District Court Bharti 2024 | अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालय येथे विविध पदांसाठी भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालय यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदरील भरती करिता ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 एप्रिल 2024 आहे. सदरील भरती ही सफाई कामगार पदासाठी होणार आहे. सदरील भरती मध्ये ज्या उमेदवारांना अर्ज करण्याची इच्छा आहे आशा उमेदवारांनी अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालय यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालय यांच्याकडून खालील दिलेली महत्त्वाची माहिती काळजीपूर्वक वाचावी.
- अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालय येथील भरती दोन पदांसाठी होणार आहे.
- सफाई कामगार या पदासाठी अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालय यांच्याद्वारे भरती आयोजित करण्यात आलेली आहे.
District Court Bharti 2024 | अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालय येथील भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि वयाची अट खालील प्रमाणे.
- सफाई कामगार या पदासाठी अर्ज करणारा उमेदवार इयत्ता चौथी पास असावा. त्याचप्रमाणे उमेदवार शरीराने सुदृढ असावा.
- सफाई कामगार या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 38 वर्षापर्यंत असावे. त्याचप्रमाणे एससी आणि एसटी प्रवर्गातील उमेदवारांसाठी पाच वर्षे वयामध्ये सूट देण्यात आलेली आहे.
- सफाई कामगार या पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवाराला प्रतिमहा 15,000 रुपये ते 47,600 रुपये पगार मिळेल.
- सदरील भरती मध्ये सफाई कामगार पदावर निवड होणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण अहमदनगर असेल.
- अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालय येथील सफाई कामगार पदाच्या भरतीसाठी उमेदवारांकडून कोणत्याही प्रकारची शुल्क आकारण्यात येणार नाही.
- सदरील भरती साठी उमेदवारांनी अर्ज करण्याकरिता पत्राद्वारे जाहिरातीमध्ये दिलेल्या पत्त्यावर अर्ज पोहोचवायचा आहे.
- सदरील भरतीसाठी 24 एप्रिल 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालय यांच्याकडून देण्यात आलेली आहे.
- सदरील भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी इच्छुक उमेदवारांनी प्रसिद्ध केलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
- “जिल्हा व सत्र न्यायालय, अहमदनगर, डी.एस.पी. चौक, न्यायनगर, अहमदनगर-४१४ ००१” या पत्त्यावर उमेदवारांनी आपला अर्ज समक्ष उपस्थित राहून किंवा पत्राद्वारे सादर करायचा आहे.
District Court Bharti 2024 | अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालय येथील भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खालील सूचना वाचाव्यात.
- सदरील भरती करिता उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची कोणतीही प्रणाली अहमदनगर जिल्हा न्यायालय यांच्याकडून राबविण्यात आलेली नाही त्यामुळे उमेदवारांनी कोणत्याही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू नये.
- सदरील भरती करिता अर्ज भरत असताना उमेदवाराने दिलेली पात्रता व्यवस्थित अर्जामध्ये लिहायचे आहे त्याच पद्धतीने उमेदवारांनी स्वतःची संपूर्ण नाव, पत्ता, मोबाईल नंबर, ई-मेल आयडी या सर्व गोष्टी बरोबर लिहायच्या आहेत. अर्ज भरताना काही चुकी झाली आणि उमेदवाराचा अर्ज बाद करण्यात आला तर याला अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालय जबाबदार राहणार नाही.
- अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालय यांच्याकडून 24 एप्रिल 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख देण्यात आलेली आहे.
- सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालय यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरातीची पीडीएफ डाउनलोड करून काळजीपूर्वक वाचावी.
District Court Bharti 2024 | अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालय येथील भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांनी खालील सूचना वाचाव्यात.
- अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालय येथील भरतीसाठी ज्या उमेदवारांनी अर्ज केलेले आहेत आशा उमेदवारांची निवड करण्यात येईल.
- अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालय यांच्याकडून भरतीसाठी अर्ज करणाऱ्या कोणत्याही उमेदवाराला TA/ DA देण्यात येणार नाही. याची उमेदवारांनी काळजी घ्यावी.
- सदरील भरती मध्ये पदावर योग्य उमेदवार निवड करण्याची जबाबदारी अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालय यांच्याकडे असणार आहे. त्यामुळे या प्रक्रिया मध्ये कोणीही हस्तक्षेप करू नये.
- सफाई कामगार या पदासाठी लागणारी आवश्यक पात्रता अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालय यांच्याकडून देण्यात आलेली आहे. उमेदवारांनी काळजीपूर्वक दिलेली पात्रता वाचावी.
- सफाई कामगार या पदावर नियुक्त होण्यासाठी उमेदवारांनी कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार करू नये. किंवा कसल्याही प्रकारचा दबाव आणू नये. असे करणाऱ्या उमेदवारावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
District Court Bharti 2024 | अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालय येथील भरती संदर्भात महत्त्वाची माहिती खालील प्रमाणे.
- सदरील भरतीसाठी दिलेल्या अर्जाच्या नमुना नुसार उमेदवाराने अर्ज भरायचा आहे. आणि नोंदणीकृत डाक द्वारे किंवा स्पीड पोस्टाद्वारे उमेदवाराने आपले अर्ज 26 एप्रिल 2024 रोजी सायंकाळी सहा वाजेपर्यंत दिलेल्या पत्त्यावर पोहोचवायचे आहेत.
- अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालयाचे अधिकृत संकेतस्थळ – https://ahmednagar.dcourts.gov.in या संकेतस्थळावर भरती संदर्भात अधिक माहिती दिलेली आहे. उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी.
- राज्य सरकार आणि केंद्र सरकार येथील कामावर रुजू असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी जर सदरील पदासाठी अर्ज केला तर त्यांच्यासाठी कमाल वयोमर्यादा लागू होणार नाही.
- जे उमेदवार शासकीय सेवेमध्ये काम करत आहेत आणि त्यांना सदरील भरतीसाठी अर्ज करायचा आहे आशा उमेदवारांनी त्यांच्या शासकीय कार्यालयातील प्रमुखाची परवानगी घेऊनच सदरील भरतीसाठी अर्ज करावा.
- अर्ज करणाऱ्या कोणत्याही उमेदवाराने जिल्हा सत्र न्यायालयाच्या निवड समिती मधील व्यक्तींना भेटून इतर कोणत्याही व्यक्तीच्या माध्यमातून त्यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला तर अशा उमेदवारांचा अर्ज रद्द करण्यात येईल. याची उमेदवारांनी दखल घ्यावी.
- सदरील भरती करिता अर्जावर उमेदवाराने त्यांचे अलीकडचे रंगीत पासपोर्ट साईज फोटो चिकटवून त्याच्यावर सही करावी.
- जाहिरातीची तारीख संपल्यानंतर उमेदवारांनी जाहिरातीच्या शेवट दिलेल्या चारित्र्याचा दाखला सादर करायचा आहे.
- नमुना अ मधील प्रतिज्ञापत्र उमेदवाराने अर्जासोबत जोडायचे आहे.
- जिल्हा सत्र न्यायालयात द्वारे दिलेल्या नमुन्यामध्ये उमेदवाराने अर्ज केलेला नसेल केव्हा केलेला अर्ज अपूर्ण असेल तर सदरील अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- जिल्हा सत्र न्यायालय येथील भरतीसाठी उमेदवारांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. आणि अर्जांची संख्या जास्त झाली. तर निवड समिती मार्फत अल्पसूची तयार करण्यात येईल. ही अल्प सूची उमेदवाराच्या शैक्षणिक पात्रते नुसार तयार करण्यात येईल. तयार केलेली अल्प सूची जिल्हा सत्र न्यायालय येथील सूचना फलक मध्ये लावण्यात येईल. त्याचप्रमाणे जिल्हा सत्र न्यायालयाच्या संकेतस्थळावर दर्शविण्यात येईल.
- सदरील भरती मधील उमेदवारांची अल्प सूची तयार करणे किंवा आवश्यक ते बदल तयार करणे याचे सर्व हक्क निवड समितीने राखून ठेवलेले आहेत.
- सदरील पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची ” चापल्य आणि साफसफाई परीक्षा” घेण्यात येईल. ही परीक्षा 20 मार्काची असणार आहे. या परीक्षेद्वारे उमेदवाराचे मूल्यमापन करण्यात येईल.
- सदरील भरतीसाठी उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलण्याकरिता ” चापल्य आणि साफसफाई परीक्षा” , गुणवत्ता यांच्या आधारे उमेदवारांची मुलाखतीसाठी निवड होईल. जाहिरातीमध्ये दिलेल्या पद संख्येच्या तिप्पट उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल. उमेदवारांची मुलाखत हे 20 गुणांची घेण्यात येईल. लेखी परीक्षा आणि मुलाखत यामध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे उमेदवारांची निवड करण्यात येईल.
- सदरील भरती करिता उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसाठी आणि मुलाखतीसाठी बोलावण्यात येईल त्यावेळेस उमेदवारांनी स्वखर्चाने दिलेल्या ठिकाणी उपस्थित राहणे गरजेचे आहे.
- सदरील भरती संदर्भात जर काही बदल करण्यात आले किंवा भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांची नावे किंवा इतर काही माहिती अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालय येथील सूचनाफलकावर आणि अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालय यांच्या संकेतस्थळावर देण्यात येईल. कोणत्याही उमेदवाराला भरती संदर्भात वैयक्तिक माहिती देण्यात येणार नाही.
- उमेदवाराचे वय पडताळण्यासाठी उमेदवाराचा जन्माचा दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, शाळांमध्ये मिळालेले गुणपत्रक यांचा उपयोग करून वयाची पडताळणी करण्यात येईल.
- उमेदवारा जवळ ओळखपत्र असल्याशिवाय सदरील भरतीतील कोणत्याही प्रक्रियेला म्हणजेच लेखी परीक्षा, मुलाखत, कागदपत्र पडताळणी यांच्यासाठी उपस्थित राहता येणार नाही.
District Court Bharti 2024 | जिल्हा सत्र न्यायालय येथील भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया खालील प्रमाणे.
- जिल्हा सत्र न्यायालय येथील भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना अर्जाचा नमुना जाहिरातीच्या पाठीमागे दिलेला आहे. उमेदवारांनी अर्ज करायचा आहे.
- सुरुवातीला उजव्या कोपऱ्यात उमेदवारांनी स्वतःचा नवीन काढलेला पासपोर्ट साईज रंगीत फोटो चिकटवायचा आहे आणि त्याच्यावर उमेदवाराने सही करायची आहे.
- त्यानंतर उमेदवाराने स्वतःचे संपूर्ण नाव आडनाव प्रथम याप्रमाणे लिहायचे आहे.
- उमेदवाराने त्यानंतर स्वतःचा कायमस्वरूपी चा पत्ता पिनकोड सहित लिहायचा आहे.
- यानंतर उमेदवाराने स्वतःचे राष्ट्रीयत्व लिहायचे आहे. त्यानंतर उमेदवाराने स्वतः महाराष्ट्रीयन आहे की नाही याबद्दल माहिती द्यायची आहे.
- उमेदवाराने स्वतःचा चालू मोबाईल नंबर किंवा स्वतःचा चालू फोन नंबर अर्जामध्ये लिहायचा आहे.
- उमेदवाराकडे जर ईमेल आयडी असेल तर स्वतःचा चालू ईमेल आयडी अर्जामध्ये लिहायचा आहे. जर ईमेल आयडी नसेल तर नाही लिहिला तरीसुद्धा चालेल.
- उमेदवाराने स्वतःचे लिंग स्त्री किंवा पुरुष यापैकी निवडायचे आहे. त्यानंतर उमेदवारांनी स्वतःची जात धर्म लिहायचा आहे आणि जातीचा प्रवर्ग लिहायचा आहे.
- यानंतर उमेदवारांनी स्वतःची जन्मतारीख लिहायची आहे. जन्मतारखे नंतर उमेदवाराने स्वतःचे वय वर्ष महिने आणि दिवस या स्वरूपात लिहायचे आहे.
- उमेदवार विवाहित आहे की नाही यासंदर्भात उमेदवारांनी स्वतःची माहिती द्यायची आहे. उमेदवाराला जर आपत्य असेल तर अपत्य बद्दल माहिती द्यायची आहे.
- 28 मार्च 2005 नंतर उमेदवाराने जन्माला दिलेल्या अपत्यांची माहिती लिहायचे आहे.
- सदरील भरतीसाठी अर्ज करणारा उमेदवार न्यायालयीन कर्मचारी आहे का याच बद्दल माहिती द्यायची आहे जर उमेदवार न्यायालयीन कर्मचारी असेल तर न्यायालयाचे नाव लिहायचे आहे.
- अर्ज करणारा उमेदवार कोणत्याही शासकीय कार्यालयात काम करत असेल तर त्या कार्यालयाचे नाव आणि स्वतः ज्या पदावर काम करत आहे त्या पदाचे नाव लिहायचे आहे.
- जर उमेदवार दिव्यांग असेल तर त्या संदर्भात माहिती लिहायचे आहे. उमेदवाराला अवगत असलेल्या भाषा लिहायचे आहेत.
- अर्ज करणाऱ्या उमेदवाराने स्वतःची शैक्षणिक पात्रता आणि अनुभव लिहायचा आहे.
- उमेदवारा विरोधात कोणतीही फौजदारी केस असेल तर त्याने त्याबद्दल माहिती लिहायची आहे. कोणत्याही न्यायालयाने कोणत्याही प्रकरणात उमेदवाराला दोषी ठरवले असेल तर त्या संदर्भात माहिती लिहायची आहे.
District Court Bharti 2024 | जिल्हा सत्र न्यायालय येथे भरती.महाराष्ट्र राज्यातील सर्व सरकारी संस्थांमधील भरती संदर्भात माहिती मिळवण्यासाठी आमच्या नोकरी फस्ट या वेबसाईटला भेट द्या. भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.