[ Hershey Chocolate ] मिल्टन हर्षी आणि त्याचे कुटुंब
मिल्टन हर्षी आणि चॉकलेट्स…!
[ Hershey Chocolate ] काही लोकांच्या डोक्यात खूळ आणि ध्यास असतो तो त्यांना सोडतच नाही. अशी माणसं वाईट परिस्थितीत ही दुप्पट उमेदीने, आशेने काम करत असतात या माणसांना परिस्थिती आणि अपयश वाकवू शकत नाही. जगामध्ये जर अशी माणसं नसती तर जगात एवढी प्रगती होणे शक्य नव्हते. मिल्टन हर्षी हा असाच एक व्यक्ती होता. त्याचे वडील विविध प्रकारचे काम करायचे त्याचबरोबर फळ शेती ही करायची. त्याच्या वडिलांचे चित्रकलेवर प्रेम असल्यामुळे त्यांचे डोके कायम पुस्तकातच असत. लहानपणी त्यांच्या वडिलांनी खूप साऱ्या जागा बदलल्यामुळे मिल्टन हर्षला स्थैर्य असं काहीच मिळालं नाही.
एके दिवशी त्याचे वडील अचानक घर सोडून निघून गेले. वडिलांनी असे अचानक घर सोडल्यामुळे हर्षी पोरका झाला. मुलाला काय उत्तर द्यायचे म्हणून त्याच्या आईने त्याला वडील मेले असलेले सांगितले. काही काळ निघून गेल्यानंतर त्याला आपले वडील जिवंत आहेत समजले. त्यानंतर तो त्याच्या आई वरती खूप चिडला. या सगळ्या घटनांमुळे हर्षी चे शिक्षण मात्र फक्त चौथीपर्यंत होऊ शकलं. थोडे दिवस त्यांना एका प्रिंटिंग प्रेसमध्ये काम केलं. लहान मुलांच्या खायच्या गोळ्या आणि चॉकलेट्स बनवण्याचा नाद त्याला लागला. अमेरिकेत अशा गोळ्या कँडी म्हणून प्रसिद्ध होत्या. अशा गोळ्या बनवण्याचा व्यवसाय करण्याची तो स्वप्न पाहू लागला. त्याने फिलाडेल्फिया येथे 4 जुलै 1876 रोजी गोळ्या बनवण्याचे काम सुरू केले. बनवलेल्या गोळ्या त्याने विकल्या सुद्धा. गोळ्यांमध्ये चिकटपणा येण्यासाठी तो पॅराफिन आणि कॅरामिला त्यामध्ये मिक्स करत होता.
[ Hershey Chocolate ] चॉकलेट बनवण्याच्या व्यवसायाची सुरुवात.
गोळ्या बनवण्याची प्रक्रिया आपल्याला वाटते तितकी सोपी नाही. यामध्ये कॅरॅमल नावाचा चिकट पदार्थ ढवळत बसावं लागतं त्यामध्ये पाठ आणि शरीर दुखायला लागतं. सतत असे काम करत राहिल्यामुळे त्याचे शरीर फार क्षिन झाले होते. बरीच वर्षे त्याने हे काम केले होते. कढईमध्ये साखर सतत वितळल्यामुळे त्याचे चटके हर्षी च्या हाताला भाजत होते त्यामुळे त्याचा एक हात विचित्र आणि ओबडधोबड झाला होता. एवढे सगळे हाल अपेष्टा सहन करून सुद्धा त्याच्या हाती काहीच लागत नव्हते. त्यामुळे त्याने हा व्यवसाय बंद करण्याचा निर्णय घेतला. परंतु आई , मावशी आणि परत भेटलेले वडील यांच्या मदतीने त्याने हा व्यवसाय सहा वर्षे चालवला तरीही त्याच्या हाती काहीच न लागल्यामुळे शेवटी त्याने हा व्यवसाय बंद केला.
आपल्या मुलाने नवीन काहीतरी व्यवसाय शिकावा म्हणून त्याच्या वडिलांनी त्याला कोलोरॅडो या ठिकाणी बोलवले. तिथे त्या ठिकाणी चांदीचा शोध लागला होता. जमिनी पासून काही अंतरावरच खाली चांदी मिळत असे. सुरुवातीला जमीन पोखरून त्यांनी काही चांदी मिळवली. पण काही काळाने त्यातही अपयश आले. त्याकाळी अशा चांदीच्या खाणींमधून चांदी काढण्यासाठी गुलामांची मोठ्या प्रमाणात तस्करी होऊ लागली. तरुण मुलांना जबरदस्तीने गुलाम बनवले जाईल आणि एकदा कामावर लावले की मरेपर्यंत सुटका नाही. आणि तेथून पळून जाणाऱ्या ला पहिल्यांदा ठार केले जाईल. एकदा हर्षी ला सुद्धा आशा टोळक्यांनी पकडून नेण्याचा प्रयत्न केला होता कसाबसा तो त्यांच्या तावडीतून सुटला. आणि इथून पुढे खाणकाम करायचं नाही असा त्याने निश्चय केला. व आपला जुनाच गोळ्या बनवण्याचा व्यवसाय त्याने सुरू करण्याचे ठरवले.
दुधापासून गोळ्या बनवल्यानंतर त्यास अतिशय स्वादिष्ट लागतात आणि त्यांचा दर्जाही सुधारतो असे हर्षी ला कोलोरॅडो येथे असताना समजले. यापुढे त्याने गोळ्या बनवताना दुधाचा वापर करायचं ठरवलं दुधापासून तयार झालेल्या गोळ्या त्याने ठीक ठिकाणी जाऊन विकायला सुरुवात केली. पण प्रत्येक ठिकाणी त्याला अपयश आलं. प्रत्येक वेळेस तो नवीन नवीन ठिकाणी जाऊन या गोळ्या विकण्याचा प्रयत्न करत असे. अशा पद्धतीने तो न्यू जर्सी, मॉरिस टाऊन, न्यूयॉर्क आणि विविध भागात जाऊन विक्री करू लागला सगळ्यांनी त्याला वेड्यात काढलं आणि त्याला याचा नाद सोडायला भाग पाडलं.
एके दिवशी एका ब्रिटिश व्यापाऱ्याने त्याच्या या गोळ्या चाखल्या. त्या ब्रिटिश व्यापाऱ्याला गोळ्यांची चव आवडली आणि त्यानं हर्षी ला 500 डॉलरची ऑर्डर दिली. या गोळ्या तो इंग्लंडमध्ये वाटणार होता. या घटनेनंतर त्याचा आत्मविश्वास अधिकच वाढला त्याने आपल्या गोळ्या इंग्लंडमध्ये विकायला सुरुवात केल्या. हळूहळू त्याला ऑर्डर्स वाढू लागल्या आणि पैसेही राहू लागले. पुढे हर्षी चॉकलेट हे एक ब्रँड बनू लागले. स्वतःला राहण्याकरता त्याने एक राजवाड्या सारखं घर बांधलं. संपूर्ण जगभर प्रवास सुद्धा केला.
[ Hershey Chocolate ] मिल्टन हर्षी याची शिकागो येथील मेळाव्याला भेट.
हर्षी ने एकदा शिकागो येथे भरलेल्या औद्योगिक मेळाव्याला 1893 रोजी उपस्थित राहिला होता. त्या औद्योगिक मेळाव्यात चॉकलेट बनवण्याचे एक जर्मन यंत्र ठेवलेलं होतं. ते यंत्र पाहून हर्षी ला ते विकत घेण्याची इच्छा मनात झाली. त्याने त्याच्या मेव्हण्याला तेथेच बोलून दाखवले की ” मी आता चॉकलेट बनवण्याच्या धंद्यात पडणार आहे…!” त्याचा मेव्हणा हा आश्चर्यचकित झाला. कारण तो आत्ताच या व्यवसायात थोडाफार स्थिरावला होता. आणि लगेच नंतर चॉकलेट तयार करायचे व्यवसायात पडणे हे अवघड ठरू शकत होतं. पण हर्षी हा आव्हाने पेलणारा होता.
आपले सगळे पण पणाला लावून त्याने चॉकलेट निर्मितीचे यंत्र तेथून विकत घेतलं. त्याच्या गोळ्यांच्या कारखान्यात त्याने ते यंत्र ठेवले आणि त्या यंत्रावर त्याचे प्रयोग चालू झाले. चॉकलेट बनवण्याची प्रक्रिया हिताची फार अवघड नव्हती. कोको नावाच्या झाडापासून मिळणाऱ्या बिया च्या पावडर बनवून त्या पावडर पासून चॉकलेट बनवणे ही प्रक्रिया आत्मसात करणे सोपे नव्हते. स्विस केमिस्ट हेनरी नेसले या व्यक्तीने पहिल्यांदा चॉकलेट बनवले होते. चॉकलेट बनवण्याची प्रक्रिया त्याने सर्वांपासून लपवून ठेवली होती.
चॉकलेट बनवण्याचा कारखाना तयार करण्यासाठी हर्षी ला मोठ्या भांडवलाची गरज होती. ते भांडवल गोळा करण्यासाठी त्याने स्वतःचा कारखाना 10 लाख डॉलर्स इतक्या किमतीला विकला. त्याने स्वतः कष्ट करून चॉकलेट बनवण्याचे तंत्र शोधून काढले. अमेरिकेतील पेन्सिलवेनिया या ठिकाणी त्याने चॉकलेट बनवण्याचा कारखाना उभा केला. चॉकलेट बनवण्यासाठी गरजेची असणारे कोको, दूध आणि कामगार त्याला या ठिकाणी मिळाले.
त्यावेळेस फक्त तेथे तीन ते चार प्रकारचे चॉकलेट तयार होत होती. कालांतराने 114 विविध प्रकारची चॉकलेट्स त्या ठिकाणी बनायला सुरू झाली. हर्षी चा चॉकलेट बार हा पुढे जगप्रसिद्ध झाला. या बारस मुळे कंपनी मोठ्या प्रमाणात उभारली. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात अमेरिकन राष्ट्राने फक्त जीवनावश्यक वस्तूंचे उत्पादन करणाऱ्या व्यवसायाचे कारखाने सुरू ठेवले. आणि इतरत्र सर्व कारखाने बंद करून टाकले त्यामध्ये हर्षी चा चॉकलेट निर्मितीचा कारखाना होता.
कारखाना बंद झाल्यानंतर परत सुरू करण्यासाठी हर्षी धडपड करायला सुरुवात केली. त्याने अमेरिकन काँग्रेसला आपण बनवत असलेला चॉकलेटचा बार लोकांच्या आरोग्यासाठी कसा चांगला आहे हे पटवून देण्याचा प्रयत्न केला. आणि अमेरिकन सरकारला ते पटले सुद्धा त्यांनी हर्षी चा चॉकलेटचा कारखाना परत सुरू करण्याचे आदेश दिले. महायुद्धाच्या काळात सैनिकांना अन्न मिळत नसे त्यावेळी त्यांना शरीरात ऊर्जा टिकून ठेवण्यासाठी हर्षी चे बार अमेरिकन सरकारने दिले. हे बार 120° तापमानात सुद्धा टिकून राहत असत. या बारची चव सैनिकांना फारशी आवडली नव्हती तरीपण उकडलेल्या बटाट्या पेक्षा हे अन्न खाल्लेले कधीही चांगले त्यामुळे त्यांनी बारला पसंती दिली. त्याकाळी कंपनीने सैनिकांसाठी कोट्यावधी बार बनवले. चक्क अंतराळवीरांना ही चंद्रावरील मोहिमेसाठी हर्षी चे चॉकलेट बार देण्यात आले होते.
[ Hershey Chocolate ] मिल्टन हर्षी यांनी आज पर्यंत बनवलेले चॉकलेट्स.
[ Hershey Chocolate ] हर्षी ने नंतर ‘ किसेस’ नावाचं चॉकलेट तयार केलं तयार झालेले चॉकलेट कन्व्हेअर बेल्ट वर आल्यानंतर एक विशिष्ट आवाज करत असत त्यामुळे या चॉकलेट चे नाव किसेस ठेवले असावे. पण या चॉकलेट च नाव कसं ठेवलं हे कोणालाच माहीत नव्हतं. तेथे काम करणाऱ्या कामगारांनाही माहीत नव्हतं. एका दिवसात सुमारे 8 कोटी ‘ किसेस’ हे चॉकलेट तयार होतं. याच्या लोकप्रियतेमुळे याचे उत्पन्नही अवाढव्य घ्यावं लागतं.
हॅरी रिझ हा हर्षी कडे काम करणारा कामगार होता. पण हर्षाचे काम सोडून त्याने स्वतःचा कारखाना सुरू केला. त्या कारखान्यात तो एक विशिष्ट प्रकारचे चॉकलेट बनवत होता. त्या चॉकलेटच्या वरती दुधापासून तयार झालेल्या चॉकलेटचे आवरण होते तर आत मध्ये पीनट बटर होते. पुढे हॅरी चा मृत्यू झाला.
आणि त्याच्या मुलांनी त्याचा कारखाना परत हर्षी ला विकला. आज पर्यंत त्या प्रकारची चॉकलेट मार्केट मध्ये खूप मोठ्या प्रमाणात खपत आहेत. आज चॉकलेट क्षेत्रात मिल्टन हर्षी ची कंपनी खूपच मोठी आहे. तिची विक्री दरवर्षी 422 कोटी डॉलर्स इतकी होती. त्याकाळी त्याच्याकडे जगभरातील 15700 कर्मचारी काम करत होते. आणि जगाच्या 90 देशात कंपनीचे साम्राज्य विस्तारलेले होते.
[ Hershey Chocolate ] मिल्टन हर्षी यांचे खाजगी आयुष्य.
आतापर्यंत आपण हर्षी व्यावसायिक आयुष्य कसं होतं ते आपण पाहिलं पण त्याच्या खाजगी आयुष्यात काय चालले होते ते पण एक गमतीशीर होते. वयाची चाळीस वर्षे उलटून गेली तरी हर्षी ने लग्न केले नव्हते. एके दिवशी त्याने आयरिश मुलीशी लग्न करून सगळ्यांना गप्प केले. हर्षाच्या या निर्णयामुळे सगळेजण आश्चर्यचकित होते. या दोघांना पुढे एकही मूलबाळ झालं नाही. काही वर्षे आनंदात गेल्यानंतर त्याच्या पत्नीला संधिवाताचा त्रास होऊ लागला. आणि हा त्रासच वाढून वाढून एके दिवशी तिचा मृत्यू झाला. त्याच्या कुटुंबात आता फक्त आई राहिलेली होती. त्याची आई शेवटपर्यंत कारखान्यांमध्ये कागद गोळा करण्याचे काम करत होते.
दिलदार मनाचा असणाऱ्या हर्षी ने फक्त स्वतःकडेच लक्ष दिले नाही. तर आपल्या कारखान्यात कामाला असणाऱ्या कामगारांसाठी शहर वसवले होते. त्या शहरांमध्ये सर्व काही होतं दवाखाने, घरे, शाळा, महाविद्यालय, दुकाने, इत्यादी सोयी होत्या. हर्षी चा दरारा खूप होता. त्यामुळे तो शहरात फेरफटका मारत असताना कोणाचाही घर अस्ताव्यस्त दिसत नसत. कोणीही दारूच्या नशेत दिसत नसत.