[ BEST Mumbai Bharti 2024 ] BEST मुंबई येथे 130 जागांसाठी नोकरीची सुवर्णसंधी.

[ BEST Mumbai Bharti 2024 ] BEST मुंबई येथे भरती निघालेली आहे. सदरील भरतीची जाहिरात BEST, मुंबई यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदरील भरती मधून एकूण 130 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. “परिविक्षाधीन अभियंता, वरिष्ठ वृत्तीधारी शिकाऊ उमेदवार” या पदांसाठी योग्य उमेदवाराची निवड करण्याकरिता सदरील भरतीचे आयोजन करण्यात आलेले आहे. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 25 ऑक्टोबर 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. BEST मुंबई येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचा.

महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, औरंगाबाद येथे भरती निघालेली आहे.

  • [ BEST Mumbai Bharti 2024 ]  BEST मुंबई येथील भरती मधून 130 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
  • BEST मुंबई येथील भरती मधून  “परिविक्षाधीन अभियंता, वरिष्ठ वृत्तीधारी शिकाऊ उमेदवार”  या पदासाठी योग्य उमेदवाराची निवड केली जाणार आहे.
  • परिविक्षाधीन अभियंता या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून इलेक्ट्रिकल अभियंता ही पदवी उत्तीर्ण केली पाहिजे.
  • वरिष्ठ वृत्तीधारी शिकाऊ उमेदवार या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून इलेक्ट्रिकल अभियंता या पदाचा डिप्लोमा पूर्ण केलेला पाहिजे.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 38 वर्षापर्यंत असावे.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी शुल्क Rs.300/- असणार आहे.
  • राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी अर्ज शुल्क Rs.150/- असणार आहे.
  • भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण मुंबई असणार आहे.
  • भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • ‘ विभागीय अभियंता, प्रशिक्षण आणि औद्योगिक अभियांत्रिकी विभाग, तिसरा मजला, क्लब रोड बिल्डिंग, बेस्ट मुंबई सेंट्रल बस डेपो, मराठा मंदिर मार्ग, मुंबई सेंट्रल, मुंबई-400 008.’ या पत्त्यावर इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज पाठवायचे आहेत.
  • परिविक्षाधीन अभियंता या पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना दरमहा 16,000 रुपये वेतन मिळणार आहे.
  • वरिष्ठ वृत्तीधारी शिकाऊ उमेदवार या पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना दरमहा 13,000 रुपये वेतन मिळणार आहे.
  • BEST मुंबई यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
  • सदरील भरतीसाठी उमेदवारांनी संस्थे कडून देण्यात आलेल्या नमुन्या नुसारच अर्ज करायचा आहे. अर्जाचा नमुना पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

 इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग फायनान्स, मुंबई येथे भरती निघालेली आहे. 

[ BEST Mumbai Bharti 2024 ] BEST मुंबई येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.

  • [ BEST Mumbai Bharti 2024 ]  7 ऑक्टोबर 2024 या तारखेपासून अर्ज करायला सुरुवात होणार आहे.
  • 25 ऑक्टोबर 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  • 25 ऑक्टोबर 2024 या तारखेनंतर मिळणारे अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी इच्छुक उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि त्यानंतर अर्ज करावा.

राष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक अंतर्गत भरती निघालेली आहे. 

Leave a Comment