PCMC Police Bharti 2024 | पोलीस भरती मध्ये पोलीस शिपाई पदासाठी प्रयत्न करणाऱ्या उमेदवारांना आता पिंपरी-चिंचवड पोलीस मध्ये भरतीसाठी सुवर्णसंधी आली आहे. पोलीस शिपाई या पदासाठी 262 जागा रिक्त आहेत. त्या भरण्यासाठी ही भरती काढण्यात आली आहे. याची जाहिरात पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून प्रसिद्ध करण्यात आले आहे. ज्या उमेदवारांना अर्ज करायचा आहे. त्यांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचून अर्ज करावा. 31 मार्च 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. त्याची प्रक्रिया पिंपरी-चिंचवड पोलिसा द्वारे सांगितली गेलेली आहे. ती काळजीपूर्वक वाचून अर्ज करावा. पिंपरी-चिंचवड पोलीस मध्ये भरती साठी अर्ज करण्यापूर्वी खालील माहिती अवश्य वाचा.
- पिंपरी-चिंचवड पोलीस विभागाद्वारे घेण्यात येणारी भरती 262 जागांसाठी आहे.
- पोलीस शिपाई या पदासाठी पिंपरी-चिंचवड पोलीस विभागाकडून भरती होणार आहे.
PCMC Police Bharti 2024 | पिंपरी-चिंचवड पोलीस विभागाच्या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता आणि वयाची अट खालीलप्रमाणे.
- पिंपरी-चिंचवड पोलीस विभागाच्या भरतीसाठी [ PCMC Police Bharti 2024 ] पोलीस शिपाई पदासाठी उमेदवाराची शैक्षणिक पात्रता 12 वी पास पाहिजे. शैक्षणिक पात्रते बद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी जाहिरात पहा.
- अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे 18 ते 28 वर्षाच्या दरम्यान असले पाहिजे. मागासवर्गीय उमेदवारांसाठी वय हे 18 ते 33 वर्षापर्यंत पाहिजे. अपंग विद्यार्थ्यांसाठी वय 18 ते 45 वर्ष पाहिजे.
- पिंपरी-चिंचवड पोलीस विभागाद्वारे पोलीस शिपाई पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना नियमानुसार मासिक वेतन देण्यात येईल.
- पोलीस शिपाई पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांसाठी पिंपरी-चिंचवड हे नोकरीचे ठिकाण असेल.
- पिंपरी-चिंचवड पोलीस विभागाद्वारे घेण्यात येणाऱ्या भरतीसाठी उमेदवारांचे परीक्षा शुल्क है 450 रुपये आहे. मागास प्रवर्गासाठी शुल्क 350 आहे.
- ज्या इच्छुक उमेदवारांना पिंपरी-चिंचवड पोलीस भरती मध्ये अर्ज करायचा आहे. त्यांनी विभागाद्वारे दिलेल्या लिंक वरती क्लिक करून ऑनलाइन अर्ज भरायचा आहे. अर्ज करण्यासाठी येथे – क्लिक करा
- पिंपरी चिंचवड पोलीस विभागाद्वारे पोलीस शिपाई पदाच्या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2024 ही आहे.
- पिंपरी चिंचवड पोलीस विभागाद्वारे पोलीस शिपाई पदासाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. ही जाहिरात पाहण्यासाठी क्लिक करा
- सदरील पोलीस भरतीसाठी अर्ज करण्यासाठी www.policerecruitment.mahait2024.org या लिंक वर क्लिक करा.
PCMC Police Bharti 2024 | पोलीस शिपाई पदासाठी घेण्यात येणाऱ्या पिंपरी-चिंचवड पोलीस भरती साठी खालील नियम वाचा.
- पोलीस शिपाई पदासाठी अर्ज करताना ऑनलाईन अर्ज करावा.
- या भरती करिता ऑफलाइन अर्ज करायची कोणतीही पद्धत पिंपरी चिंचवड पोलीस विभागाकडून राबवले नाही.
- पोलीस शिपाई पदासाठी अर्ज करताना उमेदवाराने आपले नाव, घरचा पत्ता, जन्मतारीख, वय, पिनकोड, आणि स्वतःची वैयक्तिक माहिती व्यवस्थित भरावी. शिक्षणामध्ये पूर्ण केलेल्या कोर्स संदर्भात माहिती काळजीपूर्वक भरावी. यातील कोणतीही माहिती भरताना चुकली तर त्यास पिंपरी-चिंचवड पोलीस विभाग राहणार नाही.
- अर्ज करण्याची अंतिम दिनांक 31 मार्च 2024 ही पिंपरी-चिंचवड पोलीस विभागाकडून सांगितली आहे.
- पिंपरी-चिंचवड पोलीस विभागाद्वारे प्रसिद्ध केलेली जाहिरात सर्वांनी वाचावी व त्यानुसारच उमेदवारांनी अर्ज करावा.
PCMC Police Bharti 2024 | पिंपरी-चिंचवड पोलीस विभागाद्वारे घेण्यात येणाऱ्या भरतीमध्ये इच्छुक उमेदवारांनी खालील सूचना वाचाव्या.
- पिंपरी-चिंचवड पोलीस विभागाद्वारे घेण्यात येणाऱ्या भरतीसाठी [ PCMC Police Bharti ] अर्ज केलेले उमेदवारच पात्र असतील.
- कोणत्याही प्रकारचा TA/DA भरतीसाठी येणाऱ्या उमेदवाराला मिळणार नाही. याची दक्षता अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवारांनी घ्यावी.
- भरतीसाठी येणाऱ्या सर्व उमेदवारांनी शिस्तीचे पालन करणे गरजेचे आहे. जर कोणी शिस्त पणा आणि गैर जबाबदारपणा दाखवला तर त्याला या भरतीतून बाद करण्यात येईल. त्याचप्रमाणे परीक्षा केंद्रावर ती कोणताही अनुचित प्रकार करणाऱ्या उमेदवार वरती कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
- शारीरिक चाचणीसाठी मैदान आणि लेखी परीक्षेसाठी परीक्षा केंद्र कोणते असेल हे पिंपरी-चिंचवड पोलीस विभागाद्वारे सांगितले जाईल.
- पिंपरी-चिंचवड पोलीस विभागाच्या भरतीसाठी आवश्यक अभ्यासक्रम हा संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तरी विद्यार्थ्यांनी याबद्दल संपूर्ण माहिती घेऊनच अर्ज करावा.
PCMC Police Bharti 2024 | पिंपरी-चिंचवड पोलीस विभागाच्या भरतीसाठी अधिक माहिती खालील प्रमाणे.
- पोलीस आयुक्त, पिंपरी-चिंचवड यांच्या आस्थापनेवरील 262 रिक्त असलेली पोलीस शिपाई पदाची ही भरती आहे.
- दिनांक 5 मार्च 2024 ते दिनांक 31 मार्च 2024 पर्यंत संगणकीय प्रणाली द्वारे उमेदवारांचे अर्ज स्वीकारण्यात येतील. याकरिता उमेदवारांनी संकेतस्थळाचा उपयोग करायचा आहे. www.mahapolice.gov.in आणि www.policerecruitment.mahait2024.org या दोन्ही संकेतस्थळाचा उपयोग करू शकता.
- कोणत्याही उमेदवाराने अर्ज करताना एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. अर्ज करत असताना कोणत्याही एका पदासाठी अर्ज करावा. आणि महाराष्ट्रातील एका घटकातून अर्ज करावा.
- उमेदवाराने अर्ज करत असताना कोणत्याही प्रकारची चुकीची माहिती आजा मध्ये भरू नये. जर उमेदवाराने चुकीची माहिती भरलेली आहे असे लक्षात आले. तर त्या उमेदवाराचा अर्ज बाद केला जाऊ शकतो.
- पोलीस शिपाई भरतीसाठी उमेदवाराच्या दोन चाचण्या घेतल्या जातील. पहिली चाचणी म्हणजे उमेदवाराची शारीरिक चाचणी होईल. आणि त्यानंतर उमेदवाराची दुसरी चाचणी म्हणजे लेखी परीक्षा होईल. शारीरिक चाचणी ही 50 गुणांची राहील. त्यानंतर 100 गुणांची लेखी परीक्षा घेण्यात येईल. ही लेखी परीक्षा महाराष्ट्रातील सर्व घटकांमध्ये एकाच दिवशी होणार आहे. त्यामुळे उमेदवारांनी घटकांचा विचार करून अर्ज करावा.
- महाराष्ट्रातील सर्व पोलीस घटकांमध्ये लेखी परीक्षा ही एकाच दिवसात होणार आहे. त्यामुळे उमेदवाराने अर्ज करताना घटकांचा विचार अगोदर करावा. आणि त्यानुसारच अर्ज भरावा.
- उमेदवारांना शारीरिक चाचणी पास होण्यासाठी किमान 50 टक्के गुण मिळणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे उमेदवारांना लेखी परीक्षा पास होण्यासाठी 100 पैकी 40 गुण मिळणे गरजेचे आहे. म्हणजेच लेखी परीक्षेत 40% गुणांची आवश्यकता असते. यापेक्षा जर कमी गुण उमेदवाराला मिळाले तर उमेदवार अपात्र ठरवला जाईल.
- उमेदवाराला शारीरिक चाचणी मध्ये मिळालेले गुण आणि लेखी परीक्षेमध्ये मिळालेले गुण या दोन्ही गुणांच्या निकषांवरून एक गुणवत्ता यादी तयार केली जाईल. यानंतर या गुणवत्ता यादीत ज्या उमेदवारांचा समावेश आहे त्या उमेदवारांची कागदपत्रांची पडताळणी केली जाईल. कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतर गृह विभाग महाराष्ट्र शासन निर्णय दिनांक 10 डिसेंबर 2020 नुसार अंतिम यादी जाहीर करण्यात येईल.
- पिंपरी-चिंचवड पोलीस विभाग भरतीतील पोलीस शिपाई या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, शारीरिक पात्रता, लेखी परीक्षेसाठी अभ्यासक्रम, परीक्षा शुल्क, वयाची अट, आरक्षणाच्या तरतुदी या सर्व बाबी www.policerecruitment.mahait2024.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे उमेदवाराने सामाजिक आणि समांतर आरक्षण समजून घ्यावे. उपलब्ध पदाच्या 1% पदेही अपंग उमेदवारांकरिता आहेत. यानंतर उमेदवाराने ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा.
- उमेदवारांनी अर्ज करत असताना कोणत्या कॅटेगरी ला किती आरक्षण आहे. हे पहावे आणि त्यानुसारच अर्ज करावा. मागासवर्गीय उमेदवार खुल्या वर्गामध्ये अर्ज करू शकतात. पण उमेदवार मागास प्रवर्गात अर्ज करू शकत नाहीत. यासाठी कोणत्या घटका करिता किती जागा शिल्लक आहेत. हे पाहणे गरजेचे आहे.
- पिंपरी-चिंचवड पोलीस विभागाने जाहिरातीत नमूद केलेल्या पदांच्या संख्यांमध्ये बदल होऊ शकतो. कारण माननीय उच्च न्यायालय मुंबई यांनी दिलेल्या निर्णयाविरुद्ध माननीय सर्वोच्च न्यायालय येथे याचिका दाखल आहे त्याचा अंतिम निर्णय अजून झालेला नाही. त्यामुळे जर पदांच्या संख्येमध्ये बदल झाला तर पिंपरी-चिंचवड पोलीस विभागाद्वारे संकेतस्थळावरती हा बदल सांगण्यात येईल.
- भरती समिती अध्यक्षांना ही पदे भरण्याचा अधिकार आहे. त्यामुळे त्याही वेळेस कोणत्याही प्रवर्गातील रिक्त असलेल्या पदांच्या संख्येमध्ये कमी जास्त होऊ शकते. त्याबद्दलची माहिती संकेतस्थळावरती वेळोवेळी नमूद करण्यात येईल.
PCMC Police Bharti 2024 | पिंपरी-चिंचवड पोलीस भरती मध्ये शिपाई पदासाठी आरक्षणानुसार जागा खालील प्रमाणे
- अनुसूचित जातीच्या उमेदवारांकरिता एकूण 54 जागा पोलीस शिपाई साठी आहेत. त्यातील 16 जागा सर्वसाधारण साठी आहेत. 16 जागा महिलांसाठी आहेत. तीन जागा खेळाडूंसाठी आहेत. तीन जागा प्रकल्पग्रस्तांसाठी आहेत. एक जागा भूकंपग्रस्त उमेदवारासाठी आहे. आठ जागा माजी सैनिकांसाठी आहेत. अंशकालीन पदवीधरांसाठी तीन जागा आहेत. पोलीस पाल्यांसाठी एक जागा आहे. तीन जागा गृहरक्षक दलासाठी आहेत.
- अनुसूचित जमातीतील उमेदवारांसाठी 20 जागा आहेत. त्यातील सहा जागा सर्वसाधारण साठी आहेत, सहा जागा महिलांसाठी आहेत, एक जागा खेळाडूसाठी आहे, एक जागा प्रकल्पग्रस्तांसाठी आहे, भूकंपग्रस्तांसाठी एकही जागा नाही, माजी सैनिकांसाठी तीन जागा आहेत, अंशकालीन पदवीधरांसाठी एक जागा आहे, पोलीस पालन करता एक जागा आहे, गृहरक्षक दलातील उमेदवारांसाठी एक जागा आहे.
- विमुक्त जाती – अ या प्रवर्गातील उमेदवारांकरिता 10 जागा रिक्त आहेत. त्यातील तीन जागा या सर्वसाधारण साठी आहेत, तीन जागा या महिला उमेदवारांसाठी आहेत, एक जागा खेळाडूसाठी आहे, प्रकल्पग्रस्तां साठी एक जागा आहे, भूकंपग्रस्तांसाठी एक सुद्धा जागा नाही आणि माजी सैनिकांसाठी दोन जागा आहेत.
- भटक्या जमाती- ब या पदासाठी एकूण सात जागा रिक्त आहेत. त्यातील दोन जागा सर्वसाधारण साठी आहेत. दोन जागा या महिलांसाठी आहेत, एक जागा ही खेळाडूसाठी आहे, एक जागा ही प्रकल्पग्रस्तांसाठी आहे, दोन जागा या माजी सैनिकांसाठी आहेत.
- भटक्या जमाती- क या वर्गासाठी एकूण 12 जागा आहेत. त्यातील चार जागा या सर्वसाधारण साठी आहेत, चार जागा या महिलांसाठी आहेत, एक जागा ही खेळाडूंसाठी आहे, माजी सैनिकांसाठी दोन जागा आहेत, गृहरक्षक दलासाठी एक जागा आहे.
- विविध मागास प्रवर्गासाठी 13 जागा आहेत. त्यातील चार जागा या सर्वसाधारण साठी आहेत, चार जागा या महिलांसाठी आहेत, एक जागा खेळाडूसाठी आहे, एक जागा ही प्रकल्पग्रस्त उमेदवारांसाठी आहे, दोन जागा माजी सैनिकांसाठी आहेत, एक जागा गृहरक्षक दलासाठी आहे.
- इतर मागास वर्गासाठी 99 जागा आहेत त्यापैकी 30 जागा सर्वसाधारण करीत आहेत, 29 जागा महिलांसाठी आहेत, पाच जागा खेळाडूंसाठी आहेत, पाच जागा प्रकल्पग्रस्तांसाठी आहेत, भूकंपग्रस्तांसाठी दोन जागा आहेत, माजी सैनिकांसाठी 15 जागा आहेत, अंशकालीन पदवीधरांसाठी पाच जागा आहेत, पोलीस पाल्यांसाठी तीन जागा आहेत, गृहरक्षक दलातील उमेदवारांसाठी पाच जागा आहेत.
- याच प्रमाणे एसईबीसी आणि ईडब्ल्यूएस या दोन प्रवर्गातील जागा पाहण्यासाठी जाहिरात काळजीपूर्वक वाचा.
पोलीस भरती संदर्भातील कोणत्याही प्रकारची अपडेट्स तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती पाहिजे असतील. तर आमची वेबसाईट नोकरी फर्स्ट ला भेट द्या.वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा