[ Biotin Benefits ] बायोटिन म्हणजे काय ?
[ Biotin Benefits ] व्हिटॅमिन बी-कॉम्प्लेक्स च्या समूहातील एका व्हिटॅमिन ला बायोटिन असे म्हणतात. बी-कॉम्प्लेक्स च्या समूहात व्हिटॅमिन B1, B2, B3, B5, B6, B7, B9 & B12 यांचा समावेश असतो. त्यातील व्हिटॅमिन B7 ला बायोटिन असे म्हणतात. दैनंदिन जीवनात आपण घेत असणाऱ्या आहारापासून आपल्या शरीराला ऊर्जा मिळते. खाल्लेल्या आहारापासून ऊर्जा तयार करायचे काम बायोटिन करत असते. त्याच प्रमाणे त्वचा,डोळे,केस, नखे आणि नर्वस सिस्टीम निरोगी ठेवण्याचे आणि सुरळीत चालण्याचे काम करते.
विविध अन्न पदार्थांच्या सेवनातून आपण बायोटिन मिळवू शकतो जसे कि अंडी,मासे,मांस,दूध यांसारख्या पदार्थातून बायोटिन मिळवू शकतो. त्याच प्रमाणे मानवी शरीर सुद्धा शरीरात बायोटिन बनवण्यासाठी कार्यरत असते. त्यामुळे शरीरात बायोटिन निर्माण होत असते. पण काही आजारांमुळे किंवा खराब जीवनशैलीमुळे शरीरात बायोटिन ची कमतरता येते. त्यावेळेस डॉक्टर रुग्णांना बायोटिन चे सप्लिमेंट्स वापरण्याचा सल्ला देतात. बायोटिन चे सप्लिमेंट्स घ्यायला लागल्यापासून शरीरातील कमतरतेमुळे येणारी लक्षणे कमी व्हायला सुरुवात होते. आज आपण बायोटिन चा कसा उपयोग होतो हे पाहणार आहोत.
[ Biotin Benefits ] बायोटिन सप्लिमेंट्स चे फायदे
शरीरातील ऊर्जा संतुलित ठेवण्याचे काम बायोटिन सप्लिमेंट्स करते. त्यामुळे शरीराचे स्वस्थ उत्तम राहते. शरीरात खाललेले अन्न विघटन करण्यासाठी डीजेस्टिव्ह एन्झाईम असतात, बायोटिन च्या सप्लिमेंट्स मुळे त्यांचे कार्य सुद्धा वाढते. ज्या पद्धतीने व्हिटॅमिन बी १२ शरीरातील घटक संपूर्ण भागात पोहचवण्याचे काम करते त्याच प्रमाणे बायोटिन सुद्धा आवश्यक घटक शरीराच्या संपूर्ण भागात पोहचवण्याचे काम करते. जर शरीरातील बायोटिन चे प्रमाण कमी झाले तर सदरील क्रिया सुरळीत चालत नाहीत. बायोटिनचे फायदे खालील प्रमाणे
- मधुमेह नियंत्रणात ठेवते – मधुमेह या आजारात व्यक्तीच्या शरीरातील साखरेचे प्रमाण वाढत असते. बायोटिन सप्लिमेंट्स च्या वापरामुळे मधुमेह या आजारामुळे मानवी शरीरात दिसणारी लक्षणे कमी होतात. काही मधुमेहाच्या रुग्णांना बायोटिन सप्लिमेंट्स दिले तर त्यांच्या शरीरातील वाढलेले साखरेचे प्रमाण कमी होऊन नियंत्रणात आले. त्याच प्रमाणे साखर वाढल्यामुळे आलेला तणाव कमी होतो.
- केसांसाठी फायदेशीर : केसांच्या मूळ समस्यांपैकी केस गळने, केस पांढरे होणे, डोक्याची त्वचा कोरडी पडणे, कोंडा होणे, केसांची चमक जाणे या समस्या आहेत. बायोटिन सप्लिमेंट च्या वापरामुळे आवश्यक घटक शरीरातील सर्व भागात पोहचतात त्याचप्रमाणे ते केसांपर्यंत सुद्धा पोहचतात.त्यामुळे शरीर हायड्रेटेड राहते. डोक्याची त्वचा कोरडी पडत नाही. त्यामुळे कोंडा होण्याचे प्रमाण कमी होते. केसांना योग्य पोषक घटक मिळाल्यामुळे केस गळत नाहीत किंवा लवकर पांढरे होत नाहीत.
- त्वचा आणि नखांसाठी फायदेशीर : बायोटिन सप्लिमेंट्स च्या सेवनामुळे शरीर हायड्रेटेड राहते. त्यामुळे त्वचेचे आरोग्य सुधारते. त्याचप्रमाणे वया नुसार येणाऱ्या नखांच्या समस्या सुद्धा यामुळे कमी होतात. त्यामुळे बायोटिन चे सेवन करणे त्वचेसाठी आणि नखांसाठी फायदेशीर असते. वापरामुळे त्वचेवर चमक येते आणि निर्जीव त्वचा संपून जाते. नखांची मजबुती वाढल्यामुळे नखे तुटणे, नखांना चिरा जाणे थांबते.
- गर्भवती महिलांसाठी फायदा : गर्भाच्या वाढीसाठी बायोटिन ची आवश्यकता असते. त्याचप्रमाणे गर्भावस्थेत महिलांच्या शरीरातील बायोटिन चे प्रमाण कमी झालेले असते. ते वाढवण्यासाठी बायोटिन च्या टॅब्लेट्स किंवा सप्लिमेंट्स डॉक्टर त्यांच्या सल्ल्यानुसार देत असतात. गर्भावस्थेत नियमित स्वरूपात बायोटिनचे सेवन केले तर गर्भाची वाढ व्यवस्थित होते. त्याचप्रमाणे स्तनपान करणाऱ्या महिलांना सुद्धा बायोटिन खाण्याचा सल्ला दिला जातो.
[ Biotin Benefits ] बायोटिन सप्लिमेंट्समुळे होणारे नुकसान
बायोटिन सप्लिमेंट्सचे तसे तर काही नुकसान नाही. पण अधिक प्रमाणात बायोटीनच्या सप्लिमेंट्सचे सेवन केल्यामुळे काही नुकसान सुद्धा होऊ शकते ते खालीलप्रमाणे.
- पोटासंबंधी समस्या वाढू शकतात : केसांच्या आणि त्वचेच्या वाढत्या समस्या साठी काही लोक बायोटिन सप्लिमेंट घेतात. तयामुळे त्यांना चांगला रिझल्ट दिसतो. काही लोक अधिक चांगला रिझल्ट मिळावा म्हणून अधिक बायोटिन चा वापर करतात. जास्त सप्लिमेंट्स खाल्ल्याने पचनक्रिया बिघडते, त्यामुळे उलटी होणे, पोटात दुखणे, पोट साफ न होणे, जुलाब होणे अश्या समस्या उद्भवू शकतात.
- झोप न लागणे : व्हिटॅमिन बी-७ म्हणजेच बायोटिन च्या सप्लिमेंट्स चे अधिक सेवन केल्यामुळे झोप न लागण्या सारखी समस्या उद्भवू शकते. ज्यामध्ये रात्री उशिरापर्यंत झोप न लागणे, झोप पूर्ण न होणे, झोपेतून मधेच उठणे अश्या समस्या उद्भवतात. यामुळे दिवसभरात चक्कर येणे, डोके दुखणे सारख्या समस्या निर्माण होतात.
- इतर औषधांचा प्रभाव होत नाही : बायोटिन च्या सप्लिमेंट्स प्रमाणे डॉक्टरांनी रुग्णाला इतर औषधे सुद्धा दिलेली असतात. जर बायोटिन चे सेवन अतिप्रमाणात केले तर दिलेल्या इतर औषधांचा शरीरावर परिणाम होत नाही. त्यामुळे संबंधित आजार बरे होत नाहीत त्या ऐवजी वाढतात. त्यामुळे आजारी व्यक्तींनी परस्पर बायोटिन सप्लिमेंट्स चे सेवन करू नये त्या आधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
- किडनीच्या समस्या वाढू शकतात : बायोटिन हे एक वॉटर सोल्युबल व्हिटॅमिन आहे. त्यामुळे जर हे सप्लिमेंट प्रमाणापेक्षा जास्त वापरले गेले तर शरीरातील पाणी फिल्टर करणाऱ्या किडनीवर ताण येऊ शकतो. त्यामुळे किडनीच्या समस्या वाढू लागतात. लघवीला जाण्याचे प्रमाण वाढू लागते.
[ Biotin Benefits ] बायोटिन कोणी घेऊ नये ?
ज्या व्यक्तींच्या शरीरात रक्ताच्या चाचणीद्वारे बायोटिन ची कमी आहे हे सिद्ध झाले आहे अश्या वक्तींनी बायोटिन सप्लिमेंट्स चे सेवन करावे. ज्या लोकांना जुनाट आजार आहेत, जसे कि शुगर, ब्लड प्रेशर, हायपर टेन्शन, हृदय किंवा किडनीचे आजार अशा लोकांनी बायोटिन चा उपयोग डॉक्टरांच्या सल्ल्या नुसार करावा.
[ Biotin Benefits ] बायोटिन चे कोणासाठी किती प्रमाण ?
डॉक्टर बायोटिन चे प्रमाण रुग्णांसाठी ठरवत असताना वय, लिंग आणि निदान काय झालाय यावरून ठरवतात. त्यामुळे ज्यांना बायोटिन चे सप्लिमेंट घ्यायचे आहे त्यांनी एखादा डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
- लहान मुलांसाठी जवळपास ५ मायक्रोग्रॅम बायोटिन देण्याचा सल्ला दिला जातो.
- गर्भवती आणि स्तनपान करणाऱ्या महिलांमध्ये बायोटिन घेण्याचे प्रमाण ३५ मायक्रोग्रॅम प्रतिदिन करण्याचा सल्ला दिला जातो.
- १९ वर्षीय किंवा त्यापेक्षा अधिक ३० वर्षापर्यंत च्या व्यक्तींना बायोटिन हे ३० मायक्रोग्रॅम प्रतिदिवस इतके दिले जाते.
- त्याचप्रमाणे केस गळती होणाऱ्या व्यक्तीमध्ये याचे प्रमाण २ ते ५ मिलिग्रॅम इतके दिले जाते.
- त्वचा आणि नखांच्या आरोग्यासाठी सुद्धा बायोटिन चा उपयोग केला जातो.
[ Biotin Benefits ] त्वचेच्या आणि केसांच्या समस्यासाठी बायोटिन युक्त पदार्थ खा
- बदाम : बदाम बायोटिन चा एक चांगला स्रोत आहे त्यामुळे त्वचा आणि केसांच्या आरोग्यासाठी अतिशय उत्तम आहे. तर चला पाहूया बदामामध्ये कोणते आवश्यक पोषक तत्वे असतात. बदामामध्ये ओमेगा-३ फॅटी ऍसिड आणि मोनोसॅच्युरेटेड फॅट असते. त्यामुळे शरीरातील इन्फ्लमेशन कमी होते. ओमेगा-३ फॅटी ऍसिड हृदयासाठी चांगले असते यामुळे हृदयाचे आरोग्य सुधारते. त्वचा चांगली राहावी यासाठी अँटिऑक्सिडेन्ट ची आवश्यकता आहे. बदामामध्ये अँटिऑक्सिडेन्ट चे भरपूर प्रमाण असते त्यामुळे त्वचेचे आरोग्य चांगले राहते. व्हिटॅमिन E हा घटक चेहऱ्यावर एक चमक आणतो. बदाममध्ये व्हिटॅमिन E चे प्रमाण मोठ्या प्रमाणावर असते तयामुळे त्वचेवरील चमक टिकून राहते.
- अंडे : अंड्यातील पिवळ्या भागात बायोटिन चे प्रमाण मोठ्या प्रमाणात असते त्यामुळे अंड्याच्या सेवनामुळे त्वचा चमकदार बनते. त्याचप्रमाणे अंड्यात इतर कोणते घटक असतात जे त्वचेच्या आणि केसांच्या आरोग्यासाठी चांगले असतात हे आपण पाहणार आहोत. अंड्यामध्ये व्हिटॅमिन-बी, प्रोटीन, आयरन आणि फॉस्फरस चे प्रमाण मुबलक असते. यामुळे शरीरात चांगल्या कोलेस्ट्रॉल चे प्रमाण वाढते. अंड्यातील व्हिटॅमिन बी मध्ये बायोटिन चे प्रमाण असते. यामुळे त्वचेचे आणि केसांचे आरोग्य सुधारते त्याचप्रमाणे त्वचेवर आणि केसांवर चमक येते.
- रताळे : जमिनी खाली वाढणाऱ्या रताळ्यात पोषक तत्वे मोठ्या प्रमाणात असतात. ज्यामध्ये बायोटिनचे प्रमाण सुद्धा मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे त्वचा टवटवीत राहते. बायोटिन प्रमाणेच रताळ्याच्या अजून महत्वपूर्ण व्हिटॅमिन्स असतात. त्यापैकी बीटा-केरोटीन आणि व्हिटॅमिन A यांचे प्रमाण सुद्धा मोठ्या प्रमाणावर असते त्यामुळे त्वचा आणि केसांचे आरोग्य सुधारते. रताळ्यात कार्बोहायड्रेड चे प्रमाण असल्यामुळे शरीराला ऊर्जा मिळण्याचे काम सुद्धा रताळे करते.
- मासे : ओमेगा-३ हे सप्लिमेंट तयार करण्यासाठी माश्यांचा उपयोग केला जातो. माश्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर ओमेगा-३ फॅटी ऍसिड असते त्यामुळे हृदयाचे आरोग्य सुधारते आणि हार्ट अटॅक येण्याचे प्रमाण कमी होते. ओमेगा-३ प्रमाणेच बायोटिन चे प्रमाण सुद्धा माश्यांमध्ये असते. त्यामुळे मास्यांच्या सेवनामुळे बायोटिन चे शरीरातील प्रमाण वाढते आणि त्वचेचे आरोग्य सुधारते.
[ Biotin Benefits ] सारांश
व्हिटॅमिन बी-कॉम्प्लेक्स च्या समूहातील व्हिटॅमिन बी-७ ला बायोटिन असे म्हणतात. बायोटिन हे नैसर्गिक स्वरूपात बऱ्याच अन्न पदार्थांत मिळते, त्याचप्रमाणे मानवी शरीर सुद्धा बायोटिन ची निर्मिती करते. बाजारात बायोटिन ची सप्लिमेंट्स सुद्धा उपलब्ध आहेत. ज्या व्यक्तींचे त्वचेचे आणि केसांचे आरोग्य खराब झाले आहे अश्या लोकांना बायोटिन घेण्याचा सल्ला डॉक्टर देतात. शरीरात ऊर्जा निर्माण करणे आणि पोषक घटक संपूर्ण शरीरात पोहचवणे हे बायोटिन चे कार्य असते. त्वचेचे आणि केसांचे आरोग्य व्यवस्थित ठेवण्यासाठी बायोटिन सप्लिमेंट दिले जाते. दररोज आहारात बायोटिन चा समावेश केला तर त्वचेचे आरोग्य दिवसानुदिवस सुधारत जाते. केस मुळापासून बळकट होतात आणि केस गळती थांबते. केस पांढरे होण्याची शक्यता कमी होते. केस आणि त्वचेच्या फायद्या व्यतिरिक्त सुद्धा बायोटिन चे फायदे आहेत.
[ Biotin Benefits ]
बायोटिन च्या वापरामुळे रुग्णांच्यात बरेच सकारात्मक बदल घडून आलेले आहेत. त्यापैकी डायबिटीज संतुलनात राहणे, मानसिक समस्यांत फायदेशीर, नैराश्य कमी होणे, गर्भवती महिलांसाठी फायदेशीर असे अनेक फायदे बायोटिन चे आहेत. बायोटिन नैसर्गिक स्रोतातून घेतले तर कोणताही धोका होऊ शकत नाही पण सप्लिमेंट्स च्या स्वरूपात घेतले जाणाऱ्या बायोटिन मुळे नुकसान सुद्धा होऊ शकते. त्यामुळे ज्या लोकांना बायोटिन चे सप्लिमेंट चे सेवन करायचे आहे. अश्या लोकांनी स्वतः च्या शरीरातील बायोटिन चे प्रमाण रक्ताची चाचणी करून तपासले पाहिजे. जर त्यामध्ये बायोटिन चे प्रमाण पातळीपेक्षा कमी असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्या नुसार सप्लिमेंट्स घ्यावे. सप्लिमेंट्स ची निवड करताना उच्च प्रतीची आणि नामांकित कंपनीचे सप्लिमेंट्स निवडावे.
कोलेजन संदर्भात अधिक माहिती मिळवण्याकरिता येथे क्लिक करा.