[ Shilajit Benefits ] शिलाजीत चे फायदे काय ?

[ Shilajit Benefits ] शिलाजीत कशाला म्हणतात ?

[ Shilajit Benefits ] शिलाजीत हे हिमालयातील उंच पर्वतांमध्ये आढळून येणारे एक खनिज आहे. शिलाजीत निसर्गामध्ये कच्च्या स्वरूपामध्ये आढळून येते. त्यानंतर त्याच्यावरती प्रक्रिया करून वापरण्यायोग्य बनवण्यात येते. शिलाजीत हे मूळ ब्लॅक रंगाचे असते. भारतामध्ये आयुर्वेदिक उपचार पद्धतीला महत्व आहे. या आयुर्वेदिक उपचार पद्धती मध्येच शिलाजीत चा उपयोग लिहिलेला आहे. भारत आणि चीन यांच्यामध्ये असणाऱ्या विशाल हिमालय पर्वत मध्ये शिलाजीत सापडते. शिलाजीत शोधण्याची प्रक्रिया आणि त्यावरती करण्यात येणारी प्रक्रिया खूपच कठीण असल्यामुळे शिलाजीत ची किंमत बाजारामध्ये खूप जास्त आहे. अफगाणिस्तान, तिबेट आणि रशिया यांसारख्या देशांमध्ये सुद्धा शिलाजीत आढळून येते.

भारतामध्ये शिलाजीत ला वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते यामध्ये शीलाजतू, सलाजीत आणि मिमी यांसारखे शिलाजीत ची नावे आहेत. वेगवेगळ्या आजारांमध्ये शिलाजीत चा उपयोग केला जातो. काही आजार मानवी शरीराला होऊ नयेत म्हणून सुद्धा शिलाजीत चा उपयोग केला जातो. भारतामध्ये विविध कंपन्यांच्या द्वारे शिलाजीत ची विक्री केली जाते. काही कंपन्यांकडून भेसळ युक्त शिलाजीत सुद्धा बाजारात विकले जाते. त्यामुळे शिलाजीत विकत घेताना काळजीपूर्वक आणि खात्रीशीर घेणे गरजेचे आहे. शिलाजीत हे ब्लॅक स्वरूपाचे सेमी सॉलिड लिक्विड असते. याला पाण्यामधून किंवा दुधामधून सेवन करण्याचा सल्ला वैद्यकीय चिकित्सा कडून दिला जातो.

[ Shilajit Benefits ] शिलाजीत च्या सेवनामुळे पुरुषांमध्ये होणारे फायदे खालील प्रमाणे

  1. पचनक्रिया सुधारते –  दैनंदिन जीवनामध्ये खाण्यापिण्याकडे लक्ष न दिल्यामुळे किंवा मसालेदार पदार्थ, तळलेले पदार्थ, तिखट पदार्थ त्याचप्रमाणे फास्ट फूड यांसारखे पदार्थ खाल्ल्यामुळे पचनक्रिया बिघडण्याच्या समस्या उद्भवत आहेत. त्याचप्रमाणे अति खाण्यामुळे सुद्धा लोकांचे पचन यंत्र बिघडत चालले आहे. शिलाजीत च्या सेवनामुळे पचन क्रिया सुरळीत चालते. खाल्लेले अन्न व्यवस्थित पचन होते.
  2. लिव्हरच्या आजारांवरती गुणकारी –  लिव्हर हा मानवी शरीरातील महत्त्वाचा अवयव आहे. लिव्हर मधून निघणाऱ्या पाचन रसामुळे अन्न पचनाला मदत होते. त्याचप्रमाणे शरीरात विटामिन आणि मिनरल साठवण्याचे काम लिव्हर मध्ये केले जाते. खाण्यापिण्यातील बदलामुळे किंवा मद्यपानामुळे लिव्हर संदर्भात आजार उद्भवू शकतात. शिलाजीत च्या सेवनामुळे लिव्हरची कार्यक्षमता सुधारते. त्याचप्रमाणे लिव्हरच्या कर्करोगात शिलाजीत सेवनाचा फायदा होतो. त्यामुळे लिव्हरच्या समस्या सुधारण्यासाठी वैद्यकीय चिकित्सा चा सल्ला घेऊनच शिलाजीत चे दररोज सेवन सुरू करावे.
  3. कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते – रक्तातील चरबीच्या प्रमाणाला कोलेस्ट्रॉल असे म्हणतात. कोलेस्ट्रॉलचे प्रमाण शरीरामध्ये जास्त वाढल्यामुळे हृदयरोगाची शक्यता वाढत चाललेली आहे. शरीरातील वाढत्या कोलेस्ट्रॉल मुळे विविध प्रकारचे आजार उद्भवत आहेत. त्यामुळे शरीरातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी करण्यासाठी सुद्धा शिलाजीत चा उपयोग केला जातो. जा लोकांना शिलाजीत चा उपयोग कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी करायचा आहे. अशा लोकांनी वैद्यकीय चिकित्सा चा सल्ला घ्यावा.
  4. टेस्टोस्टेरोनचे प्रमाण वाढवते –  पुरुषांच्या शरीरामध्ये महत्त्वाच्या हार्मोन्स पैकी एक हार्मोन्स म्हणजे टेस्टेस्टेरॉन आहे. वयामध्ये येणाऱ्या तरुण मुलांमध्ये टेस्टोस्टेरोन चे प्रमाण अधिक असते. जसजसे वय वाढत जाते तसतसे टेस्टोस्टेरोन चे शरीरातील प्रमाण कमी होत जाते. दाढी येणे, प्रजनन क्षमता विकसित होणे, लैंगिक इच्छा निर्माण होणे त्याचप्रमाणे पुरुषाला पुरुषत्व देण्याचे काम हे हार्मोन करत असते. वयानुसार कमी झालेले टेस्टोस्टेरोन चे प्रमाण वाढवण्याचे काम शिलाजीत करत असते. यामुळे पुरुषांमध्ये शुक्राणूंची संख्या वाढून प्रजनन क्षमता वाढते.
  5. थकवा दूर करते –  दिवसभरच्या कामामुळे येणारा थकवा दूर करण्यासाठी सुद्धा शिलाजीत चा उपयोग केला जातो. दैनंदिन जीवनातील मानसिक ताणतणावामुळे किंवा एखाद्या आजारपणामुळे व्यक्तीला येणाऱ्या थकव्यामुळे त्याची जीवनमान खालावू शकते. अशा व्यक्तींकरिता शिलाजीत हे एक आशेचा किरणच आहे. शिलाजीत चा योग्य वापरामुळे मानसिक तणाव कमी होतो. व्यक्तीमध्ये असलेला थकवा कमी होऊन शरीर ताजेतवाने होते. शिलाजीत योग्य प्रमाणात घ्यावे. शिलाजीत घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा.
  6. लठ्ठपणा कमी करण्यास मदत करते –  आज-काल लहान मुलांपासून वयस्कर वृद्धांपर्यंत लठ्ठपणाची समस्या सामान्यपणे दिसत आहे. व्यक्ती लठ्ठ होण्यामागे विविध कारणे असतात. त्यामुळे निर्माण झालेला लठ्ठपणामुळे विविध आजार लोकांना होऊ शकतात. व्यक्तीच्या शरीरातील मेटाबोलिजम कमी झाल्यामुळे लठ्ठपणाची समस्या जाणवते. शिलाजीत च्या वापरामुळे मेटाबोलिजम वाढते आणि पचन क्रिया फास्ट होते. त्यामुळे व्यक्ती लठ्ठ होत नाही. काही लोकांमध्ये अती खाण्याच्या सवयी असतात. अति खाण्याच्या सवयीमुळे सुद्धा शरीरात अतिरिक्त चरबी वाढते आणि लठ्ठपणा वाढतो. शिलाजीत च्या सेवनामुळे अति खाण्याच्या सवयी वरती ताबा मिळवण्यास मदत होते. लठ्ठपणा मध्ये शिलाजीत गुणकारी औषध मानले गेलेले आहे.
  7. जखम बरी करण्यास मदत करते –  कष्टाची काम करणाऱ्या पुरुषांमध्ये शरीरावरती जखम होण्याचे प्रमाण जास्त असते. त्याचप्रमाणे भाजणे वाहनाचा अपघात होणे यामुळे सुद्धा पुरुषांमध्ये जखम होण्याची शक्यता असते. एकदा जखम झाली की ती जखम ठीक होण्याकरिता खूप कालावधी लागतो. ही जखम लवकरात लवकर बरे करण्याचे गुण शिलाजीत मध्ये असतात. शिलाजीत च्या सेवनामुळे झालेली जखम बरी होण्यास मदत होते. कृपया कोणत्याही व्यक्तीने शिलाजीत जखमेवरती लावू नये. शिलाजीत चा उपयोग हा फक्त सेवनासाठी करावा.
  8. अनेमिया थांबवण्यास मदत करते. –  मानवी शरीरामध्ये हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे अनेमिया हा आजार होतो. त्याचप्रमाणे शरीरामध्ये आयर्न ची कमतरता झाल्यामुळे सुद्धा ॲनिमियाची लागण होते. या आजारामध्ये रक्तामधून ऑक्सिजन वाहण्याचे प्रमाण कमी होते. यामुळे शरीर पिवळे पडणे, थकवा जाणवणे, डोके दुखणे, अशक्तपणा येणे, हृदयाचे ठोके कमी जास्त होणे यांसारख्या समस्यांना रुग्णांना सामोरे जावे लागते. यातून रुग्ण बरा होण्यासाठी आयर्न युक्त आहार रुग्णांना देणे आवश्यक असते. शिलाजीत च्या नियमित सेवनामुळे व्यक्तीला आयर्नची कमतरता भासत नाही आणि त्यामुळे ॲनिमिया सारखे आजार होत नाहीत.
  9. मधुमेह प्रतिबंधक – शिलाजीत ला मधुमेह प्रतिबंधक म्हणून सुद्धा ओळखले जाते. शिलाजीत चे दररोज सेवन करणाऱ्या व्यक्तींना मधुमेहाचा धोका कमी असतो. ज्या व्यक्तींना मधुमेह झालेला आहे अशा व्यक्तींना त्याच्या त्रासापासून वाचण्यासाठी शिलाजीत चे सेवन महत्त्वाचे ठरते. कारण शिलाजीत मध्ये फ्लोविक ॲसिड मोठ्या प्रमाणात असते त्यामुळे व्यक्तीमध्ये मधुमेहाशी लढण्यासाठी ताकद निर्माण होते. इन्सुलिनचे कमी झालेले प्रमाण वाढवण्याचे काम यामुळे केले जाते. ज्या लोकांना जास्त शुगर नाही अशा लोकांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार शिलाजीत चा उपयोग करणे सुरू करावे फायदेशीर ठरेल.
  10. केस मजबूत बनवते –  आज-काल पुरुषांमध्ये केस गळतीची समस्या खूप जास्त वाढत आहे. त्याचप्रमाणे लहान वयामध्ये टक्कल पडण्याच्या केसेस सुद्धा समोर येत आहेत. केसाला योग्य पोषण न मिळाल्यामुळे केस कमकुवत बनतात आणि गळायला सुरुवात होतात. शिलाजीत मध्ये केस मजबूत करण्यासाठी आवश्यक असणारे पोषक तत्व असतात. याच्या दररोजच्या सेवनामुळे केसांना योग्य ते पोषण मिळते. आणि केस मुळापासून मजबूत बनतात. याचा कोणत्याही प्रकारचा साईड इफेक्ट नाही. शिलाजीत मध्ये मिळणारे मिनरल्स केसांसाठी गुणकारी असतात. कृपया कोणत्याही व्यक्तीने शिलाजीत केसांवरती लावू नये. कोणत्याही समस्या करिता शिलाजीत चा उपयोग करण्या पूर्वी तज्ञांचा सल्ला घ्यावा.
  11. अल्झायमर चा धोका कमी होतो – जसजसे वय वाढत जाते तसतसे व्यक्तीमध्ये अल्झायमर चा धोका सुद्धा वाढत जातो. अल्झायमर मुळे व्यक्तीची स्मरणशक्ती कमी व्हायला सुरुवात होते. काही काळानंतर ती एवढी कमी होते व्यक्तीच्या काहीच लक्षात राहणे संभव नसते. हा आजार नर्वस सिस्टम संबंधित आहे. त्यामुळे शिलाजीत च्या सेवनामुळे स्मरणशक्ती वाढते. नर्व्हस सिस्टिम चे कार्य सुधारते. मेंदूमधील न्यूरॉन चे कार्य अधिक विकसित होते त्यामुळे अल्झायमर रोगाचा धोका टळतो.

[ Shilajit Benefits ] शिलाजीत चे सेवन कशाप्रकारे करावे ?

बाजारामध्ये मिळणाऱ्या शिलाजीत पैकी चांगल्या दर्जाचे शिलाजीत खरेदी करावे. शिलाजीत उत्पादन करणाऱ्या कंपनीमध्ये स्पर्धा सुरू असल्यामुळे शिलाजीत च्या किमतीमध्ये आणि गुणवत्तेमध्ये तफावत आढळते. त्यामुळे स्वदेशी कंपनीद्वारे बनवलेले शिलाजीत वापरावे. शिलाजीत चिकट स्वरूपाची असते त्यामुळे शिलाजीत च्या डब्या मधून हरभऱ्याच्या दाण्या येवडा शिलाजीत चमचा द्वारे बाहेर काढावा आणि पाण्यामध्ये किंवा दुधामध्ये मिक्स करून सकाळी संध्याकाळी दोन वेळेस पिऊन घ्यावा. ज्या व्यक्तींना दूध पिल्यामुळे काही त्रास होत असेल तर त्यांनी पाण्यासोबत शिलाजीत चे सेवन करावे. शिलाजीत चे सेवन करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा.

[ Shilajit Benefits ] शिलाजीत ची निवड करताना खालील गोष्टी पहाव्यात.

  1. खात्रीशीर कंपनीच्या आणि ब्रांडेड कंपनीच्या शिलाजीत चा उपयोग करावा.
  2. शिलाजीत ची विक्री करणाऱ्या कंपनीद्वारे किती किमतीमध्ये किती कॉन्टिटी मिळत आहे हे पहावे.
  3. शिलाजीत मध्ये महत्त्वाचा असणारा घटक फुल्विक ॲसिड याचे प्रमाण किती आहे हे नक्की पाहावे
  4. शिलाजीत घेणाऱ्या व्यक्तीने स्वतःचे बजेट बघून शिलाजीत खरेदी करावे.
  5. तज्ञ लोकांच्या सांगण्यानुसार ओरिजनल शिलाजीत ची ओळख त्याच्या वासामुळे आणि त्याच्या चवीमुळे समजते. शिलाजीत विकत घेताना एखाद्या तज्ञ माणसाला बरोबर घेऊन जावे.
  6. काही कंपन्यांद्वारे शिलाजीत कॅप्सूल स्वरूपात तयार करण्यात आलेले आहे. कॅप्सूलच्या वापरामुळे शरीराला योग्य प्रमाणात शिलाजीत मिळते. वैद्यकीय चिकित्सा च्या सांगण्यावरून कॅप्सूल चे प्रमाण ठरवावे.

[ Shilajit Benefits ] शिलाजीतच्या अधिक सेवनामुळे होणारे दुष्परिणाम खालील प्रमाणे.

  1. शरीरामध्ये उष्णता वाढणे.
  2. हात पाय जळजळ करणे
  3. लघवी जास्त प्रमाणात होणे किंवा कमी प्रमाणात होणे.
  4. शिलाजीत मधील घटकांची कोणाला ऍलर्जी असेल तर त्या व्यक्तींनी शिलाजीत चा उपयोग करू नये.

Shilajit Benefits

[ Shilajit Benefits ] शिलाजीत चा उपयोग खालील व्यक्तींनी करू नये.

  1. गर्भावती किंवा स्तनपान करणाऱ्या स्त्रियांनी शिलाजीत चे सेवन करू नये.
  2. ज्या व्यक्तींना शिलाजीत ची ऍलर्जी आहे अशा व्यक्तींनी सुद्धा करू नये.
  3. लहान मुलांनी शिलाजीत चे सेवन करू नये.
  4. गंभीर आजार असणाऱ्या व्यक्तींनी शिलाजीत चे सेवन करू नये.
[ Vitamin B-12 Deficiency ] व्हिटॅमिन बी-१२ च्या कमतरतेचे परिणाम.

Leave a Comment