Kolhapur Police Bharti 2024 | कोल्हापूर पोलीस येथे विविध पदांसाठी भरती.

Kolhapur Police Bharti 2024 | पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या युवकांसाठी आता आनंदाची बातमी आलेली आहे. कारण कोल्हापूर पोलीस विभागामार्फत 213 जागा पोलीस शिपाई व पोलीस शिपाई चालक या पदासाठी भरती निघालेली आहे. 31 मार्च 2024 ही कोल्हापूर पोलीस भरती साठी अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे. सदरील पोलीस भरतीची जाहिरात कोल्हापूर पोलिसांमार्फत प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तरी पात्र उमेदवारांनी जाहिरात वाचून अर्ज करावा. सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची पद्धत ऑनलाइन आहे. या भरतीसाठी लागणारी पात्रता खालील प्रमाणे.

Kolhapur Police Bharti 2024

  • कोल्हापूर पोलीस विभागाची भरती 213 पदांसाठी होणार आहे.
  • पोलीस शिपाई आणि पोलीस शिपाई चालक या पदांकरिता कोल्हापूर पोलीस भरती होणार आहे.

Kolhapur Police Bharti 2024 | कोल्हापूर पोलीस भरती साठी शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा खालील प्रमाणे.

  • पोलीस शिपाई आणि पोलीस शिपाई चालक या पदासाठी उमेदवाराची शैक्षणिक पात्रता 12 वी पास असली पाहिजे.
  • पोलीस शिपाई आणि पोलीस शिपाई चालक या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे 18 ते 28 वर्षापर्यंत पाहिजे. त्याचप्रमाणे मागास प्रवर्गातील उमेदवाराचे वय 18 ते 33 वर्षे पाहिजे. अपंग उमेदवारांना 18 ते 45 वर्षे वयाची अट राहील.
  • कोल्हापूर पोलीस विभागामार्फत घेण्यात येणाऱ्या भरती मधून निवडून येणाऱ्या उमेदवारांना नियमानुसार पगार दिला जाईल.
  • पोलीस शिपाई आणि पोलीस चालक पदावर ती नियुक्त झालेल्या उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण हे कोल्हापूर जिल्हा राहील.
  • या भरती करिता कोल्हापूर पोलीस विभागाकडून 450 रुपये परीक्षा शुल्क ठेवण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी 350 रुपये परीक्षा शुल्क आहे.
  • या भरतीसाठी जे उमेदवार इच्छुक आहेत त्यांनी अर्ज करण्याकरिता कोल्हापूर पोलीस विभाग यांच्याकडून देण्यात आलेल्या संकेतस्थळावरून ऑनलाइन अर्ज करावा. अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.
  • 31 मार्च 2024 ही कोल्हापूर पोलीस भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
  • उमेदवारांनी अर्ज करण्याकरिता घाई करू नये. कोल्हापूर पोलीस विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवाराने काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.  पोलीस शिपाई    पोलीस शिपाई चालक 
  • कोल्हापूर पोलीस विभागाद्वारे अर्ज करण्याकरिता ऑनलाइन लिंक दिलेली आहे. त्या लिंक वरती क्लिक करूनच सर्वांनी अर्ज भरावा. अर्ज भरण्यासाठी येथे क्लिक करा.

Kolhapur Police Bharti 2024 | कोल्हापूर पोलीस भरतीसाठी खालील नियम वाचा.

  • या भरती करिता उमेदवाराने ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरणे गरजेचे आहे.
  • कोल्हापूर पोलीस विभागाद्वारे कोणत्याही प्रकारची ऑफलाइन अर्ज भरण्याची पद्धत राबवली गेली नाही.
  • उमेदवारांनी अर्ज भरत असताना काळजीपूर्वक भरावा. अर्जामध्ये आपली शैक्षणिक पात्रता, नाव, आपली जन्मतारीख, वडिलांचे नाव, पत्ता, पिनकोड यांसारख्या वैयक्तिक माहिती काळजीपूर्वक भरावी. जर यातील कोणतीही माहिती चुकीची भरली गेली. तर त्याला कोल्हापूर पोलीस विभाग जबाबदार राहणार नाही.
  • कोल्हापूर पोलीस विभागाच्या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2023 आहे.
  • कोल्हापूर पोलीस विभागाद्वारे प्रसिद्ध केलेली जाहिरात अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी पहावी. आणि मगच अर्ज करावा.

Kolhapur Police Bharti 2024 | कोल्हापूर पोलीस भरती करिता अर्ज केलेल्या उमेदवारांनी खालील सूचना वाचाव्या.

  • कोल्हापूर पोलीस भरती करिता अर्ज केलेले उमेदवार असतील.
  • TA / DA कोल्हापूर पोलीस विभागाद्वारे कोणत्याही उमेदवाराला देण्यात येणार नाही.
  • पोलीस भरती मध्ये कोणत्याही उमेदवाराने अनुचित प्रकार करू नये. अनुचित प्रकार केलेल्या उमेदवारा वरती कोल्हापूर पोलीस विभागातर्फे कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
  • कोल्हापूर पोलीस विभागातर्फे शारीरिक चाचणीसाठी चे ठिकाण आणि लेखी परीक्षा साठी परीक्षा केंद्र ठरवण्यात येईल. उमेदवारांनी लेखी परीक्षेसाठी येताना हॉल तिकीट बरोबर घेऊन येणे बंधनकारक आहे.
  • कोल्हापूर पोलीस विभागातर्फे घेण्यात येणाऱ्या शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेचे स्वरूप हे संकेतस्थळावर दिलेले आहे. उमेदवारांनी परीक्षेचे स्वरूप आणि अभ्यासक्रम पाहुण्यांचा अर्ज करावा.
Kolhapur Police Bharti 2024 | कोल्हापूर पोलीस विभागाद्वारे घेण्यात येणाऱ्या भरतीतील पदांचे विवरण खालील प्रमाणे.
  • पोलीस अधीक्षक, कोल्हापुर यांच्या आस्थापनेवरील 154 रिक्त होणारी पोलीस शिपाई पदाची पदे. भरण्यासाठी भरती काढण्यात आलेली आहे. महाराष्ट्र पोलीस शिपाई ( सेवाप्रवेश) नियम 2011 याच्यात वेळोवेळी केलेल्या बदलानुसार ही भरती निघालेली आहे.
  • पोलीस शिपाई चालक पदासाठी 59 जागा शिल्लक आहेत. त्यासाठी कोल्हापूर पोलीस विभागाने भरती काढलेली आहे. महाराष्ट्र पोलीस उपनिरीक्षक चालक, पोलीस हवालदार चालक, पोलीस नाईक चालक व पोलीस शिपाई चालक ( सेवाप्रवेश) नियम 2011 आणि या नियमात वारंवार केलेला बदल दिनांक 23/06/ 2022 च्या आदेशानुसार ही भरती निघालेली आहे.
  • महत्त्वाची सूचना – कोल्हापूर पोलीस, विभागाद्वारे निघालेल्या भरती मध्ये उमेदवारांना पैशाची व अन्य कोणत्याही स्वरूपात मागणी करून त्याच्या बदल्यात निवड प्रक्रियेत सहकार्य करतो असे जर कोण आश्वासन देत असेल. तर त्याच्या विरोधात अँटी करप्शन ब्युरो, कोल्हापूर येथे त्वरित तक्रार करावी. तक्रार करण्यासाठी 0231-2540989 या भ्रमणध्वनी वरती संपर्क करावा. किंवा अध्यक्ष, पोलीस भरती समिती 2022-23 यांच्याशी संपर्क साधून तक्रार करावी.
Kolhapur Police Bharti 2024 | कोल्हापूर पोलीस भरती 2024 मध्ये पोलीस शिपाई चालक या पदासाठी आरक्षणानुसार पदांचे विवरण खालील प्रमाणे.
  • कोल्हापूर पोलीस भरती 2024 या भरतीमध्ये 59 पोलीस शिपाई चालक पदे भरण्यात येणार आहेत.
  • या भरतीमध्ये अनुसूचित जाती प्रवर्गासाठी एकूण आठ जागा रिक्त आहेत. त्यातील पाच जागा ह्या सर्वसाधारण गटासाठी आहेत. दोन जागा या महिलांसाठी आहेत. एक जागा ही माजी सैनिकांसाठी आहे.
  • अनुसूचित जाती करिता चार जागा आहेत. त्यातील दोन जागा या सर्वसाधारण गटासाठी आहेत. एक जागा ही महिलांसाठी आहे. एक जागा ही माजी सैनिकांसाठी आहे.
  • विमुक्त जाती – अ करिता दोन जागा आहेत. त्यातील एक जागा ही सर्वसाधारण करीत आहे. महिलांकरिता एक जागा आहे.
  • भटक्या जमाती – ब करिता दोन जागा आहेत. सर्वसाधारण गटाकरिता एक जागा आहे. महिला करिता एक जागा आहे.
  • भटक्या जमाती – क करिता दोन जागा आहेत. त्यातील महिलांकरिता एक जागा आहे आणि एक जागा सर्वसाधारण गटा साठी आहे.
  • भटक्या जमाती – ड साठी एक जागा आहे. ही एक जागा सर्वसाधारण गटा साठी आहे.
  • विशेष मागास वर्गासाठी एक जागा आहे. ही एक जागा सर्वसाधारण गटा साठी आहे.
  • इतर मागासवर्ग करिता 11 जागा आहेत. त्यातील दोन जागा सर्वसाधारण गटासाठी आहेत. महिलांसाठी तीन जागा आहेत. खेळाडूं करिता एक जागा आहे. प्रकल्पग्रस्तांसाठी एक जागा आहे. माजी सैनिकांसाठी दोन जागा आहेत. अंशकालीन पदवीधरांसाठी एक जागा आहे. गृहरक्षक दलासाठी एक जागा आहे.
  • एसईबीसी या प्रवर्गासाठी एकूण सहा जागा आहेत. त्यातील तीन जागा सर्वसाधारण करीत आहेत. दोन जागा महिलांकरिता आहेत. एक जागा माजी सैनिकां करीत आहे.
  • ईडब्ल्यूएस या प्रवर्गासाठी एकूण सहा जागा आहेत. त्यातील तीन जागा सर्वसाधारण करीत आहेत. दोन जागा महिलांकरिता आहेत. एक जागा माजी सैनिकां करीत आहे.
  • खुल्या वर्गासाठी 16 जागा आहेत. त्यातील पाच जागा सर्वसाधारण गटासाठी आहेत. पाच जागा महिलांकरिता आहेत. एक जागा खेळाडूसाठी आहे. एक जागा प्रकल्पग्रस्तांसाठी आहे. दोन जागा माजी सैनिकांसाठी आहेत. एक जागा अंशकालीन पदवीधरांसाठी आहे. एक जागा गृहरक्षक दलासाठी आहे.
  • एकूण या भरतीमध्ये 59 जागा रिक्त आहेत. त्यापैकी 25 जागा सर्वसाधारण गटासाठी आहेत. 18 जागा महिलांसाठी आहेत. दोन जागा खेळाडूंसाठी आहेत. दोन जागा प्रकल्पग्रस्तांसाठी आहेत. आठ जागा माजी सैनिकांसाठी आहेत. अंशकालीन पदवीधरांसाठी दोन जागा आहेत. गृहरक्षक दलातील उमेदवारांसाठी दोन जागा आहेत.
Kolhapur Police Bharti 2024 | कोल्हापूर पोलीस भरती 2024 मध्ये पोलीस शिपाई  या पदासाठी आरक्षणानुसार पदांचे विवरण खालील प्रमाणे.
  • कोल्हापूर पोलीस भरती 2024 येथे 154 जागा पोलीस शिपाई पदासाठी रिक्त आहेत.
  • अनुसूचित जाती प्रवर्गासाठी 20 जागा रिक्त आहेत. यातील सर्वसाधारण गटासाठी सहा जागा आहेत. महिलांसाठी सहा जागा आहे. खेळाडूंसाठी एक जागा आहे. प्रकल्पग्रस्त उमेदवारांसाठी एक जागा आहे. माजी सैनिकांसाठी तीन जागा आहेत. अंशकालीन पदवीधर उमेदवारांसाठी एक जागा आहे. पोलीस पाल्य उमेदवारांसाठी एक जागा आहे. गृहरक्षक दलासाठी एक जागा आहे.
  • अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी एकूण 17 जागा आहेत. त्यातील चार जागा या सर्वसाधारण गटासाठी आहेत. महिला उमेदवारांसाठी पाच जागा आहेत. खेळाडूं करिता एक जागा आहे. प्रकल्पग्रस्त उमेदवारांकरिता एक जागा आहे. माजी सैनिकां करिता तीन जागा आहेत. अंशकालीन पदवीधर उमेदवारा करिता एक जागा आहे. पोलीस पाल्य उमेदवारांकरिता एक जागा आहे. गृहरक्षक दल उमेदवारा करिता एक जागा आहे.
  • विमुक्त जाती वर्गाकरिता नऊ जागा आहेत. त्यातील पाच जागा सर्वसाधारण साठी आहेत. तीन जागा महिलांसाठी आहेत. एक जागा माजी सैनिकांसाठी आहे.
  • भटक्या जमाती – ब साठी एकूण दोन जागा आहेत. त्यातील एक जागा सर्वसाधारण गटासाठी आहे. आणि एक जागा महिलांसाठी आहे.
  • भटक्या जमाती – क साठी एकही जागा नाही.
  • भटक्या जमाती – ड साठी सहा जागा आहेत. त्यातील तीन जागा सर्वसाधारण गटासाठी आहेत. महिला साठी दोन जागा आहेत. माजी सैनिकांसाठी एक जागा आहे.
  • इतर मागास वर्गासाठी 87 जागा आहेत. त्यातील सर्वसाधारण गटासाठी 27 जागा आहेत. महिलांसाठी 26 जागा आहेत. खेळाडूंसाठी चार जागा आहेत. प्रकल्पग्रस्त उमेदवारांसाठी चार जागा आहेत. भूकंपग्रस्तांसाठी दोन जागा आहेत. माजी सैनिकां करिता 13 जागा आहेत. अंशकालीन पदवीधरांसाठी चार जागा आहेत. पोलीस पाल्यांसाठी तीन जागा आहेत. गृहरक्षक दलासाठी चार जागा आहेत.
  • एसईबीसी करता सात जागा आहेत. त्यातील सर्वसाधारण गटाकरिता चार जागा आहेत. महिलांसाठी दोन जागा आहेत. माजी सैनिकांसाठी एक जागा आहे.

पोलीस भरती, आर्मी भरती, नौदल भरती त्याचप्रमाणे भारत सरकार आणि महाराष्ट्र शासनाच्या संस्थांमधील सरकारी भरती संदर्भातील अपडेट्स मिळवण्याकरिता आमच्या नोकरी फर्स्ट या वेबसाईटला भेट द्या. भेट देण्यासाठी- येथे क्लिक करा.

Leave a Comment