NLC India Limited Bharti 2024 | एनएलसी इंडिया लिमिटेड येथे भरती.

NLC India Limited Bharti 2024 | एनएलसी इंडिया लिमिटेड येथे विविध पदांसाठी भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात एनएलसी इंडिया लिमिटेड द्वारे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदरील भरती करिता ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 एप्रिल 2024 ची आहे. औद्योगिक प्रशिक्षणार्थी आणि तांत्रिक, औद्योगिक प्रशिक्षणार्थी ( खानी आणि खानी सहाय्य सेवा ) या पदासाठी सदरची भरती होणार आहे. तरी पात्रताधारक उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी एनएलसी इंडिया लिमिटेड यांच्याद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. ज्या उमेदवारांना सदरील भरतीसाठी अर्ज करायचा आहे त्या उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी.

NLC India Limited Bharti 2024

 • एनएलसी इंडिया येथील भरती 239 जागांसाठी होणार आहे.
 • एनएलसी इंडिया येथील भरती द्वारे औद्योगिक प्रशिक्षणार्थी आणि तांत्रिक, औद्योगिक प्रशिक्षणार्थी ( खानी आणि खानी सहाय्य सेवा )  ही पदे भरण्यात येणार आहेत.

NLC India Limited Bharti 2024 | एनएलसी इंडिया लिमिटेड येथील भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि वयाची अट खालील प्रमाणे.

 • औद्योगिक प्रशिक्षणार्थी आणि तांत्रिक या पदासाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून पूर्णवेळ तीन वर्षाचा अभ्यासक्रम असलेला डिप्लोमा पूर्ण केला पाहिजे.
 • औद्योगिक प्रशिक्षणार्थी ( खानी आणि खानी सहाय्य सेवा ) या पदासाठी उमेदवार कोणत्याही अभियांत्रिकी व्यापारात 10 वी उत्तीर्ण पाहिजे आणि आयटीआय उत्तीर्ण पाहिजे. किंवा 10 वी उत्तीर्ण आणि कोणत्याही अभियांत्रिकी व्यापारात राष्ट्रीय शिकाऊ प्रमाणपत्र प्राप्त पाहिजे.
 • सदरील भरतीसाठी उमेदवाराचे वय 35 वर्षापर्यंत पाहिजे . एससी आणि एसटी कॅटेगरी चा उमेदवारांसाठी पाच वर्षे सूट राहील. ओबीसी कॅटेगरी च्या उमेदवारांसाठी तीन वर्षे सूट राहील.
 • एनएलसी इंडिया लिमिटेड यांच्याद्वारे भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना 14,000 रुपये ते 22,000 रुपये प्रतिमहा पगार राहील.
 • एनएलसी इंडिया लिमिटेड यांच्याद्वारे भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारतात कोठेही राहील.
 • सदरील भरती करिता उमेदवाराकडून कोणत्याही प्रकारची शुल्क आकारले जाणार नाही.
 • सदरील भरतीसाठी पात्र उमेदवारांनी एनएलसी इंडिया यांच्या संकेतस्थळावरून अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.
 • सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 एप्रिल 2024 आहे.
 • एनसीएल इंडिया लिमिटेड येथील भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संस्थेद्वारे प्रसिद्ध केलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
 • एनसीएल इंडिया लिमिटेड येथील भरतीसाठी उमेदवारांना अर्ज करण्याकरिता संस्थेद्वारे लिंक देण्यात आलेली आहे. त्या लिंकद्वारे उमेदवारांनी अर्ज करावा. अर्ज करा.

NLC India Limited Bharti 2024 | एनसीएल इंडिया लिमिटेड येथील भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी.

 • एनसीएल इंडिया लिमिटेड येथील भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
 • एनसीएल इंडिया लिमिटेड यांच्याद्वारे ऑफलाइन अर्ज करण्याची कोणतीही पद्धत दिलेली नाही. त्यामुळे कोणत्याही उमेदवाराने ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू नये.
 • सदरील भरतीसाठी अर्ज भरत असताना उमेदवाराने ऑनलाईन पद्धतीने कोणतीही चूक न करता अर्ज भरायचा आहे. जर उमेदवारा द्वारे अर्ज भरताना चूक झाली आणि उमेदवाराचा अर्ज रद्द करण्यात आला तर याला एनएलसी इंडिया लिमिटेड जबाबदार राहणार नाही.
 • सदरील भरतीसाठी 19 एप्रिल 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
 • एनएलसी इंडिया लिमिटेड येथील भरतीसाठी उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक पहावी.

NLC India Limited Bharti 2024 | एनएलसी इंडिया लिमिटेड येथील भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांकरिता सूचना खालील प्रमाणे.

 • एनएलसी इंडिया लिमिटेड येथील भरतीसाठी ज्या उमेदवारांनी अर्ज केलेले आहेत. आशा उमेदवारांची निवड केली जाईल.
 • एनएलसी इंडिया लिमिटेड यांच्याकडून कोणत्याही उमेदवाराला TA / DA देण्यात येणार नाही. याची सर्व उमेदवारांनी काळजी घ्यावी.
 • एनएलसी इंडिया लिमिटेड यांच्याकडून परीक्षा केंद्रावर अनुचित प्रकार करणाऱ्या उमेदवारा वरती कायदेशीर कारवाई करण्यात येईल. त्यामुळे कोणत्याही उमेदवाराने परीक्षा केंद्रावर अनुचित प्रकार करू नये.
 • परीक्षा केंद्र ठरवण्याची पूर्णपणे जबाबदारी एनएलसी इंडिया लिमिटेड यांच्याकडे आहे. त्यामुळे या प्रक्रियेमध्ये इतर कोणीही हस्तक्षेप करू नये.
 • वरील परीक्षेकरिता आवश्यक अभ्यासक्रम एनएलसी इंडिया यांच्या संकेतस्थळावर दिलेला आहे. उमेदवारांनी अधिक माहितीसाठी संकेतस्थळाला भेट द्यावी.
NLC India Limited Bharti 2024 | एनएलसी इंडिया लिमिटेड येथील भरती संदर्भात आवश्यक सूचना खालील प्रमाणे.
 • सदरील भरती मध्ये प्रशिक्षणासाठी उमेदवारांची निवड ही लेखी परीक्षेद्वारे करण्यात येईल.
 • उमेदवाराची निवड ही गुणवत्तेनुसार करण्यात येईल. गुणवत्ता ठरवताना उमेदवाराला निवड चाचणी मध्ये मिळालेले गुण पकडले जातील. आरक्षणाच्या नियमानुसार आणि तरतुदीनुसार उमेदवाराची सदरील पदावर निवड करण्यात येईल.
 • सदरील भरतीच्या निवड चाचणी मध्ये कोणत्याही उमेदवारांना 100 पैकी समान गुण मिळाले तर अशा उमेदवारांची निवड करताना सुरुवातीला जन्मतारीख लक्षात घेतले जाईल ज्यामध्ये ज्या उमेदवाराचे वय जास्त आहे आशा उमेदवाराला प्राधान्य देण्यात येईल. जर दोन्हीही उमेदवारांची जन्मतारीख समान असेल तर उमेदवाराच्या अल्फाबेटिकल प्रमाणे नावानुसार त्यांची निवड करण्यात येईल.
 • सदरील भरती मध्ये निवड झाल्यानंतर उमेदवाराला पदावर नियुक्त होण्यापूर्वी मेडिकल चाचणीला सामोरे जावे लागेल. यामध्ये उमेदवाराचे मानसिक स्वास्थ्य आणि शारीरिक स्वास्थ्य सुदृढ असेल तरच त्या उमेदवाराला पदावर नियुक्त केले जाईल.
 • सदरील भरती मध्ये प्रत्येक कुटुंबातील एकाच व्यक्तीला निवड करण्यात येईल. एकापेक्षा अधिक व्यक्ती असतील कुटुंबात तर फक्त एकाच व्यक्तीची निवड होईल.
 • सदरील भरती मध्ये फक्त भारतीय नागरिकत्व असणाऱ्या उमेदवारांना अर्ज करण्यात येईल.
 • सदरील भरती मध्ये अर्ज करण्याकरिता उमेदवाराचे वय कमीत कमी 18 वर्ष असणे आवश्यक आहे.
 • सदरील भरती मधला उमेदवारांचा प्रतिसाद पाहून भरतीतील पदांसाठी पात्रता वाढवण्याचा किंवा कमी करण्याचा पूर्णपणे अधिकार एनएलसी इंडिया लिमिटेड यांच्याकडे आहे.
 • सदरील भरती मध्ये उमेदवारांना वैद्यकीय चाचणीला सुद्धा सामोरे जावे लागणार आहे.
 • या भरती द्वारे पदावर ती नियुक्त झालेल्या उमेदवारांना जर राजीनामा द्यायचा असेल किंवा संस्थेला उमेदवारांना पदावरून कमी करायचे असेल तर दोघांनाही सात दिवस अगोदर समोरच्या व्यक्तीला माहिती देणे बंधनकारक आहे.
 • एनसीएल इंडिया लिमिटेड यांच्याद्वारे घेण्यात आलेली भरती रद्द करण्याचा पूर्णपणे अधिकार एनसीएल इंडिया लिमिटेड यांच्याकडे आहे. त्याचप्रमाणे भरती संदर्भात कोणताही निर्णय घेण्याचा पूर्णपणे अधिकार एनसीएल इंडिया लिमिटेड यांच्याकडे आहे. त्यांनी घेतलेला निर्णय अंतिम राहील.
 • उमेदवाराने भरतीसाठी अर्ज केल्यानंतर त्याला भरतीतील पदावर नियुक्त केले जाईल अशी कोणतीही शाश्वती संस्थेद्वारे देण्यात येत नाही.
 • उमेदवाराची निवड ही उमेदवारांनी दिलेली माहिती त्याचबरोबर उमेदवारांनी अपलोड केलेली सेल्फ अटेस्टेड डॉक्युमेंट यांच्या आधारे केली जाईल. पण कागदपत्र पडताळणी च्या वेळेस उमेदवारांनी ओरिजनल डॉक्युमेंट घेऊन येणे गरजेचे आहे.
 • भविष्यामध्ये जर सदरील भरती मध्ये अधिक जागांची गरज असेल तर आत्ताच जास्त उमेदवारांची निवड करून त्यांना भविष्यामध्ये पदावर नियुक्ती दिली जाऊ शकते.
 • एससी/ एसटी / ओबीसी / ईडब्ल्यूएस यांची प्रमाणपत्रे उमेदवाराकडे हिंदी/ इंग्रजी याव्यतिरिक्त इतर कोणत्याही भाषेमध्ये असतील तर उमेदवाराने त्याचे ट्रान्सलेशन हिंदी किंवा इंग्रजी भाषेमध्ये करून घ्यायचे आहे.
 • सदरील भरती संदर्भात उमेदवाराला कोणतीही शंका असेल तर उमेदवाराने 04142 – 255135 या फोन नंबर वरती संपर्क साधायचा आहे. सकाळी 10:00 वाजल्यापासून सायंकाळी 5 वाजेपर्यंत सोमवार ते शनिवारी उमेदवार सदरील मोबाईल नंबर वर संपर्क साधू शकतात.
 • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यापूर्वी उमेदवाराने स्वतःचा चालू ईमेल आयडी आणि स्वतःचा चालू मोबाईल नंबर स्वतंत्र ठेवायचा आहे. सदरील भरतीला अर्ज केल्यानंतर भरती संदर्भातील संपूर्ण माहिती प्रक्रिया सुरू होण्यापासून प्रक्रिया संपेपर्यंत उमेदवाराला ई-मेल द्वारे आणि मोबाईल वरती एसएमएस द्वारे सांगण्यात येईल त्यामुळे उमेदवारांनी स्वतंत्र मोबाईल नंबर आणि स्वतंत्र ईमेल आयडी तयार करायचा आहे.
 • उमेदवाराने आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे यांच्या सेल्फ अटेस्टेड फोटो कॉपीज दिलेल्या क्रमानुसार अपलोड करायचे आहेत. त्यामुळे उमेदवाराची शैक्षणिक पात्रता संस्थेला समजण्यास मदत होईल.
 • ज्या उमेदवारांना सदरील भरती मध्ये एकापेक्षा अधिक पदांसाठी अर्ज भरायचा आहे अशा उमेदवारांनी प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्ज भरावा आणि प्रत्येक पदासाठी स्वतंत्र परीक्षा शुल्क जमा करावेत.
 • कोणत्याही उमेदवाराला सदरील भरती मधील एका पदासाठी एकदाच अर्ज करायला येणार आहे. एका पदासाठी जर उमेदवाराने अधिक वेळा अर्ज केला तर त्याने शेवट केलेला अर्ज ग्राह्य धरला जाईल.
 • उमेदवाराने भरतीसाठी डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर उमेदवाराला व्ह्यू डॉक्युमेंट असा ऑप्शन दिसेल ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर उमेदवारांनी अपलोड केलेली सर्व डॉक्युमेंट त्याला दिसतील . डॉक्युमेंट्स बरोबर आहेत का याची खात्री करून अर्ज सबमिट करायचा आहे.
 • उमेदवाराने कागदावर लिहिलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत असे अर्ज उमेदवारांनी पत्त्यावर पाठवू नयेत.
 • सदरील भरतीसाठी [ NLC India Limited Bharti 2024 ] उमेदवाराने सेल्फ अटेस्टेड डॉक्युमेंट जमा करायचे आहेत. याच्या व्यतिरिक्त झेरॉक्स कॉपी जमा केलेली चालणार नाही. याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
 • उमेदवाराने ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू नये त्याचप्रमाणे ऑफलाइन पद्धतीने कोणतीही कागदपत्रे जमा करू नयेत अशा प्रकारचा केला जाणारा अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही.
 • 20 मार्च 2024 पासून सदरील भरतीसाठी अर्ज भरण्याची सुरुवात झालेली आहे. 19 मार्च 2024 पर्यंत सायंकाळी 5 वाजेपर्यंत सदरील भरतीचे अर्ज स्वीकारले जातील.
 • सदरील भरती मध्ये उमेदवाराला कोणत्याही प्रकारची शंका असेल तर त्या उमेदवाराने संस्थेच्या ईमेल आयडी वर ई-मेल करावा. ई-मेल आयडी – help.recruitment@nlcindia.in
 • उमेदवाराने 3.5 CM X 4.5 CM ह्या साईटचा पासपोर्ट फोटो काढायचा आहे. सदरील फोटो हा कलर असावा. आणि तीन आठवड्यापेक्षा जुना नसावा. हा फोटो अर्ज भरण्यासाठी लागणार आहे.
 • त्यानंतर उमेदवाराने निळ्या किंवा काळी शाईच्या पेनाने पांढऱ्या कागदावर सही करून त्याचा फोटो अर्ज भरताना अपलोड करायचा आहे.

[ NLC India Limited Bharti 2024 ] भारत सरकारच्या सर्व सहकारी संस्थांमधील भरती संदर्भात अधिक माहिती मिळवण्यासाठी आमच्या नोकरी फस्ट या वेबसाईटला नक्की भेट द्या. भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a Comment