MSRTC Bharti 2024 | महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळ येथे भरती

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

MSRTC Bharti 2024 | महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळ येथे भरती निघालेली आहे. सदरील भरतीसाठी वृत्तपत्रांमध्ये महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळ यांच्याद्वारे जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. 18 मार्च 2024 ही सदरील भरती करिता अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे. समुपदेशक या पदाकरिता उमेदवाराची आवश्यकता असल्यामुळे सदरील भरती निघालेली आहे. या भरती करिता उमेदवाराने ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. त्यासाठी प्रसिद्ध केलेली जाहिरात उमेदवाराने काळजीपूर्वक वाचावी. त्याचप्रमाणे इच्छुक उमेदवारांनी खालील माहिती वाचा.

MSRTC Bharti 2024

  • महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळ येथील भरती तीन जागांकरिता होणार आहे.
  • समुपदेशक या पदाकरिता महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळ येथे जागा रिक्त आहे.

MSRTC Bharti 2024 | महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ येथील भरती करिता आवश्यक पात्रता आणि अटी खालील प्रमाणे.

  • समुपदेशक या पदाकरिता अर्ज करणाऱ्या उमेदवारांची मान्यताप्राप्त विद्यापीठाची / संस्थेची समाजकार्य या विषयांमधील पदव्युत्तर पदवी MSW असणे गरजेचे आहे. किंवा मानसशास्त्र या प्रमुख विषयातील कला शाखेची पदव्युत्तर पदवी (M.A.Psychology) किंवा समुपदेशन मानसशास्त्र विषयातील पदविका Advance Diploma in Psychology असणे गरजेचे आहे.
  • समुपदेशक या पदाकरिता उमेदवाराने समुपदेशन क्षेत्रामध्ये दोन वर्षाचा अनुभव सरकारी/ निमसरकारी/ खाजगी क्षेत्रामधून मिळवलेला पाहिजे.
  • समुपदेशक या पदाकरिता वयाची अट पाहण्यासाठी मूळ जाहिरात वाचा.
  • समुपदेशक पदाकरिता 4000 रुपये मासिक मानधन मिळेल.
  • सदरील भरती मधून समुपदेशक पदावरती निवड झालेल्या उमेदवारासाठी नोकरीचे ठिकाण सातारा असेल.
  • महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, सातारा येथील भरती करिता शुल्क नाही.
  • भरतीसाठी पात्र असलेल्या उमेदवारांनी व सर्व अटी मान्य असलेला उमेदवाराने जाहिरातीमधील पत्त्यावरती आपला अर्ज पत्राद्वारे पाठवावा.
  • महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या सातारा येथील भरतीसाठी पत्राद्वारे अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख 18 मार्च 2024 आहे.
  • महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या सातारा येथील भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी प्रसिद्ध केलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
  • सदरील भरती करिता उमेदवारांनी आपला अर्ज “विभाग नियंत्रक यांचे कार्यालय, म.रा.मा.प. महामंडळ विभागीय कार्यालय, बस स्थानकाजवळ सेव्हन स्टार बिल्डिंगच्या पाठीमागे, रविवार पेठ सातारा – 415001.” या पत्त्यावर पाठवावा.

MSRTC Bharti 2024 | महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, सातारा येथील भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खालील सूचना पहाव्या.

  •  महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ सातारा यांच्यामार्फत दिलेल्या पत्त्यावरती उमेदवाराने ऑफलाइन पद्धतीने अर्ज पाठवायचा आहे.
  •  ऑनलाइन अर्ज करण्याची पद्धत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळ यांच्याद्वारे राबवलेली नाही.
  •  उमेदवाराने अर्ज करत असताना अर्जामधील स्वतःची माहिती जसे की स्वतःचे संपूर्ण नाव, शैक्षणिक पात्रता, वडिलांचे नाव, जन्मतारीख, अनुभव यांसारख्या गोष्टी अर्जामध्ये काळजीपूर्वक आणि खात्रीशीर लिहायचे आहेत. यातील एक ही गोष्ट चुकीची आढळली तर त्याला जबाबदार महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळ जबाबदार राहणार नाही.
  •  18 मार्च 2024 ही समुपदेशक पदाकरिता अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  •  समुपदेशक पदाकरिता अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी महामंडळाद्वारे प्रसिद्ध केलेली काळजीपूर्वक वाचावी

 MSRTC Bharti 2024 | महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, सातारा येथील भरती करिता अर्ज केलेल्या उमेदवारांनी खालील सूचना वाचाव्या.

  • समुपदेशक पदाकरिता ज्या उमेदवारांनी अर्ज केला आहे. त्या उमेदवारांमधूनच समुपदेशक पद निवडले जाईल. बाहेरच्या उमेदवारांना संधी दिली जाणार नाही.
  • महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, सातारा यांच्याद्वारे कोणत्याही प्रकारचा TA/DA उमेदवाराला दिला जाणार नाही याची नोंद उमेदवारांनी घ्यावी.
  • सदरील भरती मध्ये रिक्त पदावरती निवड व्हावी याकरिता उमेदवाराकडून कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार केला गेला तर त्या उमेदवारावरती महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन, मंडळ यांच्याद्वारे कायदेशीर कारवाई केली जाईल.
  • सदरील भरती मधील समुपदेशक पद निवडण्याची प्रक्रिया पूर्णपणे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळ, सातारा यांच्याद्वारे ठरवण्यात येईल.
  • सदरील भरतीसाठी अधिक माहिती मिळवण्याकरिता उमेदवाराने जाहिरातीत दिलेल्या संकेतस्थळाला भेट द्यावी.
MSRTC Bharti 2024 | महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळ, सातारा यांनी सांगितलेल्या सूचना खालील प्रमाणे.
  • सदरील भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांची राज्य परिवहन मंडळाच्या सातारा शाखेमध्ये समुपदेशक म्हणून नेमणूक केली जाईल. सदरील उमेदवाराची नेमणूक मानद तत्त्वावर करण्यात येणार आहे. त्याकरिता उमेदवाराला महिना 4000 रुपये इतका पगार देण्यात येणार आहे. मानत स्वरूपाची नेमणूक ही फक्त एक वर्षाकरिता असणार आहे. त्यानंतर उमेदवाराचे काम पाहून त्या उमेदवाराला कामावर ठेवायचे की नाही ते ठरवले जाईल.
  • महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, सातारा येथील आगारामध्ये उमेदवाराला महिन्यातून किमान तीन वेळा भेट द्यायची आहे. एसटी कर्मचारी प्रामुख्याने चालक आणि वाहक यांच्याशी संवाद साधून त्यांचे मानसिक आरोग्य समजून घ्यायची आहे आणि त्यानुसार त्यांना समुपदेश करायचा आहे. त्यांच्या समस्या वैयक्तिक पातळीवर समजून घेऊन दूर होत असतील तर कराव्या अन्यथा ज्येष्ठ अधिकाऱ्यांची चर्चा करून उपचारासाठी पुढील पाऊल उचलावे.
  • सदरील समुपदेशक पदाची नेमणूक केवळ मानद तत्त्वावर आहे. समुपदेशकाचा कार्यकाळ आवश्यकतेनुसार आगाराकडून वाढवला जाईल. जर समुपदेशकाची आवश्यकता नसेल तर सदरील नेमणूक रद्द होऊ शकते. सदरील नेमणूक ही मानद तत्त्वावर असल्यामुळे नियुक्त उमेदवाराला राज्य परिवहन मंडळाचे कोणत्याही स्वरूपाचे लाभ मिळणार नाही. किंवा यापुढे त्याला सेवेमध्ये कायमस्वरूपी घेता येणार नाही. एखाद्या विशिष्ट परिस्थितीमध्ये समुपदेशक पद रद्द केले जाऊ शकते.
  • ज्या पात्र उमेदवारांना आणि ज्या उमेदवारांना अटी मान्य आहेत अशा उमेदवारांनी अर्ज करण्यासाठी फुलस्केप कागदावरती स्वतःचा अर्ज टंकलिखित करायचा आहे. त्याचप्रमाणे स्वतःचा पासपोर्ट साईज फोटो अर्जाच्या उजव्या कोपऱ्यात लावायचा आहे. फोटोवर सही करायची आहे. त्याचबरोबर उमेदवाराचे दहावीचे बोर्ड सर्टिफिकेट, शाळा सोडल्याचा दाखला, आणि इतर आवश्यक प्रमाणपत्रे, मार्कशीट आणि कागदपत्रे उमेदवारांनी सत्यप्रत करून अर्जासोबत जोडायचे आहेत. हा अर्ज उमेदवाराने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यांच्या सातारा येथील आगारामध्ये 18 मार्च 2024 च्या अगोदर जमा करायचा आहे.
  • अर्ज पोहोचवण्याचा पत्ता – विभाग नियंत्रक यांचे कार्यालय, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ विभागीय कार्यालय, बस स्थानकाजवळ सेव्हन स्टार बिल्डिंग च्या पाठीमागे, रविवार पेठ, सातारा- 415 001
MSRTC Bharti 2024 | महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळ यांच्या संदर्भात माहिती खालील प्रमाणे.

महाराष्ट्र राज्यातील प्रवाशांची वाहतूक करण्याकरिता सेवा पुरवणाऱ्या संस्थेचे नाव महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ असे आहे. ही संस्था राज्य शासनाची आहे. महाराष्ट्र मधील जनतेमध्ये या संस्थेद्वारे चालवणे जाणारे वाहन एसटी हे प्रसिद्ध आहे. 1932 रोजी खाजगी व्यावसायिकाकडून प्रवाशांची वाहतूक करणे सुरू झाले होते. पण खाजगी व्यावसायिक कोणत्याही पद्धतीचे नियम पाळत नसत. एकूण 1947 रोजी भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर 1948 रोजी बॉम्बे स्टेट रोड ट्रान्सपोर्टेशन कॉर्पोरेशन या संस्थेची स्थापना झाली.

या कंपनीचे काम प्रवाशांची सार्वजनिक वाहतूक करणे हे होते. त्यामुळे याबद्दलचे सर्व हक्क या संस्थेला देण्यात आले. पुणे ते अहमदनगर या मार्गावरती बॉम्बे स्टेट रोड कॉर्पोरेशनची पहिली बस एक जून 1948 रोजी सुरू झाली. यानंतर भाषेवर प्रांतरचनेनुसार महाराष्ट्र हा स्वतंत्र प्रांत झाला आणि त्यानंतर बीएसआरटीसी चे रूपांतर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ या संस्थेमध्ये झाले.

“गाव तिथे एसटी आणि रस्ता तिथे एसटी” हे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे ब्रीदवाक्य आहे. महाराष्ट्र मध्ये एकूण एसटीचे 31 विभाग आहेत. या 31 विभागांमार्फत एसटीचे कामकाज पाहिले जाते. महाराष्ट्रातील सर्व गावा बरोबर तर राज्यात सुद्धा वाहतूक सुविधा महामंडळाद्वारे दिल्या जातात. ही राज्य म्हणजे गुजरात, मध्य प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा, आणि गोवा या राज्यांचा समावेश आहे.

आज जर आपण एसटी महामंडळाकडे असणाऱ्या वाहनांची संख्या मोजली तर ती 15,512 इतकी वाहने आहेत. या वाहनांमध्ये साध्या बसगाड्या, शहर बस गाडी, शिवशाही सीटर, साधी स्लीपर, शिवनेरी अश्वमेध, मेडी बस, मानव विकास बस, शिवाई बस यासारख्या विविध बसेसचा समावेश आहे. तर चला पाहूया कोणत्या गाड्यांची संख्या किती आहे.

  1. साध्या बसगाड्यांची संख्या 12,700 एवढी आहे.
  2. महामंडळाकडे शहर बस गाड्या एकूण 100 आहेत.
  3. निम आराम बस गाड्यांची संख्या 450 आहे.
  4. 1070 बसेस शिवशाही सीटर च्या आहेत.
  5. साध्या स्लीपर च्या बसेस 200 आहेत.
  6. 110 बसेस शिवनेरी अश्वमेध च्या आहेत.
  7. मिडी बस एकूण 30 आहेत.
  8. मानव विकास बसेस ची संख्या 850 आहे.
  9. शिवाई बस ची संख्या फक्त दोन आहे.

MSRTC Bharti 2024

प्रत्येक टप्प्यावरती महामंडळाने बसेस मध्ये सुधारणा केलेली आहे. आजकालच्या काळात प्रसिद्ध असणाऱ्या निम आराम बसेस सुद्धा महामंडळाने यांसाठी उपलब्ध करून दिलेले आहेत. महामंडळाने 2002 रोजी अश्वमेध ही बस सुरू केली आहे. या बसचा मार्ग म्हणजे दादर ते पुणे एवढा होईल. त्यापुढे महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये ही बस चालू लागली. या संस्थेची आज एकूण उलाढाल 4370 कोटी इतकी होते. तर त्यामधून निव्वळ नफा 70 कोटी इतका राहतो. प्रवाशांना सेवा देण्यासाठी एसटी महामंडळाचे एकूण 1,07000 एवढे कर्मचारी रोज काम करत असतात. ज्यावेळेस एसटी ची स्थापना झाली त्यावेळेस महाराष्ट्र मध्ये मुंबई प्रांत सरकार हे होते. आज एसटीचा मालकी हक्क महाराष्ट्र शासनाकडे आहे. प्रवाशांच्या सेवेसाठी आज संपूर्ण महाराष्ट्रात एसटी सदैव तत्पर असते.

एसटी महामंडळावरती एकूण 17 संचालक आहेत. आणि एक अध्यक्ष आहे. अध्यक्ष कोणाला करायचं याच्यासाठी निवडणूक होत नाही. तर महाराष्ट्र राज्याचा परिवहन मंत्री एसटी महामंडळाचे अध्यक्ष असतो. या मंडळाचा उपाध्यक्ष हा प्रशासकीय सेवेतील एखादा अधिकारी असतो. सध्या एसटी महामंडळाचे अध्यक्ष माननीय एकनाथ शिंदे आहेत. तर उपाध्यक्ष माधव कुसेकर आहेत.

सरकारी, निमसरकारी आणि खाजगी भरती मधील नोकरीचे सर्व अपडेट्स मिळवण्याकरिता आमच्या नोकरी 1st या वेबसाईटला नक्की भेट द्या. भेट घेण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a Comment