AAI Bharti 2024 | भारतीय विमानतळ प्राधिकरण येथे विविध पदांसाठी भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात भारतीय विमानतळ प्राधिकरण यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदरील भरती करिता ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 1 मे 2024 आहे. कनिष्ठ कार्यकारी या पदासाठी सदरील भरती होणार आहे. यामध्ये विविध प्रकारच्या शाखांसाठी कनिष्ठ कार्यकारी हे पद आहे. सदरील भरती करिता ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भारतीय विमानतळ प्राधिकरण यांच्याद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचायचे आहे. सदरील भरती करिता इच्छुक उमेदवारांनी खालील महत्त्वाची माहिती वाचावी.
- भारतीय विमानतळ प्राधिकरण येथे 490 रिक्त जागांसाठी भरती होणार आहे.
- भारतीय विमानतळ प्राधिकरण येथील भरती कनिष्ठ कार्यकारी या पदासाठी होणार आहे.
AAI Bharti 2024 | भारतीय विमानतळ प्राधिकरण येथील भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि वयाची अट खालील प्रमाणे.
- कनिष्ठ कार्यकारी ( आर्किटेक ) – 03 जागा
- कनिष्ठ कार्यकारी ( स्थापत्य ) – 90 जागा
- कनिष्ठ कार्यकारी ( इलेक्ट्रिकल ) – 106 जागा
- कनिष्ठ कार्यकारी ( इलेक्ट्रॉनिक ) – 278 जागा
- कनिष्ठ कार्यकारी ( आयटी ) – 13 जागा
- कनिष्ठ कार्यकारी ( आर्किटेक ) या पदासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठातून आर्किटेक पदवी मिळवलेली पाहिजे. त्याचप्रमाणे गेट 2024 दिलेली.
- कनिष्ठ कार्यकारी ( स्थापत्य ) या पदासाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून बीई ( स्थापत्य ) किंवा बी.टेक ( स्थापत्य ) ही पदवी मिळवलेली पाहिजे. त्याचप्रमाणे उमेदवाराने गेट 2024 परीक्षा दिलेली पाहिजे.
- कनिष्ठ कार्यकारी ( इलेक्ट्रिकल ) या पदासाठी उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून बीई (इलेक्ट्रिकल) किंवा बी.टेक (इलेक्ट्रिकल) ही पदवी मिळवली पाहिजे. त्याचप्रमाणे गेट 2024 दिलेली पाहिजे.
- कनिष्ठ कार्यकारी ( इलेक्ट्रॉनिक ) या पदासाठी उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून बीई ( इलेक्ट्रॉनिक ) किंवा बी.टेक ( इलेक्ट्रॉनिक ) ही पदवी मिळवली पाहिजे. त्याचप्रमाणे गेट 2024 दिलेली पाहिजे.
- कनिष्ठ कार्यकारी ( आयटी ) या पदासाठी उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून बीई ( संगणक विज्ञान/संगणक अभियांत्रिकी/आयटी/इलेक्ट्रॉनिक्स ) किंवा बी.टेक ( संगणक विज्ञान/संगणक अभियांत्रिकी/आयटी/इलेक्ट्रॉनिक्स ) ही पदवी मिळवली पाहिजे . किंवा एमसीए ही पदवी मिळवलेली पाहिजे. त्याचप्रमाणे गेट 2024 दिलेली पाहिजे.
- सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 1 मे 24 रोजी 27 वर्षापर्यंत पाहिजे. एससी आणि एसटी प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी वयामध्ये पाच वर्षाची सूट आहे. तर ओबीसी प्रवर्गाच्या उमेदवारांकरिता वयामध्ये तीन वर्षे सूट आहे.
- सदरील भरती मध्ये निवडून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना प्रतिमहा 40000 रुपये ते 1 लाख 40 हजार रुपये इतके वेतन राहील.
- भारतीय विमानतळ प्राधिकरण येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना परीक्षा शुल्क ₹300 आहे. त्याचप्रमाणे एससी, एसटी, अपंग आणि महिला उमेदवारांसाठी परीक्षा शुल्क नाही आहे.
- सदरील भरतीसाठी पात्र उमेदवारांनी भारतीय विमानतळ प्राधिकरण यांच्या संकेतस्थळाद्वारे अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.
- सदरील भरती करिता अर्ज करण्याची शेवटची तारीख 1 मे 2024 ही भारतीय विमानतळ प्राधिकरण यांच्याकडून देण्यात आलेले आहे.
- सदरील भरती करिता अर्ज करण्या अगोदर भारतीय विमानतळ प्राधिकरण यांच्याद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
- सदरील भरती करिता अर्ज करण्यासाठी भारतीय विमानतळ प्राधिकरण यांच्याकडून लिंक देण्यात आलेली आहे त्याचा उपयोग करूनच उमेदवारांनी अर्ज करायचा आहे. अर्ज करा.
AAI Bharti 2024 | भारतीय विमानतळ प्राधिकरण येथील भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खालील सूचना वाचाव्यात.
- भारतीय विमानतळ प्राधिकरण येथील भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- भारतीय विमानतळ प्राधिकरण यांच्याकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याची कोणतीही पद्धत देण्यात आलेली नाही. त्यामुळे उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू नये.
- सदरील भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करत असताना उमेदवाराकडून स्वतःची वैयक्तिक माहिती भरताना काही चूक झाली आणि त्यामुळे त्याचा अर्ज बाद करण्यात आला तर याला भारतीय विमानतळ प्राधिकरण जबाबदार राहणार नाही.
- भारतीय विमानतळ प्राधिकरण येथील भरतीसाठी 1 मे 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
- भारतीय विमानतळ प्राधिकरण यांच्याद्वारे घेण्यात येणाऱ्या भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
AAI Bharti 2024 | भारतीय विमानतळ प्राधिकरण येथील भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांनी खालील सूचना वाचाव्यात.
- भारतीय विमानतळ प्राधिकरण येथील भरतीसाठी ज्या उमेदवारांनी अर्ज केलेले आहेत त्या उमेदवारांमधून पात्र उमेदवाराची निवड करण्यात येईल.
- भारतीय विमानतळ प्राधिकरण यांच्याद्वारे कोणत्याही उमेदवाराला TA/DA देण्यात येणार नाही. याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
- भारतीय विमानतळ प्राधिकरण येथील भरती वेळेस परीक्षा केंद्रावर अनुचित प्रकार करणाऱ्या उमेदवारावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
- सदरील भरतीसाठी परीक्षा केंद्र हे भारतीय विमानतळ प्राधिकरण यांच्याकडून ठरवण्यात येईल उमेदवाराने परीक्षा केंद्रावर वेळेत हजर राहावे.
- सदरील भरतीसाठी आवश्यक अभ्यासक्रम भारतीय विमानतळ प्राधिकरण यांच्या संकेतस्थळावर दिलेला आहे. उमेदवारांनी संकेतस्थळाला भेट द्यावी.
AAI Bharti 2024 | भारतीय विमानतळ प्राधिकरण येथील भरती संदर्भात आवश्यक माहिती खालील प्रमाणे.
- सदरील भरतीसाठीची [ AAI Bharti 2024 ] रिक्त पदांची संख्या वाढू शकते किंवा कमी होऊ शकते हे पूर्णपणे भारतीय विमानतळ प्राधिकरण यांच्यावर अवलंबून आहे.
- ज्या उमेदवारांना एससी / एसटी कॅटेगरी मधून अर्ज करायचा आहे उमेदवारांनी 01 मे 2024 पूर्वी जातीचा दाखला जमा करायचा आहे.
- सदरील भरतीसाठी अर्ज करणारे ओबीसी कॅटेगरी मधील उमेदवार क्रिमिलियर मध्ये येतात आशा उमेदवारांना ओबीसी प्रवर्गा मधून अर्ज करता येणार नाही. ओबीसी प्रवर्गातून अर्ज करता येण्याकरिता ” नॉन- क्रिमिलियर” दाखला असणे आवश्यक आहे.
- जे उमेदवार अपंग आहेत किंवा ज्या उमेदवारांना अपंग प्रवर्गा मधून अर्ज करायचा आहे आशा उमेदवारांनी अपंगत्वाचा दाखला 1 मे 2024 पूर्वी जमा करायचा आहे.
- ज्या माझी कर्मचाऱ्यांना सदरील भरतीसाठी अर्ज करायचा आहे आशा कर्मचाऱ्यांनी अर्ज पडताळणीच्या वेळेस डिस्चार्ज प्रमाणपत्र जमा करायचे आहे.
- उमेदवाराने कागदपत्रे पडताळणीच्या वेळेस सादर केलेली सर्व प्रमाणपत्रे हिंदी किंवा इंग्रजी भाषेमध्ये असावीत. इतर भाषेमधील प्रमाणपत्र ग्राह्य धरली जाणार नाहीत.
- सदरील भरती करिता अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मिळवलेली पदवी ही मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा डीम्ड विद्यापीठातून किंवा अपेक्स इन्स्टिट्यूट म्हणजेच आयआयटी, एनआयटी, आयआयएम या संस्थेमधून मिळवलेली असावी. उमेदवाराने मुक्त विद्यापीठातून मिळवलेली पदवी ग्राह्य धरली जाईल.
- ज्या उमेदवारांकडे बीएससी ( इंजीनियरिंग ) ही पदवी आहे आशा उमेदवारांना सुद्धा सदरील भरतीसाठी अर्ज करता येतील.
- जे उमेदवार सध्या शेवटच्या वर्षाच्या शेवटच्या सेमिस्टर मध्ये शिकत आहेत असे उमेदवार सदरील भरतीसाठी अर्ज करू शकतात. जे उमेदवार शेवटच्या वर्षी नापास होतील अशा उमेदवारांना सदरील भरतीमध्ये ग्राह्य धरले जाणार नाही.
- उमेदवाराला ज्या दिवशी मार्कशीट मिळालेले आहे त्यादिवशीची तारीख पदवी मिळालेली तारीख म्हणून ग्राह्य धरली जाईल. यामध्ये कोणालाही सूट दिली जाणार नाही.
- शेवटच्या वर्षाचे गुण ज्या विद्यार्थ्यांना सीजीपीए आणि ग्रेड फॉरमॅट मध्ये दिलेले आहेत अशा विद्यार्थ्यांनी सीजीपीए आणि ग्रेडचे रूपांतर टक्केवारी मध्ये करायचे आहे. टक्केवारी मध्ये रूपांतर करताना उमेदवारांनी विद्यापीठाच्या नियमानुसार रूपांतर करायचे आहे. टक्केवारीत रूपांतर केल्यानंतर त्याचे प्रमाणपत्र विद्यापीठाकडून घ्यायचे आहे.
- सदरील भरतीसाठी दिलेल्या शैक्षणिक पात्रतेच्या समांतर शैक्षणिक पात्रता असेल तर ग्राह्य धरली जाणार नाही. याबाबतचे सर्व अधिकार भारतीय विमानतळ प्राधिकरण यांच्याकडे असतील.
- उमेदवाराने मिळवलेल्या पदवीमध्ये कोणत्या विषयामध्ये स्पेशलायझेशन केलेले आहे याबाबतचा तपशील उमेदवारांनी लिहायचा आहे.
- उमेदवारा बाबतचा शेवटचा निर्णय भारतीय विमानतळ प्राधिकरण यांच्याद्वारे घेण्यात येईल.
- ज्या उमेदवारांनी मास्टर्स पदवी मिळवलेली आहे आशा उमेदवारांनी भरतीसाठी निवड झाल्यानंतर कागदपत्र पडताळणी वेळेस मास्टर पदवीची कागदपत्रे तपासून घ्यायचे आहेत.
- सदरील भरतीसाठी उमेदवाराचे 1 मे 2024 रोजी जास्तीत जास्त वय 27 वर्षे पर्यंत असावे.
- उमेदवाराची जन्मतारीख दहावीच्या बोर्डाच्या सर्टिफिकेट वर आहे तीच जन्मतारीख स्वीकारली जाईल. इतर कोठेही जन्मतारीख मध्ये बदल केलेला असेल तर तो ग्राह्य धरला जाणार नाही.
- 2 एप्रिल 2024 रोजी सदरील भरतीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची सुरुवात होणार आहे. 1 मार्च 2024 रोजी ऑनलाइन अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे.
- सदरील भरती मध्ये उमेदवाराला मिळणाऱ्या पगारामध्ये दरवर्षी 3% ने पगार वाढ मिळेल.
- ज्या उमेदवारांनी 2024 सालची गेट एक्झाम दिलेली आहे असे उमेदवारच भारतीय विमानतळ प्राधिकरण यांच्या भरतीसाठी पात्र असतील.
- अर्ज पडताळणीसाठी उमेदवारांचे रजिस्ट्रेशन नंबर निवडले जातील. निवडलेले रजिस्ट्रेशन नंबर भारतीय विमानतळ प्राधिकरण च्या वेबसाईट वर दिले जातील. कॉल लेटर उमेदवारांना ई-मेल द्वारे दिले जाईल.
- कागदपत्र पडताळणीच्या वेळेस उमेदवारांनी ओरिजनल डॉक्युमेंट चा एक सेट बरोबर आणायचा आहे. त्याचबरोबर सेल्फ अटेस्टेड डॉक्युमेंट्स एक एक प्रत आणायचे आहे. जर उमेदवाराकडे एखाद्या ओरिजनल डॉक्युमेंट नसेल तर त्याला ओरिजनल डॉक्युमेंट अरेंज करण्यासाठी एक्स्ट्रा वेळ देण्यात येणार नाही.
- अर्ज करणारा उमेदवार केंद्र सरकारमध्ये किंवा राज्य सरकारमध्ये कोणत्याही पदावर कार्यरत असेल तर त्या उमेदवाराला त्याच्याशी संबंधित कार्यालयातून ना हरकत प्रमाणपत्र घेऊन सादर करणे आवश्यक आहे.
- अर्ज करणारा उमेदवार जर अर्ज पडताळणीसाठी उपस्थित राहू शकला नाही तर त्याचा अर्ज रद्द केला जाऊ शकतो.
- उमेदवाराच्या अर्जाची पडताळणी होईपर्यंत प्रोव्हिजनल निवड यादी बनवण्यात येईल. ही प्रोव्हिजनल निवड यादी उमेदवाराच्या गेट स्कोर वर आधारित असणार आहे.
- जर भरतीमध्ये कोणत्याही दोन उमेदवाराला गेटला सेम मार्क मिळाले असतील तर अशा उमेदवारा मधील जास्त वय असलेल्या उमेदवाराची निवड करण्यात येईल.
- सदरील भरती मध्ये रिझर्व्ह कॅटेगरी मधील उमेदवारांना जनरल कॅटेगरी मधून अर्ज करण्यात येईल. पण जनरल कॅटेगरी मधील उमेदवाराला रिझर्व कॅटेगरी मधून अर्ज करण्यात येणार नाही.
- ज्या उमेदवारांची निवड कनिष्ठ कार्यकारी ( इलेक्ट्रॉनिक ) या पदावर होईल आशा उमेदवारांकरिता सहा महिन्याचे प्रशिक्षण राहील. त्या प्रशिक्षणाचा कालावधीत उमेदवाराला नियमानुसार मानधन मिळेल. प्रशिक्षणाच्या कालावधीतच उमेदवाराकडून बोंड सही करून घेतला जाईल.
- सदरील भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवाराची बदली संपूर्ण भारतामध्ये कोठेही होईल.
[ AAI Bharti 2024 ] महाराष्ट्रातील आणि देशातील सरकारी संस्था, खाजगी संस्था , पब्लिक सेक्टर मधील कंपन्या येथील भरती संदर्भात अधिक माहिती मिळवण्याकरिता आमच्या नोकरी फस्ट या वेबसाईटला नक्की भेट द्या. भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.