[ Fish Oil ] बरेच लोक हि मासे खात असतात. काही जणांच्या रोजच्या आहारात मासा हा असतो. मासे खाण्याचे बरेच फायदे आहेत. पण दररोज मासे खाणे शक्य नाही जरी त्यापासून मिळणारे फायदे साठी रोज मासे खायचे ठरवले तरी चांगल्या प्रतीचे मासे उपलब्ध असण्या बाबत शंकाच आहे. त्यामुळे माश्यातील सर्व अर्क ज्यात उपलब्ध आहे अश्या फिश ऑइल चा वापर आपण दररोज करू शकतो आणि माश्याचा सेवनातून जे घटक मिळतात ते मिळवू शकतो. फिश ऑइल हे कॅप्सूल च्या स्वरूपात बाजारात उपलब्ध आहे. या कॅप्सूल्स आपण बऱ्याच दिवस साठवून ठेऊ शकतो. याच्या सेवनामुळे मासे खाल्ल्याने जे फायदे होतात तेच फायदे होतात.
[ Fish Oil ] मास्यांमध्ये सुद्धा विविध प्रकार आहे पण फिश ऑइल कॅप्सूल बनवण्यासाठी उच्च प्रतीचे मासे वापरले जातात त्यामध्ये सैलमन, कॉड, हलीबट, तूना यांसारख्या मास्यांचा उपयोग फिश ऑइल सप्लिमेंट कॅप्सूल बनवण्यासाठी केला जातो. फिश ऑइल कॅप्सुललाच ओमेगा-३ कॅप्सूल असे म्हणले जाते. कारण यामध्ये ओमेगा-३ चे प्रमाण अधिक असते. त्याचप्रमाणे बुद्धीच्या विकासासाठी आणि क्रियेसाठी लागणारे आवश्यक घटक DHA आणि EPA सुद्धा असतात. शरीराच्या वाढीसाठी लागणारे व्हिटॅमिन्स,खनिजे, प्रोटिन्स आणि महत्वपूर्ण पोषक घटक सुद्धा असतात.
[ Fish Oil ] फिश ऑईलचे फायदे
- हृदयाचे आरोग्य सुधारते : फिश ऑइल मध्ये ओमेगा-३ चे प्रमाण जास्त असते, फिश ऑइल च्या सेवनामुळे हृदय रोग होण्याची संभावना कमी होते. ओमेगा-३ मुळे शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी होते आणि चांगल्या कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढते. त्यामुळे रक्ताच्या प्रवाहाला अडथळा येत नाही. आणि रक्ताभिसरण चांगले होते. त्यामुळे हृदयाला पुरेसे रक्त मिळते. रक्तवाहिन्यांचे काम सुरळीत चालते. फिश ऑईलच्या नियमित सेवनामुळे ब्रेन स्ट्रोक येण्याचे प्रमाण कमी होते. अमेरिकन हार्ट असोसिएशन च्या अनुसार ओमेगा-३ हृदयाचे आजार कमी करते.
- वजन कमी करण्यासाठी फायदेशीर : आपण अन्न पदार्थ बनवण्यासाठी बाजारात मिळणाऱ्या रिफाईंड ऑईलचा वापर करतो. या तेलामुळे हळूहळू लोकांच्या शरीरात चरबीचे प्रमाण वाढते आणि वजन वाढायला सुरुवात होते. आहारात आपण फिश ऑइल चा उपयोग केल्यांनतर वजन कमी होते असा शोध दक्षिण ऑस्ट्रेलिया विश्वविद्यालयातील प्रोफेसर पीटर होवे यांनी लावला. आहारात फिश ऑइल आणि नित्य व्यायाम केल्याने चांगल्या प्रकारे वजन कमी होते. वजन कमी करण्याबरोबरच शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी करण्याचे सुद्धा काम फिश ऑइल करते.
- रोग-प्रतिकार शक्ती वाढते : फिश ऑइल च्या दररोज सेवनामुळे शरीरातील रोगप्रतिकार शक्ती वाढते. त्यामुळे वायरल इन्फेक्शन, सर्दी, खोकला यांसारखे आजार होत नाहीत. शरीरातील साईटोकिन्स आणि इकोसोनाईड्स मजबूत करण्यासाठी ओमेगा-३ ची आवश्यकता असते. त्यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढते. रोगप्रतिकार शक्ती वाढल्याने आजारांचे प्रमाण कमी होते. त्यामुळे प्रमाणात फिश ऑइल कॅप्सूल चे सेवन करणे फायदेशीर ठरते.
- संधिवाता साठी फायदेशीर : ऑस्ट्रेलिया मधील रॉयल एडिलेड हॉस्पिटल आणि न्यूकलस विश्वविद्यालय च्या अनुसार फिश ऑइल च्या वापरामुळे संधिवाताचा त्रास कमी होण्यास फायदा होतो आणि रुग्णाला आराम मिळतो. शरीरातील इन्फ्लमेशन कमी करण्यासाठी ओमेगा-३ चा उपयोग फायदेशीर ठरतो. शरीरातील इन्फ्लमेशन कमी झाल्यावर शरीरातील संधिवाताचा त्रास कमी होतो. त्याचप्रमाणे सांधे दुखी ची तीव्रता कमी होते. शरीरातील वाढत्या कार्टिलेज ला नष्ट करण्याचे काम करणाऱ्या एन्झाईम ला फिश ऑइल कमी करते.
- चिंता आणि नैराश्य कमी करण्यासाठी फायदेशीर : नैराश्य, चिंता,सतत विचार करणे, झोप न लागणे, आत्महत्येचा विचार येणे यांसारख्या मानसिक लक्षणातून बाहेर येण्या साठी ओमेगा-३ चा फायदा होते. फिश ऑइल मध्ये ओमेगा-३ मोठ्या प्रमाणात असते, त्यामुळे याच्या सेवनातून मानसिक समस्या कमी होतात.ज्या लोकांचे मानसिक आरोग्य ठीक नाही अश्या लोकांना ओमेगा-३ चे प्रमाण जास्त असणाऱ्या मास्यांचे सेवन करायला दिले. त्यानंतर त्यांच्यातील मानसिक समस्या मोठ्याप्रमाणात कमी झाल्या.
- डोळ्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर : मास्यांच्या सेवनामुळे डोळ्यांचे आरोग्य सुधारते. वयानुसार मांसपेशी कमजोर होत असतात पण फिश ऑइल च्या सेवनामुळे मांसपेशी मजबूत होतात. मास्यांचे तेल वापरल्यामुळे शरीरातील ओमेगा-३ चे प्रमाण वाढते आणि डोळ्यांचे आरोग्य वाढते.
- अल्झायमर साठी फादेशीर : ओमेगा-३ फॅटी ऍसिड च्या सेवनामुळे अल्झायमर रोगावर उपचार करणे सोपे झाले आहे. लुईसियाना स्टेट युनिव्हर्सिटी मध्ये लावलेल्या एका शोधानुसार फिश ऑइल मध्ये असणाऱ्या फॅटी ऍसिड मुळे अल्झायमरची लक्षणे कमी होत चालली आहेत. त्याचप्रमाणे लॉस अँजेल्स येथील कॅलिफोर्निया विश्वविद्यालय मध्ये एका अभ्यासात सिद्ध झाले आहे कि फिश ऑइल मुळे अल्झायमर चे प्रमाण कमी होते.
- लक्ष केंद्रित करण्यास मदत करते : अटेन्शन डिफिसिएट म्हणजेच लक्ष केंद्रित करण्यास सक्षम नसणाऱ्या व्यक्तींवर आणि हायपर ऍक्टिव्हिटी डिसऑर्डर म्हणजेच एकावेळेस जास्त काम करणे यांसारख्या आजारांवर उपचार म्हणून फिश ऑईलचा उपयोग होतो. लहान मुलांचे अभ्यासात लक्ष न लागणे, लक्षात न राहणे, हाती घेतलेलं काम पूर्ण न करणे यांसारख्या लक्षणांपासून लहान मुलांचा बचाव कारणासाठी फिश ऑइल कॅप्सूल चा उपयोग करतात.
- त्वचेसाठी फायदेशीर : प्रदूषणामुळे किंवा दूषित आहारामुळे त्वचा कोरडी आणि तेज नसणारी होते. फिश ऑइल आणि ओमेगा-३ च्या सेवनामुळे त्वचा हायड्रेटेड होते आणि त्वचेवर तेज येते. शरीरातील इन्फ्लमेशन कमी करण्यासाठी फिश ऑइल चा उपयोग केला जातो. सोयरायसिस सारख्या त्वचेच्या गंभीर आजारासाठी सुद्धा फिश ऑईलचा उपयोग केला जातो. चेहऱ्यावरील पिंपल्स कमी करण्यासाठी सुद्धा फिश ऑईलचा उपयोग केला जातो. उन्हामुळे त्वचा काळी पडते. काळी पडलेली त्वचा परत पहिल्यासारखी कारणासाठी फिश ऑइल कॅप्सूल चा वापर केला जातो.
- मधुमेहासाठी फादेशीर : शरीरातील वाढलेल्या साखरेच्या प्रमाणामुळे मधुमेह होतो. ज्या लोकांच्या शरीरात साखरेचे प्रमाण प्रमाणापेक्षा जास्त असते अश्या लोकांना हृदय रोगाची शक्यता असते. किंवा फिट येण्याची शक्यता असते. ओमेगा-३ आणि फिश ऑईलच्या सेवनामुळे खराब कोलेस्ट्रॉल चे प्रमाण कमी होते आणि हृदयाचे आरोग्य सुधारते.
- अल्सर च्या उपचारासाठी : फिश ऑईलच्या वापरामुळे अल्सर आजार बरा होण्यास मदत होते. अल्सर मधील असणाऱ्या डीएचए आणि इपीए मुळे आणि अँटी इंफ्लामेंटरी गुणधर्मामुळे अल्सर बरा होण्यास मदत होते.
- केसांच्या विकासासाठी : फिश ऑइल कॅप्सूल च्या दररोज च्या वापरामुळे शरीराला आवश्यक ओमेगा-३ मिळते. यामुळे केस गळने, केस विरळ होणे, केस पांढरे होणे या सारख्या समस्या कमी होतात आणि केसांना एक चमक मिळते. फिश ऑइल मध्ये कीसमो प्रोटीन असते जे केसांच्या आरोग्यासाठी अतिशय उत्तम असते.
- हाडांच्या विकासासाठी गुणकारी : फिश ऑईलचे सेवन करणे हाडाच्या आरोग्यासाठी उपयोगी असते. वयानुसार मानवी शरीरातील हाडे कमजोर आणि ठिसूळ होतात, त्यामुळे हाडांना मजबूत करण्यासाठी वयोवृद्ध लोकांना फिश ऑइल कॅप्सूल घेण्याचा सल्ला दिला जातो. फिश ऑइल मध्ये हाडांसाठी ओमेगा-३ आणि भरपूर खनिजे असतात त्यामुळे हाडे मजबूत होतात.
- उच्च रक्त दाबासाठी फायदेशीर : उच्च रक्तदाब कमी करण्यासाठी फिश ऑइल कॅप्सूल चा उपयोग केला जातो. ओमेगा-३ आणि फॅटी ऍसिड यामुळे वाढलेला उच्च रक्तदाब कमी होतो. यामुळे रक्त प्रवाह सुरळीत चालतो.
[ Fish Oil ] फिश ऑइल चे नुकसान
- प्रमाणात फिश ऑइल कॅप्सूल चे सेवन केले तर फायदेशीर ठरू शकते पण फिश ऑइल कॅप्सूल चे अति प्रमाणात सेवन केल्याने नुकसान होऊ शकते.
- लिव्हर चा आजार असणाऱ्या रुग्णांनी जर फिश ऑइल चे सेवन केले तर रक्तस्राव होऊ शकतो.
- नैराश्याचा आजार असणाऱ्या लोकांनी जर फिश ऑइल कॅप्सूल चे सेवन केले तर फायदा होऊ शकतो पण अति प्रमाणात केलेल्या सेवनामुळे नैराश्याची लक्षणे तीव्र होतात.
- फिश ऑइल कॅप्सूल च्या सेवनामुळे शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहते पण अधिक फिश ऑईलच्या अधिक वापरामुळे साखरेचे प्रमाण वाढू शकते.
[ Fish Oil ] फिश ऑइल कॅप्सूल मधील घटक
सप्लिमेंट मधील घटक | घटकांचे प्रमाण / प्रति १०० ग्रॅम |
ऊर्जा | ३१३४ kj |
प्रोटीन | १८.१ ग्रॅम |
टोटल फॅट | ७४.० ग्रॅम |
सॅच्युरेटेड फॅट | २०.९ ग्रॅम |
ट्रान्स फॅट | ०० ग्रॅम |
टोटल कॅर्बो हायड्रेड | ५.२ ग्रॅम |
डीएचए | १२० मिली ग्रॅम |
इपीए | १८० मिली ग्रॅम |
[ Fish Oil ] फिश ऑइल कॅप्सूलचे पुरुषांसाठी चे फायदे
आज काल च्या युगात काही पुरुषांना स्पर्म काऊंट कमी झाल्यामुळे प्रजनन क्षमता कमी होने यांसारख्या समस्या उद्भवतात. त्याचप्रमाणे इरेक्टाईल डिसफंक्शन सारख्या समस्या सुद्धा असतात. वैज्ञानिकांच्या म्हणण्यानुसार जेव्हा एखादा पुरुष ४० वर्ष्यापेक्षा जास्त वयाचा होतो. त्यावेळेस त्याची प्रजनन क्षमता कमी होत असते. चुकीच्या जीवनशैली मुले आणि धुम्रपानामुळे पुरुषातील स्पर्म काउंट कमी होत असतो. त्यासाठी फिश ऑइल कॅप्सूल चे सेवन करणे फायदेमंद ठरू शकते.
[ Fish Oil ] पुरुषांसाठी फिश ऑइल चे फायदे
- स्पर्म काउंट वाढवण्यासाठी फिश ऑइल कॅप्सूल चा वापर करण्यात येतो. त्यामुळे पुरुषांची प्रजनन क्षमता वाढते.
- इरेक्टाइल डिसफंक्शन सारख्या आजारांसाठी फिश ऑइल चा उपयोग गुणकारी ठरतो.
- पुरुषांमधील यौन इछा वाढवण्याचे काम फिश ऑइल करते.
- चांगल्या क्वालिटीचे स्पर्म बनवण्यासाठी फिश ऑईलचा उपयोग होतो.
- पुरुषातील टेस्टेस्टेरॉन नावाचा हार्मोन वाढवण्यासाठी फिश ऑइल चा उपयोग होतो. फिश ऑइल च्या सेवनामुळे या हार्मोन्स चे संतुलन प्रमाणात राहते.
- पुरुषांच्या मांस पेशी मजबूत बनण्यासाठी फिश ऑईलचा उपयोग होतो.
- व्यायाम करणाऱ्या पुरुषांमध्ये फिश ऑइल कॅप्सूल मुळे स्टॅमिना तयार होतो.
- ओमेगा-३ च्या सेवनामुळे त्वचा चांगली होते आणि रोग प्रतिकार शक्ती वाढते.
[ Fish Oil ] सारांश
मासांच्या सेवनामुळे आपल्याला भरपूर फायदे मिळतात जर आपण मासे नियमित खालले तर ओमेगा-३ चे प्रमाण वाढून हृदय रोगाचा धोका टळतो. पण आपल्याला दररोज मास्यांचा आहारात समावेष करणे शक्य होत नाही त्यामुळे आपण फिश ऑइल चा आहारात समावेश करत असतो. यामुळे मास्यांच्या सेवनामुळे जेव्हडा फायदा होतो तेवढाच किंवा त्यापेक्षाही जास्त फायदा फिश ऑइल मुळे होत असतो. फिश ऑईलची सप्लिमेंट्स सुद्धा बाजारात उपलब्ध आहेत. त्याचा वापरामुळे शरीरातील ओमेगा-३ चे प्रमाण वाढते आणि खराब कोलेस्ट्रॉल कमी होते तसेच हृदयरोगाचा धोका सुद्धा कमी होत असतो.
डीआरडीओ येथील भरती संदर्भात अधिक माहिती मिळवण्याकरिता इथे क्लिक करा.