[ Kodak Camera ] कोडॅक कॅमेरा आणि फोटोग्राफी

[ Kodak Camera ] Kodak च्या कॅमेरा पूर्वीचे जग

[ Kodak Camera ] औद्योगिक क्रांतीला चालना मिळाली ती म्हणजे एकोणिसाव्या शतकात त्याचे कारण म्हणजे प्रकाश आणि प्रकाश शास्त्रात खूप मोठी प्रगती झाली. विज्ञान आणि तंत्रज्ञानात या काळात प्रगती होत होती. थेटर्स आणि सिनेमा मध्ये प्रकाशाचा उपयोग करून प्रगती साधण्यात लोक यशस्वी झाले होते. हे सर्व असून सुद्धा सर्वसामान्यांपर्यंत शास्त्र अजून पोहचायचे होते.

1889 रोजी एडिसनने सिनेमाचा शोध लावला आणि याच वर्षी जगप्रसिद्ध हास्यकलाकार चार्ली चापली याचा जन्म झाला. आणि तो पुढे हॉलीवुड सिनेमातील मोठा कलाकार झाला. सगळ्यात मोठा हास्य कलाकार चार्ली असला तरी यावर्षी सगळ्यात मोठा विनोद हा एडिसनचा झाला होता . कारण सिनेमा हे तंत्र चालणार नसून कोणीही सिनेमा पाहणार नाही असे एडिसनला वाटले म्हणून त्याने या तंत्राचा पेटंट घेण्याच्या भानगडीत पडला नाही. सिनेमाच्या शोधापासून 150 ते 200 डॉलर्स मिळतील एवढीच त्याची त्यामागची अपेक्षा होती. त्याच्या वकिलांनी विनंती करूनही एडिसनने सिनेमाचे पेटंट घेतले नाही. एवढेच काय त्याने आपल्या वकिलांनाही याचे पेटंट घेण्याच्या भानगडीत पडू नका असे सांगितले.

[ Kodak Camera ]  1928 सालापर्यंत सिनेमागृहात फक्त मुक चित्रपट चालत होते पण 1928 नंतर ध्वनी ही त्याला जोडला गेला आणि चित्रपटातील पात्र बोलू लागली. सुरुवातीच्या काळात ब्लॅक अँड व्हाईट सिनेमे होते. त्याच्यानंतर रंगीत सिनेमा अस्तित्वात आला आणि यामुळे लोकांच्या जीवनशैलीत बदल होऊ लागले. एकाकी राहणाऱ्या माणसांकरिता हे सिनेमागृह करमणुकीचे साधन ठरू लागले. त्यानंतर घरोघरी टेलिव्हिजन अस्तित्वात आले. पण हे सगळे सिनेमा आणि टेलिव्हिजन वरील कार्यक्रम हे आधी शूटिंग करण्यासाठी कॅमेरा ची आवश्यकता होती. त्यामुळे कॅमेराला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले होते.

कॅमेरा चा शोध निघायच्या अगोदर जर कुणाला स्वतःचा फोटो बनवायचा असेल तर चित्रकार किंवा कलाकाराकडून पोर्ट्रेट बनवून घ्यावा लागत असे त्यामुळे कलाकारांना त्यांची कला विकसित करण्याची चांगली संधी मिळत असेल. या कलाकारांमध्ये लिओनार्दो द विंसी, रेमब्रो इत्यादी कलाकारांनी खूपच चांगली व्यक्तिचित्रे काढली. लिओनार्दो द विंसी याला मानवी शरीराचा अभ्यास करायला खूप आवडत असे कित्येक वेळा त्याने स्मशानातील प्रेत बाहेर काढून त्याच्या शरीरावर ती अभ्यास करत होता. त्याकाळी श्रीमंत लोक हे स्वतःचं पोट्रेट काढून घेत असत त्यामुळे स्वतःचं पोट्रेट काढणे हे श्रीमंतीचा आणि हौसेचा भाग मानला जायचा.

[ Kodak Camera ]  पोट्रेट काढण्यासाठी लोक बरेच वेगवेगळे प्रयोग करत असत ज्या व्यक्तीचा पोट्रेट काढायचा आहे त्या व्यक्तीला प्रकाश झोतात बसवत आणि मागच्या पडद्यावर पडणारी त्याची सावली ट्रेस करत यामुळे त्या व्यक्तीची बाहेरील बाजू मिळत आणि उरलेली बाजू स्वतः काढायची असे प्रयोग चालू होते. याचे बरेच प्रकार होते त्यामध्ये सीलहाऊस, फिजिओनोट्रेस सारखे प्रकार पुढे येऊ लागले. फिजिओनोट्रेस हे तंत्र गिल लुई श्रेण याने काढलेले होतं.

1786 पासून ते 1830 पर्यंत हे तंत्र लोकांमध्ये प्रसिद्ध होतं. या पद्धतीचा वापर करून लवकरात लवकर चित्र काढता येत असत. या बहुपयोगी तंत्रानंतर 1824 रोजी ‘लिथोग्रफी’ नावाचं नवीन तंत्र बाजारात आल. फ्रान्समधील निपसे या व्यक्तीने या तंत्राचा आविष्कार केला होता. 1826 रोजी या तंत्रज्ञानाचा उपयोग करून जगातील पहिला फोटो काढण्यात आला होता. पण अजून कागदावरती फोटो काढणे कोणालाही शक्य होत नव्हते.

[ Kodak Camera ] Kodak चा शोध लागण्याची प्रक्रिया.

18 33 रोजी एक व्यक्ती इटलीतील कोमो तळ्या किनारी बसून कागदावर समोरील दृश्य रेखाटत होता. पण काही केल्याने त्याला ते दृश्य हुबेहूब रेखाटता येत नव्हते. समोर दिसणारे नयनरम्य दृश्य आपल्याला कागदावर हुबेहूब टिपता आले तर किती आनंद होईल ? हा विचार त्याच्या डोक्यात आला आणि त्यासाठी त्याने काम करायला सुरुवात केली. त्याच्या या प्रयत्नातूनच कॅमेरा आणि फोटोग्राफी चा जन्म झाला.

त्या व्यक्तीचे नाव होते विल्यम हेनरी फॉक्स टालबोट. 1844 रोजी त्याने ” द पेन्सिल ऑफ नेचर” नावाचं एक उत्कृष्ट फोटो प्रकाशित केला पण हा प्रकाशित केलेला फोटो पाहून लोकांचा त्याच्यावरती विश्वास बसेना झाला. शास्त्रावर प्रेम करणाऱ्या लोकांसाठी माझी ही भेट मी अर्पण करत आहे असे सांगून त्यांनी फोटो बनवण्याची प्रक्रिया लोकांना सांगितली पण त्याचे पेटंट बनवून पुढील 10 वर्षे ही प्रक्रिया कोणालाही वापरून दिली नाही.

[ Kodak Camera ]  फोटो काढणे शक्य झाले असले तरी फोटो बनवण्याची प्रक्रिया म्हणजेच फोटोग्राफी ही एक अवघड प्रक्रिया होती. फोटो बनवताना खूप साऱ्या कटकटींना सामोरे जावे लागत असत. रासायनिक प्रक्रियेसाठी तासनतास वेळ लागत असत कधीकधी दिवस ही जात. या सर्व प्रक्रिया एका झटक्यात झाल्या तर या कंटाळवाण्या प्रक्रियेपासून मुक्ती मिळेल असे बरेच जणांना वाटू लागले. या प्रक्रियेत आमूलाग्र बदल घडवून आणला तो म्हणजे जॉर्ज ईस्टमन याने. 1888 रोजी ‘ कोडॅक नंबर 1’ या कॅमेराने फोटोग्राफीमध्ये नवीन इतिहास रचला.

[ Kodak Camera ] ‘ कोडॅक नंबर 1’ या कॅमेराचे वर्णन सांगायचे झाले तर बॉक्स सारख्या दिसणाऱ्या या कॅमेराला एक भिंग फिक्स केलेले होते. याचा फायदा असा की 2 मीटर अंतरापर्यंत चे सर्व काही स्पष्ट विना फोकस करता दिसायचे. सेकंदाचा 1/25 वा भाग हा त्या कॅमेराच्या झडपेचा वेग होता. शिवाय कंटाळवाण्या रासायनिक प्रक्रिया ही या कॅमेरा मध्ये नव्हत्या. पूर्वीच्या प्रक्रियेत जेवढे श्रम लागत होते त्याच्या तुलनेत येथे शून्य श्रम लागत होते. 100 फोटोंसाठी पुरेसा असणारा रोल त्यामध्ये असायचा या सर्वांची किंमत ग्राहकांना फक्त 20 डॉलर्स इतकी द्यावी लागत होती.

ग्राहकांनी या प्रक्रियेनुसार 100 फोटो काढल्यानंतर हा कॅमेरा कोडॅक ला परत द्यावा लागत असे आणि सोबत आठ डॉलर्स द्यावे लागत असत त्यामध्ये 100 डेव्हलप केलेले फोटो आणि नवीन रोल बसवलेला कॅमेरा ग्राहकांना परत देत असत. या सोप्या झालेल्या प्रक्रियेमुळे कोडॅक कॅमेरा लोकांमध्ये प्रसिद्ध होत चालला. कंपनीने मोठ्या प्रमाणात त्याची जाहिरात करायला सुरुवात केली. ‘ तुम्ही फक्त बटन दाबा, उरलेलं सगळं आम्ही करू ‘ अशी घोषणाबाजी कंपनीने स्वतःच्या जाहिरातीमध्ये केली.

जॉर्ज ईस्टमन याने स्वतःला या कामांमध्ये झपाटून घेतल्यामुळेच त्याला हे यश मिळाले होते. या अगोदर तो आठवड्याला 15 डॉलर्स पगारा वरती एका बँकेत कारकून म्हणून काम करत होता. त्याचा जन्म हा रॉचेस्टर येथे 1854 रोजी झाला. वडील लवकर वारल्यामुळे कुटुंबाची सर्व जबाबदारी त्याच्यावर आली. त्याला लागलेले फोटोग्राफीचे वेड हे विलक्षण होते. फोटोग्राफी साध्या आणि सोप्या पद्धतीने बनवण्यासाठी त्याने खूप मेहनत घेतली. ही सोपी पद्धत शोधून काढण्यासाठी जॉर्ज याने सातत्याने तीन वर्ष मेहनत घेतली होती. त्याला मदत म्हणून 1000 डॉलर्स कर्नल स्ट्रॉंग या व्यक्तीने दिले होते. 1888 रोजी जॉर्ज याला त्याच्या कामामध्ये यश मिळाले आणि त्याने नवीन ” डिटेक्टिव्ह कॅमेरा” बाजारात आणला हा त्याचा नवीन कॅमेरा होता. ‘ शेरलॉक होम्स’ वरती आधारित त्याने या कॅमेरा चे नाव डिटेक्टिव्ह असे ठेवले होते .

Kodak Camera

[ Kodak Camera ] Kodak कॅमेराचा शोध लागल्यानंतर चे जग.

या कॅमेरा मध्ये जीत फिल्म वापरलेली होती ती कागदाची वापरली होती. हे फिल्म डेव्हलप करताना रासायनिक प्रक्रिया करावी लागे अगदी काळजीपूर्वक ही प्रक्रिया करावी लागायची. ही प्रक्रिया करताना काळजी न घेतल्याने बऱ्याच वेळेस हे फिल्म खराब ही होत असत. त्यामुळे एवढी मेहनत घेऊन सुद्धा प्रक्रिया अजून सुरळीत झाली नव्हती. पुढे अमेरिकेतील गुडविन या व्यक्तीने नवीन फिल्म काढली त्या फिल्म ने प्रक्रिया अजून सुधारली.

बऱ्याच वेळेस इस्टमन आणि गुडविन यांच्यात पेटंटच्या कारणावरून मारामारी सुद्धा झाल्या. पुढे गुडविन चा मृत्यू झाला त्याला आयुष्यभरात पैसा आणि ख्याती दोन्ही गोष्टी मिळाल्या नाहीत. गुडविन गेल्यानंतर ईस्ट म्हणला गुडविन च्या कंपनीला 50 लाख डॉलर्स द्यावे लागले. इंग्रजीतले K हे अक्षर आवडत असल्यामुळे आणि K हे अक्षर उच्चारायला सोपे असल्यामुळे त्याने आपल्या कंपनीचे नाव कोडॅक (KODAK ) ठेवले होते.[ Kodak Camera ] 

[ Kodak Camera ] पुढे ईस्टमन याने कंपनीची प्रगती साधण्यासाठी सुधारणे कडे लक्ष दिले. यापुढे त्याने स्वतःचे लक्ष टिकाऊ आणि स्वस्त कॅमेरे बनवण्याकडे दिले. त्याच्या याच निर्णयामुळे कंपनीची प्रगती होऊ लागली. 1896 रोजी ‘ बुल्स आय’ हे 12 डॉलर किमतीचं नवीन मॉडेल काढले. यानंतर ‘ घडी’ हे मॉडेल त्यांनी 1898 मध्ये सुरु केले. शेवटी एक डॉलर किमतीचा ‘ ब्राउनी’ हा कॅमेरा त्याने 1900 रोजी सुरू केला. या कॅमेराच्या जाहिरातीवर त्यांनी खूप जास्त भर दिला. 7.50 लाख डॉलर्स फक्त जाहिराती वरती त्याने खर्च केले. यानंतर कोडॅक कंपनी ही खूप मोठी कंपनी झाली. सिनेमासाठी आवश्यक असणाऱ्या फिल्म्स सुद्धा त्यांनी एडिसन सोबत बनवायला सुरू केल्या. यापुढे त्यांनी मिळालेल्या नफ्या मधून बऱ्याच संस्थांना मदत करायला सुरुवात केली. यापुढे फोटोग्राफी क्षेत्राचा खूप विकास झाला.

एमआयटी मध्ये अति गतिमान वस्तूंचे फोटो काढणारा कॅमेरा शोधला गेला. जर्मन कंपन्यांनीही चांगले कॅमेरे बनवायला सुरुवात केली. आणि बघता बघता तर जपानी कंपन्यांनी धंदाच गिळंकृत केला. एवढे सगळे असूनही ईस्ट म्हणजे साम्राज्य सगळ्यात मोठे ठरले. सर्वसाधारणपणे 1400 कोटी डॉलर्स इतकी विक्री त्याची 2000 रोजी झाली. त्यामध्ये त्याला 140 कोटी डॉलर्स इतका फायदा राहिला. अमेरिकेमध्ये 40000 लोक त्याच्यासाठी काम करत होते. तर जगभरात सुमारे 80 हजार लोक त्याच्यासाठी काम करत होते. एवढं सगळं पैसे मिळवून एवढे सगळे साम्राज्य उभा करून ईस्टमन हा आयुष्यात दुःखीच होता. तू आयुष्यात अविवाहित होता. आयुष्यात आता सर्व काही केले अजून काही करायची उरलेले नाही? असे म्हणून त्याने स्वतःला गोळी झाडून घेतली आणि आत्महत्या केली.

एखादा फोटो काढला की त्या कॅमेराला कॅप फोटो मधील किती बारकावे टिपता आले हे पाहण्यासाठी ” मेगापिक्सल” खूप महत्त्वाचे असते. आज-काल मेगापिक्सल वर चर्चा होताना आपल्याला दिसत असते. जेवढे जास्त बारकावे कॅमेरा ला टिपता येतील तेवढे जास्त मेगापिक्सल असे समजले जाते. 1986 मध्ये कोडॅक कंपनीच्या संशोधकांनी मेगापिक्सल असणाऱ्या या लेन्स चा शोध लावला.

कोडॅक कंपनीमुळे दरवर्षी 44.33 लाख पाउंड ची रसायने हवेमध्ये आणि पाण्यामध्ये सोडली जातात असे पर्यावरण तज्ञांचे म्हणणे आहे. पर्यावरणाला सगळ्यात जास्त धोका पोहोचवणाऱ्या कंपनी पैकी कोड्यात ही एक कंपनी होती. ‘ डर्टी डझन’ ही संकल्पना 2004 रोजी न्यूयॉर्कमधल्या लोकांनी प्रदूषण जास्त करणाऱ्या पहिल्या 12 कंपन्या वरती काढलेली होती. यामध्ये कोडॅक चा ही नंबर होता. त्याबद्दल कोडक कंपनीचा सत्कार घेण्यात आला होता.

[ Kodak Camera ] कोडॅक बद्दल सांगितली जाणारी आश्चर्य ही लक्ष विचलित करणारी आहेत. जसं की कोडॅक कंपनीने आतापर्यंत जेवढे फिल्म्स विकलेले आहेत तेवढ्यात पृथ्वीला 90 वेळा वेटोळे घालण्यात आला असत. आतापर्यंत जवळपास 9 कोटी लोकांनी कोडॅक च्या फिल्म वरती बनवलेले सिनेमा पाहिलेले आहेत.

[ Minoxidil 5 ] Minoxidil 5% खरोखर फायदेशीर आहे का ? नक्की काय फायदा होतो ?

Leave a Comment