डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ माहिती
[ डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ ] महाराष्ट्रातील हरितक्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांनी महाराष्ट्रात चार कृषी विद्यापीठांची स्थापना केली. त्या चार विद्यापीठांपैकी एक विद्यापीठ म्हणजे कोकण कृषी विद्यापीठ. याच विद्यापीठाला पुढे 12 फेब्रुवारी 2001 रोजी कै. डॉ. परशुराम कृष्णाजी उर्फ बाळासाहेब सावंत यांचे नाव देण्यात आले. सदरील विद्यापीठाची स्थापना 18 मे 1972 साली वसंतराव नाईक सरकारने केलेली होती. महाराष्ट्राच्या दापोली गावामध्ये सदरचे विद्यापीठ आहे. शेतकरी सक्षमीकरण आणि कृषी औद्योगीकरण ही उद्दिष्ट साध्य करण्यासाठी वसंतराव नाईक सरकारने या विद्यापीठाची स्थापना केलेली होती.
महाराष्ट्रातील असणारा कोकण विभाग हा त्याच्या भौगोलिक स्थितीमुळे इतर महाराष्ट्रातील विभागा पेक्षा वेगळा समजला जातो. अरबी समुद्र आणि सह्याद्रीची पर्वतरांग या दोन्हीच्या मध्ये कोकण विभाग स्थित आहे. त्यामुळे येथील शेतीसाठी असणारे हवामान, माती, पिके, पीक पद्धती यामध्ये महाराष्ट्रातील इतर भागांपेक्षा तफावत आढळते. त्यामुळे येथे शेतीविषयक विविध समस्या निर्माण झाल्या होत्या. त्या सोडवण्यासाठीच महाराष्ट्र सरकारने 18 मे 1972 साली कोकण कृषी विद्यापीठाची स्थापना केली. याचे मुख्य उद्दिष्ट शिक्षण, विविध जागांवरील भूभागाचा अभ्यास करणे, शेतीविषयक समस्या शोधणे आणि त्यांचे निवारण करणे, पीक उत्पादनामध्ये विविध तंत्रज्ञानांचा सहभाग करून घेणे आणि शेतकऱ्यांना मदत करणे हे होते.
डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ यांच्या संकेतस्थळाला भेट द्या.
कै. डॉ. परशुराम कृष्णाजी सावंत यांच्या विषयी माहिती
कै. डॉ. परशुराम कृष्णाजी उर्फ बाळासाहेब सावंत यांचा जन्म 8 जून 1908 रोजी झाला. त्यांनी बी.ए ( ओनर्स ) बी.ए.एल.एल.बी हे शिक्षण पूर्ण केले. सन 1942 रोजी झालेल्या भारत छोडो आंदोलनात त्यांचा सहभाग होता. सन 1960 ते 1972 यादरम्यान त्यांनी महाराष्ट्र सरकारच्या विविध खात्यांमध्ये मंत्रिपद भूषवलेले आहे. त्यांना महाराष्ट्र राज्यातील कृषी विद्यापीठाचे जनक म्हणून ओळखले जाते. सन 1972 मध्ये कृषी विद्यापीठ, दापोली च्या स्थापनेमध्ये त्यांचा मोठा वाटा होता. सन 1985 मध्ये त्यांना विद्यापीठाकडून डॉक्टर पदवी देण्यात आली. 11 मे 1992 रोजी त्यांचा स्वर्गवास झाला.
डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ अंतर्गत खालील महाविद्यालय येतात.
- कॉलेज ऑफ ॲग्रीकल्चर, दापोली, तालुका – दापोली, जिल्हा – रत्नागिरी.
- कॉलेज ऑफ फॉरेसट्री, दापोली, तालुका – दापोली, जिल्हा – रत्नागिरी.
- कॉलेज ऑफ हॉर्टीकल्चर, मुळदे, तालुका- कुडाळ, जिल्हा – सिंधुदुर्ग
- PGI ऑफ पोस्ट हार्वेस्ट मॅनेजमेंट, किल्ला- रोहा, जिल्हा – रायगड.
- कॉलेज ऑफ हॉर्टिकल्चर, दापोली, जिल्हा- रत्नागिरी.
- कॉलेज ऑफ ॲग्रीकल्चर, सांगुळवाडी, तालुका – वैभववाडी, जिल्हा – सिंधुदुर्ग.
- कॉलेज ऑफ ॲग्रीकल्चर, सरळगाव, तालुका- मुरबाड, जिल्हा – ठाणे.
- कॉलेज ऑफ ॲग्रीकल्चर, किर्लोस, तालुका – कुडाळ, जिल्हा – सिंधुदुर्ग.
- शरदचंद्रजी पवार कॉलेज ऑफ ॲग्रीकल्चर, खरवाटे – दहिवली, तालुका- चिपळूण, जिल्हा- रत्नागिरी.
- कॉलेज ऑफ ॲग्रीकल्चर, मंडकी- पालवन, तालुका- चिपळूण, जिल्हा – रत्नागिरी.
- कॉलेज ऑफ ॲग्रीकल्चर, फोडा घाट, तालुका – कणकवली, जिल्हा – सिंधुदुर्ग.
- कॉलेज ऑफ ॲग्रीकल्चर, मोहोप्रे, तालुका – महाड, जिल्हा – रायगड.
- एस.एस. पाटील कॉलेज ऑफ ॲग्रीकल्चरल बिझनेस मॅनेजमेंट, कर्नाळा स्पोर्ट अकॅडमी, HOC कॉलनी नजीक, जुना ठाणे नाका, पनवेल
- कॉलेज ऑफ ॲग्रीकल्चरल बिझनेस मॅनेजमेंट, किर्लोस, तालुका – कुडाळ, जिल्हा- सिंधुदुर्ग.
- शरदचंद्रजी पवार कॉलेज ऑफ फूड टेक्नॉलॉजी, खरवते – दहीवली, तालुका – चिपळूण, रत्नागिरी.
- कॉलेज ऑफ फूड टेक्नॉलॉजी, सरळ गाव, तालुका – मुरबाड, जिल्हा- ठाणे.
- कॉलेज ऑफ फूड टेक्नॉलॉजी, सांगुळवाडी, तालुका – वैभववाडी, जिल्हा – सिंधुदुर्ग.
- कॉलेज ऑफ फूड टेक्नॉलॉजी, मोहोप्रे, तालुका – महाड, जिल्हा – रायगड.
- कॉलेज ऑफ ॲग्री, बायो टेक्नॉलॉजी,सांगुळवाडी, तालुका – वैभववाडी, जिल्हा – सिंधुदुर्ग.
- कॉलेज ऑफ ॲग्री, बायो टेक्नॉलॉजी,मोहोप्रे, तालुका – महाड, जिल्हा – रायगड.
डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ पदाधिकारी.
डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू ‘श्री. सी. पी. राधाकृष्णन’ हे आहेत. ‘कुलगुरू डॉ. संजय भावे’ हे आहेत. या विद्यापीठाचे प्रो चान्सलर ‘ श्री. धनंजय मुंडे ‘ हे आहेत. धनंजय मुंडे हे महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री आहेत. तर श्री. सी. पी. राधाकृष्णन हे महाराष्ट्र राज्याचे गव्हर्नर आहेत.