Fabtech Credit Society Bharti 2024 | फॅबटेक मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटी येथे भरती.

Fabtech Credit Society Bharti 2024 | फॅबटेक मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटी येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात फॅबटेक मल्टीस्टेट को-ऑपरेटिव सोसायटी यांच्याद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदरची भरती ही खाजगी स्वरूपाची आहे. 22 मार्च 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. ब्रांच मॅनेजर, क्रेडिट मॅनेजर, कॅशियर, क्लार्क, पर्सनल लोन ऑफिसर, बचत गट अधिकारी, पिग्मी एजंट, बिझनेस लोन अधिकारी, सेल्स मॅनेजर या पदांकरिता सदरील भरती होणार आहे. सदरील पदाकरिता उमेदवारांनी आपले अर्ज ई-मेल द्वारे किंवा समक्ष पत्त्यावर हजर राहुन भरायचे आहेत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सोसायटी द्वारे प्रसिद्ध केलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचायची आहे. यानंतर ज्या उमेदवारांना भरतीसाठी अर्ज करायचा आहे त्यांनी खालील माहिती वाचावी.

Fabtech Credit Society Bharti 2024

  • फॅबटेक मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटी येथील भरती 20 जागांकरिता होणार आहे.
  • फॅबटेक मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटी येथील भरतीसाठी असणारी पदे खालील प्रमाणे.

Fabtech Credit Society Bharti 2024 | फॅबटेक मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटी येथील रिक्त पदे खालील प्रमाणे.

  1. ब्रांच मॅनेजर
  2. क्रेडिट मॅनेजर
  3. कॅशियर
  4. क्लार्क
  5. पर्सनल लोन ऑफिसर
  6. बचत गट अधिकारी
  7. पिग्मी एजंट
  8. बिझनेस लोन अधिकारी
  9. सेल्स मॅनेजर
  • ब्रांच मॅनेजर या पदाकरिता उमेदवाराकडे MBA / M.Com / B.Com / GDC & A यापैकी कोणतीही एक पदवी आवश्यक आहे. त्याचबरोबर कॉर्पोरेट बँकिंग क्षेत्रातील तीन ते पाच वर्ष अनुभव असणाऱ्या उमेदवाराला प्राधान्य देण्यात येईल.
  • क्रेडिट मॅनेजर या पदाकरिता उमेदवार B.Com झालेला पाहिजे. जर B.Com उमेदवार नसेल तर कोणत्याही क्षेत्रातील पदवीधर उमेदवार चालेल. उमेदवाराकडे मायक्रो फायनान्स / बँकिंग क्षेत्रातील कमीत कमी दोन ते तीन वर्षाचा अनुभव असेल तर प्राधान्य देण्यात येईल.
  • कॅशियर पदाच्या उमेदवाराकडे B.Com किंवा कोणत्याही शाखेतील पदवी पाहिजे आहे. या उमेदवाराकडे कोणताही अनुभव नसला उमेदवार नवखा असला किंवा अनुभवी असला तरी त्याला प्राधान्य देण्यात येईल.
  • क्लर्क पदाकरिता अर्ज करणाऱ्या उमेदवाराची बीकॉम पदवी किंवा इतर कोणत्याही शाखेतील पदवी पूर्ण झालेली असली पाहिजे. या पदाकरिता नवख्या उमेदवाराला किंवा अनुभवी उमेदवाराला प्राधान्य देण्यात येईल.
  • पर्सनल लोन ऑफिसर या पदाकरिता उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर असणे गरजेचे आहे. उमेदवाराकडे मायक्रो फायनान्स किंवा बँकिंग क्षेत्रातील कमीत कमी दोन ते तीन वर्षाचा अनुभव पाहिजे.
  • बचत गट अधिकारी या पदासाठी अर्ज करणारा उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर असला पाहिजे. त्याचप्रमाणे त्याच्याकडे मायक्रो फायनान्स किंवा बँकिंग क्षेत्रातील कमीत कमी दोन ते तीन वर्ष अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येईल.
  • पिग्मी एजंट या पदासाठी अर्ज करणारा उमेदवार 12 वी पास असला पाहिजे. या पदाकरिता उमेदवार नवखा असला तरी चालेल. जर उमेदवाराकडे सदरच्या कामाचा अनुभव असेल तर त्याला प्राधान्य देण्यात येईल.
  • बिझनेस लोन अधिकारी या पदाकरिता B.com किंवा कोणत्याही शाखेचा पदवीधर असला पाहिजे. मायक्रो फायनान्स किंवा बँकिंग क्षेत्रातील त्याच्याकडे कमीत कमी दोन ते तीन वर्षे अनुभव असला पाहिजे.
  • सेल्स मॅनेजर या पदासाठी उमेदवाराची बीकॉम पदवी किंवा कोणत्याही शाखेतील पदवी आवश्यक आहे. मायक्रो फायनान्स किंवा बँकिंग क्षेत्रातला दोन ते तीन वर्ष कमीत कमी अनुभव पाहिजे.
  • सदरील भरती ही संस्थेच्या नव्याने सुरू होणाऱ्या म्हसवड तालुका- मान जिल्हा- सातारा येथील शाखे करीत आहे.
  • सदरील भरती करिता वयाची अट पाहण्यासाठी उमेदवारांनी प्रसिद्ध केलेली जाहिरात पहावी.
  • फॅबटेक मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटी येथील भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांचे नोकरीचे ठिकाण म्हसवड असेल.
  • फॅबटेक मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटी येथील भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना नियमानुसार मासिक वेतन मिळेल.
  • सदरील भरती [ Fabtech Credit Society Bharti 2024 ] करिता कोणताही शुल्क सोसायटी करून आकारला जाणार नाही.
  • जे उमेदवार या भरतीसाठी पात्र आहेत त्या उमेदवारांनी आपला अर्ज ई-मेलद्वारे किंवा समक्ष दाखल करावा.
  • प्रत्येक उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी फॅबटेक मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटी यांनी प्रसिद्ध केलेली जाहिरात पहावी. जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
  • fabtechmulti@gmail.com या ईमेल आयडी वरती इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज पाठवावा. किंवा संस्थेच्या रिजनल ऑफिस सांगोला येथे समक्ष उपस्थित राहून अर्ज जमा करावा.

Fabtech Credit Society Bharti 2024 | फॅबटेक मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटी येथील भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी खालील सूचना वाचा.

  • सदरील भरती करिता उमेदवाराने ई-मेल द्वारे किंवा समक्ष दिलेल्या पत्त्यावर हजर राहुन अर्ज करायचा आहे.
  • सदरील भरती मध्ये फॅबटेक मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटी करून ऑनलाइन अर्ज करण्याचा कोणताही पोर्टल उपस्थित केलेला नाही.
  • फॅबटेक मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटी यांच्या ईमेल वरती उमेदवाराने अर्ज करताना काळजीपूर्वक आणि जपून करायचे आहेत. जर उमेदवाराकडून स्वतःची माहिती जसे की स्वतःचे नाव, ई-मेल आयडी, मोबाईल नंबर, राहता पत्ता यांसारख्या गोष्टी चुकीच्या भरल्या गेल्या. आणि त्यामुळे नोकरीची संधी गेली. तर त्याला संस्था जबाबदार राहणार नाही.
  • सदरील भरती करिता सर्व पदांना अर्ज करण्याची 22 मार्च 2024 ही शेवटची तारीख आहे.
  • वरील भरती मधील कोणत्याही पदाकरिता अर्ज करण्यापूर्वी उमेदवाराने संस्थेद्वारे प्रसिद्ध केलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. आणि त्यानंतरच योग्यतेनुसार अर्ज करावा.

Fabtech Credit Society Bharti 2024 | फॅबटेक मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटी येथे भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांनी खालील सूचना वाचाव्यात.

  • फॅबटेक मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटी येथे निवड होण्यासाठी उमेदवाराने सर्वप्रथम अर्ज करणे गरजेचे आहे.
  • फॅबटेक मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटी यांच्याकडून भरतीसाठी येणाऱ्या कोणत्याही उमेदवाराला TA/DA दिला जाणार नाही.
  • सदरील भरती मध्ये निवड प्रक्रिया फॅबटेक मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटी यांच्याद्वारे ठरवण्यात येईल. यामध्ये कोणीही इतर हस्तक्षेप करू नये.
  • सदरच्या भरतीमध्ये कोणत्याही उमेदवाराने आपली निवड व्हावी यासाठी दबाव तंत्राचा उपयोग करू नये. किंवा कोणताही अनुचित प्रकार करू नये असे करणाऱ्या उमेदवारां वरती कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
  • उमेदवाराने प्रत्येक पदाच्या किती जागा शिल्लक आहेत हे पाहूनच भरतीसाठी अर्ज करायचा आहे.

Fabtech Credit Society Bharti 2024 | फॅबटेक मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटी संदर्भात महत्त्वाची माहिती खालील प्रमाणे.

  • फॅबटेक मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, सांगोला या संस्थेचा रजिस्ट्रेशन नंबर एमएससीएस/1262/2016 हा आहे.
  • फॅबटेक मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, सांगोला या संस्थेचा पत्ता ” प्रधान कार्यालय लोखंडे हाइट्स, पहिला मजला, वाडेगाव नाका सांगोला, जिल्हा सोलापूर” हा आहे.
  • सदरील भरतीमध्ये [ Fabtech Credit Society Bharti 2024 ]  उमेदवाराला कोणत्याही प्रकारची अडचण असेल तर त्या उमेदवाराने 9801242727 / 8421216923 या मोबाईल क्रमांकावरती संपर्क साधायचा आहे.
  • सदरील भरती मधील सर्व पदे ही संस्थेची म्हसवड येथे नव्याने सुरू होणाऱ्या शाखे करिता असणार आहे.
  • फॅबटेक मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटी या संस्थेची एकूण 25 शाखा महाराष्ट्रात आहेत.
  • ब्रांच मॅनेजर या पदाकरिता एक जागा रिक्त आहे. क्रेडिट मॅनेजर पदाकरिता एक जागा रिक्त आहे. कॅशियर पदासाठी एक जागा राखीव आहे. तीन जागा क्लार्क पदासाठी आहेत. पर्सनल लोन ऑफिसर यासाठी चार जागा रिकामी आहेत. बचत गट अधिकारी पदासाठी चार जागा रिक्त आहेत. पिग्मी एजंट यासाठी दोन जागा रिक्त आहेत. बिझनेस लोन अधिकारी यासाठी दोन जागा रिक्त आहेत. सेल्स मॅनेजर पदासाठी दोन जागा रिक्त आहेत.
  • ” उद्योजकतेचा विकास हाच आमचा ध्यास” हे ध्येय आणि ब्रीद वाक्य फॅबटेक मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटी यांचे आहे.
  • सदरील संस्थेमधील भरती रद्द करण्याचा पूर्णपणे अधिकार संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे आहे. त्यामुळे कोणत्याही उमेदवाराने भरती रद्द झाल्यास तक्रार करू नये.
  • सध्या सुरू होणाऱ्या म्हसवड येथील शाखेसाठी आवश्यकतेनुसार जागा जाहिरातीत दिलेले आहेत. या जागांमध्ये भविष्यात जागा कमी जास्त होऊ शकतात. याचा पूर्णपणे अधिकार मुख्य कार्यकारी अधिकारी फॅबटेक मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटी यांच्याकडे आहे.
  • फॅबटेक मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटी या संस्थेमध्ये गोल्ड लोन, होम लोन, पिग्मी लोन, कार लोन, एज्युकेशन लोन, पर्सनल लोन, बिझनेस लोन या सर्व प्रकारचे लोन योग्य दरामध्ये मिळतात.
  • फॅबटेक मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटी या संस्थेमध्ये खातेदारांना मोबाईल आणि इंटरनेट बँकिंगची सुविधा मिळते. ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी चा पूर्ण उपयोग या संस्थेमध्ये केला जातो. कोणत्याही त्रासा विना ग्राहकाला सहज कर्ज मिळते. खातेदारांना जलद गतीने सर्व सुविधा मिळतात.
  • महाराष्ट्रातील पंढरपूर, सोलापूर, मंगळवेढा, नाजरा, मारवाडे, घेरडी, तासगाव, कवठेमंकाळ, जुनोनी, विटा, जत, आटपाडी, उमदी, सांगली या ठिकाणी फॅबटेक मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटी यांच्या शाखा आहेत.
  • संस्थेच्या वेबसाईट वरती अकाउंट ओपनिंग फॉर्म, शेअर फॉर्म, डिपॉझिट स्कीम फॉर्म, लोन फॉर्म इत्यादी फॉर्म उपलब्ध आहेत. उमेदवाराने ते तपासून पहावेत.
  • संस्थेच्या योजनेमध्ये महिला आणि बालक यांच्याकरिता बचत योजना आहेत. त्याचप्रमाणे ठेवी वरती चांगले व्याज मिळण्याच्या योजना आहेत. प्रोफेशनल स्किल डेव्हलपमेंट सारख्या योजना संस्थेमध्ये उपलब्ध आहेत.
  • सदरील सोसायटीमध्ये महिलांकरिता बचत गट उपलब्ध आहे. गुंतवणूक करण्यासाठी वेगवेगळ्या गुंतवणुकीच्या योजना उपलब्ध आहेत. ज्या खाते धारकांना पिग्मी योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्यांच्यासाठी पिग्मी योजना उपलब्ध आहे.
  • या सोसायटीमध्ये ग्राहकाच्या समस्येला पूर्णपणे समाधानकारक असा उपाय शोधून दिला जातो. ग्राहकाचे समाधान होण्यासाठी प्रयत्न केला जातो.
  • अर्ज करणाऱ्या उमेदवारांना फॅबटेक मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटी संदर्भात अधिक माहिती मिळवण्यासाठी https://www.fabtechmultistate.com या वेबसाईटला भेट द्या.
  • फॅबटेक मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटी या संस्थेची स्थापना 2016 रोजी झालेली आहे.
  • फॅबटेक मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटी चे सर्व कर्मचारी हे विनम्र आणि आधार युक्त वागणूक देणारे आहेत. ग्राहकाला हव्या त्या सुविधा पुरवण्याचे काम सर्व कर्मचारी तत्परतेने करत असतात.

महाराष्ट्र राज्यातील सर्व खाजगी पतसंस्था त्याचप्रमाणे खाजगी बँक, को-ऑपरेटिव्ह सोसायटी या सर्वांच्या भरती ची माहिती मिळवण्याकरिता आमच्या नोकरी 1st या वेबसाईटला नक्की भेट द्या. भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a Comment