[ Probiotics ] प्रो-बायोटिक्स म्हणजे काय ? फायदे आणि उपयोग

[ Probiotics ] प्रो-बायोटिक्स एक प्रकारचे सुक्षजिव असतात. आंबवलेल्या पदार्थात प्रो-बायोटिक्स मोठ्या प्रमाणात आढळून येतात.  विज्ञानाच्या अभ्यासामुळे हे सिद्ध झाले आहे कि पाचनतंत्र व्यावस्थित चालण्यासाठी प्रोबियोटिक्स चे संतुलन राहणे गरजेचे आहे. आतड्यांमधील चांगल्या बॅक्टरीया चे प्रमाण योग्य राहण्यासाठी प्रो-बायोटिक्स ची आवश्यकता असते. प्रो-बायोटिक्स युक्त आहार खालल्या मुळे आपल्याला वजन कमी करण्यास मदत होते. त्याचप्रमाणे रोग प्रतिकार शक्ती वाढते. आज आपण प्रो-बायोटिक्स बद्दल माहिती जाणून घेणार आहोत. त्याचप्रमाणे प्रो-बायॉटिक्स कशापासून मिळते हे ही पाहणार आहोत.

[ Probiotics ] प्रो-बायोटिक्स म्हणजे काय ?

प्रो-बायोटिक्स एक जैविक घटक आहे. जे शरीरासाठी फायदेशीर आहे. पचनक्रिया व्यवस्थित चालण्यासाठी आणि सुधारण्यासाठी उपयोग होतो. लोक नेहमी विषाणूंना आजार निर्माण करणारे असे मानतात पण काही फायदेशीर ब्याक्टेरिया पण असतात त्यांचा उपयोग स्वस्थ चांगले ठेवण्यासाठी होतो. आतड्याचे आरोग्य त्याचप्रमाणे पचनसंस्थेचे आरोग्य सुधारण्यासाठी याचा उपयोग होतो.

[ Probiotics ] काही अभ्यासात हे सिद्ध झाले आहे कि  शरीरातील चांगल्या ब्याक्टेरियाचे प्रमाण कमी झाले कि पचनासंबंधी आजार सुरु होतात त्यामुळे हे आजार कमी करण्यासाठी डॉक्टर प्रो-बायोटिक्स चे सेवन करण्याचा सल्ला देतात. प्रो-बायोटिक्स च्या सेवनामुळे शरीरातील चांगले बॅक्टेरिया चे प्रमाण वाढते. आणि पचनाचा आजार हळू-हळू कमी व्हायला सुरुवात होते. त्याच बरोबर शरीरातील सर्व कार्य सुरुळीत चालते.

[ Probiotics ] प्रो-बायोटिक्स चे फायदे

 1. शरीरातील चांगल्या बॅक्टेरियाचे प्रमाण संतुलित ठेवते : पोटातील चांगल्या ब्याक्टेरियाचे प्रमाण कमी होणे आणि खराब ब्याक्टेरियाचे प्रमाण वाढणे याला बॅक्टेरियाचे संतुलन बिघडले असे म्हटले जाते. प्रो-बायोटिक्स च्या वापरामुळे पोटातील चांगल्या बॅक्टेरियाची प्रमाण वाढते आणि चांगल्या ब्याक्टेरियाचे प्रमाण संतुलित राहते. या  कारणामुळे पचनाच्या समस्या,ऍलर्जी, तणाव, लठ्ठपणा, यांसारख्या समस्या उद्भवत नाहीत.
 2. प्रो-बायोटिक्स मुळे जुलाब थांबतात किंवा होत नाहीत : पोटामध्ये खराब ब्याक्टेरिया वाढल्यामुळे लोकांना जुलाबाच्या त्रासाला सामोरे जावे लागते. बाहेरील अशुद्ध अन्न खाल्ल्यामुळे हा आजार उद्भवत असतो. पोटातील अन्नाचे विघटन करायला चांगल्या ब्याक्टेरिया नसल्यामुळे असे होते. त्यामुळे डॉक्टर जुलाबाच्या पेशंटला प्रो-बायोटिक्स खाण्याचा सल्ला देतात. त्यामुळे आजर लवकर बरा होतो आणि सुधारणा होते. पोटाचे आरोग्य बिघडल्यामुळे मेंदूचे कार्य व्यवस्थित होत नाही. पण प्रो-बायोटिक्स च्या सेवनामुळे डोक्याचे आरोग्य सुद्धा सुधारते.
 3.  हृदयाचे आरोग्य सुधारते : शरीरात वाढलेले खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी सुद्धा पर-बायोटिक्स महत्वपूर्ण आहे. उच्च रक्तदाब कमी करण्यासाठी सुद्धा प्रो-बायोटिक्स चा उपयोग होतो. शरीरातील कोलेस्ट्रॉल चे प्रमाण कमी झाले आणि उच्च रक्तदाब कमी झाल्यावर हृदयाचे आरोग्य सुधारते यामुळे हार्ट अटॅक येण्याचे प्रमाण कमी होते.
 4. मानसिक आरोग्य सुधारते : बऱ्याच अभ्यासातून हे सिद्ध झाले आहे कि “गट & ब्रेन ” हे कनेक्शन एकमेकांशी निगडित असते.म्हणजेच पोटाचे आणि आतड्याचे आरोग्य चांगले असल्यावर मानसिक आरोग्य सुद्धा चांगले असते. ज्या लोकांचे आतड्याचे आरोग्य चांगले नाही त्यांच्यात मानसिक समस्या म्हणजेच मूड खराब होणे, उदास राहणे, नैराश्य, चिडचिडे पणा सारखी लक्षणे दिसतात. सप्लिमेंटच्या स्वरूपात असलेले प्रो-बायॉटिक्स सेवन केल्यामुळे बऱ्याच मानसिक समस्या कमी होतात आणि मानसिक आरोग्य सुधारते.
 5. त्वचेच्या समस्या आणि एक्सिमा चा धोका कमी होतो : ज्या लोकांचे आतड्याचे आरोग्य ठीक नाही अश्या रुग्णात त्वचेची समस्या निर्माण होते. त्वचेचे इन्फेक्शन, गजकर्ण, त्वचा कोरडी पडणे, त्वचा काळवंडणे अश्या स्वरूपाच्या समस्या उद्भवतात. जर पोटाचे आरोग्य चांगले असेल तर त्वचेचे आरोग्य सुद्धा सुधारते आणि एक्सिमा सारख्या गंभीर आजाराचा धोका सुद्धा टळतो. पोटाचे आरोग्य चांगले करायचे असेल तर प्रो-बायोटिक्स चा उपयोग करणे गरजेचे आहे. प्रो-बायोटिक्स चा फायदा शरीरात लगेच दिसावा यासाठी प्रो-बायोटिक्स चे सप्लिमेंट्स वापरण्याचा सल्ला डॉक्टर देतात. गर्भवती महिलांमध्ये मुलाला जन्म देण्याच्या आधी २ महिन्यापासून जर प्रो-बायोटिक्स चा उपयोग केला गेला तर मुलाच्या जन्मावेळी एक्सिमा होण्याचा धोका ८०% पर्यंत टाळता येतो.काही लोकांना दूध पिल्यामुळे पोट खराब होण्याची शक्यता असते प्रो-बायोटिक्स चा वापरामुळे हि समस्या सुद्धा कमी होते.
 6.  पोट विकारांची लक्षणे कमी करते : पोट विकारांमध्ये इरिटेबल बॉवेल सिंड्रोम, इरिटेबल बॉवेल डीसीस,अल्सर, बद्धकौष्ठ, क्रोहंस डीसीस यांसारख्या आजारांनी त्रासलेल्या व्यक्तींना प्रो-बायोटिक्स वापरण्याचा सल्ला डॉक्टर देतात. प्रो-बायोटिक्स च्या वापरण्यात वापरण्यात येणाऱ्या सप्लिमेंट्स मध्ये बिफिडोबैक्टिरियम आणि लॅकटोबैक्सीलियस हे दोन असे प्रकार आहेत कि ज्यांच्या वापरामुळे पोटाचे आजार लवकर बरे होण्यास मदत मिळते. त्याचप्रमाणे जे पोटाचे आजार दीर्घ काळ चालतात आश्या आजाराची लक्षणे कमी करण्यासाठी प्रो-बायोटिक्स चा उपयोग केला जातो.
 7. रोग प्रतिकार शक्ती वाढवते : प्रो-बायॉटिक्स च्या वापरामुळे शरीरात खाललेल्या अन्नाचे विघटन होते आणि आणि अन्न शरीरात शोषले जाते. यामुळे शरीरातील रोग-प्रतिकार शक्ती वाढली जाते. यामुळे वायरल इन्फेक्शन पासून वाचले जाते. त्याचप्रमाणे इतर आजारांबरोबर लढण्याची ताकत वाढते.
 8. लठ्ठपणा कमी करते : प्रो-बायोटिक्स च्या वापरामुळे पचनक्रिया लवकर होते त्यामुळे वजन वाढण्याचे प्रमाण कमी होते. पोट साफ करण्याचे काम प्रो-बायोटिक्स करत असते त्यामुळे वजन कमी होते आणि लठ्ठपणा कमी होतो. वयानुसार कमजोर झालेली पचनशक्ती सुधारावते आणि त्यामुळे अन्न पचन होण्याचा वेळ कमी होतो.

[ Probiotics ] प्रो-बायोटिक्स कशातून मिळते ?

आंबवलेल्या पदार्था मध्ये प्रो-बायोटिक्स नावाचा जीवक असतो . अश्या पदार्थ मध्ये प्रो-बायोटिक्स चे प्रमाण जास्त असते. प्रो-बायोटिक्स चे स्तोत्र खालीलप्रमाणे

 1. लोणचे : आपल्या दररोज च्या जेवणात ला पदार्थ म्हणजे लोणचे. अभ्यासानुसार हे सिद्ध झाले आहे कि लोणच्यांमध्ये प्रो-बायोटिक्स चे प्रमाण अधिक असते. त्यामुळे जेवणाबरोबर लोणचे खाल्ल्याने पचनक्रिया व्यवस्थित होते. बाजारात मिळणाऱ्या हवाबंद डब्यात प्रो-बायोटिक्स अस्तित्वात नसतात कारण ते खूप दिवस जुने झालेले असते.
 2. दही : घरी बनवलेले दही हे सर्वात जास्त प्रो-बायोटिक्स असणाऱ्या पदार्थांपैकी आहे. दह्यामध्ये बिफिडोबैक्टिरियम आणि लॅकटोबैक्सीलियस हे दोन महत्वाचे प्रो-बायोटिक्स असतात. अधिक फायद्यासाठी घरी बनवलेले दही वापरा. दुकानात मिळणारे हवाबंद डब्यातील दही टाळावे.
 3. डार्क चॉकलेट : डार्क चॉकलेट मध्ये प्रो-बायोटिक्स चे प्रमाण जास्त प्रमाणात आढळून येते. पचनक्रिया व्यवस्थित चालण्यासाठी डार्क चॉकलेट चा उपयोग होतो. डार्क चॉकलेट मध्ये मोठ्या प्रमाणात अँटी ऑक्सिडेन्ट मिळून येतात. त्यामुळे शरीरातील फ्री रॅडिकल कमी होतात.
 4. सफरचंद :  नवीन संशोधणात हे स्पष्ट झाले आहे कि सफरचंदात मोठ्या प्रमाणात प्रो-बायोटिक्स असतात. त्याच प्रमाणे पचनासाठी लागणारे फायबर सुद्धा सफरचंदात मोठ्या प्रमाणात असते. पचनासाठी लागणारे जवळपास सर्व घटक सफरचंदात असतात.
 5. आंबवलेले पदार्थ : इडली,ढोकळा,डोसा तसेच दक्षिण भारतीय आंबवलेले पदार्थ सुद्धा प्रो-बायोटिक च्या प्रमाणात जास्त असतात. कारण आंबवल्यामुळे त्यात जिवाणू तयार होतात. ते अन्न पचनासाठी मदत करतात.

Probiotics

[ Probiotics ] प्रो-बायोटिक्स सप्लिमेंट्स खाण्याची वेळ ?

प्रो-बायोटिक्स बनवणाऱ्या कंपन्या प्रो-बायोटिक्स सकाळी उपाशीपोटी खाण्याचा सल्ला देतात. तर काही डॉक्टर प्रो-बायोटिक्स खाण्याचा सल्ला जेवणानंतर देतात. काही शोधानुसार प्रो-बायोटिक्स सकाळी उपाशी पोटी खावे किंवा रात्री झोपण्याअगोदर खावे असे सांगितले जाते. दिवसभरात आपण विविध गोष्टी खात असतो. सकाळच्या नाष्टयापासून रात्रीच्या जेवण पर्यंत आपण विविध अन्न खात असतो. त्यामुळे खाललेले अन्न पचन होणेसाठी प्रो-बायोटिक्स शरीरात असणे गरजेचे असते. त्यासाठी सकाळी उपाशी पोटी याचे सेवन करणे फायदेमंद ठरू शकते. त्याचप्रमाणे जेवण अगोदर ५ मिनिट प्रो-बायोटिक्स चे सेवन करणे हि सुद्धा प्रो-बायोटिक्स घेण्याची चांगली पद्धत आहे.

[ Probiotics ] अँटी-बायोटिक्स आणि प्रो-बायोटिक्स मधील फरक

शरीरात ब्याक्टेरियल इन्फेक्शन झाल्यांनतर अँटी-बायोटिक्स वापरले जातात. शरीरातील ब्याक्टेरिअल इन्फेक्शन विरोधात अँटिबायोटिक्स लढतात आणि इन्फेक्शन कमी करतात. शरीर रोगमुक्त बनवण्यात फायदेमंद असतात. तयामुळे डॉक्टरांच्या सल्ल्या मुळे अँटी-बायोटिक्स घ्यावेत. प्रो-बायोटिक्स हे पोटातील चांगले ब्याक्टेरिया असतात. खराब ब्याक्टेरियाचे प्रमाण वाढल्यावर पोटाचे कार्य बिघडते त्याचे कार्य सुधारण्यासाठी प्रो-बायोटिक्स चा उपयोग होतो. प्रो-बायोटिक्स अन्न पदार्थात सुद्धा उपलब्ध असते. त्याचप्रमाणे प्रो-बायोटिक्स चे सप्लिमेंट्स सुद्धा बाजारात उपलब्ध आहेत. अधिक त्रास होणाऱ्या व्यक्तींना डॉक्टरांच्या सल्ल्या नुसार सप्लिमेंट्स दिले जाते. आरोग्य व्यवस्थित ठेवण्यासाठी याचा उपयोग केला जातो. रोगांपासून बचाव करण्यासाठी रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यात अँटी-बायोटिक्स चा महत्वाचा रोल आहे.

[ Probiotics ] प्रो-बायोटिक्स शब्दाचा शोध

१९५३ साली पहिल्यांदा प्रो-बायोटिक्स शब्दाचा वापर करण्यात आला होता. वर्णर कोलाथ या जर्मन शास्त्रज्ञानाने पहिल्यांदा प्रो-बायोटिक्स या शब्दाची ओळख करून दिली होती. या मध्ये लॅटिन आणि ग्रीक भाषेचा उपयोग केला होता. प्रो हा शब्द लॅटिन भाषेतील तर बायो हा शब्द ग्रीक भाषेतील आहे. याचा अर्थ इंग्रजी मध्ये “फॉर लाईफ ” असा होतो. डेनियल एम लिली आणि रॉजली एच स्टिलवेल या दोन शास्त्रज्ञांनी १९६५ मध्ये म्हणजेच एकूण १२ वर्षांनंतर हा शब्द प्रचालनात आणला. प्रो-बायॉटिक्स हा एक जिवंत ब्याक्टेरिया आहे आणि तो मानवी शरीरासाठी खूप गरजेचं आहे असे १९९२ साली फुलर नावाच्या शास्त्रज्ञानी सांगितले.

[ Probiotics ] शरीरातील प्रो-बायोटिक्स ची गरज कशी ओळखावी ?

आज कालच्या युगात सर्वांनीच प्रो-बायोटिक्स घेतले तर त्याचा कोणताही तोटा होणार नाही. कारण आजकालच्या धावपळीच्या जगात सर्वच जण बाहेरील फास्ट फूड खात असतात. त्यामुळे पोटातील खराब ब्याक्टेरियाचे प्रमाण वाढत जाते. त्यामुळे अन्न पचन न होणे, लठ्ठ पण वाढणे असे आजार होतात. त्यामुळे सर्वानीच प्रमाणात प्रो-बायोटिक्स चे सेवन केले तर फादेशीर ठरू शकते. अधिक जाणून घेण्यासाठी रक्त आणि स्टूल टेस्ट करून तुम्ही माहिती मिळवू शकता. आणि त्यानुसार निर्णय घेऊ शकता.

जर तुम्ही आरोग्यदायी जीवनशैली फॉलो करत असाल तर तुम्हाला आजार होण्याची संभावना कमी होते. समतोल आहार घेणाऱ्या व्यक्ती नैसर्गिक रित्या प्रो-बायोटिक्स चा उपयोग करत असते. त्यामध्ये प्रो-बायोटिक्स युक्त पदार्थांचा उपयोग असतो. त्यामुळे   प्रो-बायोटिक्स सप्लिमेंट्स घेण्याची आवश्यकता नसते.

बायोटिन संदर्भात अधिक माहिती मिळवण्याकरिता इथे क्लिक करा.

Leave a Comment