[ Benefits of Multivitamin ] विटामिन हे शरीर बांधणीसाठी आवश्यक असणारा घटक आहे. विटामिन मुळे आरोग्य व्यवस्थित राहते. शरीरातील विटामिन चे प्रमाण किंवा मिनरल चे प्रमाण कमी झाल्यामुळे त्या व्यक्तीला अति खाण्याच्या किंवा कमी खाण्याच्या सवयी लागतात. मल्टी विटामिन टॅबलेटच्या सेवनामुळे या खाण्याच्या लागलेल्या सवयी कमी होतात. यामुळे भविष्यात गंभीर आजार होण्याची संभावना कमी होते.
आपण सर्वजणच नेहमी चांगला आहार घेण्याचा प्रयत्न करतो, व्यायाम करतो आणि चांगली झोप सुद्धा घेतो. तरीसुद्धा आपल्या शरीरामध्ये काही विटामिन चे प्रमाण किंवा काही मिनरल्स चे प्रमाण कमी झालेले आढळून येते. धावपळीच्या जगामध्ये बऱ्याच वेळेस आपल्याला चांगला आहार मिळत नाही. व्यायाम करायला वेळ मिळत नाही त्याचप्रमाणे कामाच्या तणावामुळे झोप सुद्धा चांगली मिळत नाही यामुळे विटामिन च्या कमतरतेची समस्या सुरू होते.
बरेच लोक विटामिन च्या कमतरतेमुळे समस्येपासून दूर राहण्यासाठी दररोज एक मल्टी विटामिन टॅबलेट सेवन करायची सवय लावतात.
[ Benefits of Multivitamin ] मल्टी विटामिन संदर्भात माहिती खालीलप्रमाणे
[ Benefits of Multivitamin ] अन्नपदार्थांमध्ये उपलब्ध असणारे विविध प्रकारचे विटामिन आणि मिनरल्स मल्टी विटामिन मध्ये उपलब्ध असतात. मल्टी विटामिन च्या टॅबलेट्स किंवा कॅप्सूल चे दररोज सेवन केल्यामुळे शरीराला कमी पडत असणारे विटामिन्स आणि मिनरल्स शरीराला मिळतात आणि शरीराचे आरोग्य व्यवस्थित राहते. शरीराला लागणाऱ्या दैनंदिन कामासाठी आवश्यक असणारे विटामिन्स आणि मिनरल्स त्याचप्रमाणे शरीरामध्ये कमी पडणारे विटामिन्स आणि मिनरल्स लगेच मिळवायचे असतील तर मल्टी विटामिन हा सगळ्यात चांगला मार्ग आहे.
जर तुमच्या आहारामध्ये सर्व विटामिन युक्त पदार्थ असतील तर तुम्हाला मल्टी विटामिन टॅबलेट किंवा कॅप्सूल घेण्याची आवश्यकता नाही. गर्भवती महिलांनी आणि स्तनपान करणाऱ्या महिलांनी मल्टी विटामिन घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
जर तुमच्या शरीरामध्ये कोणत्याही एका विटामिन कमतरता असेल तर कमतरता असलेल्या विटामिन ची टॅबलेट किंवा कॅप्सूल घ्यावी. ही कॅप्सूल मल्टी विटामिन च्या कॅप्सूल पेक्षा तुमच्या शरीरामध्ये अधिक चांगल्या पद्धतीने काम करेल. पण शरीरामध्ये कोणत्या विटामिन ची कमी आहे हे शोधणे खूप वेळ खाऊ आहे त्यामुळे मल्टी विटामिन ची कॅप्सूल सेवन करणे सहज आणि सोपे आहे.
[ Benefits of Multivitamin ] मल्टीविटामिन मध्ये असणारे घटक खालीलप्रमाणे
[ Benefits of Multivitamin ] मल्टी विटामिन मध्ये विविध प्रकारचे विटामिन्स आणि विविध प्रकारचे मिनरल्स असतात. मानवी शरीराचे व्यवस्थित काम चालण्यासाठी 13 विटामिन आणि 16 मिनरल्स आवश्यक असतात. त्यामुळे प्रत्येक मल्टीविटामिन मध्ये हे व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स असतातच. पण त्याच बरोबर अमिनो ऍसिड, फॅटी ॲसिड यांसारखे घटक सुद्धा असतात. मल्टी विटामिन मध्ये असणारे घटक खालील प्रमाणे.
कार्बोहायड्रेट, शुगर, फायबर, फॅट, ट्रान्स फॅट, सॅच्युरेटेड फॅट, कोलेस्ट्रॉल, प्रोटीन, कॅल्शियम, आयर्न, विटामिन ए, विटामिन सी, विटामिन बी 1, विटामिन बी 2, विटामिन बी 6, विटामिन ई, विटामिन डी, बेटा केरोटीन, सोडियम, फॉलिक ऍसिड, फॉस्फरस, पोटॅशियम, ओमेगा 3, ओमेगा 6, ओमेगा 7, ओमेगा 9, विटामिन b12, मॅग्नेशियम सल्फेट, झिंक ऑक्साईड
यांसारखे घटक मल्टी विटामिन मध्ये असतात.
[ Benefits of Multivitamin ] मल्टीविटामिन चे फायदे खालील प्रमाणे
- ऊर्जा वाढवते – जर शरीरामध्ये आवश्यक विटामिन्स आणि मिनरल्स यांची कमतरता असेल तर शरीरातील ऊर्जा कमी होते. दररोज डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मल्टी विटामिन चे सेवन केल्यानंतर शरीरातील ऊर्जा पुन्हा वाढायला सुरुवात होते कारण कमी झालेल्या विटामिन्स आणि मिनरल चे प्रमाण वाढू लागते. आणि व्यक्तीला पुन्हा शरीरामध्ये ऊर्जेचा संचार झालेले अनुभूती येते.
- डोळ्याचे आरोग्य सुधारते – डोळ्यांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी विटामिन ए ची गरज असते. पण दररोजच्या आहारा मधून विटामिन ए मिळणे जरा अवघड जाते. बऱ्याच वयोवृद्ध व्यक्तींमध्ये विटामिन ए ची कमतरता होते त्यामुळे त्यांना रात आंधळेपणा झाल्याचे समजते. बऱ्याच लहान मुलांमध्ये विटामिन च्या कमतरतेमुळे चष्मा कमी वयात लागण्याच्या समस्या उद्भवतात. जर मल्टी विटामिन चे योग्य प्रमाणात सेवन केले तर विटामिन ए ची कमतरता शरीरात निर्माण होणार नाही. त्याचप्रमाणे डोळ्याच्या विकासासाठी आणि डोळ्याच्या रोगप्रतिकारशक्ती साठी आवश्यक असणारे सर्व घटक मल्टी विटामिन मधून मिळतील आणि डोळ्याचे आरोग्य सुधारेल.
- मांसपेशी मजबूत बनवते – शरीरातील मांसपेशी च्या विकासासाठी प्रोटीन ची आवश्यकता असते. प्रोटीन च्या कमतरतेमुळे मांसपेशी कमकुवत व्हायला लागतात. शरीरामध्ये प्रोटीन ची निर्मिती अमिनो ऍसिड पासून होत असते. मल्टी विटामिन मध्ये मोठ्या प्रमाणात अमिनो ऍसिड असतात. त्यामुळे शरीरात प्रोटीन ची निर्मिती योग्य प्रमाणात होते. प्रोटीन ची कमतरता पूर्ण होते आणि मांसपेशी सदृढ बनतात.शरीरामध्ये निर्माण होणाऱ्या फ्री रॅडिकल मुळे मांसपेशी कमकुवत बनतात. मल्टी विटामिन मध्ये असणारे एंटीऑक्सीडेंट फ्री रॅडिकल चे काम निष्क्रिय करते यामुळे मांसपेशी विकसित होतात.
- रोगप्रतिकारशक्ती वाढते – मल्टी विटामिन च्या वापरामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढते. कारण शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासाठी पांढऱ्या पेशींचे प्रमाण योग्य असणे गरजेचे असते. पेशींच्या निर्मितीसाठी आणि त्यांचे कार्य प्रणाली व्यवस्थित चालण्यासाठी आवश्यक विटामिन ची गरज मल्टी विटामिन मधून पूर्ण होते. मल्टी विटामिन मध्ये असणारे विटामिन सी आणि विटामिन ई हे अँटिऑक्सिडंट फ्री रॅडिकल ला निष्क्रिय करतात आणि त्यामुळे शरीराला होणारी इजा कमी होते. आणि शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढते.
- हृदयाचे आरोग्य सुधारते – हृदय हे शरीरातील एक मुख्य अवयव आहे. त्यामुळे त्याचे आरोग्य व्यवस्थित ठेवणे खूप गरजेचे आहे. मल्टी विटामिन च्या वापरामुळे हृदयाचे आरोग्य चांगले राहते. त्याचप्रमाणे हृदयरोग होण्याची शक्यता कमी होते. मल्टीविटामिन मध्ये असणाऱ्या विटामिन्स आणि मिनरल्स मुळे रक्तवाहिन्यांचे कार्य सुधारते आणि हृदयापर्यंत रक्त व्यवस्थित पोहोचते.
- कॅन्सरचा धोका कमी करते – मल्टी विटामिन मध्ये मोठ्या प्रमाणात अँटिऑक्सिडंट असतात. त्यामुळे दररोज मल्टी विटामिन च्या सेवनामुळे सर्व प्रकारच्या कॅन्सरचा धोका हळूहळू कमी होतो. जर तुम्हाला मल्टी विटामिन चे सेवन करायचे असेल त्यापूर्वी तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
- मेंदूचे कार्य सुधारते – मेंदूचे कार्य चांगले चालण्यासाठी मेंदूला डीएचए आणि विटामिन बी 12 ची आवश्यकता असते. त्याचप्रमाणे ओमेगा थ्री ची सुद्धा गरज असते. हे सर्व घटक मल्टी विटामिन मध्ये उपलब्ध असतात त्यामुळे मल्टी विटामिन च्या सेवनामुळे मेंदूचे कार्य व्यवस्थित चालते.
- तणाव आणि नैराश्य कमी होणे – मानवी शरीरामध्ये आनंदी राहण्याकरिता असणाऱ्या हार्मोन्स चे प्रमाण कमी झाल्यानंतर तणाव आणि नैराश्य वाढत असते. मल्टी विटामिन च्या सेवनामुळे तणाव आणि नैराश्य कमी झालेले चे आपल्याला दिसून येते. कारण शरीराला योग्य पोषण मिळाल्यानंतर शरीर तणाव करणारे हार्मोन्स कमी करते आणि आनंदी राहण्यासाठी आवश्यक असणारे हार्मोन्सची संख्या वाढवते. त्यामुळे व्यक्तीचा मूड चांगला राहतो.
- त्वचेसाठी फायदेशीर – त्वचा चांगली राहण्यासाठी विटामिन सी, विटामिन ई, विटामिन डी थ्री, विटामिन बी12 यांसारख्या विटामिन ची त्वचेला गरज असते. जर हे व्हिटॅमिन मिळाले नाहीत तर त्वचा काळी पडणे, त्वचेची रोगप्रतिकारशक्ती कमी होणे, सतत त्वचेचे आजार होणे यांसारखी लक्षणे दिसू लागतात. मल्टी विटामिन मध्ये त्वचेला आवश्यक असणारे सर्व विटामिन असतात त्यामुळे त्वचेचे आरोग्य सुधारते.
- केसांचे आरोग्य सुधारते –आजकाल आपण पाहत आहोत की धावपळीच्या युगामध्ये केसांच्या समस्या खूपच वाढलेल्या आहेत. केस गळणे, केस पांढरे होणे, डोक्यामध्ये चाळ पडणे, केस विरळ होणे यांसारख्या अनेक समस्या आजच्या तरुणांपासून वृद्ध व्यक्तींपर्यंत भेडसावत आहेत.
[ Benefits of Multivitamin ] केसांचे आरोग्य जर चांगले ठेवायचे असेल तर केसांना बायोटिन, विटामिन सी, विटामिन ई यांसारखे घटक लागत असतात. यांसारख्या घटकांची आहारातून पूर्तता झाली न झाल्यावर केसाच्या समस्या सुरू होतात. यावर उपाय म्हणून मल्टी विटामिन चे सेवन करणे हा चांगला उपाय आहे.
अलीकडे केसांसाठी बनवण्यात येणारे सौंदर्यप्रसाधनांमध्ये सुद्धा विटामिन ई चे प्रमाण वापरले जाते. जर तुमचे केस अधिक पांढरे होत चालले असतील तर तुम्ही मल्टी विटामिन च्या सेवनामुळे त्याचे प्रमाण कमी करू शकता.
[ Benefits of Multivitamin ] विटामिन मुळे होणारे साइड इफेक्ट
[ Benefits of Multivitamin ] प्रमाणापेक्षा जास्त मल्टी विटामिन चे सेवन केल्यामुळे त्याचे साईड इफेक्ट सुद्धा होत असतात. मल्टी विटामिन मुळे होणारे साइड इफेक्ट कमी करण्यासाठी डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसारच आणि दिलेल्या प्रमाणानुसार मल्टी विटामिन चे सेवन करावे. जास्त प्रमाणात मल्टी विटामिन चे सेवन केल्यामुळे अधिक जास्त झोप लागणे किंवा झोप न लागणे यांसारख्या समस्या होऊ शकतात.
त्याचप्रमाणे पचनास संदर्भातील समस्या सुद्धा उद्भवू शकतात. चांगल्या क्वालिटीचे मल्टी विटामिन न वापरल्यामुळे किडनी लिव्हर यांच्या सुद्धा समस्या उद्भवू शकतात. सतत मल्टी विटामिन वापरल्यामुळे नंतर मल्टी विटामिन चा काहीच फरक शरीरावरती पडत नाही. जर कोणत्याही प्रकारचा साईड इफेक्ट मल्टी विटामिन च्या वापरामुळे दिसायला लागला तरतरीत डॉक्टरांची संपर्क साधावा. आणि त्यांच्या सांगण्यानुसार मल्टी विटामिन चे प्रमाण कमी जास्त करावे.
[ Benefits of Multivitamin ] चांगल्या मल्टी विटामिन ची निवड कशी करावी ?
[ Benefits of Multivitamin ] मल्टी विटामिन ची निवड करत असताना सर्वप्रथम कोणत्या कंपनीचे मल्टी विटामिन आहे हे तपासून घ्यावे. त्यानंतर ती कंपनी किती वर्षापासून सेवा देत आहे आणि कशाप्रकारे सेवा देत आहे यासंदर्भात माहिती घ्यावी. यानंतर मल्टी विटामिन ची किंमत किती रुपये आहे हे तपासावे. कारण आजकाल मल्टी विटामिन चे मार्केटिंग करून मल्टी विटामिन जास्त किमतीला विकले जात आहे.
त्यामुळे जे मल्टी विटामिन योग्य किमतीमध्ये मिळत आहे आशा मल्टी विटामिन ची निवड करावी. मल्टी विटामिन मध्ये असणारे घटक तपासून घ्यावे. त्यामध्ये तुम्हाला आवश्यक असणारे घटक आहेत का याबाबत चौकशी करावी. मल्टी विटामिन ची एक गोळी किती एमजी ची आहे हे तपासावे. विकत मल्टी विटामिन घेणार आहे त्या मल्टी विटामिन चा फरक रुग्णांना पडत आहे का नाही याबाबत रुग्णांचे रिव्यू ऑनलाइन वाचावेत. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मल्टी विटामिन ची निवड केल्यानंतर आपल्या डॉक्टरांना सदरील मल्टी विटामिन चा उपयोग करावा की नाही याबद्दल विचारावे.
[ Benefits of Vitamin C ] विटामिन ‘सी’ चे फायदे