[ Collagen Benefits ] कोलॅजन म्हणजे काय ?
जर तुम्हाला वय होयच्या आधीच जर वयस्कर दिसायचे नसेल तर किंवा तरुण वयात म्हातारे दिसायचे नसेल तर शरीरातील कोलॅजन चे प्रमाण कमी होऊन देऊ नका. कोलॅजन हा शरीरातील असा घटक आहे जो तुम्हाला लवकर म्हातारा बनवत नाही आणि तुम्हाला तरुण दिसण्यात मदत करतो. कोलॅजन म्हणजे नक्की आहे तर काय ? कोलॅजन हे एक प्रोटीन चा प्रकार आहे. ज्या पद्धतीने प्रोटीन शरीरातील मांसपेशी बळकट करते. त्याचप्रमाणे कोलॅजन हे त्वचा आणि केस तरुण ठेवण्यास मदत करते.
शरीरातील सांधे,हाडे,मांसपेशी,रक्तपेशी यामध्ये कोलॅजन उपलब्ध असते. सुंदर आणि निरोगी त्वचे साठी कोलॅजन या प्रोटीन ची आवश्यकता असते. वय वाढणे आणि वाढत्या वयानुसार चेहऱ्यावर सुरकुत्या येणे, त्याचप्रमाणे इतर समस्या वाढू लागतात. जर तुम्हाला या समस्या कमी करायच्या असतील तर तुम्हाला शरीरातील कोलॅजन चे प्रमाण वाढवावे लागणार आहे.वयाच्या ३० वर्ष नंतर जर तुम्हाला तुमच्या शरीराची काळजी घ्यायची असेल तर तुम्हाला कोलॅजन कडे लक्ष देणे गरजेचे आहे. शरीरातील एकूण प्रोटीनच्या ३०% प्रोटीन हे कोलॅजन च्या स्वरूपात असते.
[ Collagen Benefits ] कोलॅजन चे आपल्या शरीरासाठी फायदे
- हाडांच्या आरोग्यासाठी : हाडांना मजबूत करण्यासाठी कोलॅजन चा उपयोग केला जातो. ज्यामुळे हाडे फ्रॅक्चर होण्याचा धोका कमी होतो. हाडांची घनता वाढवण्यासाठी सुद्धा कोलॅजन चा उपयोग होतो. सांधेदुखी त्याच प्रमाणे ऑस्टियोपोरोसिस सारख्या समस्या होण्यापासून कोलॅजन बचाव करते.
- त्वचेचे आरोग्य सुधारते : त्वचेला जवान ठेवण्यासाठी कोलॅजन चा उपयोग केला जातो. वाढत्या वयानुसार चेहऱ्यावर सुरकुत्या येत असतात. त्याचप्रमाणे चेहऱ्यावर अनेक समस्या येत असतात. या कमी करण्याचे काम कोलॅजन करत असते. वयानुसार कोलॅजन च्या कमी मुळे चेहऱ्याची त्वचा लूज पडते. कोलॅजन च्या वापरामुळे त्वचा पहिल्यासारखी होते.
- केस गळत नाहीत : वयानुसार केस गळतीला सुरुवात होत असते, त्याचप्रमाणे केस विरळ होणे, टक्कल पडणे यांसारख्या समस्या येत असतात. या समस्यांपासून मुक्ती पाहिजे असेल तर कोलॅजन चा वापर करावा. कोलॅजन चा उपयोग केल्यांनतर केस मुळापासून मजबूत होतात आणि नखांना सुद्धा मजबूत बनवतात.
- पचन क्रिया सुरळीत होते : पचनक्रिया व्यवस्थित चालण्यासाठी आतड्यांचे आरोग्य चांगले असावे लागते. आतड्याचे आरोग्य सुरळीत होण्यासाठी कोलॅजन मदत करते. लीकी गट सिंड्रोम, इरिटेबल बॉवेल सिंड्रोम यांसारख्या आजारातून बचावन्याचे काम करते. आतड्याची सूज कमी करण्याचे काम कोलॅजन करत असते. कोलॅजन हे पचनासाठी हलके असते.
- हृदयाचे आरोग्य सुधारते : रक्त वाहिन्यांच्या चांगल्या कार्यासाठी कोलॅजन मदत करते. कोलॅजन च्या वापरामुळे रक्तवाहिन्यांचे आरोग्य सुधारते. रक्ताभिसरण चांगले होते. यामुळे कार्डिओ हेल्थ सुधारते. खराब कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी होऊन हृदयरोगाचा आणि फिट येण्याचा धोका टळतो.
- सांधे दुखी कमी करते : काही काळापूर्वी सांधेदुखीचा त्रास हा फक्त वयस्कर आणि म्हाताऱ्या लोकांमध्ये होत असायचा पण आज काल तरुणांपासून निम्म्या वर्षाच्या लोकांपर्यंत सांधे दुखीचा त्रास होताना दिसत आहे . यामध्ये कोलॅजन चा महत्वाचा रोल आहे. वयानुसार आणि आहार संतुलित नसल्यामुळे कोलॅजन चे शरीरातील प्रमाण कमी होत असते. कोलॅजन च्या वापरामुळे संधिदुखी कमी होते.
- ओरल हेल्थ सुधारते : एका चांगल्या हास्य मागे त्या व्यक्तीच्या ओरल हेल्थ चा हात असतो. ओरल हेल्थ सुधारण्यासाठी कोलॅजन चा उपयोग होतो. दात आणि हिरड्यांचे आरोग्य वाढते आणि त्यांचे आयुष्मान सुद्धा वाढते.
- कोलॅजन कशातून मिळणार : आपण कोलॅजन ला दररोज आहारात सहभागी केले पाहिजे, शाकाहारी भोजनातून सुद्धा कोलॅजन मिळते. भोपळ्याच्या बिया, बदाम यांच्यात मोठ्याप्रमाणावर कोलॅजन असते. मांसाहारी पदार्थांमध्ये अंड्याचा पांढरा भाग, मासे आणि मांस यामध्ये कोलॅजन चे प्रमाण मोठ्या प्रमाणात असते.
[ Collagen Benefits ] कोलॅजन कशातून मिळते….?
- हिरव्या पालेभाज्या : हिरव्या पालेभाज्यांचा उपयोग शरीराला पोषण देण्यासाठी केला जातो कारण हिरव्या पालेभाज्यात अधिक प्रमाणात पोषक घटक असतात. शरीरातील कोलॅजन कमी होण्यापासून थांबवण्यासाठी कोलॅजन चा उपयोग केला जातो. पालेभाज्यांचा रंग हिरवा असण्यामागे कारण आहे ते म्हणजे पालेभाज्यांमध्ये क्लोरोफिल असते. बऱ्याच अभ्यासातून असे स्पष्ट झाले आहे कि शरीरातील कोलॅजन चे प्रमाण वाढण्यासाठी क्लोरोफिल महत्वाचा घटक आहे.
- आंबट फळे : लिंबू, संत्री, मोसंबी, आवळा यांसारख्या पदार्थांचा समावेश आंबट फळांमध्ये होतो. आंबट फळांमध्ये व्हिटॅमिन सी चे प्रमाण जास्त असते. चेहरा उजळ होण्यासाठी व्हिटॅमिन सी चा उपयोग होतो. त्यामुळे आंबट फळे खाण्याचा किंवा चेहऱ्यावर लावण्याचा सल्ला दिला जातो. व्हिटॅमिन सी मुळे शरीरातील कोलॅजन चे प्रमाण वाढते.
- अंडी : नियमित अंडी खाणाऱ्या लोकांच्या शरीरात कोलॅजन चे प्रमाण भरपूर असते. अंड्यातील पांढऱ्या भागात कोलॅजन चे प्रमाण मोठ्या प्रमाणात असते. लिव्हर च्या स्वस्थ आरोग्यासाठी अमिनो ऍसिड ची आवश्यकता असते ते अमिनो ऍसिड अंड्यातून मिळते.
- लहान फळे : बोरे, जांभळे, स्ट्रॉबेरी सारख्या लहान फळांमध्ये अँटिऑक्सिडंट मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे सूर्याच्या किरणांमुळे काळी पडलेली त्वचा परत पहिल्यासारखी होते. त्याचप्रमाणे कोलॅजन चे प्रमाण कमी झालेले वाढते. लहान फळांमध्ये सुद्धा व्हिटॅमिन सी चे प्रमाण असते त्यामुळे सुद्धा कोलॅजन चे प्रमाण वाढण्यास मदत होते.
- टोमॅटो : लायकोपिन नावाचे अँटिऑक्सिडंट हे टोमॅटो मध्ये उपलब्ध असते. जे त्वचेतील कोलॅजन कमी होऊ नये म्हणून काम करत असते. टोमॅटो मध्ये मोठ्या प्रमाणात अँटी ऑक्सिडंट उपलब्ध असतात. ज्यामुळे त्वचेचे रक्षण होते. त्यामुळे टोमॅटो आपण आहारात समाविष्ट केला पाहिजे.
- भोपळ्याच्या बिया : शरीरातील कोलॅजन चे प्रमाण संतुलित ठेवण्यासाठी भोपळ्याच्या बियांचा फायदा होतो. भोपळ्याच्या बियांमध्ये झिंक चे प्रमाण मोठ्या प्रमाणात आढळते. शरीरात झिंक च्या सेवनामुळे सुद्धा त्वचेचे आरोग्य चांगले राहते. शरीरातील झिंक चे प्रमाण वाढवण्यासाठी तुम्ही ड्राय फ्रुट्स म्हणजेच काजू, बदाम, अखरोड यांचे सेवन करू शकतो.
[ Collagen Benefits ] शरीरातील कोलॅजन संतुलित ठेवण्यासाठी खालील गोष्टी करा.
- फेशियल मसाज करणे : फेशियल मसाज करण्यामुळे त्वचेतील कोलॅजन चे उत्पादन वाढण्यास मदत होते. फेशियल मसाज मुळे रक्ताभिसरण चांगले होते, त्वचा लूज पडत नाही. कोलॅजन चे प्रमाण वाढल्यामुळे त्वचा ग्लो करते. त्याचप्रमाणे हाडे मजबूत बनतात. त्यामुळे आठवड्यातून एकदा फेशियल मसाज करायची सवय लावून घ्या.
- धूम्रपान करू नका : धूम्रपान केल्यामुळे शरीरातील कोलॅजन चे प्रमाण नष्ट होते. चेहऱ्यावर सुरकुत्या, काळे डाग यायला सुरुवात होते. आणि वयाच्या आधी म्हातारे होयची शक्यता कमी होते. त्यामुळे त्वचेचा निरोगी आरोग्यासाठी धूम्रपान करू नये.
- पाणी भरपूर प्या : पाणी जास्त पिल्यामुळे शरीर हायड्रेटेड राहते . काही अभ्यासानुसार हे स्पष्ट झाले आहे कि जी लोक दिवसभरात भरपूर पाणी पितात त्यांच्या शरीरात कोलॅजन मोठया प्रमाणात आढळून येते.
FAQ
१) कोलॅजन साठी सप्लिमेंट घ्यावे का ?
कोलॅजन तुम्हाला नैसर्गिक रित्या सुद्धा मिळू शकते. त्यासाठी तुम्हाला कोलॅजन चे प्रमाण जास्त असणारे पदार्थ दररोजच्या आहारात समावेश करून घ्यावे लागणार आहे. जर तुम्हाला या गोष्टी रोज आहारात समाविष्ठ करता येत नसतील तर तुम्हाला कोलॅजन चे सप्लिमेंट घेणे गरजेचे आहे. याव्यतिरिक्त जर तुमचे वय जास्त झाले असेल किंवा तुम्हाला आतड्याचे काही आजार असतील तर कोलॅजन चे सप्लिमेंट घेणे गरजेचे ठरेल. कारण आतड्याची शोषण ताकद कमी झालेली असते त्यामुळे आहारापेक्षा सप्लिमेंट घेतलेले फायद्याचे ठरू शकते.
२) कोलॅजन सप्लिमेंट्स कशा स्वरूपात उपलब्ध असते ?
बाजारात सामान्यपणे कोलॅजन सप्लिमेंट हे पावडर आणि कॅप्सूल च्या स्वरूपात उपलब्ध असतात. याप्रकारचे सप्लिमेंट्स बनवणाऱ्या कंपन्या वनस्पती, गाईचे दूध, प्राण्यांचे मांस यांसारख्या कच्चा माल वापरून सप्लिमेंट्स बनवत असतात. शाकाहारी आणि मांसाहारी लोक आपापल्या निवडीनुसार सप्लिमेंट्स निवडू शकतात.
३) कोलॅजन सप्लिमेंट्स ची निवड कशा प्रकारे करावी ?
[ Collagen Benefits ] कोलॅजन सप्लिमेंट्स ची निवड करताना ते सप्लिमेंट कश्या पासून बनवलेले आहे हे पाहावे म्हणजे बनवण्यासाठी कोणता कच्चा माल वापरण्यात आलेला आहे हे पाहावे. जर तुम्ही शाकाहारी असाल तर सप्लिमेंट्स चा कन्टेन्ट नक्की पाहावा. त्यामध्ये अमिनो ऍसिड, प्रोटीन आणि व्हिटॅमिन चे प्रमाण किती आहे हे उपलब्ध असणाऱ्या सप्लिमेंट वरती चेक करावे. पुरेश्या प्रमाणात पोषक घटक असणाऱ्या सप्लिमेंट्स ची निवड करावी. शक्यतो वनस्पती पासून किंवा गाईच्या दुधापासून बनवण्यात येणाऱ्या सप्लिमेंट्स ची निवड करावी. नामांकित कंपनी चे सप्लिमेंट्स निवडावे. सप्लिमेंट्स निवडण्या आधी त्याचे रिव्हिव्ह वाचावे. सप्लिमेंट्स टिकून राहणासाठी त्यात वापरण्यात येणाऱ्या ऍडिटिव्ह चे प्रमाण काय आहे हे पाहावे. त्याचप्रमाणे एक्सपायरी डेट किती आहे हे सुद्धा पाहावे.
[ Collagen Benefits ] कोलॅजन चे प्रकार
एका अध्ययनानुसार पहिले तर कोलॅजन एकूण २८ प्रकारचे असते. त्यातील टाईप १, टाईप २, टाईप ३, आणि टाईप ४ हे मुख्य चार प्रकार आहेत. यातील टाईप १ कोलॅजन हे शरीरातील प्रत्येक मेद आणि मेदयुक्त मध्ये आढळून येते. टाईप २ हा कोलॅजन चा दुसरा प्रकार शरीरातील सांध्यांमध्ये आढळून येतो. टाईप ३ हा कोलॅजन हा त्वचा आणि रक्तवाहिन्या मध्ये आढळतो. आणि राहिलेला टाईप ४ हा कोलॅजन पोटातील आतडे , कान, डोळे, किडनी इत्यादी मध्ये आढळून येतो.
निष्कर्ष [ Collagen Benefits ]
कोलॅजन आपल्या शरीरातील त्वचेचे आरोग्य आणि सौंदर्य चांगले राखण्यात मदत करते. आपल्या आहारात कोलॅजन युक्त खाद्य पदार्थ समाविष्ट करू शकतो त्यामुळे त्वचा तरुण राहते. त्याचबरोबर इतर पोषक घटकांचा समावेश केल्यावर त्वचा चमकदार बनते. त्याचबरोबर व्यायाम आणि त्वचेची घेतली जाणारी काळजी यामुळे कोलॅजन चे प्रमाण वाढण्यास मदत होत असते आणि त्वचा जिवंत आणि डागमुक्त होत असते. सौंदर्य शास्त्रामध्ये कोलॅजन ला अनन्य साधारण महत्व प्राप्त झाले आहे. कोलॅजन च्या सप्लिमेंट्स चे सेवन करण्या अगोदर आहारतज्ज्ञ आणि डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कोलॅजेन त्वचेला हायड्रेटेड ठेवण्यास मदत करते. पचनक्रिया सुधारण्यासाठी आणि आतड्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी कोलॅजन चा उपयोग होतो.
नोकर भरती संदर्भात अपडेट साठी येथे क्लिक करा.
1 thought on “[ Collagen Benefits ] कोलॅजन म्हणजे काय ? फायदे आणि नुकसान काय ?”