालाय अश्या रुग्णांना
- थकवा जाणवणे, चक्कर येणे , अशक्तपणा येणे अशा रुग्णांना
- ताप येणे, कणकणी येणे, उल्टी येणे अश्या रुग्णांना
- शरीरातील कोणताही भागात सूज असणे.
- सांधे दुखणे
- हृदयाची कंपने वाढणे किंवा कमी होणे.
- ब्लड प्रेशर ची समस्या असणे .
[ What is CBC Test ] सीबीसी टेस्ट चे फायदे
रक्ताच्या करण्यात येणाऱ्या तपासण्यांमध्ये सीबीसी ही एक सर्वसामान्य तपासणी आहे. ज्यामध्ये रक्तामधील पेशींची मोजणी केली जाते. पेशींच्या पातळी नुसार डेंग्यू, मलेरिया, निमोनिया यासारख्या आजारांच्या निदानास मदत होते. त्याच प्रमाणे एनिमिया कँसर सारख्या आजारांची माहिती मिळते. सीबीसी टेस्ट चे काही फायदे खालील प्रमाणे.
- आरोग्याची तपासणी – सीबीसी तपासणी मुळे शरीरातील रक्ताचे आरोग्य समोर येते. त्यामुळे डॉक्टरांना संपूर्ण शरीराचे आरोग्य ठरवण्यास मदत होते. आणि निर्माण होणाऱ्या रोगाला वेळेचं आळा घालता येतो.
- . एनिमियाचे निदान – एनिमिया मध्ये शरीरातील लाल पेशींचे प्रमाण कमी होते. त्यामुळे शरीरातील संपूर्ण भागाला पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही. सीबीसी टेस्ट मध्ये शरीरातील लाल पेशींचे प्रमाण लक्षात येते . त्यामुळे एनिमिया चे निदान होण्यास मदत होते.
- संसर्गाचे निदान – शरीरातील पांढऱ्या पेशी ह्या संक्रमणासोबत लढण्याचे काम करत असतात शरीरात जेव्हा संक्रमण होते तेव्हा या पेशींची संख्या कमी जास्त होत असते. सीबीसी टेस्ट मधील पांढऱ्या पेशींच्या प्रमाणावरून संसर्गाचे निदान होण्यास मदत होते.
- ब्लॉकेज समजण्यास मदत – सीबीसी मधील प्लेटलेट काउंट मधून शरीरातील रक्तवाहिन्यांत होणाऱ्या ब्लॉकेज ची माहिती मिळते.कमी प्लेटलेट मधून रक्तस्त्राव समजतो तर जास्त प्लेटलेट च्या वरून शरीरातील ब्लॉकेज समजण्यास मदत होते.
- आरोग्य सुधारण्यास – नियमित सीबीसी तपासणी केल्यामुळे शरीरातील रक्त तपासणीवरून आरोग्याबद्दल बद्दल बरीच माहिती मिळते. त्यामुळे आरोग्याबद्दल माहिती मिळते. गरजेनुसार डॉक्टरांकडून उपचार घेतला जातो. आणि आरोग्य सुधारण्यास मदत होते.
- आरोग्याबद्दल योग्य माहिती मिळते – व्यक्तीचे शरीर योग्य काम करत आहे कि नाही त्याच प्रमाणे त्याच्या शरीरात कोणत्या घटकांची कमी आहे. या संदर्भात माहिती सीबीसी टेस्ट द्वारे मिळते.
- आरोग्याची देखरेख – सीबीसी टेस्ट मुळे आरोग्याची देखरेख होण्यास मदत होते. गंभीर आजारांचे निदान सुरुवातीलाच होते त्यामुळे लगेच उपचार घेऊन रुग्णाला बरे होता येते. आणि रुग्ण काही काळातच सशक्त बनतो.
[ What is CBC Test ] सीबीसी टेस्ट करायच्या आधीची तयारी …
सीबीसी तपासणी हि एक जगभर केल्या जाणाऱ्या तपासणीतल सर्वसामान्य तपासणी आहे. त्यामुळे रोगाचे निदान करण्यास डॉक्टरांना मदत होते. त्याचप्रमाणे रुग्णाला त्याच्या आरोग्याबद्दल माहिती मिळते. हि तपासणी उपचारासाठी एक दिशादर्शक ठरते.
- उपवास आवश्यक नाही – या तपासणी आगोदर रुग्णाला उपवास करण्याची आवश्यकता नसते. त्यामुळे हि तपासणी सोयीस्कर ठरते. रुग्णांनी हि तपासणी करण्या अगोदर काहीतरी अन्न प्राशन केले तरी चालू शकते.
- आरामदायी कपडे – हि टेस्ट करताना रुग्णाच्या शरीरातून रक्ताचे नमुने घेतले जातात. त्यामुळे रुग्णाने असेच कपडे घालावे ज्यामधून रक्ताचे नमुने घेणे लॅबोरेटरी तज्ज्ञांना शक्य होईल. शक्यतो हाफ टी-शर्ट, हाफ शर्ट याचा उपयोग करावा.
- पाणी पिणे – हि तपासणी करताना शरीरातून रक्ताचे नमुने बाहेर काढले जातात. त्यामुळे रक्ताचे भिसरण चांगले व्हावे यासाठी जास्त पाणी प्यावे. त्यामुळे चक्कर येणे टाळू शकतो.
- औषध संबंधी – सीबीसी टेस्ट करण्याच्या अगोदर तुम्ही कोणती औषधे घेतलेली आहेत हे रुग्णाने डॉक्टरांना सांगणे आवश्यक आहे. कारण त्या औषधांचा सीबीसी टेस्ट च्या रिपोर्ट वरती फरक पडू शकतो.
[ What is CBC Test ] सीबीसी टेस्ट करण्याची प्रक्रिया
सीबीसी तपासणी करण्यासाठी कोणत्याही विशेष तयारीची आवश्यकता नाही आहे. या टेस्ट साठी फक्त रक्ताचा नमुना घेतला जातो. त्याची प्रक्रिया खालीलप्रमाणे
- रुग्णाला खुर्ची वरती शांत बसवून किंवा बेडवरती झोपवून त्याच्या हातातील रक्तवाहिने मधून रक्ताचा नमुना घेतला जातो.
- ज्या रक्तवाहिनी मधून रक्ताचा नमुना घ्यायचा आहे ती जागा फलेबोटोमिस्ट या अल्कोहोल ने साफ केली जाते.
- त्यांनतर हातामध्ये टॉर्नीकुएट बांधले जाते तयामुळे त्वचेवरून रक्तवाहिनी स्पष्ट स्वरूपात दिसते . सुई द्वारे रक्ताचे नमुने घेतले जातात.
- सुई च्या माध्यमातून रक्ताचा नमुना गोळा करून, एका काचेच्या ट्यूब मध्ये ठेवला जातो.
- त्यानंतर हाताला बांधलेल्या टॉर्नीकुएट ला काढले जाते.
- रक्ताचा नमुना घेतल्यानन्तर सुई काढली जाते व त्याजागी एक पट्टी लावली जाते . त्यामुळे रक्तस्त्राव थांबतो.
या नंतर घेतलेला रक्ताचा नमुना प्रयोगशाळेत पाठवला जातो. रक्त थोड्या प्रमाणात काढल्यामुळे रुग्णाला काही त्रास होत नाही. काही कालांनंतर रुग्णाच्या शरीरात परत रक्त निर्माण होते.
[ What is CBC Test ] सीबीसी तपासणी नंतर घ्यायची काळजी
सबीसी तपासणी साठी रक्ताचे नमुने दिल्यानंतर २४ तासांच्या आत त्याचा निकाल येतो. शरीरात पुन्हा रक्त निर्माण होते. सीबीसी तपासणीसाठी रक्ताचा नमुना दिल्यानंतर घ्यायची काळजी खालीलप्रमाणे
- रक्तस्त्राव होऊ न देणे – सीबीसी टेस्ट करीत ज्या ठिकाणातून रक्ताचा नमुना घेतलेला आहे त्या ठिकाणातून पुन्हा रक्तस्त्राव बाहेर येण्याची शक्यता असते त्यामुळे अशा ठिकाणावर कापूस किंवा पट्टीने १० ते १५ मी. घट्ट पकडावे. त्यानंतर सोडून द्यावे. असे करण्याने अतिरिक्त रक्त वाया जाणार नाही.
- कमी ताण घेणे – सीबीसी टेस्ट करण्यासाठी हाताच्या ज्या भागातून रक्त घेतले गेलेले आहे अश्या भागावर कमी ताण घेणे. कठीण आणि परिश्रमाची कामे न करणे . आराम करणे.
- जड सामान उचलू नये – ह्या हातातून सीबीसी टेस्ट साठी रक्ताचे नमुने घेतले आहेत अश्या हाताने कोणतेही जड सामान उचलू नये त्यामुळे पुन्हा रक्तस्त्राव होण्याची शक्यता असते. तसेच व्यायाम करणे सुद्धा टाळावे.
- मद्यपान आणि कॅफिन युक्त पेय टाळावीत – सीबीसी टेस्ट नंतर काही तास कोणत्याही मद्याचे सेवन करू नये . त्यामुळे रक्तात संक्रमण होण्याची शकता असते. त्यामुळे मद्यपानापासून दूर राहण्याचा सल्ला डॉक्टर देत असतात.
[ What is CBC Test ] सीबीसी तपासणीचा रिपोर्ट
सीबीसी टेस्ट चा रिपोर्ट कमीतकमी १ तासाच्या आत मिळतो तर जास्तीतजास्त २४ तासाच्या आत मिळतो. रुग्णाचा रिपोर्ट आल्यानंतर त्यातील पेशींचे प्रमाण हे सामान्य प्रमाणापेक्षा कमी जास्त झाले असेल तर डॉक्टर रुग्णासोबत चर्चा करून पुढील उपचाराला सुरुवात करतात. सीबीसी रिपोर्ट ची आकडेवारी खालीलप्रमाणे
सीबीसी मूल्य | सामान्य मूल्य |
आरबीसी | ४.७ ते ६.१ मिलियन सेल / एमसीएल |
डब्ल्यूबीसी | ४,५०० ते १०,००० सेल / एमसीएल |
हेमॅटोक्रिट | पुरुष : ४०.७ % ते ५०.३% महिला : ३६.१% ते ४४.३% |
हिमोग्लोबिन | पुरुष : १३.८ ते १७.२ ग्राम/डीएल महिला : १२.१ ते १५.१ ग्राम/डीएल |
लाल पेशींचे मूल्यांकन | |
एमसीवी | ८० ते ९५ फेमतोलिटर |
एमसीएच | २७ ते ३१ पीजी / सेल |
एमसीएचसी | ३२ ते ३६ ग्राम / डीएल |
प्लेटलेट | १,५०,००० ते ४,५०,००० / डीएल |
[ What is CBC Test ] सामान्य रेंज पेक्षा जास्त सीबीसी ची आकडेवारी
सीबीसी च्या रिपोर्ट मधील पेशींचे प्रमाण हे सामान्य प्रमाणापेक्षा जास्त असेल तर खालील संभाव्य आजार असू शकतात.
- संक्रमण आणि सूज : जर तुमचे शरीर कोणत्या आजारासोबत लढत असेल तर पांढऱ्या पेशींचे शरीरातील प्रमाण वाढते. हे प्रमाण वाढून सामान्य पातळी पेक्षा जास्त होते. गाठ झाल्यामुळे निर्माण झालेल्या सुजे मुळे सुद्धा शरीरात पांढऱ्या पेशी वाढू शकतात .
- डीहायड्रेशन : जर तुम्ही तुमच्या शरीराला पुरेसे पाणी पीत नसाल तर शरीरातील रक्त अधिक घट्ट बनते त्यामुळे लाल पेशींची संख्या वाढते. पाणी जास्त पिल्याने या समस्ये पासून आराम मिळू शकतो.
- फुफुसाचे रोग : फुफुसाच्या जुनाट रोगामुळे सुद्धा शरीरातील लाल पेशींचे प्रमाण वाढते. लाल पेशी शरीरातील सर्व भागांना ऑक्सिजन पोहचवण्याचे काम करतात. फुफुसाच्या आजारामुळे ऑक्सिजन चे शरीरात प्रमाण कमी होते परिणामी लाल पेशी वाढतात.
- किडनीचे विकार : किडनीच्या समस्यांमुळे लाल रक्त निर्माण करणाऱ्या हार्मोन्स वरती परिणाम होऊ शकतो. त्यामुळेच लाल पेशींचे शरीरातील प्रमाण वाढते.
- कँसर : कॅन्सर या जीव घेण्या आजारामुळे सुद्धा शरीरातील पांढऱ्या पेशींचे प्रमाण वाढू शकते.
[ What is CBC Test ] सामान्य रेंज पेक्षा कमी सीबीसीची आकडेवारी
जेव्हा शरीरात पेशींची संख्या कमी होते तेव्हा शरीर विविध आजारांचे संकेत देते .
- एनिमिया : लाल रक्त पेशी कमी होण्याचे प्रमुख कारण म्हणजे एनिमिया आहे. एनिमिया हा आयरन ची कमतरता, व्हिटॅमिन बी-१२ ची कमतरता यांच्यामुळे निर्माण होतो.
- एचआयव्ही : इतर संक्रामण प्रमाणेच एचआयव्ही ग्रसित व्यक्तीच्या शरीरात पेशींची संख्या कमी झालेली असते.
- औषधांचा वापर : काही औषधे जसे कि किमोथेरपी , अँटीबायोटिक्स चा साईड इफेक्ट यामुळे सुद्धा पेशींची संख्या कमी होऊ शकते.
- पोषक तत्वांची कमी : शरीराला लागणारी पोषक तत्वे जसे कि आयरन, व्हिटॅमिन बी-१२, फॉलिक ऍसिड अश्या तत्वांचा कंटाळते मुले सुद्धा पेशींची कमी येऊ शकते .