[ Singer Sewing Machine ] सिंगर चे शिवण यंत्र

[ Singer Sewing Machine ] सिंगर च्या शिवण यंत्राचे यश

[ Singer Sewing Machine ] 1920 च्या सुमारास गांधीजींनी पाश्चिमात्य तंत्रज्ञानाला विरोध केला होता. सिंगर च्या शिवणयंत्राला मात्र त्यांनी कधीच विरोध केला नाही. महात्मा गांधी तुरुंगात होते तेव्हा त्यांनी लिहिलेल्या पत्रात असे सांगितले आहे की ” जगात जर अतिशय उपयुक्त अशा गोष्टी शोधल्या तर त्यात सिंगर च्या शिवण यंत्राचा प्रथम क्रमांक लागेल” या शिवण यंत्रामुळे बऱ्याच जणांना नोकऱ्या मिळाल्या होत्या. बऱ्याच लोकांना रोजगार दिला गेला होता. यात शिवण यंत्रामुळे बऱ्याच लोकांनी आपली पोटं भरली. आता तुम्ही सर्व विचारात पडला असताल कि या शिवण यंत्राचा शोध कोणी लावला असेल तर याचा शोध आयझॅक मेरीट सिंगर या व्यक्तीने लावला होता. सिंगर चा स्वभाव हा क्रूर, फसवा, लबाड आणि व्यभिचारी असा होता. त्याचप्रमाणे तो डोक्याने ही खूप हुशार होता. त्याचं आयुष्य हे एक गमतीशीर होतो.

[ Singer Sewing Machine ] शिवण यंत्र निघायच्या अगोदर सर्व मंडळी ही सुई दोऱ्याने शिवणकाम करत होती. फ्रान्समधील एका व्यक्तीने पहिल्यांदा शिवण यंत्राचा शोध लावला. त्या व्यक्तीच नाव “बारथेलेमी थीमोनिए” . हे यंत्र जर बाजारात आलं तर शिवणकाम करणाऱ्या लोकांची कामे बुडतील या भीतीने लोकांनी ते यंत्र चक्क मोडून टाकले. त्यानंतर वॉल्टर हंट या व्यक्तीने अमेरिकेतील न्यूयॉर्क येथे शिवण यंत्रामध्ये सुधारणा करून त्याची पुढची आवृत्ती काढली. शिवण यंत्रामुळे बेकारी वाढेल या भीतीमुळे वॉल्टर हंट याला कोणीही मदत केली नाही.

[ Singer Sewing Machine ] सिंगर च्या शिवण यंत्रा पूर्वीचे जग.

[ Singer Sewing Machine ] शिवण यंत्राच्या निर्मितीमुळे बेकारी वाढेल किंवा आपल्याला कोणीही आर्थिक मदत करणार नाही. या भीतीला न घाबरता. हौ नामक अमेरिकेतील बोस्टन येथे राहणाऱ्या व्यक्तीने एक उत्कृष्ट दर्जाचे शिवण यंत्र तयार केले. पण बेकारी वाढेल या भीतीने त्याने लावलेल्या शोधाकडे कोणीही लक्ष दिले नाही. त्यामुळे ” हौ” याचे मानसिक संतुलन बिघडले त्यानंतर तो इंग्लंडला रवाना झाला. इंग्लंडमध्ये गेल्यानंतरही त्याच्या शोधाचे कोणीही कौतुक केले नाही. साधं त्याच्याकडे कोणी लक्षही दिले नाही. त्यामुळे तो कंटाळला आणि परत बॉस्टन ला आला. बॉस्टनला आल्यानंतर पाहतो तर काय सिंगर नावाच्या एका व्यक्तीने शिवण यंत्राचे उत्पादन घ्यायला सुरू केलेले होते.

हे समजल्यावर त्याने सिंगर च्या विरोधात खटला भरला. पण तोपर्यंत खूप सारे शिवण यंत्र बाजारात विकून सिंगर ने मोठ्या प्रमाणात पैसा कमावलेला होता. या पैशाचा उपयोग करून त्याने केस साठी प्रसिद्ध आणि महागडे वकील नेमले होते. शेवटी दोघांमध्ये तडजोड झाली आणि प्रत्येक शिवण यंत्राच्या विक्री मागे ‘ हौ’ ला 25 डॉलर्स इतकी रक्कम द्यायची ठरवली. यानंतर सिंगर चे नाव शिवण यंत्राशी जोडले गेले कारण ‘ हौ’ याने पैसे घेऊन शिवण यंत्राचा नाद सोडला त्यानंतर तो आर्मी मध्ये भरती झाला. त्यामुळे शिवण यंत्राचा आणि ‘ हौ’ यांचा कायमचा संबंध संपला.

[ Singer Sewing Machine ] शिवण यंत्राचा शोध

शिवण यंत्राचा सर्वकाही शोध ” हौ” ने लावलेला होता. असं नाही तर सिंगर सुद्धा यंत्राच्या बाबतीत खूप हुशार होता. एकदा त्याने लाकडा वरती अक्षर कोरणारे यंत्र तयार केले होते. या यंत्राच्या संदर्भातच सिंगर ची भेट “ऑर्सन फेलप्स” या व्यक्तीशी झाली. हा व्यक्ती सुद्धा शिवण यंत्र बनवण्याचं काम करत होता. पण त्याला परफेक्ट असं शिवण यंत्र बनवायला जमलं नाही. बनवलेल्या शिवण यंत्राचा सिंगर याने अभ्यास केला. आणि त्याला तीन अपेक्षित असे बदल सुचवले. सिंगर ने सुचवलेले बदल पाहून तो आश्चर्यचकित झाला. इतक्या कमी वेळात याने कसे काय बदल सुचवले असतील हे त्याला समजेना. आणि त्याने हे बदल करून फक्त 11 दिवसात नवीन शिवण यंत्र बनवले.

सिंगर याने बनवलेले पहिले शिवण यंत्र हे अमेरिका मधील ” स्मिथ सोनियन इन्स्टिट्यूशन” येथे अजून जसेच्या तसे जपून ठेवले आहे. सिंगर च्या कंपनीने 1851 रोजी शिवण यंत्राचे उत्पादन सुरू केले. या यंत्राचा डिझाईन सिंगर ने केलेले होते आणि उत्पादनासाठी फेलप्स याचा कारखाना वापरलेला होता. त्यांच्याबरोबरच “जॉर्ज झिबर” या व्यक्तीने त्यांना चाळीस डॉलर्स जास्त देऊन त्यांच्याबरोबर सामील झाला.

[ Singer Sewing Machine ] सिंगर आणि हौ यांच्यातील वाद.

सिंगर आणि हौ यांच्यात जो खटला चालू होता. त्या खटल्यामध्ये सिंगर च्या बाजूने जो वकील होता त्याचं नाव एडवर्ड क्लार्क असे होते. त्याने खटला जिंकल्यानंतर सिंगर च्या धंद्यात भागीदारी मागितली. सिंगर नेही त्याला व्यवसायात भागीदारी दिली. आता तो यंत्राच्या विक्रीचे काम पाहू लागला होता. सिंगर च्या कंपनीचा विस्तार करण्यात क्लार्क चा मोठा वाटा होता. त्याने आपल्या डोक्याचा आणि युक्तीचा वापर करून कंपनीचा विकास केला होता. बाजारात मोडकळीस आलेली शिवण यंत्रे परत कंपनीकडे यावी यासाठी त्याने कोणत्याही कंपनीचे शिवानी यंत्र देणाऱ्याला 50 डॉलर रक्कम सुरुवातीला द्यायला सुरुवात केली. त्यामुळे लोकांचा शिवण यंत्रावरील विश्वास बसत चालला. खरेदी केलेले शिवण यंत्र चालले तर चालले नाहीतर परत माघारी दिले असं लोक करत होते.

शिवण यंत्राबद्दल ची भीती आता त्यांच्या मनातून निघून गेली होती. यामुळेच 1853 रोजी शिवण यंत्र विक्री हे तीन पट झाली होती. आता सिंगर ने प्रत्येकाच्या घरी वापरता येतील अशा प्रकारचे शिवण यंत्र बनवलेले होते. पण या शिवण यंत्राची विक्री करण्याच्या वेळेस क्लार्कच्या समोर एक मोठा प्रश्न आला. तो म्हणजे त्याकाळी सर्वसामान्य कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 500 डॉलर होते. तर सिंगर च्या शिवणयंत्राची किंमत 125 डॉलर्स इतकी होती. त्यामुळे शिवण यंत्र खरेदीसाठी लोक तयार होत नव्हते.

Singer Sewing Machine

मग क्लार्कने हप्त्यावर शिवण यंत्र विकायचे ठरवले. त्यासाठी त्याने एक प्लॅन आखला. सुरुवातीला पाच डॉलर भरायचे आणि तिथून पुढे दरमहा तीन डॉलर भरायचे असा नियम केला. सिंगर नंतर क्लार्क हा कंपनीचा अध्यक्ष बनला. 1882 रोजी क्लार्क चा मृत्यू झाला. त्यानंतर मेक्याजी हा स्कॉटलंड वरून आलेला व्यक्ती कंपनीचे अध्यक्ष बनला. पुढे ही कंपनी जगभरात नावारूपाला आली.

सिंगर ही कंपनी अमेरिकेतील पहिलीच बहुराष्ट्रीय कंपनी म्हणून उदयाला आली. पुढे जाऊन त्यांनी स्कॉटलांड, ब्राझील आणि फ्रान्स येथे मोठे कारखाने उभे केले. फर्निचर आणि एरोस्पेस ला लागणारी यंत्रे सुद्धा 1958 रोजी कंपनीने तयार करायला सुरुवात केली. आज जवळपास 150 देशात कंपनीच्या शाखा आहेत. रिटेल दुकान-1500 , आउटलेट-58,200, विक्रेते- 18,200 आहेत. 1975 पासून शिवण यंत्राची विक्री झपाट्याने घसरली. तोपर्यंत कंपनीने 30 लाख यंत्रांची विक्री केली होती.

आता घरगुती शिवण यंत्र घेणे लोकांनी कमी केले होते. त्याऐवजी ते कार्यालयात जाऊन शिवण काम करत होते. त्यामुळे 2000 रोजी कंपनी तोट्यात गेली. तोट्यात गेलेली कंपनी फायद्यात आणण्यासाठी आता नवीन व्यक्तीची गरज होती. त्यासाठी त्यांनी झेरॉक्स कंपनीच्या माजी प्रमुख ला नेमले. त्याचे नाव होते जोसेफ फ्लाविन . या कामासाठी जोसेफ ची निवड झाल्यानंतर जोसेफने लगेच कंपनी नजिकच राहायला सुरुवात केली. खूप कष्ट आणि मेहनत घेऊन त्याने कंपनीत अमुलाग्र बदल घडवले. व्यवसायिक तोट्या पुढे त्याचेही काही चालले नाही. त्यानंतर सिंगर कंपनीला ‘ एसवीपी वर्ल्डवाईड’ या कंपनीनं विकत घेतल.

आता आपण सिंगर च्या आयुष्याबद्दल माहिती जाणून घेऊया. सिंगर कुठला होता? याबद्दल जाणून घेऊया. त्याचा जन्म हा ट्रॉय या न्यूयॉर्क जवळील खेड्यात झाला होता.

[ Singer Sewing Machine ] सिंगर चे लहानपण

सिंगर ला लहानपणी नाटकात काम करायला आवडायचे. त्याची उंची 6 फुट होती. तो दिसायला उंच आणि देखना रुबाबदार होता. त्याची कॅथरीन नावाच्या मुली सोबत ओळख झाली. आणि पुढे जाऊन तिच्याबरोबरच त्याने लग्न केले. त्यानंतर त्याने नाटकात काम करणे सोडले आणि लेथ मशीन ऑपरेटर म्हणून काम करू लागला. त्याचप्रमाणे त्याने कारकून म्हणून हे काम केले. नाटकाची ओढ त्याला स्वस्त बसून देत नव्हती. त्यामुळे त्याने परत एकदा नाटकात काम करायला सुरुवात केली.

यावेळी त्याला मेरी नावाच्या मुलीसोबत प्रेम झालं. आणि लग्न न करताच ते दोघे एकत्र राहू लागले. त्याकाळी हे सर्व भयानक मानलं जायचं. ही गोष्ट कॅथरीन ला समजताच. तिने सिंगर चा साथ सोडला आणि मुलांना घेऊन आपल्या वडिलांजवळ राहू लागली. आता मेरी आणि सिंगर गावोगावी फिरून नाटक करत होते. पण नाटकात एवढा पैसा मिळत नव्हता त्यामुळे त्याने टायपिंग चे काम सुरू केले. लाकडा वरती अक्षर कोरायचे यंत्र त्याने शोधून काढले. त्याच काळात त्याच्या हातात शिवण यंत्र हे पडले. त्याने हे यंत्र लपून न्यूयॉर्कला नेले. आणि त्याचे उत्पादन घ्यायला सुरुवात केली. आणि त्यातून त्याने बरेच पैसे कमावले. न्यूयॉर्कमध्ये त्याने स्वतःचे घरही घेतले. फिरण्यासाठी घोड्याची एक बग्गी घेतली. कामासाठी त्याने खूप नोकर चाकर ठेवले.

पुढे जाऊन त्याने एक डॉक्टर 24 तास त्याच्या सेवेसाठी ठेवलेला होता. कारण तो कधीकधी मनोरुग्ण करत असे. मेरीला आणि मुलांना तो नाका तोंडातून रक्त येईपर्यंत मारत असे. कोणत्याही बारीक गोष्टींवरून तो चिडत असे. एकदा अशाच छोट्याशा कारणावरून त्याने मिरीला नाकातून रक्त येईपर्यंत मारलं होतं. हळूहळू मेरीला समजलं की कॅथरीन सोडून सिंगर ला अजूनही बर्‍याच बायका आहेत त्यातल्या काही बरोबर तर त्याने फसवून लग्न केलेली आहेत. मेरी नावाच्या तीन बायकांसोबत त्याचा संसार चालू होता. यामुळे मेरी त्याच्यावर ती संतापली आणि चक्क सिंगर विरोधात खटला भरला. त्यामुळे सिंगर पळून इंग्लंडला गेला.

आयझॅक सिंगर हा पुढे जाऊन खूप एकाकी पडला आणि दिवसेंदिवस तो दुःखी बनत चाललेला होता. कारण त्याला रोज लोकांची टीका आणि तिरस्कारच मिळत होता. एकदा त्याने लोकांना खुश करण्यासाठी पार्टी दिली होती पण त्या पार्टीला कोणीही हजर राहिला नाही. शेवटी 1873 रोजी तो इंग्लंडला एकाकी अवस्थेतच मृत्युमुखी पडला.

[ Home Remedies for Acne ] चेहऱ्यावरील मुरूम कमी करण्यासाठी 9 घरगुती उपाय.

 

Leave a Comment