[ Benefits of Vitamin C ] विटामिन ‘सी’ चे फायदे

[ Benefits of Vitamin C ] शरीरामध्ये आवश्यक विटामिन्स पैकी एक महत्त्वाचा विटामिन म्हणजे विटामिन सी हा आहे. विटामिन सी मुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढते. वातावरणातील बदलामुळे होणाऱ्या आजारांपासून शरीराचे रक्षण करण्याचे काम करते. ज्या व्यक्तीच्या शरीरामधील प्रतिकारशक्ती कमी झालेली आहे अशा व्यक्तींना विटामिन सी युक्त आहार खाण्याचा सल्ला दिला जातो. कोरोना काळामध्ये सुद्धा रुग्णांना विटामिन सी च्या टॅबलेट्स खाण्यासाठी देण्यात येत होत्या. चेहऱ्यावर येणारा काळपटपणा विटामिन सी च्या सेवनामुळे कमी व्हायला सुरुवात होतो. विटामिन सी च्या टॅबलेट्स घेण्यापूर्वी एकदा डॉक्टरांचा अवश्य सल्ला घ्यावा. प्रत्येक मानवी शरीराला दररोज 2000 mg एवढ्या प्रमाणातच विटामिन सी घेण्याचा सल्ला दिला जातो. हा सल्ला फक्त 18 वर्षे पुढील लोकांसाठी आहे. लहान मुलांमध्ये याचे प्रमाण डॉक्टरांच्या सांगण्यावरून ठरवले जाते.

शरीरातील रक्तामध्ये विटामिन सी चे प्रमाण कमी झाल्यानंतर रुग्णाला येणाऱ्या अडचणी समजून घेतल्या गेल्या. त्याचप्रमाणे ज्या रुग्णांमध्ये विटामिन सी चे प्रमाण भरपूर आहे अशा रुग्णांमध्ये त्याचा होणारा फायदा लक्षात घेतला गेला. आणि त्यावरून मानवी शरीराला विटामिन सी चे काय फायदे होतात याचा अंदाज लावण्यात आला.

[ Benefits of Vitamin C ]  विटामिन सी मुळे होणाऱ्या फायद्यांमुळे विटामिन सी जगभरातील लोकांच्या समोर आलेले आहे. ज्या व्यक्तीच्या शरीरामध्ये विटामिन सी चे प्रमाण योग्य आहे अशा व्यक्ती चे आरोग्य चांगल्या स्वरूपाचे असल्याचे दिसून आले आहे. अशा व्यक्तीची रोगप्रतिकारशक्ती सुद्धा चांगली असल्याचे दिसून आले आहे. विटामिन सी चे प्रमाण शरीरात योग्य असेल तर शरीर हृदयविकार, कॅन्सर, स्ट्रोक, डोळ्यांचे आजार यांसारख्या रोगांपासून दूर राहते. आणि मानवी शरीराला आजार होत नाहीत. यामुळे सर्वांनीच विटामिन सी युक्त आहार घ्यावा. विटामिन सी चे सप्लीमेंट घेत असताना लोकांनी अधिक प्रमाणात सेवन करू नये.

Benefits of Vitamin C

[ Benefits of Vitamin C ] विटामिन सी किती प्रमाणात घ्यावा ?

[ Benefits of Vitamin C ]  विटामिन सी चे सेवन करणे शरीरासाठी चांगले असले तरीसुद्धा त्याचे नैसर्गिक स्वरूपात सेवन करणे योग्य ठरू शकते. पण काही लोक विटामिन सी च्या सप्लीमेंट चा उपयोग करतात किंवा विटामिन सी च्या सप्लीमेंट चा उपयोग करण्यासाठी डॉक्टरां द्वारे त्यांना सांगितले जाते. पण अशा सप्लीमेंट चे सातत्याने सेवन करणे किंवा प्रमाणापेक्षा जास्त सेवन करणे घातक ठरू शकते.

या सप्लीमेंट चा फायदा होत आहे म्हणून बरेच लोक याचे प्रमाणाबाहेर सेवन सुद्धा करताना दिसत आहे. माणसाच्या शरीराला दररोज 2000 mg इतक्या प्रमाणात विटामिन सी आवश्यक असते. तरी याच्यापेक्षा जास्त सेवन करू नये. कायमस्वरूपी दररोज जर तुम्हाला विटामिन सी चे सेवन करायचे असेल तर दिवसाला फक्त 500 mg सेवन करणे फायद्याचे ठरू शकते. याच्यापेक्षा जास्त किंवा कमी सप्लीमेंट चे सेवन करू नये.

पण काही व्यक्तींच्या शरीरामध्ये जेवढ्या विटामिन सी ची गरज आहे. त्यापेक्षाही कमी प्रमाणात व्हिटॅमिन सी उपलब्ध असलेल्या चे दिसते. परंतु भारतामध्ये विटामिन सी चे प्रमाण कमी असणाऱ्या व्यक्तींची संख्या खूपच कमी आहे. खूपच कमी लोकांमध्ये विटामिन सी ची कमतरता जाणवते. बऱ्याचशा लोकांना विटामिन सी च्या कमतरतेमुळे अशक्तपणा, ॲनिमिया, रक्त प्रवाह जाणे, दात पडणे यांसारखे आजार झालेले दिसून येतात.

तज्ञांच्या सांगण्यानुसार जो व्यक्ती दररोज 500 mg एवढे विटामिन सी चे सप्लीमेंट घेत असतो आशा व्यक्तीला कोणत्याही प्रकारचे साईड इफेक्ट दिसत नाहीत. फक्त काही व्यक्तींमध्ये त्यांचे पोट खराब होण्याची लक्षणे दिसण्यात आलेली आहेत. पण याच्यावर उपचार म्हणून सप्लीमेंट च्या कंपनीमध्ये बदल केला तर ही समस्या सुद्धा कमी होते. विटामिन सी चे सप्लीमेंट निवडत असताना ज्या सप्लीमेंट मध्ये ऍसिडचे प्रमाण कमी आहे आशा सप्लीमेंट ची निवड करावी.

सप्लीमेंट पेक्षा अन्नपदार्थात मिळालेले विटामिन सी कधीही चांगल्या गुणवत्तेचे असते. आणि त्याचा काही दुष्परिणाम किंवा साईड इफेक्ट सुद्धा होत नाही. त्यामुळे रुग्णांनी सप्लीमेंट स्वरूपात असणारे विटामिन सी घेण्यापेक्षा अन्नपदार्थ मधून मिळालेले विटामिन सी घेण्याकडे लक्ष द्यावे. फळांमधून व्यक्तीला विटामिन सी सुद्धा मिळते त्याचप्रमाणे आवश्यक इतर विटामिन आणि मिनरल्स मिळतात त्याचबरोबर फायबर सुद्धा मिळते. व्यक्तीला पालेभाज्या, फळभाज्या याच्या माध्यमातून सुद्धा चांगल्या प्रमाणे विटामिन सी मिळते. ज्या व्यक्तींना विटामिन सी युक्त आहार घेणे सोपे आहे. अशा व्यक्तींनी विटामिन सी च्या सप्लीमेंट चा उपयोग शक्यतो करू नये. यामुळे कोणत्याही प्रकारचे साईड इफेक्ट सुद्धा होणार नाहीत आणि व्यक्तीला नैसर्गिक दृष्ट्या शरीरातील विटामिन सी चे प्रमाण वाढवता येईल.

[ Benefits of Vitamin C ]  एक कप संत्र्याचा ज्यूस पिल्यानंतर व्यक्तीच्या शरीराला दररोज आवश्यक असणारे 500 mg विटामिन सी ची मात्रा मिळते. आंबट फळांमध्ये विटामिन सी चे प्रमाण सर्वात जास्त असते. त्याचप्रमाणे इतर फळांमध्ये सुद्धा विटामिन सी चे प्रमाण कमी जास्त असते. कोणत्या फळांमध्ये ती स्वरूपात विटामिन सी आहे हे पाहण्यासाठी खालील माहिती वाचावी.

खरबूज या फळाच्या एक कप ज्यूस मध्ये 59 mg एवढ्या प्रमाणात व्हिटॅमिन सी असते. संत्री या फळाच्या एक कप ज्यूस मध्ये 97 mg एवढ्या प्रमाणात विटामिन सी चे प्रमाण असते. ब्रोकली या फळाच्या एक कप ज्यूस मध्ये 74 mg एवढ्या प्रमाणात विटामिन सी असते. लाल कोबी या फळाच्या अर्ध्या कप ज्यूस मध्ये 40 mg विटामिन सी चे प्रमाण असते. हिरव्या ढोबळी मिरचीच्या अर्ध्या कप ज्यूस मध्ये 60 mg एवढ्या प्रमाणात व्हिटॅमिन सी असते. लाल ढोबळी मिरचीच्या अर्ध्या कप ज्यूस मध्ये 95 mg एवढ्या प्रमाणात व्हिटॅमिन सी असते. किवी या एका मध्यम साईच्या फळांमध्ये 70 mg एवढे विटामिन सी असते. एक कप टोमॅटो ज्यूस मध्ये 45 mg विटामिन सी असते.

[ Benefits of Vitamin C ] विटामिन सी चे शरीरातील काम

[ Benefits of Vitamin C ]  विटामिन सी ला एस्कॉरबिक ऍसिड असे सुद्धा म्हटले जाते. शरीराच्या वाढीसाठी आणि शरीरातील टिशू रिपेअर करण्यासाठी विटामिन सी ची आवश्यकता असते. शरीराच्या विविध कामांमध्ये विटामिन सी ची शरीराला मदत होते. यामध्ये कोलेजन ची निर्मिती करणे, आयर्न चे शरीर शरीरात शोषण करणे, रोगप्रतिकारशक्ती चे कार्य व्यवस्थित चालणे, जखम बरी करणे, दातांचे डोळ्यांचे कार्य व्यवस्थित चालणे यांसारख्या कामामध्ये विटामिन सी ची मदत होते.

माणसाच्या शरीरात असणाऱ्या एंटीऑक्सीडेंट पैकी महत्त्वाचे एंटीऑक्सीडेंट म्हणजे व्हिटॅमिन सी हे आहे. शरीरामध्ये निर्माण होणाऱ्या फ्री रॅडिकल मुळे शरीराला होणाऱ्या इजा कमी करण्याचे काम विटामिन सी करते. फ्री रॅडिकल मुळे कॅन्सर, हृदयाचे आजार यांसारखे गंभीर रोग होत असतात. विटामिन सी च्या वापरामुळे फ्री रॅडिकल निष्क्रिय होतात.

मानवी शरीरामध्ये विटामिन सी साठवून ठेवले जात नाहीत. त्यामुळे जरी विटामिन सी चा ओव्हरडोस झाला तरीसुद्धा कोणत्याही भीतीचे कारण नाही. तरीसुद्धा कोणत्याही व्यक्तीने 2000 mg पेक्षा जास्त विटामिन सी एका दिवसामध्ये घेऊ नये. यामुळे पोट खराब होणे, पचनाच्या तक्रारी वाढणे यांसारख्या समस्या वाढू शकतात.

[ Benefits of Vitamin C ]  ‘ वॉटर सोल्युबल’ विटामिन्स ला शरीर साठवून ठेवत नाही. विटामिन सी हे सुद्धा एक ‘ वॉटर सोल्युबल’ विटामिन आहे. त्यामुळे शरीर विटामिन सी ला साठवून ठेवत नाही. त्यामुळे विटामिन सी चे प्रमाण शरीरात व्यवस्थित राहण्यासाठी दररोजच्या आहारातूनच विटामिन सी ला घेणे गरजेचे आहे.

[ Benefits of Vitamin C ] विटामिन सी चे शरीरासाठी फायदे खालील प्रमाणे

  1. तणाव –  ज्या व्यक्तींच्या शरीरामध्ये विटामिन सी चे प्रमाण कमी असते अशा व्यक्तींना मानसिक तणावांना सामोरे जावे लागत असते. तणाव कमी करण्यासाठी शरीरातील विटामिन सी चे प्रमाण योग्य असणे गरजेचे. ज्या व्यक्तींमध्ये मद्यपान, धूम्रपान करण्याचे प्रमाण जास्त आहे अशा व्यक्तींच्या शरीरामध्ये विटामिन सी चे प्रमाण कमी असते. ज्या व्यक्तींना लठ्ठपणा आहे आशा व्यक्तींमध्ये सुद्धा विटामिन सी चे प्रमाण कमी असते. त्यामुळे अशा व्यक्तींना जास्त तणावाला सामोरे जावे लागते. जीवनशैली व्यवस्थित ठेवून विटामिन सी चे प्रमाण व्यवस्थित ठेवले तर शरीरातील तणाव कमी होतो.
  2. सर्दी – वातावरणामध्ये झालेल्या बदलामुळे किंवा थंड अन्नपदार्थ खाल्ल्यामुळे सर्दी सारखा आजार होत असतो. ज्या व्यक्तींची रोगप्रतिकारशक्ती कमी आहे अशा व्यक्तींना सर्दी हा आजार सहज होतो. तर प्रतिकारशक्ती चांगली असणाऱ्या व्यक्तीला शक्यतो सर्दी होत नाही. . काही लोकांमध्ये सर्दीची एलर्जी असते. विटामिन सी चे प्रमाण शरीरात चांगले असेल तर सर्दी झाली तरी सुद्धा त्यानंतर ताप येणे किंवा कणकणी येणे यांसारखे आजार उद्भवत नाहीत. निमोनिया किंवा मधील इन्फेक्शन होऊ नये म्हणून शरीर प्रतिकार करते.
  3. स्ट्रोक – तज्ञांच्या रिसर्च नुसार असे सांगण्यात आलेले आहे की ज्या व्यक्तीच्या रक्तामध्ये विटामिन सी चे योग्य प्रमाण आहे. अशा व्यक्तींमध्ये स्ट्रोक येण्याची शक्यता 40% कमी असते. तर याउलट ज्या व्यक्तींना स्ट्रोक आलेले आहेत अशा व्यक्तींच्या रक्तामधील विटामिन सी चे प्रमाण पाहिले तर ते कमी असलेले आढळून आले. ज्या व्यक्तीच्या आहारामध्ये दररोज फळे, पालेभाज्या आहेत अशा व्यक्तींच्या शरीरामध्ये विटामिन सी चे प्रमाण अधिक आढळून येते.
  4. त्वचा वृद्ध होणे – वाढत्या वयानुसार सर्वांची त्वचा वृद्ध होत असते . शरीराला जर विटामिन युक्त आहार मिळाला नाही तर वयाच्या पूर्वीसुद्धा व्यक्तीची त्वचा वृद्ध होते अशा वेळेस व्यक्तीचे वय चालू वयापेक्षा जास्त दिसू लागते. यामध्ये त्वचेवर रिंकल येणे, त्वचा कोरडी पडणे यांसारखी लक्षणे दिसू लागतात. विटामिन सी ज्या व्यक्तीच्या शरीरामध्ये मुबलक आहे. किंवा ज्या व्यक्तीच्या आहारामध्ये विटामिन सी चे प्रमाण योग्य आहे अशा व्यक्तींची त्वचा नेहमीच उजळ राहते आणि आरोग्यदायी सुद्धा राहतो. चेहऱ्यावरील रिंकल्स कमी होते.

[ History of Maharashtra ] महाराष्ट्राची निर्मिती

Leave a Comment