SCI Bharti 2024 | शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया द्वारे भरती जाहीर करण्यात आलेली आहे. या भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तरी इच्छुक उमेदवारांनी जाहिरात वाचून अर्ज करावा. या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 12 मार्च 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. सदाहरित भरती ही करारावर होणार आहे. या भरतीसाठी एकूण तीन जागा सचिवीय अधिकारी या पदासाठी रिक्त आहेत. ऑनलाइन अर्ज करून झाल्यानंतर उमेदवाराने तो बायोडाटा दिलेल्या मेल आयडी वरती पाठवावा.अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती संदर्भात संपूर्ण माहिती वाचावी. सदरील भरती ची माहिती खालील प्रमाणे.
- शिपिंग कार्पोरेशन ऑफ इंडिया ची भरती तीन जागांसाठी होणार आहे.
- सदरील भरती मध्ये करारा वरती सचिवीय अधिकारी पदासाठी उमेदवाराची नेमणूक करणे आहे.
SCI Bharti 2024 | शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया येथे भरतीसाठी शैक्षणिक पात्रता आणि वयाची अट खालील प्रमाणे
- [SCI Bharti 2024 ] शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया येथे सचिवीय अधिकारी या पदासाठी पात्र कंपनीचा सचिव असणे गरजेचे आहे त्याचप्रमाणे इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरी ऑफ इंडिया चे सदस्यत्व असणे गरजेचे आहे.
- सचिवीय अधिकारी या पदासाठी वय 1 फेब्रुवारी 2024 रोजी 32 वर्षाच्या आत पाहिजे.
- शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया च्या भरती द्वारे सचिवीय अधिकारी या पदी निवड होणाऱ्या उमेदवाराला मासिक वेतन 50000 रुपये. देण्यात येईल.
- शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया द्वारे निवड झालेल्या उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण हे मुंबई (महाराष्ट्र) असेल.
- या भरतीसाठी उमेदवाराकडून प्रवेश शुल्क घेण्यात येणार नाही.
- शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या संकेतस्थळावरती अर्ज करावा. अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.
- सदरील भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 12 मार्च 2024 ही शिपिंग कॉर्पोरेशन द्वारे देण्यात आलेली आहे.
- शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया द्वारे घेण्यात येणाऱ्या भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
- शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया द्वारे अर्ज करण्याची वेबसाईट दिली आहे. अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.
SCI Bharti 2024 | शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया येथील भरतीसाठी खालील नियम वाचा.
- शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया साठी अर्ज करताना ऑनलाइन पद्धतीने करावा.
- ऑफलाइन अर्ज करण्याची म्हणजेच पोस्टाने किंवा कुरियरने अर्ज करण्याची कोणतीही पद्धत शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया द्वारे राबवलेली नाही.
- जन्मतारीख, वय, स्वतःचे नाव, वडिलांचे नाव, संपूर्ण पत्ता, पिन कोड आणि स्वतःची वैयक्तिक माहिती अर्ज भरताना जर चुकली तर शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया जबाबदार राहणार नाही.
- 12 मार्च 2024 नंतर कोणत्याही उमेदवाराने अर्ज केला. तर तो ग्राह्य धरला जाणार नाही. त्याचप्रमाणे पोस्टाने आणि कुरियरने आलेले अर्ज सुद्धा ग्राह्य धरले जाणार नाहीत.
- प्रसिद्ध केलेली जाहिरात ही शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया द्वारेच प्रसिद्ध केलेली आहे का? हे उमेदवाराने पहावे. शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या संकेतस्थळावरून जाहिरात डाउनलोड करावी. ती जाहिरात काळजीपूर्वक वाचून उमेदवारांनी अर्ज करावा.
SCI Bharti 2024 | शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया येथील भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांनी खालील नियम वाचा.
- शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया येथील भरतीसाठी [ SCI Bharti 2024 ] फक्त अर्ज केलेले उमेदवार पात्र असतील.
- शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया द्वारे उमेदवाराला कोणत्याही प्रकारचा TA/DA देण्यात येणार नाही.
- शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया द्वारे भरतीमध्ये अनुचित प्रकार करणाऱ्या उमेदवारां वरती कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
- शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया च्या भरतीसाठी परीक्षा केंद्र हे शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ठरवेल. उमेदवाराने परीक्षेला येताना बरोबर हॉल तिकीट घेऊन येणे गरजेचे आहे.
- या भरतीसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेचे स्वरूप, एकूण गुण हे सर्व शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या संकेतस्थळावरती उपलब्ध आहे. उमेदवारांनी अर्ज करण्याअगोदर संकेतस्थळाला भेट द्यावी.
SCI Bharti 2024 | शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया येथील भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया खालील प्रमाणे.
- शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया येथील भरतीसाठी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया द्वारे देण्यात आलेल्या लिंक वरती प्रथम क्लिक करावी. अर्ज भरण्यासाठी येथे क्लिक करा.
- दिलेल्या लिंक वर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन विंडो ओपन होईल. त्यामध्ये डाव्या कोपऱ्यात निळ्या कलर मध्ये शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया चा लोगो दिसेल. तसेच शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड असे भाषेत लिहिलेले दिसेल. त्या पद्धतीने तुम्हाला ओपन झालेल्या पेजच्या मध्यभागी करंट रिक्रुटमेंट असे लिहिलेले दिसेल.
- करंट रिक्रुटमेंट च्या खाली तुम्हाला चार पर्याय दिसतील ते खालील प्रमाणे.
- Requirement of Secretarial officers on Contracts
- Requirement of Accounts Assistant on Contracts
- Requirement of Hindi Officers on Contracts
- Requirement of Master Mariners / Chief Engineers in Rank of Senior Manager
यातील Requirement of Secretarial officers on Contracts या पहिल्या पर्यायावर ती क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एडवर्टाइजमेंट आणि अप्लाय नाव अशी दोन निळी बटने पर्यायाच्या खाली दिसतील. त्यातील अप्लाय नाव वरती क्लिक करून अर्ज भरायला सुरुवात करा.
- अप्लाय नाव वरती क्लिक केल्यानंतर एक नवीन गुगल फॉर्म ओपन होईल. “Application form for Secretarial Officer on Contract (Advt. No. 02/2024)” असे हेडिंग त्या फॉर्मुला असेल. फॉर्म भरायला सुरुवात करताना सुरुवातीला चालू ईमेल आयडी भरावा. त्यानंतर स्वतःचे पूर्ण नाव भरावे. त्यानंतर जन्मतारीख फॉर्म मध्ये भरावी. जेंडर सिलेक्ट करावे. कायमस्वरूपी चा पत्ता फॉर्म मध्ये भरावा. कायमस्वरूपी च्या पत्त्या व्यतिरिक्त दुसरीकडे कोठे राहत असाल तर तो पत्ता लिहावा. स्वतःचा चालू मोबाईल नंबर अर्जामध्ये लिहावा, या मोबाईल नंबर व्यतिरिक्त अजून एक अल्टरनेट मोबाईल नंबर अर्जामध्ये भरावा, परत एकदा स्वतःचा मोबाईल नंबर आणि वैवाहिक स्टेटस क्लिक करून भरावा. आणि नेक्स्ट बटन वर क्लिक करावे.
- नेक्स्ट बटन वर क्लिक केल्यानंतर तुम्ही अर्ज भरायचा दुसऱ्या टप्प्यामध्ये पोहोचता. दुसऱ्या टप्प्यामध्ये तुम्हाला तुम्ही तुमच्या शिक्षण पूर्ण केलेले आहे ते भारतातून केले की बाहेरून केले. यासंदर्भात प्रश्न विचारला जातो यानंतर तुमचे शिक्षण पूर्ण झालेली तारीख तुम्हाला लिहायची आहे. शिक्षणामध्ये तुम्ही किती टक्के गुणांनी पास झाले आहात किती टक्केवारी लिहायची आहे. यानंतर प्रोफेशनल क्लियर यामधील यस किंवा नो हा ऑप्शन निवडायचा आहे. प्रोफेशनल कॉम्पिटिशन ची तारीख तुम्हाला यानंतर अर्जात भरायचे आहे. द इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरी येथे किती गुण मिळाले हे लिहायचे आहे. इन्स्टिट्यूटची मेंबरशिप कशी आहे याबद्दल माहिती भरायची आहे, असोसिएट मेंबरशिप ची तारीख भरायची आहे, फेलो मेंबरशिप ची तारीख भरायची आहे, किती वर्षाचा तुमचा अनुभव आहे हे लिहायचे आहे. तुमचे ग्रॅज्युएशन कम्प्लिट झाले आहे का हे लिहायचे आहे. ग्रॅज्युएशन कोणत्या क्षेत्रातून पूर्ण केले याबद्दलची माहिती लिहायची आहे. आणि जर अधिक काही माहिती असेल तर ती सुद्धा लिहायचे आहे. यानंतर नेक्स्ट बटन वरती क्लिक करायचे आहे.
- तुम्ही अर्ज भरायचे दोन टप्पे पूर्ण केलेले आहेत. आणि तिसरा टप्प्यामध्ये आलेला आहात. यामध्ये तुम्हाला तुम्ही केलेल्या प्रॅक्टिकल ट्रेनिंग संदर्भात माहिती विचारलेली आहे. सुरुवातीला ऑर्गनायझेशन चे नाव. किती तारखेपासून कोणत्या तारखेपर्यंत ऑर्गनायझेशन बरोबर काम केले तो कार्यकाळ. एका वर्षामध्ये किती काम केले आणि कोणत्या पदासाठी केले त्याची माहिती लिहायचे आहे. यानंतर तुम्हाला नेक्स्ट बटन वरती क्लिक करायचे आहे.
- वरती क्लिक केल्यानंतर तुम्ही अजून कोणत्या संस्थेमध्ये प्रॅक्टिकल ट्रेनिंग केलेली आहे सर्वात माहिती लिहू शकता. त्यानंतर तुम्ही कोणत्या संस्थेबरोबर काम केलेल्या चा अनुभव तुमच्याकडे आहे. या संस्थेचे नाव त्या संस्थेसोबत कधीपासून काम करायला सुरुवात केली. ती तारीख किती तारखेपर्यंत काम पूर्ण केले ती तारीख याचा तपशील भरायचा आहे. त्याचप्रमाणे कोणत्या पदावर काम केले त्या पदाचे नाव लिहायचे आहे. यानंतर नेक्स्ट बटन वरती क्लिक करून तुम्ही अर्ज भरायच्या शेवटच्या टप्प्यावर पोहोचता.
- अर्ज भरायचा शेवटच्या टप्प्यावर तुम्हाला कोणती डॉक्युमेंट अपलोड करायची आहेत. यासंदर्भातील माहिती सांगितलेली आहे. खालील डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करावी लागणार आहेत.
- एक्झिक्युटिव्ह ची संपूर्ण मार्कशीट
- प्रोफेशनल ची संपूर्ण मार्कशीट
- ISCI चा असोसिएट मेंबर असलेले चा पुरावा.
- ट्रेनी म्हणून काम केलेल्या पुरावा, इतर कोणत्या ठिकाणी काम केलेल्या एक्सपिरीयन्स असलेले प्रमाणपत्र.
- जन्माचा पुरावा असलेले कोणतेही कागदपत्र आधार कार्ड, पॅन कार्ड, शाळा सोडल्याचा दाखला, बर्थ सर्टिफिकेट इत्यादी
- वरील दिलेले डॉक्युमेंट उमेदवारांनी स्कॅन करून अपलोड करायचे आहेत. स्कॅन केलेल्या कागदपत्राची साईज हे 20MB पेक्षा जास्त नको आहे. उमेदवारांनी त्यांचा रिझ्युम shorerecruitment@sci.co.in या मेल आयडी वरती सेंड करायचा आहे.
- यानंतर अर्जामध्ये भरलेली सर्व माहिती बरोबर आहे आणि अर्जामधील अपलोड केलेले सर्व डॉक्युमेंट खरे आहेत. याचे सेल्फ डिक्लेरेशन उमेदवाराने द्यायचे आहे. नियम व अटी मान्य करून अर्ज सबमिट करायचा आहे.
- नवीन उमेदवारांनी अर्ज भरताना काळजीपूर्वक भरायचा आहे. जर तुम्हाला अर्ज भरताना काही अडचणी येत असतील किंवा अर्ज भरता येत नसेल तर तज्ञांकडून अर्ज भरून घ्यावा. अर्ज भरताना कोणत्याही प्रकारची चुकी होणार नाही याची काळजी घ्यावी.
- उमेदवाराने जर शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियासमोर चुकीची कागदपत्रे सादर केली किंवा मूळ कागदपत्रांमध्ये काही बदल करून अपलोड केली आणि कागदपत्रे पडताळणी वेळेस ही गोष्ट लक्षात आली. तर संबंधित उमेदवारावरती कायदेशीर कारवाई केली जाईल.
भारत सरकार मधील संस्था आणि महाराष्ट्र सरकारच्या संस्था या सरकारी संस्थांमधील विविध पदांसाठी निघालेल्या भरती साठी नोकरी 1st चा वेबसाईटला भेट द्या. – क्लिक करा.