[ Minoxidil 5 ] Minoxidil 5% खरोखर फायदेशीर आहे का ? नक्की काय फायदा होतो ?

[ Minoxidil 5 ]  Minoxidil म्हणजे काय असते ?

[ Minoxidil 5 ] Minoxidil हे औषध संपूर्ण जगभरात केस गळती थांबवण्यासाठी, टक्कल पडलेल्या किंवा केस गेलेल्या ठिकाणी नवीन केस आणण्यासाठी Minoxidil चा उपयोग केला जातो. जगभरात मिळणाऱ्या औषधांपैकी केस उगवण्यासाठी वापरण्यात येणारे Minoxidil हे वैज्ञानिक दृष्ट्या सिद्ध झालेले औषध आहे. Minoxidil चा उपयोग कसा करावा यासंदर्भात रुग्णांनी योग्य डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. पेशंटची अवस्था पाहून डॉक्टरांना द्वारे केस गळतीचे व्यवस्थित निदान केले जाते. त्यानंतरच पेशंटला मिनॉक्सीडील वापरण्याचा सल्ला दिला जातो. मीनाक्षी डील किती प्रमाणात लावायचे हे ठरवताना रुग्णाचे वजन, लिंग, मेडिकल हिस्टरी इत्यादी सर्व गोष्टी पहाव्या लागतात.

Minoxidil हे केस उगवण्यासाठी गुणकारी औषध असले तरीसुद्धा या औषधाचे काही साईड इफेक्ट सुद्धा आहेत. यामध्ये प्रामुख्याने चेहरा, कान, गळा या ठिकाणी खाज सुटणे, सूज येणे, डोक्यामध्ये पुरळ उठणे, डोळे जळजळ होणे, डोक्यामध्ये कोंडा होणे, केस गळू लागणे यांसारखे साइड इफेक्ट्स Minoxidil च्या वापरामुळे दिसू शकतात. पण हे साइड इफेक्ट्स दीर्घकाळासाठी नसतात काही काळानंतर उपचार बंद केल्यानंतर हे साइड इफेक्ट बंद होतात. Minoxidil चा उपयोग करत असताना जर साइड इफेक्ट्स खूप व्हायला लागले आणि त्यामुळे रुग्णाला जास्त त्रास व्हायला लागला तर लगेच Minoxidil चा वापर थांबवावा आणि डॉक्टरांशी संपर्क साधावा. गर्भवती महिलांनी आणि स्तनपान करणाऱ्या महिलांनी Minoxidil चा उपयोग करू नये.

[ Minoxidil 5 ] Minoxidil चे फायदे आणि उपयोग करण्याची पद्धत खालील प्रमाणे.

Minoxidil च्या वापरामुळे केस गळती कमी होते. त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी केस गळती जास्त झालेली आहे आणि टक्कल पडलेला आहे किंवा केस विरळ झालेले आहेत अशा ठिकाणी Minoxidil चा उपयोग केल्यानंतर केस पुन्हा उगवायला सुरुवात होतात. एलोपेशिया आजारामध्ये Minoxidil चा उपयोग केला जातो.

Minoxidil चा वापर कसा करायचा हे रुग्णांना डॉक्टरांच्या द्वारे सांगितले जाते. रुग्णांची केस किती प्रमाणात गेलेले आहेत. टक्कल किती पडलेला आहे. रुग्णाल ला इतर काही आजार आहेत का. ही सर्व परिस्थिती पाहून डॉक्टरांना द्वारे मी ऑक्साईड किती प्रमाणात वापरायचे याचा सल्ला दिला जातो. जर कोणाला केसा संबंधित समस्यां करिता Minoxidil चा उपयोग करायचा असेल. तर त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

सर्वसामान्यपणे डॉक्टरांकडून Minoxidil या द्रव स्वरूपात असणाऱ्या औषधातील 1ml ड्रॉपर च्या सहाय्याने किंवा स्प्रे च्या सहाय्याने ज्या भागातील केस विरळ झालेला आहे किंवा डोक्यातील ज्या भागांवर रुग्णाला केसाची वाढ आवश्यक आहे त्या भागावर ती लावावे. असे सकाळी 1ml आणि संध्याकाळी 1ml अशा स्वरूपात Minoxidil चा वापर सर्वसामान्यपणे केला जातो. Minoxidil डोक्याला लावताना डोके कोरडे असणे आवश्यक आहे. केसांच्या मुळापर्यंत हे औषध पोहोचणे आवश्यक आहे. सकाळी आंघोळ झाल्यानंतर केस कोरडे केल्यानंतर हे औषध लावावे आणि रात्री झोपण्यापूर्वी एकदा या औषधाचा उपयोग करावा.

[ Minoxidil 5 ] Minoxidil वापरताना घ्यायची काळजी खालील प्रमाणे.

 1. गर्भवती स्त्रियांनी जर Minoxidil चा उपयोग केला तर त्याचा दुष्परिणाम होऊ शकतो. त्यामुळे गर्भवती स्त्रियांनी Minoxidil चा उपयोग टाळावा. किंवा गरज असेल तेव्हा डॉक्टरांचा योग्य तो सल्ला घ्यावा आणि त्यानुसारच उपचार सुरू ठेवावेत.
 2. गर्भवती स्त्रियांप्रमाणेच स्तनपान करणाऱ्या स्त्रियांनी सुद्धा Minoxidil चा उपयोग करू नये. जर केला तर त्यांना दुष्परिणामांना सामोरे जावे लागेल. गरजेनुसार स्तनपान करणाऱ्या स्त्रियांनी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आणि त्यानुसार निर्णय घ्यावा.
 3. ज्या रुग्णांना किडनीचा आजार आहे असे रुग्ण कोणतेही औषधाचा उपयोग करताना खूप काळजीपूर्वक करत असतात. पण अशा रुग्णांकरिता Minoxidil मुळे कोणत्याही प्रकारचा तोटा होणार नाही. किंवा कोणताही दुष्परिणाम किडनी वरती होणार नाही. किडनीसाठी Minoxidil पूर्णपणे सुरक्षित आहे.
 4. मायग्रेन किंवा डोकेदुखीची समस्या असणाऱ्या रुग्णांनी Minoxidil चा उपयोग काळजीपूर्वक करावा. Minoxidil चा उपयोग करत असताना सुरुवातीच्या काळात मायग्रेन किंवा डोकेदुखीचा त्रास खूप व्हायला लागला तर लगेच वापर थांबवावा आणि डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आणि त्यानुसारच पुढील उपचार सुरू ठेवावेत.
 5. लिव्हर ची समस्या असणाऱ्या रुग्णां वरती Minoxidil चा काही दुष्परिणाम झालेला आहे अशा केसेस शक्यतो पाहायला मिळालेला नाही. तरीही रुग्णांनी जबाबदार पणे डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
 6. हृदया संदर्भात समस्या असणाऱ्या रुग्णांनी Minoxidil चा उपयोग केला तर कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही. हे वैज्ञानिक दृष्ट्या सिद्ध झालेले आहे. त्यामुळे हृदयासंबंधी आजार असणाऱ्या व्यक्तींनी त्याबद्दल शंका बाळगू नये.

[ Minoxidil 5 ] Minoxidil च्या वापरामुळे होणारे दुष्परिणाम खालील प्रमाणे.

Minoxidil चा वापरामुळे फायदा होत असला किंवा केसा संबंधित समस्यांपासून सुटका मिळत असेल. पण तरीसुद्धा याचे बरेच साइड इफेक्ट सुद्धा आहेत. त्यापैकी काही साईड इफेक्ट्स खालील प्रमाणे आहेत.

 • त्वचेवर खाज सुटणे
 • त्वचा कोरडी पडणे
 • त्वचेवर पांढरा लेयर तयार होणे.
 • त्वचा जळजळ करणे
 • वजन वाढणे
 • चेहऱ्यावर , हातावर आणि पायावर सूज येणे
 • श्वास घ्यायला त्रास होणे.
 • हृदयाचे ठोके वाढणे
 • छातीत दुखणे
 • चक्कर येणे
 • क्वचित बेशुद्ध पडणे
 • डोके दुखणे
 • उलटी येणे

[ Minoxidil 5 ] Minoxidil च्या वापरामुळे होणारे चांगले परिणाम खालील प्रमाणे.

Minoxidil 5

 • Minoxidil चा वापरामुळे केसांच्या खालील त्वचेमधील रक्त प्रवाह सुरळीत चालतो. यामुळे केसांना फायदा होतो.
 • Minoxidil चा वापरामुळे पोषक तत्वे केसांच्या मुळापर्यंत पोहोचतात. आणि केसांना पुरेपूर पोषण मिळते.
 • Minoxidil चा वापरामुळे विरळ असणारे केस घनदाट बनतात.
 • Minoxidil मुळे डोक्यावरील ज्या भागांमध्ये टक्कल पडलेला आहे अशा ठिकाणी नव्याने केस यायला सुरुवात होतात.
 • प्रदूषणामुळे किंवा इतर कॉस्मेटिक च्या वापरामुळे जे केस कमजोर झालेली आहेत कशा केसांना मजबूत करायचे काम Minoxidil करते.
 • मेल पॅटर्न आणि फीमेल पॅटर्न हेअर लॉस यामुळे गेलेल्या केसांना पुन्हा आणण्यासाठी Minoxidil चा उपयोग केला जातो. याच्या वापरामुळे विकास चक्र निर्माण होते. आणि केसांची वाढ होते.

[ Minoxidil 5 ] Minoxidil निवडताना घ्यावयाची काळजी खालील प्रमाणे.

 • Minoxidil विकत घेताना रुग्णांनी डॉक्टरांनी दिलेल्या कंपनीचेच विकत घ्यावे.
 • Minoxidil मेडिकल मधून विकत घेत असताना औषधाच्या बॉक्स वरील मॅन्युफॅक्चर तारीख आणि एक्सपायरी तारीख पाहून खात्री करूनच घ्यावे.
 • Minoxidil च्या बॉक्सवर जी किंमत दिलेली आहे त्या किमतीतच औषध विकत घेणे.
 • Minoxidil विकत घेताना त्यामध्ये कन्टेन्ट काय आहे हे पाहणे खूप गरजेचे आहे. Minoxidil मध्ये Minoxidil & Finasteride Topical Solution हा कन्टेन्ट असेल तरच Minoxidil विकत घ्यावे.
 • Minoxidil विकत घेताना केसांवरती लावण्यासाठी देण्यात आलेला ड्रॉपर किंवा स्प्रे व्यवस्थित काम करत आहे का नाही. हे पहावे आणि त्यानंतरच सदरील औषध खरेदी करावे.
 • Minoxidil खरेदी करताना सुरुवातीला एका महिन्यासाठी खरेदी करावे. एका महिन्यासाठी 60ml इतक्या कॉन्टिटी चे Minoxidil औषध खरेदी करावे.
 • Minoxidil खरेदी केल्यानंतर थंड, कोरड्या आणि सावलीमध्ये Minoxidil ची बाटली ठेवावी. फ्रिजमध्ये बाटली ठेवू नये. लहान मुलांपासून हे औषध दूर ठेवावे.
 • रजिस्टर डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय कोणत्याही मेडिकल व्यावसायिकाने रिटेलमध्ये Minoxidil ची विक्री करू नये.
 • Minoxidil हे औषध बाहेरील वापरासाठी आहे. कृपया कोणत्याही जखमेवरती किंवा ओरली या औषधाचा उपयोग करू नये. डोळ्यांमध्ये हे औषध जाऊ देऊ नये.

[ Minoxidil 5 ] Minoxidil वापरासंदर्भात काही टिप्स खालील प्रमाणे.

 • Minoxidil का उपयोग करण्यापूर्वी हा धुवावेत. Minoxidil चा उपयोग करून झाल्यानंतर हात स्वच्छ धुवावेत.
 • Minoxidil चा उपयोग थेट डोक्यावरील त्वचे वरती करावा. जर नाकामध्ये, डोळ्यामध्ये किंवा तोंडामध्ये जर Minoxidil गेले तर थंड पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यावे.
 • Minoxidil डोक्यावरती लावल्यानंतर चार तास डोक्याला इतर कोणतेही कॉस्मेटिक लावू नये. जसे की शाम्पूने डोके धुवू नये. डोक्याला तेल लावू नये. चार तासानंतर डोक्याला तुम्ही तेल लावू शकता. किंवा आंघोळ करताना पाण्याने धुऊ शकता.
 • Minoxidil च्या वापरामुळे सुरुवातीला पहिल्या आठवड्यात केस गळती होऊ शकते. हे एक चांगले लक्षण आहे याचा अर्थ असा होतो की Minoxidil काम करत आहे. सुरुवातीला कमकुवत असणारे केस निघून जातात आणि त्यांच्या जागेवर मजबूत केस उगवतात.
 • Minoxidil चा वापर करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवावी की Minoxidil चेहऱ्यावर जाऊ नये जर चेहऱ्यावर गेले तर चेहऱ्यावर अनावश्यक केस उगवू शकतात.
 • Minoxidil चा वापर अनावश्यक ठिकाणी केस उगवण्यासाठी करू नये. जर असे केले तर गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल.

[ Minoxidil 5 ] Minoxidil संदर्भात विचारले जाणारे काही प्रश्न खालील प्रमाणे.

 1. Minoxidil 5% च्या वापरामुळे केसांची वाढ होते का ?

उत्तर – जर तुम्हाला केसांची वाढ कायम पाहिजे असेल तर तुम्हाला Minoxidil 5% उपयोग दररोज करावा लागेल. जर तुम्ही याचा उपयोग बंद केला तर दोन-तीन महिन्यानंतर पुन्हा केस गळती सुरुवात होऊ शकते.

2. Minoxidil चा उपयोग सुरू केल्यापासून रिझल्ट किती दिवसात दिसतो ?

उत्तर – जर तुम्हाला Minoxidil 5 % चा रिझल्ट पाहायचा असेल तर तुम्हाला कमीत कमी चार महिने याचा उपयोग करावा लागेल. त्यानंतरच तुम्हाला याचा रिझल्ट दिसेल.

3. Minoxidil चा वापर करत असेल तर दररोज शाम्पू ने केस धोने आवश्यक आहे का ?

उत्तर – जर तुम्ही दररोज Minoxidil 5 % चा उपयोग करत असाल तर तुम्हाला दररोज शाम्पू ने केस धुणे आवश्यक नाही. फक्त Minoxidil 5% वापरण्यापूर्वी डोके कोरडे करावे.

4. Minoxidil 5% दिवसातून किती वेळा डोक्याला लावावे ?

उत्तर- Minoxidil 5% दिवसातून सकाळी एकदा आणि रात्री एकदा असे दोन वेळा डोक्याला लावण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जातो.

[ Shilajit Benefits ] शिलाजीत चे फायदे काय ?

 

Leave a Comment