[ Depression ] नैराश्य हा असा एक आजार आहे. यामध्ये व्यक्ती निराशपना , राग आणि एकटेपणा सतत अनुभवत असतो. हि एक गंभीर मानसिक समस्या आहे. याचा उपचार करण्यासाठी औषधे, विविध थेरपी, संवाद आणि जीवनशैलीत सुधारणा करून करण्यात येतो. नैराश्या बद्दल अधिक माहिती आपण खाली पाहणार आहोत.
[ Depression ] नैराश्य म्हणजे काय ?
मनोरुग्ण तज्ज्ञांच्या माहितीनुसार हा एक गंभीर मानसिक आहे. ज्यामध्ये व्यक्ती एका आठवड्या पेक्षा जास्त काळ निराशपणा आणि एकटेपणा या समस्यांना भेडसावत असतो. आणि त्याला कशातच रस वाटत नसतो. ह्या आजाराने ग्रासलेला व्यक्ती स्वतः चे दैनंदिन कार्य करण्यासाठी सुद्धा सक्षम नसतो. त्याच्या स्वभावात चिडचिडेपणा वाढलेला असतो.
स्वतः च काहीतरी गंभीर नुकसान झालाय असे नैराश्यात असणारा व्यक्ती कायम वागत असतो. आपले काही तरी मोठे नुकसान झालाय या भावनेसारखे व्यक्ती कायम निराश, चिडचिडा असतो. जसे काय त्याचा आयुष्यातील रस निघून गेलाय.
[ Depression ] नैराश्याचे प्रकार
नैराश्याची गंभीरता आणि कालावधी नुसार त्याचे वेग-वेगळे प्रकार पडतात. त्यातील काही प्रकार खालील प्रमाण.
१) क्लिनिकल डिप्रेसिव्ह डिसऑर्डर
हा नैराश्याचा सर्वाधिक गंभीर प्रकार आहे. यामध्ये व्यक्तीला नैराश्याची लक्षणे दोन आठवड्या पेक्षा जास्त काळ दिसत असतात. क्लिनिकल डिप्रेसिव्ह डिसऑर्डर ला मेजर डिप्रेसिव्ह डिसऑर्डर असे सुद्धा नाव आहे. या रुग्णांमध्ये खालील लक्षणे आढळतात.
- दिवसभर निराश राहणे.
- दैनंदिन जीवनातील क्रिया करण्यात रुची नसने.
- वजन विना कारण वाढणं किंवा कमी होणे.
- अति झोपणे किंवा झोपच न येणे.
- विचार करणे आणि समजून घेण्याची क्षमता कमी होणे
- निर्णय घेऊ न शकणे
- सतत आत्महत्येचे विचार येणे किंवा स्वतःला नुकसान पोहचवणे.
२) डिसथायमिया
या नैराश्याच्या प्रकाराला मनस्ताप किंवा पर्सिस्टंट डिप्रेसिव्ह डिसऑर्डर असे सुद्धा म्हणतात. या प्रकारच्या नैराश्याच्या रुग्णांना २ वर्ष्या पेक्षा जास्त काळ नैराश्याची लक्षणे दिसू शकतात. मेजर डिप्रेसिव्ह डिसऑर्डर पेक्षा डिसथायमिया प्रकारची गंभीरता कमी प्रमाणात असते. डिसथायमिया या प्रकारात कधी कधी डिप्रेसिव्ह डिसऑर्डर ची लक्षणे दिसू शकतात.
३) सिजनल इफेक्टिव्ह डिसऑर्डर
वातावरणानुसार व्यक्तीला होणाऱ्या नैराश्याच्या समस्येला सिजनल इफेक्टिव्ह डिसऑर्डर असे म्हणतात. सामान्यपणे वर्षातील ठराविक एका महिन्यात हा आजार रुग्णाला होत असतो. जास्तकरून हिवाळ्यात हा आजार रुग्णांमध्ये दिसतो. ज्याचा प्रमुख कारण सूर्यकिरणांचा अभाव आहे.
४) पोस्टपार्टम डिप्रेशन :
या प्रकारचे नैराश्य हे प्रसूती झालेल्या महिलांमध्ये खासकरून आढळते. हार्मोन्स मधील झालेल्या बदलामुळे हे नैराश्य येत असते. काही दिवसांनी ते आपोआप ठीक होते. जर एक महिन्या पेक्षा अधिक दिवस जाऊन हि आजार बारा होत नसेल तर डॉक्टरांशी संपर्क साधावा.
५) सायकॉटिक डिप्रेशन :
मनोविकृतीच्या रुग्णांमध्ये या प्रकारचे डिप्रेशन हळू हळू निर्माण होते. हि एक गंभीर स्थिती आहे. यामध्ये रुग्णांना भ्रम आणि आभास होऊ लागतो. आभासामध्ये व्यक्ती विविध गोष्टी बघतो आणि आवाज ऐकतो जे वास्तविक नसतात. ज्या गोष्टी खऱ्या नसतात अश्या गोष्टी चा आभास रुग्णाला होऊ लागतो.
[ Depression ] नैराश्याची लक्षणे
नैराश्य माणसाला फक्त भावनात्मक दृष्ट्या नाही तर शारीरिक दृष्ट्या सुद्धा त्रासदायक असते. नैराश्याची काही प्रमुख लक्षणे खालील प्रमाणे
- सकारात्मक आणि चांगले न वाटणे
- आवडत्या कामात रस न राहणे
- भूख न लागणे
- काम कारण्यासाठी ऊर्जा आणि प्रेरणा न वाटणे
- लक्ष केंद्रित न करता येणे
- झोप न येणे किंवा जास्त झोप येणे
- निर्णय न घेता येणे
- शंकात्मक राहणे
[ Depression ] नैराश्याची कारणे
नैराश्याची अनेक करणे असू शकतात यामध्ये शरीराच्या बाहेरील, आतील आणि अनुवांशिक घटकांचा समावेश आहे. उदाहरणार्थ एखाद्या जवळील व्यक्तीचे अचानक झालेले निधन नैराश्येचे बाहेरील कारण ठरू शकते. त्याचप्रमाणे काही आजार असणे हे आतील कारण असू शकते. त्याचप्रमाणे अनुवंशिकतेने सुद्धा नैराश्य येऊ शकते. खाली काही कारण लिहिलेले आहेत ज्यामुळे नैराश्य येऊ शकते.
- दुःखद परिस्थिती निर्माण झाल्यामुळे
- कामाचा तणाव जास्त असणे
- प्रेम संबंधात खटाटोप
- कुटुंबात कोणाला तरी नैराश्य असणे
- शारीरिक हालचाल न होणे.
- वजन कमी होणे
- आत्मसन्मान कमी होणे
[ Depression ] नैराश्याच्या संबंधित काही गोष्टी
खाली दिलेल्या कारणामुळे रुग्णामध्ये नैराश्य विकसित होऊ शकते.
- मस्तिष्क रसायन : डोक्यामध्ये विविध प्रकारची रसायने उपलब्ध असतात. त्यामध्ये कमीजास्त प्रमाण झाले तर नैराश्य सारख्या समस्या होऊ शकतात.
- अनुवंशिकता : एका अनुवांशिक रूपाने सुद्धा नैराश्य माणसाला होऊ शकते. उदाहरणार्थ एका वेळेस दोन जुळी मुले जन्माला आली आणि त्यातील एकाला जर नैराश्याचा त्रास होत असेल तर ७०% शक्यता आहे कि दुसऱ्या मुलाला सुद्धा हा त्रास होऊ शकतो.
- वक्तिमत्व : काही लोक मानसिक दृष्ट्या खूप संवेदनशील असतात. ज्यांच्यात आत्मविश्वास कमी असतो त्यांना नैराश्याचा त्रास होण्याची शक्यता जास्त असते.
- परिस्थिती : काही कारणामुळे गरिबी येणे किंवा त्यातून बाहेर पडण्यासाठी कोणताही मार्ग न दिसणे त्यामुळे सुद्धा नैराश्य येत असते.
[ Depression ] नैराश्यावर मात कशी करावी
काही विशेष गोष्टींचे पालन करून नैराश्यावर मात करता येते
- दररोज व्यायाम आणि ध्यान करा.
- पौष्टिक आहार घ्या.
- पुरेपूर झोप घ्या.
- मित्रांबरोबर संपर्कात राहा.
वरील उपाय करून सुद्धा तुम्हाला नैराश्य कमी होत नाही असे वाटत असेल तर मनोरुग्ण तज्ज्ञांचा सल्ला घ्या.
[ Depression ] नैराश्याचे निदान
नैराश्याचे निदान करण्यासाठी रुग्णाची लक्षणे आधी समजून घेतली जातात. लक्षणे कधी सुरु होतात आणि कधी संपतात आणि कोणत्या काळात लक्षणे तीव्र असतात. याची तपासणी डॉक्टर करतात. आणि अन्य काही तपासण्या करून नैराश्याचे निदान केले जाते आणि योग्य उपचार केले जातात.
उपचार
नैराश्याचा उपचार प्रमुखपणे आजाराची गंभीरता ओळखून केला जातो. उपचारपद्धती मध्ये खालील उपचारांचा समावेश होतो.
- फार्माकोथेरपी : या उपचार पद्धती मध्ये रुग्णाला अँटी डिप्रेशन टॅबलेट बरोबर अन्य गोळ्या दिल्या जातात. ज्या लक्षणांना कमी करण्यासाठी मदत करतात. या गोळ्यांच्या मदतीने डोक्यातील रसायनाचे प्रमाण परत सामान्य जागी आणले जाते. त्यामुळे मेंदूची लक्षणे कमी होतात.
- सायकोथेरपी : या उपचार पद्धतीमध्ये कौन्सलर रुग्णाशी बोलतात समस्यांचे कारण आणि उपचार पद्धती ठरवतात. यामध्ये कॉनग्नेटिव्ह बिहेविरल थेरपी चा उपयोग केला जातो. यामध्ये रुग्णाची विचार करायची पद्धत, आकलन शक्ती, निर्णय घेण्याची क्षमता आणि स्वभाव ठरवला जातो.
- ब्रेन स्टिम्युलेटिंग थेरपी : यामध्ये चुंबकाचा उपयोग करून चुंबकीय लहरी मेंदू मधून पास केला जातेत . या माध्यमातून मेंदूच्या विशिष्ट भागाला चालना दिली जाते.
[ Depression ] नैराश्यात असणाऱ्या व्यक्तीला कसे ओळखावे ?
- एकटापणा : नैराश्यातील व्यक्ती प्रत्येकवेळी आपली भावना समोरच्या व्यक्तीला सांगेलच असे नाही. जर व्यक्ती सतत एकटेपणात राहत असेल किंवा सतत थकल्या प्रमाणे वाटत असेल तर ती नैराश्यात असण्याची संभाव्यता आहे. इतर व्यक्ती त्यांची भावना समजू शकत नाही त्यामुळे ते स्वतःची मानसिक स्तिथी इतर कोणाला सांगत नाहीत.
- आनंदी न राहणे : नैराश्यातील व्यक्ती एका वेळेनंतर स्वतःच्या या आजारासोबत लढायला सुरुवात करतात. सतत लढून सुद्धा त्यांना या आजारावर मात करता येत नाही त्यामुळे त्यांना आनंदित राहता येत नाही. त्यांच्याकडे कोणी लक्ष देत नाही म्हणून स्वतः ची परिस्थिती ते इतरांना सांगायला सुरुवात करतात.
- थकवा जाणवणे : एखादा व्यक्ती कायम थकलेला दिसत असेल तर नक्कीच त्याला नैराश्याचा त्रास होत असणार. पण तो इतरांना सांगण्याचा प्रयत्न करत नाही त्यामुळे आपल्या आसपासच्या लोकांत कोण असे रुग्ण आहेत हे आपण पहिले पाहिजे.
- मानसिक लक्षणे : नैराश्यात व्यक्ती कधीच लोकांच्यात मिसळत नाहीत त्यांना ते आवडत नाही. आणि त्या बद्दल ते काही स्पष्टीकरण सुद्धा देत नाहीत. मानसिक समस्यांमुळे ते असे करत असतात.
- ऊर्जा कमी होणे : नैराश्यातील व्यक्तीला व्यक्ती कधीच उत्साही नसतो. कोणतेही काम करायला त्याच्यात कायम निरुत्साह असतो. कारण ते काम करण्यासाठी त्याच्यात ऊर्जा कमी असते.
[ Depression ] लो-ग्रेड डिप्रेशन म्हणजे काय ?
जगभरातील लाखो लोक नैराश्याशी लढत आहेत. दैनंदिन जीवनाच्या क्रिया करताना सुद्धा रुग्णाला अडचणी येतात. सततच्या आणि जुन्या नैराश्य मुळे आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे. डिप्रेशन चे बरेच प्रकार पडतात त्यातील एक प्रकार लो-ग्रेड डिप्रेशन आहे. त्यालाच माईल्ड ग्रेड डिप्रेशन असे म्हणतात. यामध्ये लोक दैनंदिन आयुष्यात निराशपण जाणवत असतात. पण लोक त्याला नॉर्मल समजत असतात.
यामध्ये कामामध्ये लक्ष न लागणे, थोडा थकवा जाणवणे अशी लक्षणे असतात. पण लोक यांच्याकडे सामान्य म्हणून लक्ष देत नाहीत. यालाच डीस्थिमेनिया असे सुद्धा म्हणतात. यामध्ये लोकांना समजताच नाही कि त्यांना नैराश्य आहे. या आजाराला रुग्ण किरकोळ समजतात पण याचे परिणाम मात्र गंभीर होत असतात. दीर्घ काळ मानसिक आजाराने ग्रसित असणाऱ्या व्यक्ती चे जीवनमान खालावते. जगभरातील ३.५ % लोक हे लो-ग्रेड डिप्रेशन चे रोगी आहेत. पण त्यांना हे माहिती नाही. लो-ग्रेड डिप्रेशन व्यक्तीच्या आयुष्यात जास्तीतजास्त ५ वर्षे राहू शकते आणि त्यानंतर याचा उपचार नाही केला तर याचे रूपांतर गंभीर नैराश्यात होते.
लो-ग्रेड डिप्रेशन ची लक्षणे
- खूप जास्त खाणे किंवा कमी खाणे, वजन वाढणे किंवा कमी होणे
- खूप जास्त विचार करणे किंवा विचारच न करणे
- खूप थकवा जाणवणे
- आत्मविश्वास कमी होणे
- मनात नकारात्मक विचार येणे
- कोणत्याही कामात आनंद नसने
- एकटेपणा आणि निराशपणा
- लक्ष न लागणे
- कोणताही निर्णय न घेता येणे
मेजर डिप्रेशन म्हणजे काय ?
लो-ग्रेड डिप्रेशन च्या तुलनेत मेजर डिप्रेशन अधिक गंभीर असते. या दोन्ही नैराश्याची जवळपास सगळी लक्षणे सारखीच असतात. मेजर डिप्रेशन या आजारामध्ये व्यक्तीला आत्महत्येचे विचार येऊ शकतात. लो-ग्रेड डिप्रेशन चा उपचार वेळेवर नाही केल्यामुळे ७५% लोकांना मेजर डिप्रेशन आजार होतो. याची लक्षणे खालील प्रमाणे
[ Depression ] मेजर डिप्रेशन ची लक्षणे
- आक्रमक होणे
- चीड-चीड करणे
- चिंता करणे
- लैंगिक शक्ती कमी होणे
- थकवा जाणवणे
- डोके दुखणे
- एकटेपणा जाणवणे
- विसर पडणे
- भूक कमी लागणे
- आरोग्याविषयी चिंता करणे
प्रोबायोटिक संदर्भातील माहिती मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.