Central Bank of India Bharti 2024 | सेंट्रल बँक ऑफ इंडिया येथे भरती.

Central Bank of India Bharti 2024 | सेंट्रल बँक ऑफ इंडिया येथे नवीन भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात सेंट्रल बँक ऑफ इंडिया द्वारे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. 27 मार्च 2024 ही सेंट्रल बँक ऑफ इंडिया भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. सदरील भरती मध्ये अप्रेंटिस या पदाकरिता जागा भरायच्या आहेत. भरतीसाठी इच्छुक आणि पात्रता धारक उमेदवाराने ऑनलाइन अर्ज करायचे आहेत. सेंट्रल बँक ऑफ इंडिया द्वारे प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवाराने काळजीपूर्वक वाचावी आणि त्यानंतरच अर्ज करावा. सदरील भरती करिता अर्ज करण्यासाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी खालील दिलेली संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचावी.

Central Bank of India Bharti 2024

 • सेंट्रल बँक ऑफ इंडिया येथील भरती 3000 रिक्त जागा भरण्याकरिता होणार आहे.
 • सेंट्रल बँक ऑफ इंडिया येथे अप्रेंटिस पदाचा उमेदवार कामासाठी पाहिजे आहे त्यासाठी सदरील ची भरती होणार आहे.

Central Bank of India Bharti 2024 | सेंट्रल बँक ऑफ इंडिया येथील भरतीसाठी च्या पदाची शैक्षणिक पात्रता आणि अटी खालील प्रमाणे.

 • सदरील भरती मध्ये अप्रेंटिस या पदाकरिता अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे कोणत्याही शाखेतील पदवी पाहिजे.
 • सेंट्रल बँक ऑफ इंडिया येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 31 मार्च 2024 रोजी 20 वर्षे ते 28 वर्षे पाहिजे. SC/ST प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी पाच वर्षे सूट राहील. त्याचप्रमाणे OBC प्रवर्गाच्या उमेदवारांकरिता तीन वर्ष सूट राहील.
 • सेंट्रल बँक ऑफ इंडिया येथील भरती मधून निवडून येणाऱ्या 3000 अप्रेंटिस करिता नियमानुसार पगार राहील.
 • अप्रेंटिस पदाकरिता सेंट्रल बँक ऑफ इंडिया येथे निवड झालेल्या उमेदवारांकरिता नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत असेल.
 • सदरील भरती करिता परीक्षा शुल्क 800 रुपये आहे. तर SC/ST कॅटेगरी साठी आणि महिलांसाठी शुल्क 600 रुपये आहे. उमेदवारांकरिता परीक्षा शुल्क 400 रुपये आहे.
 • सदरील भरती करिता उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरायचा आहे. अर्ज भरण्याकरिता येथे क्लिक करा.
 • नॅशनल अप्रेंटिस ट्रेनिंग स्कीम च्या अंतर्गत सदरील सेंट्रल बँक ऑफ इंडिया मधील भरती होत आहे तरी उमेदवारांनी यासाठी अर्ज करावा. अर्ज करा.
 • सदरील भरती करिता सेंट्रल बँक ऑफ इंडिया द्वारे जाहिरात प्रसिद्ध केली आहे. जाहिरात पहा.

Central Bank of India Bharti 2024 | सेंट्रल बँक ऑफ इंडिया येथील अप्रेंटिस पदाकरिता इच्छुक उमेदवारांसाठी सूचना खालील प्रमाणे.

 • सेंट्रल बँक ऑफ इंडिया येथील अप्रेंटिस पदाकरिता ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
 • सदरील भरती करिता ऑफलाइन अर्ज करण्याची कोणती पद्धत सेंट्रल बँक ऑफ इंडिया द्वारे राबवण्यात आलेली नाही.
 • अप्रेंटिस पदाकरिता ऑनलाइन अर्ज भरत असताना उमेदवारांनी स्वतःची पूर्ण माहिती शिक्षण, जन्मतारीख, नाव, वडिलांचे नाव, विद्यापीठाचे नाव, पासिंग इयर या सर्व गोष्टी काळजीपूर्वक भरायचे आहेत. जर यामध्ये भरताना काही चूक झाली आणि अर्ज बाद झाला. तर त्याला सेंट्रल बँक ऑफ इंडिया चा ऑफर राहणार नाही.
 • 27 मार्च 2024 ही अप्रेंटिस पदाकरिता अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
 • अप्रेंटिस पदाकरिता अर्ज करण्यापूर्वी सर्व उमेदवारांनी सेंट्रल बँक ऑफ इंडिया द्वारे प्रसिद्ध केलेली जाहिरात पहावी.

Central Bank of India Bharti 2024 | सेंट्रल बँक ऑफ इंडिया येथील अप्रेंटिस पदाकरिता अर्ज केलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना खालील प्रमाणे.

 • अप्रेंटिस पदाकरिता अर्ज केलेल्या उमेदवारांची निवड सेंट्रल बँक ऑफ इंडिया द्वारे करण्यात येईल.
 • सेंट्रल बँक ऑफ इंडिया कडून कोणत्याही प्रकारचा TA/DA अर्ज करणाऱ्या उमेदवाराला देण्यात येणार नाही.
 • सदरील भरती मध्ये अप्रेंटिस पदावरती नियुक्ती व्हावी याकरिता जर उमेदवाराकडून कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार केला गेला तर त्या उमेदवारा वरती सेंट्रल बँक ऑफ इंडिया द्वारे कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
 • सदरील भरती करिता पात्र उमेदवारांची नेमणूक नॅशनल अप्रेंटिस ट्रेनिंग स्कीम आणि सेंट्रल बँक ऑफ इंडिया यांच्याद्वारे करण्यात येईल.
 • अप्रेंटिस पदाकरिता आवश्यक पात्रता त्याचप्रमाणे कामासंदर्भात तील संपूर्ण माहिती सेंट्रल बँक ऑफ इंडिया च्या संकेतस्थळावरती दिलेली आहे. तरी उमेदवारांनी ती पहावी.
Central Bank of India Bharti 2024 | सेंट्रल बँक ऑफ इंडिया येथील अप्रेंटिस पदाकरिता नियुक्त होण्यापूर्वी खालील माहिती वाचा.
 • सेंट्रल बँक ऑफ इंडिया [ Central Bank of India Bharti 2024 ]  ही भारतातील पब्लिक सेक्टर मधील एक महत्त्वाची बँक आहे. 45000 हून अधिक शाखा सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या भारतामध्ये आहेत. सेंट्रल बँक ऑफ इंडिया चा वार्षिक उलाढाल 6 लाख कोटी इतकी आहे. एकूण 31 हजार पेक्षा जास्त कर्मचारी या संस्थेमध्ये काम करत आहेत. 1911 रोजी या बँकेची स्थापना झाली होती.
 • प्रशिक्षणार्थी कायदा, 1961 याच्या अंतर्गत वर्ष 2024-25 करिता प्रशिक्षणार्थी पदाच्या जागा रिक्त आहेत.
 • निवड करण्यात आलेले अप्रेंटिस पदाचे उमेदवार यांना बँकेच्या वेगवेगळ्या शाखा, वेगवेगळे विभाग आणि विविध रीजन मध्ये नेमणूक केली जाईल.
 • सदरील भरती मध्ये जाहिरातीमध्ये दाखवण्यात आलेली अप्रेंटिस पदाच्या जागा प्रत्येक बँकेच्या गरजेनुसार कमी जास्त होऊ शकतात. ही गोष्ट उमेदवारांनी लक्षात ठेवावी.
 • राखीव प्रवर्गातून अप्रेंटिस पदाकरिता अर्ज करणारा उमेदवार खुल्या वर्गातून अर्ज करू शकतो. पण खुल्या वर्गातील उमेदवार राखीव प्रवर्गातून अर्ज करू शकत नाही. राखीव प्रवर्गाचा कट ऑफ कमी लागण्याची शक्यता आहे.
 • उमेदवाराची निवड झाल्यानंतर त्याच्याकडे मेडिकल सर्टिफिकेट असणे गरजेचे आहे. त्याचबरोबर त्याच्या इतर कागदपत्रांची पडताळणी केली जाईल. जातीचा दाखला तपासला जाईल. उमेदवाराचे पोलीस वेरिफिकेशन केले जाईल.
 • पात्र उमेदवारांनी स्वतः शारीरिक दृष्ट्या आणि मानसिक दृष्ट्या सुदृढ असलेल्या चे प्रमाणपत्र एमबीबीएस डॉक्टरांकडूनच घ्यावे. किंवा याबाबत अधिक माहिती सेंट्रल बँक ऑफ इंडिया उमेदवारांना देईल.
Central Bank of India Bharti 2024 | सेंट्रल बँक ऑफ इंडिया येथील भरतीसाठी पात्रता खालीलप्रमाणे.
 • अर्ज करणारा उमेदवार भारताचा नागरिक असावा.
 • नेपाळ भूतान आणि तिबेट येथील उमेदवार 1 जानेवारी 1962 च्या आधी भारतामध्ये येऊन कायमस्वरूपी राहिलेला असावा.
 • उमेदवाराकडे भारत सरकारचे एलिजिबिलिटी प्रमाणपत्र असावे.
 • पाकिस्तान, बर्मा, श्रीलंका, केनिया, युगांडा, टांझानिया, जांबिया, मालावी, जायरे, इथोपिया, व्हिएतनाम या देशातील भारतीय वंशाचे लोक जर कायमस्वरूपी भारतामध्ये होण्यासाठी आले असतील तर त्यांच्याकडे भारत सरकारचे प्रमाणपत्र असले पाहिजे तरच उमेदवारांना या भरतीमध्ये सहभागी होता येईल.
 • सदरील भरती करिता अर्ज करणाऱ्या उमेदवाराची जन्मतारीख 1-04-1996 ते 31-03-2004 यादरम्यान पाहिजे. राखीव प्रवर्गातील उमेदवार, अपंग उमेदवार, महिला उमेदवार यांच्यासाठी सूट देण्यात आलेली आहे.
 • केंद्र शासनाद्वारे मान्यताप्राप्त असलेल्या विद्यापीठ आणि महाविद्यालयातून उमेदवाराने पदवी मिळवलेली असणे गरजेचे आहे. उमेदवार 31-03-2020 नंतर पास होणे गरजेचे आहे.
 • उमेदवाराने स्वतःला https://nats.education.gov.in/ या संकेतस्थळावरती रजिस्टर करायचे आहे. ज्या उमेदवारांनी अर्ज भरताना स्वतःची प्रोफाइल 100% भरलेली आहे अशाच उमेदवारांना निवड प्रक्रियेमध्ये सहभागी होता येईल.
 • अप्रेंटिस पदाकरिता निवड झालेल्या उमेदवाराचे नोकरीचे ठिकाण त्याने सिलेक्ट केलेल्या रिजन नुसार आणि शाखांमध्ये रिक्त पदानुसार ठरणार आहे.
 • अर्ज करणाऱ्या उमेदवारांपैकी ज्या उमेदवाराचे शिक्षण झाल्यानंतर एक वर्ष किंवा त्याहून अधिक काळ नोकरी केलेली आहे आशा उमेदवाराला या भरती करिता अर्ज करता येणार नाही.
 • उमेदवाराने याच्या अगोदर सेंट्रल बँक ऑफ इंडिया येथे अप्रेंटिस म्हणून काम केले असेल. किंवा नॅशनल अप्रेंटिस ट्रेनिंग स्कीम या योजनेअंतर्गत अप्रेंटिस म्हणून काम केले असेल तर त्या उमेदवाराला सदरच्या भरतीमध्ये अर्ज करता येणार नाही.
 • अप्रेंटिस म्हणून काम करणाऱ्या कोणत्याही उमेदवाराला बँकेमधील पदावरती स्वतःचा कायम स्वरूपाचा हक्क सांगता येणार नाही. याची नोंद उमेदवारांनी घ्यावी.
 • अप्रेंटिस म्हणून काम करण्याचा कालावधी संपल्यानंतर उमेदवार बँकेतील रिक्त पदांसाठी कायमस्वरूपी नोकरी करिता अर्ज करू शकतो. याबाबत बँकेचा कोणताही प्रतिबंध नाही.
 • अप्रेंटिस पदाकरिता अर्ज केलेल्या उमेदवाराला निवड प्रक्रियेमधून जावे लागणार आहे. निवडक प्रक्रियेचा पहिला भाग ही ऑनलाइन लेखी परीक्षा असणार आहे. आणि दुसरा भाग म्हणजे स्थानिक भाषा उमेदवाराला येते याचा पुरावा सादर करण्याबाबत आहे.
 • ऑनलाइन रिटन एक्झाम ही एकूण पाच भागांमध्ये विभागलेली आहे. त्यामध्ये 1) परिणात्मक, सामान्य इंग्रजी, तर्क क्षमता संगणक ज्ञान यासंदर्भात पहिला भाग आहे. 2) मूलभूत किरकोळ दायित्व उत्पादने यासंदर्भात भाग आहे. 3) मूळ किरकोळ मालमत्ता उत्पादने याचा तिसरा भाग आहे. 4) मूलभूत गुंतवणूक उत्पादने याचा चौथा भाग आहे. 5) मूलभूत विमा उत्पादने याचा पाचवा भाग आहे.
 • अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे सिलेक्शन हे मेरिट नुसार आणि रिक्त जागा नुसार होईल.
 • जर सदरील भरती मध्ये निवड परीक्षेत एकापेक्षा अधिक उमेदवाराला सारखेच गुण मिळाले तर गुणवत्ता यादी ही त्यांच्या वयाच्या उतरत्या क्रमाने तयार केली जाईल.
 • उमेदवाराला ज्या ठिकाणी नोकरी करायची आहे तेथील स्थानिक भाषा आली पाहिजे. त्यासाठी उमेदवाराकडे इयत्ता 10वी आणि 12 वी मध्ये स्थानिक भाषेतील विषय शिकलेल्या चे प्रमाणपत्र पाहिजे. किंवा पदवी मध्ये स्थानिक भाषा च्या विषयाचा समावेश पाहिजे.
 • जाहिरातीमध्ये सांगितलेली निवड प्रक्रिया बदलण्याचा अधिकार पूर्णपणे सेंट्रल बँक ऑफ इंडिया यांच्याकडे आहे.
 • SC/ST/OBC/EWS/PWBD या कॅटेगरीतील उमेदवारांना भारत सरकारच्या नियमानुसार आरक्षण देण्यात येईल.
 • सेंट्रल बँक ऑफ इंडिया येथे अप्रेंटिस पदाच्या जागा कंत्राटी तत्त्वावर भरण्यात येणार आहेत. उमेदवार आणि बँक यांच्यामध्ये डिजिटल स्वरूपाचे कंत्राट होणार आहे.
 • निवड झालेल्या उमेदवाराला अप्रेंटिस म्हणून सेंट्रल बँक ऑफ इंडिया येथे 12 महिने काम करावे लागेल.
 • जर निवड झालेला उमेदवार प्रशिक्षणाच्या दिवशी हजर राहिला नाही किंवा प्रशिक्षणाच्या दिवशी हजर राहिला पण नोकरी जॉईन करायच्या दिवशी गैरहजर राहिला तर अशा उमेदवारांबरोबरच कंत्राट रद्द करण्यात येईल.
 • जर कंत्राटी करार संपायच्या अगोदर बँकेला किंवा करायला काही कारणास्तव हा करार रद्द करायचा असेल तर नॅशनल अप्रेंटिस ट्रेनिंग स्कीम यांच्याकडे अर्ज करू शकता मिळालेला अर्ज दुसऱ्या पार्टीला पाठवण्यात येईल.

राष्ट्रीय बँका, सरकारी बँका, त्याचप्रमाणे जिल्हा मध्यवर्ती बँका येथील निघालेल्या भरतीची सर्व प्रकारच्या अपडेट्स आमच्या नोकरी फस्ट या वेबसाईट वरती तुम्हाला मिळतील. वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a Comment