[ Good Year Tyers ] गुड इयर टायर चे यश
[ Good Year Tyers ] 1998 रोजी फ्रँक सीबरलिंग या 38 वर्षाच्या माणसाने गुड इयर ही कंपनी सुरू केली. त्यावेळीस कंपनीत फक्त 13 कामगार होते त्यांच्या जोरावर त्यांनी कंपनी सुरू केली. तेरा कर्मचाऱ्यांपासून सुरू झालेली कंपनी 2018 रोजी 64,000 कर्मचाऱ्यांची संख्या असलेली कंपनी बनली.
गुड इयर या कंपनीने जगभरातील 27 देशात आपल्या व्यवसायाचा जम बसवलेला आहे. 1750 कोटी डॉलर्स इतकी उलाढाल कंपनीने 2022 रोजी केली. रबरी पाईप जी आग विझवण्यासाठी वापरले जाते आणि घोड्याच्या टाचेला बसवले जाणारे रबर बनवणे, दोन चाकी सायकलींना आणि गॅरेजला बसणारे टायर्स सुरुवातीला ही कंपनी बनवत होती.
विमान आणि मोटार कार यांचेही टायर्स या कंपनीने विसाव्या शतकात बनवायला सुरू केले. त्यावेळीस कंपनी एवढी मोठी अवाढव्य होईल आणि जगात नाव कमावणारी होईल असा कोणालाही अंदाज नव्हता. सायकल ही 1890 च्या दशकात जगभर प्रसिद्ध झालती लोकांना सायकलीचे खूप वेड लागलेले होते. यामुळेच फ्रँक च्या डोक्यात टायर बनवण्याची कल्पना आली असावी. टायर निर्मितीसाठी त्याने एक छोटा कारखाना विकत घेतला. हा कारखाना घेण्यासाठी त्याला त्यावेळेस 3500 डॉलर्स इतकी रक्कम मोजावी लागली. तेव्हा त्याला स्वतःच्या मेहुण्या कडून पैसे उसने घ्यावे लागले होते.
[ Good Year Tyers ] मोटारीसाठी टायर बनवण्याची सुरुवात.
मोटारीचे टायर बनवण्यासाठी फ्रँक याने 1901 मध्ये सुरुवात केली. त्याकाळी रेस साठी लागणाऱ्या मोटार गाड्या फोर्ड बनवत होता . या गाड्यांसाठी लागणाऱ्या टायर ची निर्मिती ही फ्रँक ने केली होती. त्याकाळी ट्यूब शिवाय टायर बनवण्याचे पेटंट पी. डब्ल्यू. लीच फिल्ड याने मिळवल. विमानांच्या चाका साठी वापरला जाणारा टायर म्हणजे न्यूमॅटिक टायर 1909 रोजी बनला.
[ Good Year Tyers ] गुडईयर या कंपनीने पहिल्यांदाच अमेरिकेबाहेर कॅनडा मध्ये आपला पहिला कारखाना 1910 रोजी सुरू केला. अनेक ऐतिहासिक उड्डाण मध्ये गुड इयर कंपनीचे टायर्स वापरले गेले आहेत. त्यामध्ये न्यूयॉर्क मधील लॉंग आयलँड पासून कॅलिफोर्नियातील लॉन्ग बीच पर्यंतचा 84 दिवसाचा विमान प्रवास या प्रवासामध्ये सुद्धा गुड इयर चे टायर्स वापरलेले आहेत.
गुड इयर कंपनीने पहिला नायलॉनचा टायर 1947 रोजी काढला. 1950 पर्यंत गुड इयर्स कंपनीने 50 कोटी टायर्स बनवले होते. कंपनीची विक्री ही 100 कोटी डॉलर्सच्या वरती गेलेली होती. ‘अपोलो 14’ सोबतच गुड इयर्स 1970 रोजी चंद्रावर जाऊन पोहोचले होते. रेडियल टायर हा कंपनीने 1977 रोजी काढला. यानंतर ‘ व्हाईट हाऊस’ मधून चांगल्या प्रकारे वेस्ट डिस्पोजल उत्तम प्रकारे केल्याबद्दल बक्षीस हे मिळालं. आज ही कंपनीकडे प्रदूषण मुक्त असणारी एक बट्टी आहे.
निर्मिती प्रक्रियेतून बनणारे खराब टायर्स या भट्टीमध्ये इंधन म्हणून वापरण्यात येतात. जपानच्या सुमिटोमो या रबर निर्माण करणाऱ्या कंपनीसोबत 1999 रोजी गुड इयर कंपनीने करार केला. जपानमध्येही त्यांची जॉईंट व्हेंचर तयार झाली. त्याचप्रमाणे डनलॉप टायर्स वरही थोडेफार हक्क गुड इयर टायरला मिळाले. टायर्स निर्मितीमध्ये यश मिळाल्यानंतर त्यांनी रबर आणि रबरा शी निगडित उत्पादन यावर लक्ष केंद्रित केलं. तंत्रज्ञानाचा उपयोग करून नवीन नवीन गोष्टी तयार करण्यात गुड इयर टायर चा कल होता.
[ Good Year Tyers ] गुड इयर कंपनीचा इतिहास
आता आपण गुड इयर कंपनीची आकडेवारी पाहिली आता या कंपनीचा संक्षिप्त इतिहास पाहूया. या कंपनीला गुड इयर हे नाव कशामुळे मिळाले ? हे नाव पडण्यामागे एक व्यक्ती आहे आणि त्याचे नाव चार्ल्स गुडइयर असे आहे. इस 1800 संपायच्या आधी दोन दिवस तो जन्मला होता. चार्ल्स याने आपल्या वडिलांसोबत काही दिवस काम केले. त्याच्या वडिलांचा हार्डवेअर चा उद्योग होता.
1821 रोजी गुड इयर आणि त्याच्या वडिलांना एकत्रित सुरू केलेल्या व्यवसायात मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. यामुळे त्यांच्या कुटुंबाची हाल झाले. सर्व कुटुंब कर्जबाजारी झाले. या सर्व घटनाक्रमामुळे चार्ल्सला अनेक वेळा नैराश्यात जावे लागले. पण या काळात सुद्धा तो रबर संशोधन करतच होता. काही केल्याने रबराचे खुळ त्याच्या डोक्यातून जात नव्हते. रबरा बरोबर खेळण्यात त्याला मजा वाटते. रबर पाण्यात विरघळत नाही, तो टिकाऊ आहे, रबरा पासून अनेक उत्पादन बनवले जातात. यामुळे तो रबराच्या विलक्षण प्रेमात होता.
रबरा विषयीचे प्रश्न सोडवण्याचा विचार त्याच्या डोक्यात सतत चालत होता. तुरुंगात असताना सुद्धा ही त्याने रबराचे खूप प्रयोग केले तुरुंगात त्यांनी आपल्या बायकोला कच्चा रबर आणि रोलिंग पिन आणायला सांगितली. ज्यादिवशी तो तुरुंगाच्या बाहेर पडला तेव्हा त्याने मॅग्नेशियम ची पावडर रबरात मिक्स केली. यामुळे रबराचा चिकटपणा थोडा कमी झाला. हा एक फायद्याचाच प्रयोग ठरला.
[ Good Year Tyers ] रबरा संबंधी समस्यांचे प्रश्न सोडवणे हेच ध्येय होते.
[ Good Year Tyers ] रबरा संबंधीचे प्रश्न सोडवणे हे गुडइयर ने आपल्या आयुष्यात ध्येय ठरवलं होतं. पुढची सगळी वर्ष त्याने रबराचे प्रश्न सोडवण्यात घालवली. यामध्ये त्याचा सगळा पैसा, वेळ आणि सर्वस्व त्याने पणाला लावले. त्याच्या या नादामुळे त्याच्या सगळ्या वस्तू वरती कर्ज झाले आणि गरिबी ओढवली. गरज पडेल तेव्हा तो भिकाऱ्यासारखे लोकांना भिक मागे. बिचर नावाच्या एका मुलीशी चाचणी 1824 रोजी लग्न केले. त्याला बरीच मुले होती. पण गरिबीमुळे तो त्यांना अन्न आणि औषध देऊ शकला नाही त्यामुळे त्यातली काही मुले दगावले. एवढं करून सुद्धा रबरा विषयी संशोधन करण्याचा त्याचा नाद संपला नाही.
घरातील स्वयंपाक घरालाच त्याने आपली प्रयोगशाळा बनवले. या प्रयोगशाळेमध्ये तो विविध प्रकारचे रबर आणून त्यांच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग करत. त्याचे जेवढे रबरावर प्रेम होते तेवढेच रबरा बाबत तो वेडा होता कधी कधी तो रबरा पासून बनवलेला सूट घालत. त्याच्या या प्रयोगात त्याला बायकोने आणि मेहुण्याने साथ दिली. मेहुण्याने त्याला 46000 डॉलर्स इतकी रक्कम दिली.
पण त्याने दिलेल्या पैशाची कधी राख रांगोळी झाली हे समजलंच नाही. एवढे होऊन त्याने कधी हो की चूक केलं नाही. प्रयोगासाठी तो मित्रांकडून कर्ज घेत असे आणि कर्ज न फेडता आल्यामुळे त्याला कित्येक वेळा तुरुंगवासही भोगावा लागला आहे. चार्ल्स याचा दोन वर्षाचा मुलगा 1840 रोजी मृत्यू पावला त्याच्या अंत्यविधीसाठी सुद्धा पैसे चार्ल्स कडे नव्हते. त्याकाळी त्याने अमेरिकेतील पोस्ट ऑफिस साठी पत्र आणण्यासाठी रबरी बॅगा बनवल्या. पण उष्णतेमुळे त्यांचा टिकाव लागला नाही त्यामुळे त्या उन्हात वितळून गेल्या. अशा पद्धतीने हाही प्रयोग फसला. पण चार्ल्स खचून गेला नाही.
त्याचवेळी त्याला एक असे स्वप्न पडले की सल्फर म्हणजेच गंधक रबरात मिसळल्यानंतर रबराचे गुणधर्म बदलतात ही संकल्पना गुड इयर ला पटलेली होती. पण याचं प्रात्यक्षिक त्यानं कधी करून पाहिलं नव्हतं. एकदा स्टो वर प्रयोग करत असताना रबर आणि सल्फर एकत्र मिसळल्यामुळे रबराचे गुणधर्म बदललेले त्याला जाणवले. यामुळे रबराला वास येत नव्हता. पाण्याचा त्यावर परिणाम होत नसल्यामुळे पाण्यात ते चांगले टिकत होते. खूप थंडी आणि खूप उष्णता या दोन्ही वेळेस रबर जसेच्या तसे राहत होते. खाली पडले तर ते तुटत नव्हते. या अपघाती प्रयोगामुळे रबर उद्योगात पहाट झाली. गुड इयर ने या प्रक्रियेचे पेटंट 1844 रोजी घेतले.
[ Good Years Tyers ] गुड इयर याची कलाकृती.
लंडनमध्ये 1851 रोजी भरलेल्या प्रदर्शनात गुडइयर न रबरा पासून तयार केलेल्या बऱ्याच वस्तू प्रदर्शनात ठेवल्या होत्या. या वस्तू पाहून लोकांना आश्चर्य वाटले. बऱ्याच वृत्तपत्रात या वस्तूंविषयी लेख आले होते. त्याला बक्षीस म्हणून एक पदक मिळाले. पण हवे तेवढे पैसे त्याला अजून मिळत नव्हते. त्यातच त्याच्या पेटंटच्या चोऱ्या करून बऱ्याच लोकांनी उत्पादन करायला सुरुवात केली. मधल्या काळात बायकोही मरण पावली. पुढे तो फ्रान्समध्ये गेला.
फ्रान्स सरकारने त्याला दिलेले पेटंट हे त्याच्याकडून काढून घेतले. फ्रान्समध्येही तो कर्जबाजारी झाला यामुळे त्याला तिथल्या ‘क्लिची’ या कारागृहात टाकण्यात आले. तो कारागृहात असताना त्याच्या पेटंट वर बाहेर लोकांनी अमाप पैसा मिळवला. त्यानं पुढे जाऊन ” गम इलास्टिक” नावाचं स्वतःचा आत्मचरित्र हे लिहिलं. हे आत्मचरित्र विकून त्याला थोडेफार पैसे मिळाले. पण ते पैसे खूप कमी होते. शेवटी तो तसाच मरण पावला कुटुंबावरच बरच कर्ज न फेडता तो तसाच निघून गेला.
[ Good Year Tyers ] गुड इयर कंपनी आणि गुड इयर चा काहीच संबंध नव्हता. गुड इयर गेल्यानंतर जवळपास 38 वर्षानंतर 1898 रोजी फ्रँक सिबरलींक याने टायर बनवण्याची कंपनी काढली. गुड इयर बद्दल त्याला नेहमी आदर भावना वाटत होती. आयुष्यात एका गोष्टीसाठी वाहत जाण्याला त्याने दिलेली ही श्रद्धांजली होती.
[ Good Years Tyers ] गुड इयर कंपनी संदर्भातील वाद.
1979 ते 1998 या काळात गुड इयर कंपनीत लिली लेडबेटर नावाची महिला काम करत होती. नोकरीला असलेल्या या महिलेला इतर पुरुष कर्मचाऱ्यांप्रमाणेच पगार मिळत होता. पण काळानुसार तिच्या पगारात आणि पुरुष कर्मचाऱ्यांच्या पगारात खूप मोठी तफावत व्हायला लागली. आपण स्त्री असल्यामुळे कंपनीत आपल्याला जाणून बुजून शिवागण असल्याचे तिचे म्हणणे होते. त्यामुळे तिने गुडइयर कंपनी विरोधात खटला दाखल केला.
[ Good Year Tyers ] या केसचा निकाल तिच्या बाजूने लागला आणि तिला नुकसान भरपाई म्हणून 3.60 लाख डॉलर्स मिळावे म्हणून न्यायालयाने आदेश दिला. हे प्रकरण खूप जुनी असल्यामुळे अमेरिकन काँग्रेसने न्यायालयाने दिलेला निकाल ग्राह्य मानला जाऊ नये असा ठराव पास केला यामुळे कंपनीला नुकसान भरपाई द्यावी नाही लागली. पुढे खूप जुनी प्रकरणे बाहेर काढली जाऊ नयेत यासाठी कायदा बनविण्यात आला. या कायद्याला नाव लेड बेटर चा पडलं.