Thane Gramin Police Bharti 2024 | ठाणे ग्रामीण पोलीस येथे 119 जागांसाठी भरती.

Thane Gramin Police Bharti 2024 | नमस्कार मित्रांनो पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. ठाणे ग्रामीण पोलीस यांनी 119 रिक्त जागा भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे. 31 मार्च 2024 ही ठाणे ग्रामीण पोलीस भरती साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. होणारी भरती ही पोलीस शिपाई आणि पोलीस शिपाई चालक या दोन पदांसाठी होणार आहे. या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करता येणार आहेत. त्यामुळे पात्रताधारक उमेदवारांनी जाहिरात वाचण्याचा अर्ज करावा. ठाणे ग्रामीण पोलीस भरती संदर्भात अधिक माहितीसाठी खालील जाहिरात वाचा.

Thane Gramin Police Bharti 2024

 • ठाणे ग्रामीण पोलीस भरती ही 119 जागांसाठी होणार आहे.
 • ठाणे ग्रामीण पोलिसांमार्फत घेण्यात येणाऱ्या भरती मधील पदांची नावे खालील प्रमाणे.

Thane Gramin Police Bharti 2024 | ठाणे ग्रामीण पोलीस भरतीतील पदांची नावे त्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयाची अट खालील प्रमाणे

 1. पोलीस शिपाई
 2. पोलीस शिपाई चालक
 • पोलीस शिपाई आणि पोलीस शिपाई चालक या पदासाठी शैक्षणिक पात्रता किमान 12 वी पास इतकी आहे. शैक्षणिक पात्रता अजून खोलवर जाणून घेण्यासाठी प्रसिद्ध केलेली जाहिरात पहा.
 • सदरील भरती करिता वयाची अट ही 18 वर्ष ते 28 वर्षापर्यंत आहे. मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरिता वयाची अट 33 वर्षापर्यंत आहे. तर अपंग विद्यार्थ्यांकरिता वयाची अट ही 45 वर्षापर्यंत आहे.
 • पोलीस शिपाई आणि पोलीस शिपाई चालक या पदाकरिता निवडून आलेल्या उमेदवारांना मासिक वेतन हे नियमानुसार मिळेल.
 • ठाणे ग्रामीण पोलीस भरती द्वारे नियुक्त झालेल्या उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण ठाणे राहील.
 • सदरील भरती करिता प्रवेश शुल्क हे 450 रुपये राहील. त्याचप्रमाणे मागास प्रवर्गासाठी शुल्क 350 असेल.
 • इच्छुक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी ठाणे ग्रामीण पोलिसांनी ऑनलाइन लिंक दिलेली आहे. त्याद्वारेच उमेदवारांनी अर्ज करावा. अर्ज करण्यासाठी- येथे क्लिक करा
 • ठाणे ग्रामीण पोलीस भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2023 आहे.
 • ठाणे ग्रामीण पोलीस मार्फत सदरील भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
 • सदरील भरती संदर्भात अधिक माहिती पाहण्यासाठी www.mahapolice.gov.in या महाराष्ट्र पोलीस संकेत स्थळाला भेट द्या.

Thane Gramin Police Bharti 2024 | ठाणे ग्रामीण पोलीस यांच्यामार्फत घेण्यात येणाऱ्या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खालील नियम वाचावे.

 • ठाणे ग्रामीण पोलीस यांच्यामार्फत घेण्यात येणाऱ्या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
 • उमेदवारांनी कोणत्याही पद्धतीने ऑफलाईन अर्ज करू नये. कारण ऑफलाईन अर्ज करण्याची पद्धत ठाणे ग्रामीण पोलिसांनी राबवलेली नाही.
 • ठाणे ग्रामीण पोलीस भरती करिता अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी आपल्या स्वतःची माहिती, आपले नाव, वय, पत्ता, जन्मतारीख, सध्याचा पत्ता इत्यादी गोष्टी काळजीपूर्वक अर्जामध्ये भराव्यात. जर जर यातील काही चुकले तर ठाणे ग्रामीण पोलीस याकरता जबाबदार राहणार नाही.
 • 31 मार्च 2024 ही ठाणे ग्रामीण पोलीस भरती करिता अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
 • ठाणे ग्रामीण पोलिसांनी सदरील भरती करिता प्रसिद्ध केलेली जाहिरात. उमेदवाराने डाउनलोड करून काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

Thane Gramin Police Bharti 2024 | ठाणे ग्रामीण पोलीस भरती करिता अर्ज केलेल्या उमेदवारांनी खालील सूचना वाचाव्यात.

 • ठाणे ग्रामीण पोलीस भरती करिता ज्या उमेदवारांनी अर्ज केलेले आहेत असे उमेदवार पात्र राहतील.
 • TA / PA हा कोणत्याही उमेदवाराला देण्यात येणार नाही. ठाणे ग्रामीण पोलिसांनी स्पष्ट सांगितलेले आहे.
 • आज-काल पोलीस भरती, आर्मी भरती त्याचप्रमाणे इतर भरतीमध्ये उमेदवार उंची वाढवण्यासाठी त्याचप्रमाणे लेखी परीक्षेमध्ये पास होण्यासाठी अनुचित प्रकार करत असल्याचे लक्षात येत आहे. ठाणे ग्रामीण पोलीस भरती मध्ये असा कोणताही अनुचित प्रकार घडल्यास त्या उमेदवारावरती कायदेशीर कारवाई केली जाईल.
 • सदरील भरती बाबत संपूर्ण माहिती, निवड प्रक्रिया आणि लेखी परीक्षेसाठी असणारा अभ्यासक्रम हा महाराष्ट्र पोलीस यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. उमेदवारांनी संकेतस्थळावर भेट देऊन पहावे.
Thane Gramin Police Bharti 2024 | ठाणे ग्रामीण पोलीस भरती बद्दल महत्त्वाची माहिती खालील प्रमाणे.
 • पोलीस अधीक्षक, ठाणे ग्रामीण यांच्या आस्थापनातून सदरील पोलीस शिपाई आणि पोलीस शिपाई चालक या रिक्त पदांसाठी भरती काढण्यात आलेली आहे. महाराष्ट्र पोलीस शिपाई ( सेवाप्रवेश) नियम 2011 यामध्ये वेळोवेळी बदललेल्या तरतुदीनुसार हे शक्य झाले आहे.
 • उमेदवाराला एका पदासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील फक्त एकाच घटकांमध्ये अर्ज करता येतो.
 • उमेदवाराने स्वतःची माहिती भरत असताना बरोबर भरावी. किंवा अर्ज हा व्यक्तींकडून भरून घ्यावा. जर अर्जामध्ये ती माहिती चुकली तर अर्ज बाद केला जाईल.
 • ठाणे ग्रामीण पोलीस भरती ही दोन चाचण्यांमध्ये होणार आहे पहिल्या चाचणी मध्ये शारीरिक चाचणी तर दुसऱ्या चाचणीमध्ये लेखी चाचणी होणार आहे. शारीरिक चाचणी ही 50 गुणांची राहणार आहे. त्यानंतर लेखी परीक्षा असणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील पोलीस घटकांची लेखी परीक्षा ही एकाच दिवशी होणार आहे. त्यामुळे उमेदवाराने आपल्याला कोणत्या घटकातून अर्ज करायचा आहे. हे आधीच ठरवून अर्ज करावा.
 • सदरील मध्ये पात्र होण्याकरिता उमेदवाराला शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षा पास होणे गरजेचे आहे. शारीरिक चाचणी पास होण्याकरिता एकूण गुणांच्या कमीत कमी 50 टक्के गुण असणे गरजेचे आहे. तर लेखी परीक्षा पास होण्यासाठी उमेदवारांना एकूण गुणाच्या कमीत कमी 40% गुण मिळणे आवश्यक आहे. जर यापेक्षा कमी गुण उमेदवाराला मिळाले तर तो या भरतीमध्ये अपात्र ठरवलं जाईल.
 • शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेमध्ये मिळालेल्या गुणांची बेरीज करून गुणवत्ता यादी तयार केली जाईल. यामध्ये वेगवेगळ्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांचा विचार करून आरक्षणानुसार ही तात्पुरती निवड यादी तयार केली जाईल. निवड यादी मध्ये नाव असणाऱ्या उमेदवारांची सर्व कागदपत्रे पडताळली जातील. आणि ज्या उमेदवारांची सर्व कागदपत्रे खरी आहेत. त्यांचे नाव निवड यादीत समाविष्ट होईल. गृह मंत्रालय महाराष्ट्र शासन निर्णय दिनांक 10/ 12/ 2020. यानुसार अंतिम निवड यादी जाहीर करण्यात येईल.
 • ठाणे ग्रामीण पोलिसांच्या मार्फत घेण्यात येणाऱ्या भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, आवश्यक कागदपत्रे, गरजेची प्रमाणपत्रे, परीक्षा शुल्क या सर्व माहिती जाणून घेण्यासाठी www.policerecruitment2024.mahait.org या संकेतस्थळाला भेट द्या. वेबसाईट वरील सर्व माहिती समजून घ्यावी. आरक्षणाच्या तरतुदी वाचाव्यात. या भरतीतील संपूर्ण जागांपैकी 1% जागा ही अनाथ उमेदवारांसाठी आहे. या सर्व गोष्टींचा विचार करून उमेदवारांनी अर्ज करावा.
 • भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवाराने लेखी परीक्षा आणि शारीरिक चाचणीसाठी वेळेवर उपस्थित राहावे. जर उमेदवार पैकी कोणत्याही एका परीक्षेला गैरहजर राहिला. किंवा दोन्ही परीक्षेला गैरहजर राहिला तर तो भरतीसाठी अपात्र ठरवला जाईल. शारीरिक चाचणी ची तारीख आणि लेखी परीक्षेची तारीख ही कार्यालयाद्वारे ठरवली जाईल. त्यामुळे उमेदवारांनी या तारखा आणि परीक्षेची वेळ काळजीपूर्वक पाहायची आहे.
 • भरतीसाठी अर्ज करत असताना उमेदवारांनी कोणती पदे कोणा करिता रिक्त आहेत हे पाहणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरिता किती जागा आहेत हे सुद्धा पाहणे गरजेचे आहे. मागास प्रवर्गातील विद्यार्थी खुल्या प्रवर्गातून अर्ज भरू शकतात. पण खुल्या प्रवर्गातील विद्यार्थी मागास प्रवर्गातून अर्ज करू शकत नाहीत.
 • पदोन्नती आरक्षणासंदर्भात विषय हा सर्वोच्च न्यायालयात आहे. त्यामुळे या भरतीसाठी असणारी पदांची संख्या कमी जास्त होऊ शकते. याचा पूर्ण अधिकार कार्यालयाकडे आहे.
 • पोलीस भरती करिता उमेदवाराची निवड करण्यासाठी कोणत्याही व्यक्ती द्वारे जर पैशाची मागणी करण्यात आली किंवा इतर कोणत्याही स्वरूपात मागणी करण्यात आली. तर संबंधित उमेदवाराने अँटी करप्शन ब्युरो ठाणे यांना माहिती कळवावी. संपर्क साधून त्वरित तक्रार नोंदवावी. पोलीस अधीक्षक किंवा पोलीस तक्रार समिती 2022-23 यांच्याशी संपर्क साधून तक्रार नोंदवावी.उमेदवारांना कोणत्याही प्रकारची अडचण असल्यास कार्यालयाच्या वेळेत खालील दिलेल्या टेलीफोन नंबर वरती संपर्क साधावा.पोलीस अधीक्षक, ठाणे ग्रामीण कार्यालय – 022-25342784
 • बँड्समन पदासाठी टीप – सदरील पोलीस शिपाई भरती मधील आठ पदे ही बँड्समन पदाकरिता आहेत. या आठ पदांची निवड करत असताना एक जागा अनुसूचित जमातीसाठी, दोन जागा इतर मागास प्रवर्गासाठी, एक जागा ईडब्ल्यूएस साठी, एक जागा एसईबीसी साठी आणि उर्वरित तीन जागा या राखीव आहेत.
Thane Gramin Police Bharti 2024 | ठाणे ग्रामीण पोलीस संदर्भात अधिक माहिती साठी खाली वाचा.

पोलीस अधीक्षक ठाणे ग्रामीण मध्ये येणाऱ्या पोलीस स्टेशन ची नावे खालील प्रमाणे.

 1. गणेशपुरी पोलीस स्टेशन
 2. भिवंडी तालुका पोलीस स्टेशन
 3. कसारा पोलीस स्टेशन
 4. कल्याण तालुका पोलीस स्टेशन
 5. मुरबाड पोलीस स्टेशन
 6. किनवली पोलीस स्टेशन
 7. कुळगाव पोलीस स्टेशन
 8. टोकावडे पोलिस स्टेशन
 9. पगडा पोलीस स्टेशन
 10. वाशिंद पोलीस स्टेशन
 11. शहापूर पोलीस स्टेशन

एकूण 11 पोलीस स्टेशनचा ठाणे ग्रामीण पोलीस मध्ये सामावेश होतो. डॉ. डी.एस. स्वामी हे ठाणे ग्रामीण पोलीस चे अधीक्षक आहेत. ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयाचा पत्ता – जेल रोड, ठाणे पश्चिम, ठाणे, महाराष्ट्र 400601

Thane Gramin Police Bharti 2024 |  ठाणे ग्रामीण पोलिसांकडून केले गेलेल्या काही कारवाया खालील प्रमाणे.
 1. ठाणे ग्रामीण पोलिसांकडून मोबाईल चोरी करणाऱ्या गुन्हेगारास अटक.
 2. तीन कोटीचा गुटखा स्थानिक गुन्हे शाखे कडून पकडण्यात आला.
 3. घरफोडी करणाऱ्या गुन्हेगारांकडून आणखी दोन गुन्हे उघड करण्यास स्थानिक गुन्हे शाखेला यश.
 4. पडघा येथील फ्रिज चोरीच्या गुन्ह्यातील आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली.
 5. अवैद्य गावठी दारू बनवणाऱ्या वर स्थानिक गुन्हे शाखा ठाणे ग्रामीण यांच्याकडून कारवाई
 6. 10 लाख किमतीचा गांजा स्थानिक गुन्हे शाखा कडून जप्त ठाणे ग्रामीण पोलिसांची कारवाईला यश
 7. प्रतिबंधित तंबाखू आणि मसाला पान एकूण किंमत 41 लाख 75 हजार 320 ठाणे ग्रामीण पोलिसांकडून जप्त.

पोलीस भरती, त्याचप्रमाणे सरकारी भरतीतील कोणत्याही पदासाठी तयारी करणाऱ्या उमेदवारांना जर भरतीचे अपडेट्स पाहिजे असतील तर आमच्या वेबसाईटला नक्की भेट द्या – क्लिक करा

 

Leave a Comment