MPSC Bharti 2024 | महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरती.

MPSC Bharti 2024 | महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरती विविध पदांसाठी भरती निघालेली आहे. या भरतीची जाहिरात महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. 10 एप्रिल 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. राज्य पोलीस तक्रार प्राधिकरण, विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरण या पदांसाठी सदरील ची भरती होणार आहे. सदरील भरती करिता उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज भरायचे आहेत. ऑफलाइन पद्धतीने अर्ज भरण्यापूर्वी उमेदवारांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत जाहीर केलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. सदरील भरतीसाठी उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी.

MPSC Bharti 2024

  • महाराष्ट्र लोकसेवा आयोग येथील भरती आठ जागांसाठी होणार आहे.
  • महाराष्ट्र लोकसेवा आयोग येथील भरती मध्ये राज्य पोलीस तक्रार प्राधिकरण, विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरण ही पदे भरण्यात येणार आहेत.

MPSC Bharti 2024 | महाराष्ट्र लोकसेवा आयोग येथील भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि वयाची अट खालील प्रमाणे.

  • राज्य पोलीस तक्रार प्राधिकरण या पदासाठी नियमित वयोमानाने निवृत्त झालेला पोलीस अधिकारी पाहिजे. या पोलिस अधिकाऱ्याचा दर्जा विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्यापेक्षा कमी नसला पाहिजे. किंवा राज्य शासनाच्या सचिव पदाच्या दर्जापेक्षा कमी दर्जा नसलेला अधिकारी सदरील पदासाठी आवश्यक आहे.
  • विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरण या पदासाठी उमेदवार पोलीस अधीक्षक दर्जापेक्षा कमी दर्जा नसलेला त्याचप्रमाणे नियमित वयोमानाने निवृत्त झालेला सेवानिवृत्त अधिकारी पाहिजे.
  • सदरील भरती करिता उमेदवाराचे वय सेवानिवृत्त म्हणजे 60 वर्षापासून पुढचे पाहिजे.
  • सदरील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या भरती मध्ये पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवाराला 1,37,700 रुपये इतका पगार दरमहा मिळेल.
  • सदरील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या भरती मध्ये पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारासाठी नोकरीचे ठिकाण संपूर्ण महाराष्ट्रात असेल.
  • महाराष्ट्र लोकसेवा आयोग येथील सदरच्या भरतीसाठी उमेदवाराकडून प्रवेश शुल्क आकारण्यात येणार नाही. शुल्क शुन्य असेल.
  • महाराष्ट्र लोकसेवा आयोग येथील भरतीसाठी उमेदवारांनी जाहिरातीमध्ये दिलेल्या पत्त्यावर अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यासाठी ऑफलाइन पद्धतीचा उपयोग करायचा आहे.
  • महाराष्ट्र लोकसेवा आयोग येथील भरतीसाठी 10 एप्रिल 2024 ही अर्ज करण्याची शेवटची दिनांक आहे.
  • महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्याद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचायची आहे. जाहिरात पहा.
  • “आयोगास सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, त्रिशुल गोल्ड फिल्ड, प्लॉट नंबर ३४, सरोवर विहार समोर, सेक्टर ११, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई ४००६१४.” या पत्त्यावर उमेदवारांनी अर्ज पाठवायचे आहेत.

MPSC Bharti 2024 | महाराष्ट्र लोकसेवा आयोग येथील भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खालील सूचना वाचा.

  • सदरील भरती करिता उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • ऑनलाइन अर्ज करण्याची ही प्रणाली महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्याकडून सदरच्या भरतीसाठी राबविण्यात आलेली नाही. त्यामुळे उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करू नये.
  • सदरील भरती करिता अर्ज करत असताना उमेदवारांनी स्वतःचे नाव, पत्ता, , जन्मतारीख, पिनकोड आणि इतर वैयक्तिक माहिती काळजीपूर्वक भरायची आहे. यामध्ये काही चूक झाली आणि उमेदवाराचा अर्ज बाद करण्यात आला तर याला महाराष्ट्र लोकसेवा आयोग जबाबदार राहणार नाही.
  • 10 एप्रिल 2020 रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोग येथील भरती करिता अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  • महाराष्ट्र लोकसेवा आयोग येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी सर्वप्रथम प्रसिद्ध झालेली जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

MPSC Bharti 2024 | महाराष्ट्र लोकसेवा आयोग येथील भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांसाठी सूचना खालील प्रमाणे.

  • महाराष्ट्र लोकसेवा आयोग येथील भरतीसाठी ज्या उमेदवारांनी अर्ज केलेले आहेत आशा उमेदवारांमधून योग्य उमेदवाराची निवड करण्यात येईल.
  • महाराष्ट्र लोकसेवा आयोग येथील भरतीसाठी कोणत्याही उमेदवाराला TA / DA देण्यात येणार नाही. याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
  • सदरील भरतीसाठी राबविण्यात आलेल्या निवड प्रक्रियेमध्ये अनुचित प्रकार करणाऱ्या उमेदवाराला कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल. याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
  • सदरील भरतीसाठी परीक्षा केंद्र हे महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्याद्वारे ठरवण्यात येईल. उमेदवाराने दिलेल्या परीक्षा केंद्रावर वेळेत उपस्थित राहावे.
  • सदरील भरती मधील पदांसाठी आवश्यक अभ्यासक्रम महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी संकेतस्थळाला भेट द्यावी.
MPSC Bharti 2024 | महाराष्ट्र लोकसेवा आयोग येथील भरती संदर्भात अधिक माहिती खालील प्रमाणे.
  • राज्य व विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरण येथे रिक्त असणाऱ्या जागा गृह विभागाच्या मागणीनुसार आणि माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार भरण्याकरिता सेवानिवृत्त उमेदवारांचे पॅनल नियुक्त करण्यात येणार आहे.
  • राज्य पोलीस तक्रार प्राधिकरण चा सदस्य आणि विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरण यांचा सदस्य या दोन पदासाठी सदरची भरती होणार आहे.
  • नागपूर, नवी मुंबई ( कोकण ), अमरावती, छत्रपती संभाजीनगर, पुणे, नाशिक या विभागांच्या विभागीय पोलीस निवारण प्राधिकरण च्या सदस्य पदासाठी उमेदवारांची नेमणूक करायची आहे.
  • पोलीस तक्रार प्राधिकरणाची स्थापना 01 फेब्रुवारी 2014 रोजी करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र पोलीस अधिनियम 2014 नुसार पोलीस तक्रार प्राधिकरणाची स्थापना झालेली आहे. नियमानुसार वेळोवेळी सदरील प्राधिकरणाची कार्यपद्धती पाणी कार्य नियमावली सुधरवण्यासाठी प्रक्रिया राबविण्यात येते. महाराष्ट्र राज्य पोलीस तक्रार प्राधिकरण 2016 यांच्यामधील तरतुदी सुद्धा गृह विभागाच्या अधिसूचनेनुसार 17 नोव्हेंबर 2016 पासून लागू करण्यात आलेले आहेत.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करण्याचा नमुना दिलेला आहे. उमेदवारांनी स्वतःचा अर्ज त्या नमुन्या नुसार टायपिंग करून घ्यायचा आहे. आणि दिलेल्या पत्त्यावर 10 एप्रिल 2024 रोजी सायंकाळी सहा वाजेपर्यंत पोहोचेल या बेताने स्पीड पोस्ट द्वारे अर्ज दिलेल्या पत्त्यावर पाठवायचा आहे. अर्ज करायच्या शेवटच्या तारखेनंतर प्राप्त झालेला अर्ज कोणत्याही परिस्थितीत ग्राह्य धरला जाणार नाही.
  • www.mpsc.gov.in या वेबसाईटवर सदरील भरतीची जाहिरात दिलेली आहे उमेदवारांनी वेबसाईटवर भेट देऊन जाहिरात काळजीपूर्वक वाचायची आहे.
  • सदर ची जाहिरात ही उपसचिव महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्याद्वारे देण्यात आलेली आहे.
MPSC Bharti 2024 | महाराष्ट्र लोकसेवा आयोग येथील भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया खालील प्रमाणे.
  • दिलेल्या अर्जाच्या नमुन्यामध्ये ज्या पदासाठी उमेदवारांना अर्ज करायचा आहे त्या पदांची नावे एका बाजूला दिसतील. आणि दुसऱ्या बाजूला ज्या पदासाठी उमेदवाराला अर्ज करायचा आहे त्या पदासमोर उमेदवाराने टिक करायचे आहे. एकूण आठ पदे आहेत. त्यापैकी योग्य त्या पदा पुढे उमेदवारांनी टेक करावी.
  • दुसऱ्या क्रमांकावर उमेदवाराने स्वतःचे संपूर्ण नाव लिहायचे आहे.
  • तिसऱ्या क्रमांकावर उमेदवाराने स्वतःचा संपर्क तपशील लिहायचा आहे. 3.1 मध्ये उमेदवाराने सध्याचा पत्ता लिहायचा आहे. त्याच्याखाली दूरध्वनी क्रमांक, ई-मेल आयडी, भ्रमणध्वनी क्रमांक लिहायचा आहे. 3.2 मध्ये उमेदवाराने कायमस्वरूपी चा पत्ता लिहायचा आहे.
  • चौथ्या क्रमांकावर उमेदवाराने स्वतःची जन्मतारीख लिहायची आहे. यामध्ये जन्मतारीख लिहिण्याकरिता तीन बॉक्स दिलेले आहेत. पहिला बॉक्स मध्ये दिनांक दुसऱ्या बॉक्समध्ये महिना आणि तिसऱ्या बॉक्समध्ये वर्ष लिहायचे आहे.
  • पाचव्या क्रमांकावर उमेदवाराने सेवानिवृत्तीच्या वेळेस धारण केलेले पद लिहायचे आहे.
  • सहाव्या क्रमांकावर उमेदवाराने स्वतःची सेवानिवृत्तीची दिनांक लिहायचे आहे. पहिल्या बॉक्स मध्ये दिनांक लिहायचे आहे. दुसऱ्या बॉक्समध्ये महिना लिहायचा आहे आणि तिसऱ्या बॉक्समध्ये वर्ष लिहायचे आहे.
  • सातव्या क्रमांकावर उमेदवाराने स्वतःचा सेवा तपशील लिहायचा आहे.
  • आठव्या क्रमांकावर उमेदवाराने स्वतःजवळ असलेले विशेष प्राविण्य लिहायचे आहे.
  • नवव्या क्रमांकावर उमेदवाराने सेवेमधील उल्लेखनीय कामगिरी लिहायचे आहे.
  • दहाव्या क्रमांकावर उमेदवाराने स्वतः विरोधात कोर्टामध्ये कोणताही फौजदारी गुन्हा दाखल असेल प्रलंबित असेल केव्हा निकाल लागलेला असेल तर त्या संदर्भाचा तपशील लिहायचा आहे.
  • अकराव्या क्रमांकावर उमेदवाराने स्वतःच्या विरोधात कोणतीही शिस्तभंगाची कारवाई विभागाद्वारे केलेली असेल तर त्याचा तपशील उमेदवारांनी नमूद करायचा आहे.
  • त्यानंतर उमेदवाराने प्रतिज्ञापत्र सादर करायचे आहे. यामध्ये उमेदवारा द्वारे दिलेली माहिती संपूर्ण बरोबर आहे. त्याचप्रमाणे कोणतीही खोटी माहिती उमेदवारांनी दिलेली नाही याबाबतचे प्रतिज्ञापत्र असते. जर उमेदवाराने कोणतीही खोटी माहिती दिली असेल तर उमेदवाराचा अर्ज रद्द करण्यात यावा यासाठी उमेदवाराची सहमती म्हणून प्रतिज्ञापत्र लिहून घेतले जाते. त्याखाली उमेदवाराची सही उमेदवाराचे संपूर्ण नाव आणि उमेदवाराचे निवृत्तीचा पदनाम लिहिलेला असतो.
  • सदरील अर्जासोबत उमेदवाराने सेवानिवृत्तीच्या वेळेस शासनाने दिलेले ओळखपत्र जोडायची आहे. त्या ओळख पत्राची प्रत स्व स्वाक्षरी करून अर्जासोबत जोडायचे आहे.
  • दिलेला अर्जाचा नमुना उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचायचा आहे. आणि त्यानंतरच भरायला घ्यायचा आहे अर्ज भरत असताना उमेदवारांनी अनुभवी आणि तज्ञ व्यक्तींचा सल्ला घ्यायचा आहे. अर्ज भरताना पेनाने केव्हा हस्तलिखित भरायचा नाही. सदरील अर्जाच्या नमुन्या प्रमाणे उमेदवाराने अर्ज टंकलिखित करून घ्यायचा आहे. भरतीसाठी मिळालेल्या सदरील पदासाठी आवश्यक ती माहिती अर्जाच्या नमुन्यामध्ये उमेदवारांनी भरायची आहे.
  • सदरील भरतीसाठी अर्ज भरत असताना कोणत्याही प्रकारची शंका असल्यास किंवा भरती बाबत कोणत्याही प्रकारची त्रुटी असल्यास उमेदवारांनी 022-69385900 या मोबाईल नंबर वरती संपर्क साधायचा आहे.
  • सदरील भरती संदर्भात काही महत्त्वाची माहिती बाबत आयोगा सोबत चर्चा करण्याकरिता उमेदवाराने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या ईमेल आयडी वरती ई-मेल करावा. ई-मेल आयडी – contact-secretary@mpsc.gov.in
  • एमपीएससी स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांना ट्विटर वरती चालू करण्यासाठी @mpsc_office या नावाने सर्च करावे. त्याचप्रमाणे टेलिग्राम वरती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या संपर्कात राहण्याकरिता @official_mpsc या ऑनलाइन पोर्टल ला टेलिग्राम वर सर्च करावे.
  • महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत निघालेली सदरची भरती ची जाहिरात क्रमांक- 036/2024 हा आहे. त्यामुळे कोणत्याही उमेदवाराला जर सदरील भरती बाबत शंका वाटत असेल तर त्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगा चौकशी करिता सदरील जाहिरात नंबर वापरावा.
  • सदरील पदांची नियुक्ती ही करार पद्धतीने राहील. उमेदवार सेवेवर रुजू झाल्यानंतर तीन वर्षांकरिता त्याची सेवा असेल. यानंतर त्याला पदावरून रिक्त करण्यात येईल.

MPSC Bharti 2024 | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे निघणाऱ्या भरती संदर्भात माहिती मिळवण्याकरिता आमच्या नोकरी फस्ट या वेबसाईटला नक्की भेट द्या. भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a Comment