Railway Protection Force Bharti 2024 | रेल्वे संरक्षण दल येथे भरती.

Railway Protection Force Bharti 2024 | रेल्वे संरक्षण दल येथे विविध पदांसाठी भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात रेल्वे संरक्षण दल यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदरील भरती करिता ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 मे 2024 ही आहे. उपनिरीक्षक आणि हवालदार या पदासाठी सदरील भरती होणार आहे. तरी पात्रता धारक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यापूर्वी रेल्वे संरक्षण दल यांच्याद्वारे प्रसिद्ध केलेली काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. सदरील भरती करिता इच्छुक उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी.

Railway Protection Force Bharti 2024

 • रेल्वे संरक्षण दल येथील भरती 4660 जागांसाठी होणार आहे.
 • रेल्वे संरक्षण दल येथील भरती मध्ये उपनिरीक्षक आणि हवालदार या पदासाठी भरती होणार आहे.

Railway Protection Force Bharti 2024 | रेल्वे संरक्षण दल येथील रिक्त पदांसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि वयाची अट खालील प्रमाणे.

 • उपनिरीक्षक या पदासाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर पदवी मिळवणे आवश्यक आहे.
 • हवालदार या पदासाठी उमेदवार भारत सरकारच्या मान्यताप्राप्त बोर्डा मधून दहावीची परीक्षा उत्तीर्ण झालेला पाहिजे.
 • उपनिरीक्षक या पदासाठी उमेदवाराचे वय 20 ते 28 वर्ष आवश्यक आहे. त्याचप्रमाणे हवालदार या पदासाठी उमेदवाराचे वय 18 ते 28 वर्ष आवश्यक आहे.
 • रेल्वे संरक्षण दल अंतर्गत भरण्यात येणाऱ्या 4660 जागांवरती निवड झालेल्या उमेदवारांना 21,700 रुपये ते 35,400 रुपये मासिक वेतन असेल.
 • रेल्वे संरक्षण दल अंतर्गत भरण्यात येणाऱ्या पदांसाठी सर्व उमेदवारांना नोकरीचे ठिकाण हे संपूर्ण भारत असेल.
 • सदरील भरती करिता परीक्षा शुल्क ₹500 रेल्वे संरक्षण दल यांच्याकडून आकारण्यात येणार आहे. एससी / एसटी / महिला / माझी कर्मचारी / ईबीसी यांच्याकरिता प्रवेश शुल्क 250 रुपये असेल.
 • सदरील भरती करिता उमेदवारांनी 15 एप्रिल 2024 पासून ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.
 • 14 मे 2024 ही तारीख रेल्वे संरक्षण दल यांच्याकडून अर्ज करण्याची अंतिम तारीख देण्यात आलेली आहे.
 • सदरील भरती करिता इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यापूर्वी रेल्वेद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
 • सदरील भरती मध्ये ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याकरिता रेल्वे संरक्षण दल यांच्याद्वारे देण्यात आलेल्या ऑनलाइन पोर्टल द्वारे उमेदवारांनी अर्ज करावेत.

Railway Protection Force Bharti 2024 | रेल्वे संरक्षण दल येथील भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खालील नियम वाचा.

 • रेल्वे संरक्षण दल येथील भरती करिता उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
 • सदरील भरती करिता ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याची कोणतीही पद्धत रेल्वे संरक्षण दल यांच्याकडून राबविण्यात आलेली नाही त्यामुळे उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू नये.
 • सदरील भरती करिता अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज भरताना स्वतःबद्दलची संपूर्ण माहिती काळजीपूर्वक भरावी. विकल्प निवडताना काळजीपूर्वक निवडावेत. जर अर्ज भरत असताना उमेदवाराकडून कोणत्याही पद्धतीची चूक झाली तर सदरील उमेदवाराचा अर्ज बाद करण्यात येईल.
 • 14 मे 2024 ही संस्थेद्वारे देण्यात आलेली अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
 • रेल्वे संरक्षण दल पदासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

Railway Protection Force Bharti 2024 | रेल्वे संरक्षण दल येथील भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांनी खालील सूचना वाचाव्यात.

 • रेल्वे संरक्षण दल यांच्या ऑनलाइन प्रणाली द्वारे ज्या उमेदवारांनी अर्ज केलेले आहेत आशा उमेदवारांमधून योग्य उमेदवाराची निवड करण्यात येईल.
 • रेल्वे संरक्षण दल यांच्याकडून भरतीसाठी अर्ज केलेल्या कोणत्याही उमेदवाराला TA/DA देण्यात येणार नाही. अर्ज केलेल्या सर्व उमेदवारांनी लक्षात घ्यावे.
 • सदरील भरती मध्ये कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार उमेदवाराने केला तर त्या उमेदवारावर रेल्वे संरक्षण दल यांच्याकडून कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
 • रेल्वे संरक्षण दल येथील भरतीचे परीक्षा स्थळ रेल्वे संरक्षण दलाकडून ठरविण्यात येईल त्यामुळे उमेदवाराने दिलेल्या वेळेत परीक्षा स्थळावर उपस्थित राहणे आवश्यक आहे.
 • सदरील भरती करिता आवश्यक माहिती आणि अभ्यासक्रम रेल्वे संरक्षण दलाच्या संकेतस्थळावर दिलेला आहे.
Railway Protection Force Bharti 2024 | रेल्वे संरक्षण दल येथील भरतीसाठी अधिक सूचना खालील प्रमाणे.
 • सदरील भरती संदर्भात अधिक माहिती आरआरबी च्या वेबसाईटवर तेरा नंबर पॅरेग्राफ मध्ये दिलेली आहे. उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी.
 • वय मर्यादा मध्ये कोणत्या प्रकारची सूट देण्यात आलेली आहे यासंदर्भात अधिक माहितीसाठी जाहिरात पहा.
 • अर्ज करणाऱ्या उमेदवाराने पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता अर्ज करायचा शेवटच्या दिवशी पर्यंत पूर्ण करणे गरजेचे आहे. ज्या उमेदवारांना अजून पदवी मिळालेली नाही आशा उमेदवारांनी सदरील भरतीसाठी अर्ज करू नये.
 • सदरील भरती करिता उमेदवाराचे शारीरिक मोजमाप आणि वैद्यकीय आरोग्य चाचणी करणे गरजेचे आहे. यासंदर्भात अधिक माहिती आरआरबी च्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अर्जत करणाऱ्या उमेदवारा पैकी ज्या उमेदवारांची वैद्यकीय आरोग्य चाचणी मध्ये त्रुटी येईल आशा उमेदवारांना भरती मध्ये सहभागी होता येणार नाही.
 • या भरतीमध्ये माझी कर्मचाऱ्यांसाठी राखीव जागा आहेत. त्याचप्रमाणे महिलांकरिता 15% आरक्षण आहे. आणि एससी / एसटी / ओबीसी / ईबीसी या आरक्षणासंदर्भात अधिक माहितीसाठी आरआरबी च्या संकेतस्थळाला भेट द्या.
 • सदरील भरती मध्ये संगणकावर आधारित चाचणी घेण्यात येईल. त्यानंतर शारीरिक क्षमता चाचणी आणि शारीरिक मोजमाप चाचणी घेण्यात येईल.
 • सदरील भरतीसाठी सर्व उमेदवारांकरिता परीक्षा फी ₹500 आहे. त्यातील 400 रुपये परीक्षा फी जे उमेदवार CBT टेस्ट साठी उपस्थित राहतील त्यांना माघारी देण्यात येतील.
 • रेल्वे संरक्षण दल येथील भरतीसाठी उमेदवाराने भरलेल्या अर्जातील माहितीद्वारे उमेदवाराची प्राथमिक निवड केली जाईल. तिथून पुढच्या टप्प्यामध्ये उमेदवाराने भरलेली माहिती तपासली जाईल यामध्ये कोणत्याही प्रकारची चुकीची माहिती उमेदवाराने भरलेली असेल. किंवा अपूर्ण माहिती दिलेली असेल. तर त्या उमेदवाराचा अर्ज कोणत्याही टप्प्यावर रद्द केला जाऊ शकतो.
 • सदरील भरती करिता उमेदवारांनी ऑनलाइन फॉर्म योग्य रिजन मध्ये दिलेल्या संकेतस्थळा नुसार भरायचा आहे. खालील माहिती वाचा.
 1. अहमदाबाद  –   www.rrbahmedabad.gov.in
 2. अजमेर –   www.rrbajmer.gov.in
 3. बेंगलोर –  www.rrbbnc.gov.in
 4. भोपाळ – www.rrbbhopal.gov.in
 5. भुबनेश्वर – www.rrbbbs.gov.in
 6. बिलासपुर – www.rrbbilaspur.gov.in
 7. चंदिगड – www.rrbcdg.gov.in
 8. चेन्नई – www.rrbchennai.gov.in
 9. गोरखपुर – www.rrbgkp.gov.in
 10. गुवाहाटी – www.rrbguwahati.gov.in
 11. जम्मू- श्रीनगर – www.rrbjammu.gov.in
 12. कोलकाता – www.rrbkolkata.gov.in
 13. मालदा – www.rrbmalda.gov.in
 14. मुंबई – www.rrbmumbai.gov.in
 15. मुजफ्फरपुर – www.rrbmuzaffarpur.gov.in
 16. पटना – www.rrbpatna.gov.in
 17. प्रयागराज – www.rrbald.gov.in
 18. रांची – www.rrbranchi.gov.in
 19. सिकंदराबाद – www.rrbsecunderabad.gov.in
 20. सिलिगुरी – www.rrbsiliguri.gov.in
 21. तिरुवनंतपुरम – www.rrbthiruvananthapuram.gov.in
Railway Protection Force Bharti 2024 | रेल्वे संरक्षण दल संदर्भात अधिक माहिती खालील प्रमाणे.

केंद्र सरकारचे रेल्वे मंत्रालयाच्या अंतर्गत असणारे सशस्त्र सुरक्षा दल म्हणजेच रेल्वे सुरक्षा दल होय. भारतीय संसदेने 1957 रोजी रेल्वेची मालमत्ता आणि प्रवाशांची सुरक्षा लक्षात घेऊन रेल्वे सुरक्षा दल याची स्थापना केली. रेल्वेच्या परिसरात झालेली चोरी, मालमत्ता चा घेतलेला ताबा, खून, दरोडे यांसारख्या घटनांचा तपास करण्याचा अधिकार रेल्वे सुरक्षा दल यांच्याकडे आहे. सुरक्षा दलाकडे रेल्वेचे प्रवास क्षेत्र आणि रेल्वेने प्रवास करणारे प्रवासी यांची सुरक्षा करण्याचे काम असते. त्याचप्रमाणे रेल्वेच्या परिसरात गुन्हे करणाऱ्या आरोपीला अटक करण्याचे काम सुद्धा रेल्वे पोलिसांकडे आहे.

रेल्वे संरक्षण दलाच्या सर्व अधिकाऱ्यांची नेमणूक नागरी सेवा परीक्षेद्वारे केली जाते. सदरील अधिकाऱ्यांचे पद हे गट अ प्रकारातील आहे. रेल्वे संरक्षण दलाचे महासंचालक पद हे आयपीएस अधिकाऱ्याकडे असते. सध्या रेल्वे संरक्षण दलाचे महासंचालक मनोज यादव आहेत. भारतीय रेल्वे मंत्रालयाद्वारे घेण्यात येणाऱ्या परीक्षेमधून उपनिरीक्षक आणि हवालदार या पदांची निवड केली जाते.

रेल्वेची देखभाल करणे, रेल्वेच्या मालमत्ता ला आणि प्रवाशांना सुरक्षा देणे, रेल्वेची आर्थिक प्रगती साधने यासारख्या गोष्टी भारत सरकार करिता चिंता झालेल्या होत्या. त्यामुळे 1861 रोजी रेल्वेने स्वतःची पोलीस यंत्रणा सुरू केली. सुरुवातीला कंत्राटी कंपनीने पोलीस दलावर नियंत्रण ठेवण्याचे काम केले. 1872 रोजी भारतीय रेल्वेने शिफारस केल्यानंतर रेल्वे पोलिसांना सरकारमध्ये सामील करून घेतले गेले. त्या दिवसापासून 1882 पर्यंत रेल्वे पोलिसांचे सरकारी पोलीस आणि खाजगी पोलीस असे दोन विभाजन झाले होते. खाजगी पोलिसांमध्ये कंपनीने नेमून दिलेले चौकीदार असायचे. कंपनीच्या मालकी हक्काचे संरक्षण करण्याचे काम या खाजगी पोलिसांकडे असायचे.

रेल्वे सुरक्षा दलाने आजपर्यंत 100 वर्ष भारतीय रेल्वेला सुरक्षा दिलेली आहे. वॉच आणि वार्ड 1954 रोजी सुरू झाले आणि रेल्वे सुरक्षा दलाला गृह मंत्रालयाच्या शिफारशीनुसार संविधानिक दर्जा मिळाला. या दलामध्ये महिलांची टक्केवारी जास्त आहे. रेल्वेची मालमत्ता आणि काम यांच्याशी निगडित कोणतेही नियम आणि तरतूद लागू करण्याचे अधिकार रेल्वे सुरक्षा दलाकडे आहेत. रेल्वेच्या कायद्याचे कोणत्याही व्यक्ती द्वारा उल्लंघन झाल्यास अशा व्यक्तीला अटक करण्याचा पूर्णपणे अधिकार रेल्वे सुरक्षा दलाकडे आहे.

कोणत्याही रेल्वेच्या क्षेत्रामध्ये घडलेला गुन्हा हा त्या रेल्वे पोलिसांकडे येतो. सदरील गुन्हा हा राज्याच्या पोलीस दलाच्या खाली सुद्धा येतो. रेल्वेमध्ये कायदा, सुव्यवस्था राखणे, धावत्या गाडीमध्ये घडलेल्या गुन्ह्यांचे तपास करणे इत्यादी सर्व कामे रेल्वे पोलिसांकडे येतात. रेल्वे मधून किंवा रेल्वेच्या कार्यक्षेत्रातून अमली पदार्थाची होणारी दळणवळण थांबवण्याचे काम रेल्वे पोलिसांकडे आहे. त्याचप्रमाणे अमली पदार्थ जप्त करणे आणि अमली पदार्थांची देवाणघेवाण करणाऱ्या व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करणे हे काम रेल्वे पोलिसांकडे आहे. एनडीपीएस कायद्याच्या कलम 42 मध्ये या सर्वांबद्दल अधिक माहिती दिलेली आहे.

रेल्वे सुरक्षा दलामध्ये महासंचालक, अतिरिक्त महासंचालक, महानिरीक्षक, उपमहानिरीक्षक, वरिष्ठ कमांडर, कमांडंट, असिस्टंट कमांडंट यांसारखी उच्चपदे असतात. त्यानंतर इन्स्पेक्टर, उपनिरीक्षक, सहाय्यक उपनिरीक्षक, हेड कॉन्स्टेबल, हवालदार यांसारखी पदे असतात. रेल्वे संरक्षण दल कायदा 1957, रेल्वे मालमत्ता कायदा 1966, रेल्वे संरक्षण दल नियम 1987, रेल्वे संरक्षण दल निर्देश 1987 यांसारख्या कायद्याच्या अंतर्गत रेल्वे संरक्षण दलाचे कायदे आणि नियम आधारलेले आहेत.

रेल्वे संरक्षण दल येथे एकूण सहा युनिट आहेत. त्यामध्ये पोलीस कुत्र्यांसाठी प्रजनन आणि प्रशिक्षण केंद्र, केंद्रीय गुन्हे ब्युरो, सेंट्रल वेपन स्टोअर, गुन्हे गुप्तचर शाखा, विशेष गुप्तचर शाखा, सायबर सेल शाखा यांसारख्या शाखांचा समावेश आहे.

[ Railway Protection Force Bharti 2024 ] भारतीय रेल्वे मधील कोणत्याही भरती संदर्भात अधिक माहिती मिळवण्यासाठी आमच्या नोकरी फस्ट या वेबसाईटला नक्की भेट द्या. भेट घेण्यासाठी येथे क्लिक करा.

 

Leave a Comment