Jaywant Institute of Medical Science Bharti | जयवंत इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स, सांगली या संस्थेद्वारे रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदरील भरती मध्ये एकूण सहा पदे रिक्त आहेत. यामध्ये प्राध्यापक, वाचक आणि व्याख्याता या पदाकरिता जागा रिक्त आहेत. 9 डिसेंबर 2023 शी या भरती करिता अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. ऑफलाइन पद्धतीने उमेदवाराने अर्ज करावा. अर्ज करण्याअगोदर उमेदवारांनी जयवंत इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स, सांगली याद्वारे प्रसिद्ध झालेली जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. सदरील भरतीमध्ये अर्ज करण्याअगोदर उमेदवारांनी खालील महत्त्वाची माहिती वाचावी.
- जयवंत इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स, सांगली येथील भरती सहा जागांकरिता होणार आहे.
- सदरील भरती ही प्राध्यापक, वाचक आणि व्याख्याता या पदासाठी होणार आहे.
Jaywant Institute of Medical Science Bharti | जयवंत इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स येथील भरतीसाठी शैक्षणिक पात्रता आणि अटी खालील प्रमाणे.
- M.U.H.S नाशिक, महाराष्ट्र सरकार आणि NCISM नवी दिल्ली या संस्थेने सांगितल्याप्रमाणे उमेदवाराची शैक्षणिक पात्रता आणि अनुभव पाहिजे.
- या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 60 वर्षाच्या आत पाहिजे.
- जयवंत इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स, सांगली यांच्याद्वारे ध्यानात येणाऱ्या भरती मधून निवड झालेल्या सहा उमेदवारांना नियमानुसार मासिक वेतन मिळेल.
- जयवंत इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स या भरती मधून निवडून आलेल्या उमेदवारांचे नोकरीचे ठिकाण हे सांगली राहील.
- सदरील भरती करिता उमेदवाराकडून कोणत्याही प्रकारची शुल्क घेण्यात येणार नाही.
- पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यासाठी आपला अर्ज पत्राद्वारे किंवा समक्ष उपस्थित राहून दिलेल्या पत्त्यावर जमा करावा.
- सदरील भरती करिता 9 डिसेंबर 2023 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख राहील.
- सदरील भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी उमेदवाराने जयवंत इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स, सांगली यांच्याद्वारे केलेली जाहिरात पहावी. जाहिरात पहा.
- सदरील भरती करिता उमेदवाराने अर्ज करण्यासाठी ” जयवंत इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स, गेट नंबर 319/1 – 320, AP- किल्ले मच्छिंद्रगड, तालुका – वाळवा, जिल्हा सांगली.” या पत्त्यावर आपला अर्ज पत्राद्वारे पाठवावा.
Jaywant Institute of Medical Science Bharti | जयवंत इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स या भरती करिता खालील नियम वाचा.
- सदरील भरती करिता ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- ऑनलाइन अर्ज करण्याची कोणतीही पद्धत जयवंत इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स यांच्याद्वारे राबविण्यात आलेली नाही.
- जयवंत इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स येथील भरतीसाठी ऑफलाइन अर्ज करत असताना उमेदवाराने आपले शिक्षण, जन्मतारीख, नाव आम्ही स्वतःची वैयक्तिक माहिती बरोबर लिहावी. जर ही माहिती देताना काही चुकले तर त्याला संस्था जबाबदार राहणार नाही.
- 9 डिसेंबर 2023 ही सर्व पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
- कर्ज करणाऱ्या प्रत्येक उमेदवाराने जयवंत इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून प्रसिद्ध करण्यात आलेली भरतीची जाहिरात वाचावी.
Jaywant Institute of Medical Science Bharti | जयवंत इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स येथील भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांसाठी खालील सूचना.
- जयवंत इन्स्टिट्यूटच्या भरतीसाठी ज्या उमेदवारांनी अर्ज केलेले आहेत ते उमेदवारच भरतीसाठी पात्र असतील.
- सदरील भरती करिता येणाऱ्या कोणत्याही उमेदवाराला जयवंत इन्स्टिट्यूट कडून कोणत्याही प्रकारचा TA/DA देण्यात येणार नाही. याची नोंद उमेदवारांनी घ्यावी.
- या भरतीमध्ये उमेदवाराने कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार केला तर त्या उमेदवारावर ती जयवंत इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स च्या माध्यमातून कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
- सदरील भरतीची निवड प्रक्रिया आणि त्याची वेळापत्रक जयवंत इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून ठरवले जाईल.
- सदरील भरतीची पूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी जयवंत इन्स्टिट्यूटच्या संकेतस्थळाला भेट द्या.
Jaywant Institute of Medical Science Bharti | जयवंत इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स, सांगली येथे अर्ज करण्याची प्रक्रिया खालील प्रमाणे.
- सदरील भरती करिता इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज दिलेल्या नमुन्या प्रमाणे लिहायचा आहे. त्यानंतर अर्जाबरोबर आवश्यक असणारे प्रमाणपत्रे, मार्कशीट इत्यादी गोष्टींच्या कॉपी सेल्फ अटेस्टेड करून जोडायचे आहेत. आणि दिलेल्या पत्त्यावर पत्राद्वारे पाठवायचे आहे.
- ” सेक्रेटरी, शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ, जयवंत इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स, गट नंबर – 319/1 – 320, मुक्काम पोस्ट – किल्ले मच्छिंद्रगड, तालुका- वाळवा, जिल्हा सांगली.” या पत्त्यावर उमेदवारांनी आपला अर्ज पाठवायचा आहे.
- उमेदवारांना अर्ज भरताना काही अडचण आली तर ई-मेल करावा. ई-मेल आयडी – contact@sspmjims.com
- उमेदवारांनी आपला अर्ज पाच दिवसाच्या आत मध्ये दिलेल्या पत्त्यावर पाठवावा.
- ईमेल आयडी द्वारे आलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
- सदरील भरती ही आयुर्वेदिक कॉलेज मधील आहे. त्यामुळे आयुर्वेद संदर्भातील उमेदवारांनी अर्ज करावा.
- उमेदवारांनी स्वतःचा पूर्ण बायोडाटा आणि दोन पासपोर्ट साईज फोटो अर्जाबरोबर जोडावेत.
Jaywant Institute of Medical Science Bharti | जयवंत इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स येथील विषयानुसार पदे खालील प्रमाणे.
- सदरील भरती मध्ये क्रिया शरीर या विषयासाठी एक प्राध्यापक, एक वाचक आणि एक व्याख्याता ही पदे रिक्त आहेत.
- या भरतीमध्ये रचना शरीर या विषयाचे एक प्राध्यापक आणि एक वाचक अशी दोन पदे भरायचे आहेत.
- सदरील संस्थेमध्ये संहिता आणि सिद्धांत या विषयाच्या वाचक पदासाठी एक जागा शिल्लक आहे.
Jaywant Institute of Medical Science Bharti | जयवंत इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स संदर्भातील माहिती खालील प्रमाणे
जयवंत इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स हे एक आयुर्वेदिक हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर आहे. जयवंत इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स हे एक आयुर्वेदिक हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर आहे. या संस्थेची स्थापना श्री. जयवंत राव भोसले यांनी केलेली आहे. 1964 रोजी त्यांनी शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेची स्थापना केली. या संस्थेद्वारे ग्रामीण भागांमध्ये शाळा आणि महाविद्यालय चालवण्याचे काम केले जाते. जयवंतराव भोसले यांचा नेहमीच कल मुलींना शिक्षण देण्याकडे होता. म्हणून त्यांनी 1974 रोजी कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना केली.
जयवंत इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स येथे संस्कृत संहिता सिद्धांत, रचना शरीर, क्रिया शरीर, द्रव्यगुण, रसशास्त्र आणि भाईशाज्य कल्पना, शलाका तंत्र, स्वस्तवित्रा, कुमार तंत्र, प्रसूती तंत्र आणि स्त्री रोग, पंचकर्म, काया चिकित्सा, अगदतंत्र आणि व्यवहार आयुर्वेदिक विधी, विकृती विज्ञान रोग निदान. इत्यादी शाखा आहेत.
सध्या शेतकरी प्रसारक मंडळ या संस्थेचे चेअरमन डॉक्टर सुरेश भोसले हे आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार सध्याचे युग हे मेडिकल आणि आयुर्वेदिक क्षेत्रामध्ये नवनवीन शोध लावण्याचे आहे. लोकांना चांगले आरोग्य पुरवणे हे आमचे ध्येय आहे. 2018 मध्ये शेतकरी शिक्षण प्रसार मंडळाने जयवंत आयुर्वेदिक हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर याची स्थापना किल्ले मच्छिंद्रगड तालुका वाळवा, जिल्हा सांगली या ठिकाणी केली आहे.संस्थेचे उद्दिष्ट हे मानवजातीच्या कल्याणाकरिता पुढील पिढीसाठी आयुर्वेदिक शिक्षण पुरवणारी दर्जेदार संस्था होणे हे आहे. विद्यार्थ्यांना आयुर्वेदिक अभ्यासाकरिता चांगले वातावरण तयार करून देणे हे या संस्थेचे काम आहे. संस्थेचे मूलभूत तत्त्व हे विद्यार्थ्यांना चांगल्या प्रतीचे आयुर्वेदिक शिक्षण देण्याचे आहे .
डॉक्टर अतुल भोसले यांच्या नेतृत्वाखाली जयवंत इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स, किल्ले मच्छिंद्रगड याची स्थापना झालेली आहे. डॉक्टर अतुल भोसले हे कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स, डीम्ड युनिव्हर्सिटी, या युनिव्हर्सिटीचे उपकुलगुरू आहेत. जयवंत इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स हे छत्रपती शिवाजी युनिव्हर्सिटी, कोल्हापूर या विद्यापीठामध्ये येते. एक खाजगी संस्था आहे. जी आयुर्वेदिक क्षेत्रांमधील ज्ञान विद्यार्थ्यांना पुरवण्याचे काम करत आहे. कृष्णा शुगर फॅक्टरी शेजारी असणारे हे महाविद्यालय मेडिकल सोबत अभियांत्रिकी कॉलेज सुद्धा आहे.
आयुर्वेद ही 5000 वर्षांपूर्वी पासून आपल्याला निरोगी आयुष्य राहण्यासाठी मदत करत आहे. आयुर्वेदाला प्राचीन भारतामध्ये मानवी शरीर निरोगी ठेवण्यासाठी आणि आजार बरे करण्यासाठी अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले होते. आधुनिक काळातील मेडिकल सायन्सच्या प्रगतीमुळे लोक आयुर्वेदाला विसरत चाललेले आहे. पण आपल्याला विसरून चालणार नाही. दैनंदिन आयुष्यात वापरले जाणारे वस्तू आणि वनस्पती यांच्यापासून आयुर्वेदिक औषधांची निर्मिती केली जाते.
मानवी शरीराला ताण तणाव मुक्त करून सुखी आयुष्याकडे घेऊन जाण्याचा मार्ग म्हणजे आयुर्वेद आहे. दीर्घ आजाराने ग्रीस असणाऱ्या मानवी शरीराला आयुर्वेदामुळे ऊर्जा मिळते त्याचे शरीर पुनर गतिमान व्हायला लागते त्वचा आणि केसांचे आरोग्य सुधारते. आयुर्वेदामध्ये शरीरातील आजाराचे मूळ शोधले जाते आणि त्यानुसार उपचार दिले जातात. यामुळे जगभरात आयुर्वेदाचे नाव प्रसिद्ध झाले आहे. भारतातील एकूण लोकसंख्येच्या 90% लोक कोणत्या ना कोणत्या कारणासाठी आयुर्वेदाचा उपयोग करत असतात.
आयुर्वेदामध्ये रुग्णाच्या शरीरातील दोष तीन भागांमध्ये विभागाला जातो त्याला त्रिदोष असे म्हणतात. वात, पित्त, आणि कफ हे त्याचे प्रकार आहेत. आयुर्वेदिक उपचारांचा होणाऱ्या लाभांश एक लाभ म्हणजे त्वचेचे आरोग्य सुधारणे, केसांचे आरोग्य सुधारणे आणि वजन नियंत्रणात राहणे हे आहे. योग्य आहार आणि योग्य आयुर्वेदिक उपचार याच्यामुळे मानवी शरीरातील अतिरिक्त वजन कमी होते. ध्यान करणे, योग करणे योग्य त्या आयुर्वेदिक वनस्पतींचे नियमित सेवन करणे. या गोष्टीमुळे शरीर ताणतणावापासून दूर राहते. त्याचबरोबर पचनक्रिया सुधारते रक्तदाब व्यवस्थित राहतो. शरीरशुद्धीसाठी अनेक वेळा आयुर्वेदिक उपचारांचा उपयोग केला जातो. भारतामध्ये सतत विदेशी आक्रमणामुळे आयुर्वेदिक पद्धतीला जास्त प्रमाणात महत्व मिळाले नाही. याविरुद्ध आधुनिक मेडिकल पद्धतीचा उपयोग जास्त होऊ लागला.
रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आयुर्वेदाचा उपयोग होतो. रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी गिलोय, आवला, तुळशी, हळद, काली मिर्च या आयुर्वेदिक वनस्पतींचा उपयोग होतो. कोरोना काळात आयुर्वेदिक पद्धतींचा उपयोग शक्ती वाढवण्यासाठी करायला हवा होता. याचा उपयोग दररोज जरी केला तरी शरीरावर कोणताही घातक परिणाम होत नाही.
महाराष्ट्र राज्यातील आणि भारतातील मेडिकल कॉलेजमधील रिक्त जागांसाठी निघालेल्या भरतीची अपडेट्स मिळवण्याकरिता आमच्या नोकरी फस्ट या वेबसाईटला भेट द्या. भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.