[ Vitamin B-12 Deficiency ] व्हिटॅमिन बी-१२ ची शरीरातील गरज ?
मानवी शरीरात लाल रक्त पेशी,न्यूरॉन, डीएनए निर्माण करण्यासाठी व्हिटॅमिन बी-१२ ची गरज असते. त्याच प्रमाणे दैनंदिन क्रिया करण्यासाठी व्हिटॅमिन बी-१२ चा उपयोग केला जातो. मानवी शरीरातील मांसपेशी, रक्तवाहिन्या यांचे कार्य योग्य रित्या चालवण्यासाठी व्हिटॅमिन बी-१२ चा उपयोग होतो. त्यामुळे मानवी शरीरात बी-१२ योग्य प्रमाणात असणे गरजेचे आहे. याचे मानवी शरीरातील प्रमाण हे १९० ते ९५० पिकोग्राम प्रति मिलीलिटर (पीजी/एमएल ) एव्हड्या प्रमाणात पाहिजे.
आपले शरीर विटॅमी बी-१२ हे स्वतः तयार करू शकत नाही त्यामुळे आपल्याला दररोज च्या आहारातून बी-१२ मिळवावे लागते. निदर्शनात आल्यानुसार काही लोक बी-१२ चे प्रमाण वाढविण्या साठी समाविष्ट आहाराचे सेवन मोठ्या प्रमाणात करतात तर काही लोक कमीत कमी प्रमाण बी-१२ चे शरीरात राहावे एव्हडा सुद्धा बी-१२ युक्त आहार घेत नाहीत. परिणामी व्हिटॅमिन बी-१२ ची कमतरता त्यांना भेडसावते. ह्या व्हिटॅमिन ची कमतरता भारतातील सामान्य समस्या आहे. तरुण व्यक्तींपेक्षा वृद्ध व्यक्तीमध्ये बी-१२ च्या कमतरतेची प्रमाण जास्त जाणवते. कारण वयानुसार त्यांच्या शरीरात व्हिटॅमिन शोषून घेण्याचे प्रमाण कमी झालेले असते. अश्या लोकांना इंजेक्शन च्या माध्यमातून बी-१२ दिले जाते.
[ Vitamin B-12 Deficiency ] व्हिटॅमिन बी-१२ ची कमतरता म्हणजे नक्की काय ?
व्हिटॅमिन बी-१२ ची कमी म्हणजे शरीरात व्हिटॅमिन बी-१२ ची मात्रा कमी होणे होय. प्रमाण कमी होण्याचे मुख्य कारण म्हणजे व्हिटॅमिन बी-१२ युक्त आहार न घेणे, घेतलेल्या आहारातून बी-१२ शरीरात शोषला न जाणे, कधी कधी दीर्घ काळ चालणाऱ्या आजारासोबत सुद्धा बी-१२ ची कमतरता येऊ शकते. व्हिटॅमिन बी-१२ मुळे शरीरात लाल रक्त पेशी तयार होतात. शरीरातील ऑक्सिजन वायू संपूर्ण अवयव पर्यंत पोहचण्याचे काम लाल रक्त पेशी करत असतात. बी-१२ च्या कमतरतेमुळे शरीरातील सर्व भागांना पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही. यामुळे गंभीर परिणामांना सामोरे जावे लागू शकते.
[ Vitamin B-12 Deficiency ] तुमच्या शरीराला किती प्रमाणात बी-१२ ची गरज ?
तुमच्या शरीराला किती प्रमाणात व्हिटॅमिन बी-१२ ची गरज आहे. बऱ्याच विविध गोष्टींवर अवलंबून आहे. त्यामध्ये वय,आहाराच्या सवयी, शारीरिक स्वास्थ्य आणि आजारपण इत्यादी गोष्टींचा समावेश आहे. दूध,मांस आणि अंडे यामध्ये व्हिटॅमिन बी-१२ मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. त्याच प्रमाणे विविध प्रकारचे धान्य , दही, ताक यामध्ये सुद्धा व्हिटॅमिन बी-१२ मोठ्या प्रमाणात आढळून येते.
व्हिटॅमिन बी-१२ चे किती प्रमाण रोज सेवन करावे . हे वयोमानानुसार खाली दिलेले आहे . बी-१२ चे प्रमाण मायक्रो ग्राम मध्ये आहे.
- ६ महिन्यापर्यंत असणारे बालक – ०.४ एमसीजी
- ७-१२ महिने पर्यंत असणारे बालक – ०.५ एमसीजी
- १-३ वर्षाचे बालक – ०.९ एमसीजी
- ४-८ वर्षाचे बालक – १.२ एमसीजी
- ९-१३ वर्षाचे बालक – १.८ एमसीजी
- १४-१८ वर्षाचे किशोर वयीन मुले – २.४ एमसीजी
- १८ वर्षा पुढील – २.४ एमसीजी
[ Vitamin B-12 Deficiency ] भारतात बी-१२ च्या कमतरतेचे काही आकडे खालील प्रमाणे .
देशाच्या एकूण लोकसंख्येच्या १.५% ते १५% पर्यंत लोकांमध्ये व्हिटॅमिन बी-१२ ची कमतरता आहे. वयोमानानुसार याचे आकडे वेगवेगळे आहेत. ते खालील प्रमाणे .
- ३ वर्षे ते २० वर्षे वयाच्या कमीत कमी ३९% लोकांना बी-१२ ची कमतरता आहे.
- २० वर्षे ते ४० वर्षे वयाच्या कमीत कमी ५९% लोकांमध्ये बी-१२ ची कमतरता आहे.
- ६० वर्षे आणि त्याहून अधिक वय असणाऱ्या ६०% व्यक्तींमध्ये बी-१२ ची कमतरता आहे.
[ Vitamin B-12 Deficiency ] व्हिटॅमिन बी-१२ च्या कमतरतेची लक्षणे ..
व्हिटॅमिन बी-१२ च्या कमतरतेमुळे शरीरात शारीरिक आणि मानसिक समस्या निर्माण होऊ शकतात. बी-१२ कमतरतेची लक्षणे सुरवातीच्या काळात ओळखणे अवघड असते. वेळेनुसार हि लक्षणे अधिक तीव्र होत जातात त्यामुळे वेळेवर या लक्षणांवर लक्ष देणे गरजेचे आहे. बऱ्याच वेळेला व्हिटॅमिन बी-१२ च्या लक्षणे लवकर समजत नाहीत पण जेव्हा त्यामुळे लाल पेशींचे प्रमाण कमी होते आणि अनेमिया सारखा रोग होतो. तेव्हा या गोष्टी लक्षात येतात.यामुळेच पुढे त्याचे रूपांतर मानसिक समस्येत होते. खालील काही लक्षणे व्हिटॅमिन बी-१२ च्या कमतरतेमुळे होणारी आहेत.
- हात-पाय सुन्न होणे.
- मांसपेशी मध्ये कमतरता येणे.
- निराशा, नैराश्य,चिंता इत्यादी.
- समतोल आणि निर्णय घेण्याच्या क्षमतेवर परिणाम होणे.
- संयम न राहणे.
- सतत थकवा आणि अशक्तपणा येणे.
- जुलाब आणि उलटी आल्या सारखे वाटणे.
- तोंड येणे
- उत्साह कमी होणे.
- वजन कमी होणे.
- डोळ्यांनी कमी दिसणे , डोळे पिवळे होणे.
- त्वचा पिवळी होणे.
- बोलताना चाचपडणे.
- लक्षात ठेवण्यास अडचण येणे.
[ Vitamin B-12 Deficiency ] बी-१२ कमतरतेची कारणे
विटामिन बी-१२ ची कमतरता विविध परिस्थिती मध्ये आढळून येऊ शकते . त्यापैकी काही करणे खालील प्रमाणे.
- व्हिटॅमिन बी-१२ चे प्रमाण जास्त असणाऱ्या पदार्थांचे सेवन कमी प्रमाणात करणे अथवा न करणे .
- पोट आणि आतड्याच्या आजारामुळे व्हिटॅमिन बी-१२ चे शोषण शरीरात कमी प्रमाणात होते . त्यामुळे सुद्धा कमतरता येऊ शकते.
- जीवघेणे आजार त्याच प्रमाणे दीर्घ काळ असलेले आजारपण यामुळे सुद्धा व्हिटॅमिन बी-१२ ची कमतरता भासवु शकते.
- ज्या पेशंटचे पोटाचे ऑपरेशन झालेले आहे अश्या लोकांमध्ये व्हिटॅमिन बी-१२ ची कमी येऊ शकते .
- वयस्कर लोकांमध्ये पचनशक्ती कमजोर झाल्यामुळे व्हिटॅमिन बी-१२ ची कमतरता निर्माण होऊ शकते.
[ Vitamin B-12 Deficiency ] व्हिटॅमिन बी-१२ कमतरतेची निदान
व्हिटॅमिन बी-१२ च्या कमतरतेचे निदान करणे आव्हानात्मक असते कारण यामध्ये लक्षणे स्पष्ट स्वरूपात दिसत नाहीत. इतर व्हिटॅमिन च्या कमतरतेमुळे सुद्धा बी-१२ ची कमजोरी येऊ शकते . शरीरातील बी-१२ चे प्रमाण पाहण्यासाठी डॉक्टर प्रथम रक्ताच्या चाचण्या करण्याचा सल्ला देतात. बी-१२ चा चाचणी बरोबर सीबीसी टेस्ट सुद्धा करण्याचा सल्ला डॉक्टर देतात तयामुळे लाल पेशी, पांढऱ्या पेशी यांचे प्रमाण लक्षात येते.
[ Vitamin B-12 Deficiency ] व्हिटॅमिन बी-१२ कमी साठी उपचार आणि औषधे
व्हिटॅमिन बी-१२ ची कमतरता असणाऱ्या लोकांना तोपर्यंत उपचार घ्यावे लागतात जोपर्यंत व्हिटॅमिन बी-१२ ची पातळी सामान्य होत नाही . काही लोकांना जन्मभर व्हिटॅमिन बी-१२ च्या कमतरतेची उपचार सुरु ठेवावे लागू शकतात. बी-१२ ची औषधे खालील स्वरूपात उपलब्ध असतात.
- व्हिटॅमिन बी-१२ च्या गोळ्या
- व्हिटॅमिन बी-१२ नसल स्प्रे
- व्हिटॅमिन बी-१२ इंजेक्शन
- व्हिटॅमिन बी-१२ जेल .
वरील दिलेल्या औषधांचा वापर करून बी-१२ ची कमतरता दूर करता येऊ शकते . त्याच प्रमाणे आहारात व्हिटॅमिन बी-१२ युक्त पदार्थ वाढवण्याचा सल्ला डॉक्टर देतात. व्हिटॅमिन बी-१२ च्या कमतरतेमुळे निर्माण झालेला अनेमिया बरा करण्यासाठी विशेष उपचार डॉक्टर देतात. व्हिटॅमिन बी-१२ च्या कमतरतेमुळे आलेल्या मानसिक समस्यांना बरे करण्यासाठी विशेष उपचार असतात.
[ Vitamin B-12 Deficiency ] व्हिटॅमिन बी-१२ ची कमतरता येऊ नये म्हणून काय करावे ?
व्हिटॅमिन बी-१२ युक्त खाद्य पदार्थ आणि पेय यांचे नियमित सेवन करणे . यामुळे अधिकतर लोकांना व्हिटॅमिन बी-१२ ची कमतरता येणार नाही.काही खाद्य पदार्थ खालील प्रमाणे
- प्राण्यांपासून मिळणारे व्हिटॅमिन बी-१२ चे स्त्रोत – दूध,लाल मांस, मासे, अंडी.
- सर्व प्रकारची धान्य खासकरून नाचणी.
योग्य जीवन शैली चे पालन करणे त्याच प्रमाणे वाईट सवयी सोडणे
- मद्यपान न करणे
- बाहेरील खाणे टाळणे
[ Vitamin B-12 Deficiency ] व्हिटॅमिन बी-१२ च्या कमतरते मुळे होणारे गंभीर परिणाम
व्हिटॅमिन बी-१२ कमतरता जास्त काळ राहिल्यामुळे गंभीर समस्यांना सामोरे जावे लागू शकते. या कमतरते मुळे मानसिक आणि मेंदूशी निगडित समस्या वाढू शकतात. त्याच प्रमाणे बी-१२ च्या कमतरते मुळे शरीरातील इतर व्हिटॅमिन च्या कमतरता येऊ शकतात. व्हिटॅमिन बी-१२ च्या खूपच कमतरते मुळे मृत्यू होण्याची शक्यता असते. बी-१२ च्या कमतरते मुळे कमी झालेल्या लाल पेशी आणि त्यामुळे निर्माण झालेला अनेमिया शरीरासाठी खूपच घातक ठरू शकतो.
निष्कर्ष
मानवी शरीराचे दैनंदिन काम व्यवस्थित चालण्यासाठी व्हिटॅमिन बी-१२ चे पुरेसे प्रमाण आवश्यक आहे. आहारात व्हिटॅमिन बी-१२ युक्त पुरेसे पदार्थ वाढवल्यानंतर बहुतांश लोक बी-१२ च्या कमतरते पासून वाचू शकतात. बी-१२ युक्त आहार असून सुद्धा बी-१२ ची कमतरता भासवत असेल तर रक्ताची चाचणी करून डॉक्टरांकडून योग्य ते उपचार घ्यावेत .
[ Vitamin B-12 Deficiency ] सतत विचारले जाणारे प्रश्न ?
१) शाकाहारी लोकांमध्ये व्हिटॅमिन बी-१२ च्या कमतरतेचा धोका जास्त असतो का ?
होय, मांसाहारी लोकांच्या तुलनेत शाकाहारी लोकांच्या आहारात बी-१२ युक्त पदार्थ कमी प्रमाणात असतात . वनस्पती पासून तयार केले गेलेल्या अण्णा मध्ये व्हिटॅमिन बी-१२ चे प्रमाण कमी असते. त्यामुळे शाकाहारी लोकांनी आहारात व्हिटॅमिन बी-१२ च्या सप्लिमेंट्स चा उपयोग करून व्हिटॅमिन बी-१२ ची कमतरता दूर करता येते.
२) व्हिटॅमिन बी-१२ च्या कमतरते मुळे थकवा किंवा अशक्तपणा येऊ शकतो का ?
होय, व्हिटॅमिन बी-१२ च्या कमतरते मुळे शरीरात लाल पेशी निर्माण होण्याचे प्रमाण कमी होते. त्यामुळे शरीर दैनंदिन काम करण्यासाठी पर्याप्त ऊर्जा निर्माण करू शकत नाही . त्यामुळे मानवी शरीरात थकवा किंवा अशक्तपणा येऊ शकतो.
३) शरीरात व्हिटॅमिन बी-१२ ची झालेली कमतरता भरून काढली जाऊ शकते का ?
होय, शरीरातील व्हिटॅमिन बी-१२ कशामुळे कमी झाले आहे याचे योग्य निदान करून डॉक्टरांच्या सल्ल्या नुसार उपचार घेतल्यावर व्हिटॅमिन बी-१२ ची कमतरता पूर्ण होऊ शकते. व्हिटॅमिन बी-१२ ची कमतरता पूर्ण होण्यासाठी ६ महिने ते १ वर्षाचा कालावधी लागू शकतो.
४) व्हिटॅमिन बी-१२ ची शरीरातील कमतरता गंभीर आजार आहे का ?
व्हिटॅमिन बी-१२ ची कमतरता शरीरात निर्माण झाल्यापासून लगेच उपचार नाही घेतले तर याचा गंभीर परिणाम शरीरावर होऊ शकतो. हि समस्या दीर्घ काळ चालू असल्यावर मेंदू संबंधी आजार होण्याची शक्यता आहे.
५) व्हिटॅमिन बी-१२ ची शरीरातील पातळी एखादा कमी झाली कि कधीच वाढू शकत नाही का ?
व्हिटॅमिन बी-१२ हे आपल्या शरीरात निर्माण होत नाही . ते आपल्याला बाहेरील आहारातून घ्यावे लागते. एखादा जुनाट आजार सोबत बी-१२ ची कमतरता असेल तर आजार जो पर्यंत बरा होत नाही तो पर्यंत बी-१२ ची पातळी वाढणे कठीण असते.
६) घरगुती उपचारांनी व्हिटॅमिन बी-१२ ची पातळी वाढू शकते का ?
आहारात व्हिटॅमिन बी-१२ युक्त पदार्थ कमी प्रमाणात असल्यामुळे आलेली कमतरता हि घरगुती व्हिटॅमिन बी-१२ युक्त पदार्थ आहारात समावेश करून कमतरता दूर करता येते पण तरीही कमतरता दूर होत नसेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
[ What is CBC Test ] सीबीसी टेस्ट म्हणजे काय ? कोणी करावी ?