MCGM Bharti 2024 | बृहन्मुंबई महानगरपालिका येथे भरती

MCGM Bharti 2024 | बृहन्मुंबई महानगरपालिका येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्याद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. 17 मे 2024 ही सदरील भरती करिता ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. अनुज्ञापन निरीक्षक या पदासाठी रिक्त जागा भरण्यासाठी सदरील भरती होणार आहे. या भरती करिता उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यापूर्वी बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्याद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात वाचावी. बृहन्मुंबई महानगरपालिका येथील भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खालील माहिती वाचावी.

MCGM Bharti 2024

  • बृहन्मुंबई महानगरपालिकेची सदरील भरती 118 जागांसाठी होणार आहे.
  • बृहन्मुंबई महानगरपालिका येथील भरती अनुज्ञापन निरीक्षक या पदासाठी होणार आहे.

MCGM Bharti 2024 | बृहन्मुंबई महानगरपालिका येथील भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि वयाची अट खालील प्रमाणे.

  • अनुज्ञापन निरीक्षक या पदासाठी उमेदवार मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवी उत्तीर्ण असला पाहिजे.
  • सदरील भरती करिता अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 38 वर्षापर्यंत असावे. यामध्ये मागासवर्गीय उमेदवाराचे वय 43 वर्षापर्यंत असावेत.
  • सदरील भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना 29,200 रुपये ते 92,300 रुपये एवढा पगार दर महा राहील.
  • बृहन्मुंबई महानगरपालिका येथील भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण मुंबई असेल.
  • बृहन्मुंबई महानगरपालिका येथील भरती साठी प्रवेश शुल्क 1000 रुपये आहे. तर मागासवर्गीय उमेदवारांसाठी परीक्षा शुल्क 900 रुपये आहे.
  • सदरील भरती करिता पात्र असलेल्या उमेदवारांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळावरून भरतीसाठी अर्ज करायचा आहे.
  • 17 मे 2024 ही बृहन्मुंबई महानगरपालिके द्वारे अर्ज भरण्याकरिता देण्यात आलेली शेवटची तारीख आहे.
  • बृहन्मुंबई महानगरपालिके द्वारे प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवाराने ऑनलाइन अर्ज भरण्यापूर्वी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
  • सदरील भरती करिता ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्याकडून ऑनलाइन पोर्टल देण्यात आलेला आहे त्याद्वारे उमेदवारांनी अर्ज भरावा.

MCGM Bharti 2024 | बृहन्मुंबई महानगरपालिका येथील भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी खालील सूचना वाचाव्यात.

  • बृहन्मुंबई महानगरपालिका येथील भरतीसाठी उमेदवाराने ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • बृहन्मुंबई महानगरपालिका येथे ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याची कोणतीही पद्धत राबवलेली नाही.
  • सदरील भरती करिता अर्ज करणाऱ्या उमेदवाराने ऑनलाइन पद्धतीने अर्ज करत असताना संपूर्ण अर्ज काळजीपूर्वक भरायचा आहे. जर यामध्ये कोणत्याही प्रकारची चूक झाली आणि त्यामुळे उमेदवाराचा अर्ज बाद करण्यात आला तर त्याला बृहन्मुंबई महानगरपालिका जबाबदार राहणार नाही.
  • बृहन्मुंबई महानगरपालिका येथील होणाऱ्या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकरिता ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 मे 2024 ही आहे.
  • बृहन्मुंबई महानगरपालिका येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी प्रसिद्ध केलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि त्यानंतर अर्ज करावा.

MCGM Bharti 2024 | बृहन्मुंबई महानगरपालिका येथील भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांकरिता सूचना खालील प्रमाणे.

  • सदरील भरती मध्ये ज्या उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज केलेला आहे आशा उमेदवारांमधून बृहन्मुंबई महानगरपालिका येथील पदासाठी उमेदवारांची नियुक्ती केली जाईल.
  • बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्याकडून उमेदवाराला कोणत्याही प्रकारचा TA/DA देण्यात येणार नाही. याची सर्व उमेदवारांनी दक्षता घ्यावी.
  • सदरील भरती मध्ये परीक्षा केंद्रावर अनुचित प्रकार करणाऱ्या उमेदवारावर बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्याद्वारे कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
  • सदरील भरती करिता परीक्षा केंद्र ठरवण्याचा पूर्णपणे अधिकार बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्याकडे राहणार आहे. त्यामुळे या प्रक्रियेमध्ये कोणी सुद्धा हस्तक्षेप करू नये.
  • बृहन्मुंबई महानगरपालिका येथे होणाऱ्या परीक्षा करिता योग्य अभ्यासक्रम आणि त्यासंदर्भातील अधिक माहिती संस्थेच्या संकेतस्थळावर दिलेली आहे उमेदवाराने ती माहिती काळजीपूर्वक वाचावी.
MCGM Bharti 2024 | बृहन्मुंबई महानगरपालिका येथील भरती संदर्भात अधिक माहिती खालील प्रमाणे.
  • माननीय आयुक्त, बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्याकडे वरील भरती संदर्भात संपूर्ण अधिकार आहेत. सदरील भरती कोणत्याही टप्प्यात थांबवण्याचे किंवा सदरील भरती पुढे ढकलण्याचे पूर्णपणे अधिकार आयुक्त यांच्याकडे आहेत.
  • बृहन्मुंबई महानगरपालिका येथील भरती [MCGM Bharti 2024]  मध्ये पदांची संख्या कमी जास्त करण्याचा अधिकार पूर्ण पुणे आयुक्त, बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्याकडे आहे. त्याचप्रमाणे सदरील भरती रद्द करण्याचा अधिकार सुद्धा त्यांच्याकडे आहे.
  • बृहन्मुंबई महानगरपालिका येथील भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांपैकी कोणत्याही उमेदवाराकडून सदरील पदाची शैक्षणिक पात्रता पूर्ण झालेली नसल्यास त्या उमेदवाराची उमेदवारी कोणत्याही टप्प्यात रद्द करण्यात येईल. उमेदवारी रद्द केल्यानंतर त्याला कोणत्याही पद्धतीने याबद्दल माहिती दिली जाणार नाही.
  • महाराष्ट्रातील मागासवर्गीय उमेदवारांना सदरील भरती करिता आरक्षणाचा फायदा मिळेल. पण महाराष्ट्र बाहेरून महाराष्ट्रामध्ये स्थावर झालेल्या उमेदवारांना मागासवर्गीय आरक्षणाचा कोणताही फायदा मिळणार नाही.
  • भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारा सोबत संपर्क ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर द्वारे करण्यात येईल. त्यामुळे उमेदवाराने आपला ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर स्पष्टपणे लिहावा. त्याचप्रमाणे उमेदवाराने स्वतःचा चालू ई-मेल आयडी आणि मोबाईल नंबर लिहावा.
  • उमेदवाराने जन्माचा दाखला, शालांत परीक्षा उत्तीर्ण गुणपत्रक व प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, पदवी परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल प्रमाणपत्र ( सर्व सेमिस्टर चे ), एमएससीआयटी प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र या सर्व कागदपत्रे संबंधित अधिकाऱ्यांकडून सही करून घेऊन कागदपत्रे पडताळणीसाठी नियुक्तीच्या अगोदर आणायचे आहेत.
  • लग्न झालेल्या महिलांनी लग्नानंतर बदललेल्या नावानुसार अर्ज करायचा असेल तर नावात बदल केलेल्याचे राजपत्र सादर करावे. राजपत्रात नसेल तर लग्नापूर्वी असणाऱ्या नावानुसार महिला अर्ज करू शकतात. कागदपत्र पडताळणी च्या वेळेस राजपत्र सादर करणे आवश्यक आहे.
  • भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांपैकी अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती हे उमेदवार सोडून इतर मागासवर्गीय उमेदवार किंवा ईडब्ल्यूएस उमेदवार यांनी नॉन क्रिमिलियर दाखला अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.
  • निवड झालेल्या उमेदवाराकडे नियुक्तीच्या वेळेस नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे. जर नसेल तर त्या उमेदवाराला पदावर नियुक्त करता येणार नाही.
  • महिला समांतर आरक्षणामध्ये खुल्या वर्गामध्ये महिलांसाठी जे आरक्षण आहे त्या जागांवर गुणवत्तेच्या आधारावर महिला उमेदवाराची नेमणूक केली असल्यावर. त्या महिला उमेदवाराकडे नॉन क्रिमिलियर दाखला असण्याची अट शासनाद्वारे रद्द करण्यात आलेली आहे.
  • एसईबीसी म्हणजे च सामाजिक शैक्षणिक दृष्ट्या मागास असणाऱ्या वर्गातील उमेदवाराची निवड शासनाच्या निर्देशानुसार नियुक्ती केली जाईल.
  • सदरील भरती करिता निवड झालेल्या उमेदवाराने पदावर नियुक्त होण्यापूर्वी सहा महिने अगोदर आपल्या जात प्रमाणपत्राची पडताळणी संबंधित अधिकार्‍याकडून करून घेणे गरजेचे आहे. या पडताळणी मध्ये संबंधित अधिकाऱ्यांकडून जात पडताळणी प्रमाणपत्र अवैध ठरवले तर उमेदवाराला पदावरून खाली करण्यात येईल. किंवा सदरील उमेदवाराला पदावर नियुक्ती देण्यात येणार नाही.
  • सदरील भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांमधून पदावर निवड झालेल्या उमेदवारा वरती कोणत्याही प्रकारची फौजदारी केस किंवा गुन्हा नसला पाहिजे. कोणत्याही माजी कर्मचारी या विरोधात लाचलुचपत विभागाची कारवाई झाली नाही पाहिजे. उमेदवारावर आतापर्यंत कसल्याही प्रकारची चौकशी झाली नाही पाहिजे.
  • सदरील भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवाराचा कार्यकाळ दोन वर्षे किंवा नवीन पदांची भरती निघेपर्यंत या दोन्हीपैकी कोणता कार्यकाळ कमी वेळेत आहे त्या वेळेपर्यंत सदरील भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांची नोकरी राहील.
  • सदरील भरती करिता जी शैक्षणिक पात्रता जाहीर करण्यात आलेली आहे. त्या शैक्षणिक पात्रतेचा उमेदवार जर मिळाला नाही तर सदरील भरतीची पात्रता कमी करण्यात येईल.
  • अनुज्ञापन निरीक्षक या पदासाठी उमेदवाराची नेमणूक तीन वर्षासाठी केली जाईल. त्यानंतर उमेदवाराचे सदरील पदावरील काम, त्याची गुणवत्ता पहिली जाईल जर सदरील बाबी असमाधानकारक असतील तर उमेदवाराला कोणतीही पूर्वसूचना न देता त्याला पदावरून कमी करण्यात येईल.
  • अनुज्ञापन निरीक्षक या पदासाठी उमेदवाराची मल्टिपल चॉइस क्वेश्चन नुसार चाचणी घेण्यात येईल. त्या चाचणीत उमेदवाराला मिळालेल्या गुणांनुसार त्याची गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल. गुणवत्ता यादी तयार करताना सामाजिक आणि समांतर आरक्षणाचा उपयोग केला जाईल.
  • पदावर नियुक्त झालेल्या उमेदवाराला त्याची सर्व कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे पडताळणीसाठी कार्यालयात जमा करणे आवश्यक आहे. जर उमेदवाराने पडताळणी साठी कागदपत्र आणि प्रमाणपत्र जमान नाही केल्यास त्या उमेदवाराची नियुक्ती थांबवण्यात येईल.
  • सदरील पदासाठी ऑनलाइन एमसीक्यू चाचणी घेण्यात येणार आहे. या चाचणीची तारीख कोणत्याही कारणास्तव बदलण्यात आली तर बदललेली तारीख बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल.
  • सदरील भरतीची प्रक्रिया उमेदवाराला ऑनलाइन बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली जाईल. त्यामुळे उमेदवाराने वारंवार सदरील भरतीची प्रक्रिया पाहण्यासाठी संकेतस्थळाला भेट द्यावी. नियुक्तीनंतर कोणत्याही उमेदवाराने कोणत्याही कारणास्तव सदरील पदाचा राजीनामा दिला. तर त्या जागेवर दुसऱ्या उमेदवाराची फेर नियुक्ती करण्यात येईल.
  • मागासवर्गीय आरक्षणा मधून पदावर निवड झालेल्या उमेदवाराला पदावर नियुक्त झाल्यापासून सहा महिन्याच्या आत मध्ये स्वतःचे जात पडताळणी प्रमाणपत्र जमा करणे आवश्यक आहे. जर उमेदवार जात पडताळणी प्रमाणपत्र जमा करण्यास अयशस्वी ठरला तर त्याला पदावरून रद्द करण्यात येईल.
  • सदरील पदावर माझी कर्मचाऱ्यांपैकी एका कर्मचाऱ्यांची निवड झाली तर त्या कर्मचाऱ्याला या आधी आरक्षणाचा लाभ घेतला असेल तर त्याला जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे गरजेचे राहणार आहे.
  • बृहन्मुंबई महानगरपालिका येथील भरती संदर्भातील कोणताही निर्णय माननीय आयुक्त यांनी घेतल्यानंतर तो सर्व उमेदवारांकरिता बंधनकारक राहील. या निर्णयाला प्रतिउत्तर पत्राद्वारे कोणत्याही उमेदवाराने देऊ नये कारण अशा प्रतिउत्तर कडे लक्ष देण्यात येणार नाही.
  • ऑनलाइन परीक्षेसाठी दिलेल्या केंद्रावर क्षमता जास्त असल्यास अधिक उमेदवारांची चाचणी त्या ठिकाणी घेण्यात येईल. जर एखाद्या केंद्रावर क्षमता कमी असल्यास तेथील उमेदवारांना दुसऱ्या परीक्षा केंद्रावर पाठवण्यात येईल.
  • सदरील भरती मध्ये भाग घेणाऱ्या कोणत्याही उमेदवारा द्वारे चुकीची माहिती देण्यात आली किंवा भरतीच्या नियमांचे उल्लंघन करण्यात आले तर त्या उमेदवाराला कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरविण्यात येईल. त्याचप्रमाणे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या इतर कोणत्याही भरतीसाठी तो उमेदवार पात्र ठरणार नाही.

[MCGM Bharti 2024] महाराष्ट्र राज्यातील सर्व नगरपालिका, महानगरपालिका यांच्यातील रिक्त पदांसाठी निघालेल्या भरतीची संपूर्ण माहिती मिळवण्यासाठी उमेदवारांनी आमच्या नोकरी फस्ट या वेबसाईटला भेट द्या. भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a Comment