GMC Jalgaon Bharti 2024 | शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जळगाव येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात ही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जळगाव द्वारे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. 12 मार्च 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. सदरील भरती मध्ये डेटा एंट्री ऑपरेटर आणि ऑडिओ लॉजिस्ट या दोन पदाच्या जागा रिक्त आहेत. तरी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याचा पत्ता जाहिरातीमध्ये दिलेला आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जळगाव येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील माहिती वाचा.
- शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जळगाव येथील भरती ही तीन जागांसाठी होणार आहे.
- डेटा एंट्री ऑपरेटर आणि ऑडिओ लॉजिस्टिक या पदांसाठी तीन जागा रिक्त आहेत.
GMC Jalgaon Bharti 2024 | शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जळगाव येथील भरतीसाठी शैक्षणिक पात्रता आणि अटी खालीलप्रमाणे.
- डेटा एन्ट्री ऑपरेटर या पदासाठी अर्ज करणारा उमेदवार कोणत्याही शाखेतील पदवीधर असला पाहिजे. त्याचप्रमाणे प्रतिमिनिट 30 मराठी शब्द आणि 40 इंग्लिश शब्द टायपिंगचे स्पीड असले पाहिजे. अर्ज केलेला उमेदवार MS-CIT उत्तीर्ण असला पाहिजे.
- ऑडिओलॉजिस्ट या पदासाठी अर्ज करणारा उमेदवार ऑडिओ लॉजी आणि स्पीच लँग्वेज यामध्ये बॅचलर पदवी मिळवलेला असावा. भारतीय पुनर्वसन परिषदे कडून पुनर्वसन व्यावसायिक म्हणून वैद्य नोंदणी प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
- सदरील भरती करिता पत्राद्वारे अर्ज पोहोचण्याची अंतिम तारीख 12 मार्च 2024 ही आहे.
- अर्ज केलेल्या उमेदवारांची मुलाखत 12 मार्च 2024 रोजी होईल.
- या भरती करिता अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 वर्षे ते 40 वर्षापर्यंत पाहिजे. राखीव प्रवर्गातील उमेदवाराचे वय 45 वर्षांपर्यंत पाहिजे.
- या भरती मधून रिक्त पदांसाठी निवड झालेल्या उमेदवारांचे नोकरीचे ठिकाण हे जळगाव राहील.
- सदरील भरतीसाठी कोणत्याही प्रकारची शुल्क आकारण्यात येणार नाही.
- शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जळगाव येथील भरतीसाठी उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर आपला अर्ज पत्राद्वारे किंवा समक्ष उपस्थित राहून करावा.
- सदरील भरतीसाठी अर्ज करण्याअगोदर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जळगाव द्वारे प्रसिद्ध केलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक आणि त्यानंतरचा अर्ज करावा. जाहिरात वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
- इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याकरिता “शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जिल्हा सामान्य रुग्णालय आवार जिल्हा पेढ, जळगाव.” या पत्त्यावर पत्राद्वारे आपला अर्ज पाठवावा.
GMC Jalgaon Bharti 2024 | शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जळगाव येथील भरतीसाठी इच्छुक उमेदवारांसाठी सूचना.
- सदरील भरती करिता जाहिरातीमध्ये दिलेल्या पत्त्यावर अर्ज करायचा आहे.
- ऑनलाइन अर्ज करण्याची कोणतीही वेबसाईट किंवा पोर्टल शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय, जळगाव यांच्याद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेली नाही.
- भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी आपली वैयक्तिक माहिती म्हणजेच शिक्षण, जन्मतारीख, स्वतःचे पूर्ण नाव, पिनकोड यांसारख्या गोष्टी काळजीपूर्वक भराव्यात. जर यातली कोणती गोष्ट चुकीची भरली गेली तर त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जळगाव जबाबदार राहणार नाही.
- 12 मार्च 2024 ही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जळगाव द्वारे सांगितलेली अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
- सदरील भरतीसाठी मुलाखतीचे ठिकाण है शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जळगाव राहील.
- शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जळगाव येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी जाहिरात डाऊनलोड करून वाचावी.
GMC Jalgaon Bharti 2024 | शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जळगाव येथील भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांकरिता सूचना.
- सदरील भरती करिता अर्ज केलेले उमेदवार पात्र असतील. असे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जळगाव द्वारे सांगण्यात आलेले आहे.
- TA/DA कोणत्याही उमेदवाराला मिळणार नाही. असे स्पष्टपणे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय द्वारे सांगण्यात आलेले आहे.
- सदरील भरतीच्या प्रक्रियेमध्ये कोणत्याही उमेदवाराने अनुचित प्रकार केला तर त्याच्यावरती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जळगाव यांच्याद्वारे कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
- परीक्षा केंद्रावर येताना सर्व उमेदवारांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जळगाव यांच्याकडून प्रसिद्ध केलेले हॉल तिकीट बरोबर आणावे.
- सदरील भरतीची प्रक्रिया आणि त्यासंदर्भातील माहिती संस्थेच्या संकेतस्थळावरती दिलेली आहे. उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी.
GMC Jalgaon Bharti 2024 | शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जळगाव येथील भरतीसाठी अटी व शर्ती खालील प्रमाणे.
- जाहिरात प्रसिद्ध झालेल्या दिवशी उमेदवाराचे वय 18 वर्षे पूर्ण असले पाहिजे. त्याचप्रमाणे उमेदवाराचे जास्तीत जास्त वय 40 वर्षापर्यंत असले पाहिजे. आणि मागास प्रवर्गातील उमेदवाराचे जास्तीत जास्त वय 45 वर्षांपर्यंत असले पाहिजे.
- सदरील भरतीतील सर्व पदे ही कंत्राटी तत्त्वावर संस्थेद्वारे भरली जातील.
- वरील पदांपैकी ” डाटा एन्ट्री ऑपरेटर” या पदाची भरती ही केवळ 11 महिन्या साठी कंत्राटी स्वरूपाची असेल.
- तर 120 दिवसाच्या कंत्राटी भरती वरच ऑडिओ लॉजिस्ट पद भरले जाईल.
- पदावर नियुक्त झालेल्या उमेदवाराला कोणत्याही प्रकारची कायमस्वरूपी शासकीय नोकरी मिळणार नाही. आणि कायमस्वरूपी कामावर घेण्याबाबत उमेदवाराला न्यायालयात खटला दाखल करता येणार नाही.
- सदरील भरती करिता जर दिलेल्या शैक्षणिक पात्रतेचा उमेदवार मिळाला नाही. तर शैक्षणिक पात्रता किंवा अट कमी करण्याचा अधिकार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जळगाव यांच्याकडे राहील.
- पदावरती निवड झालेल्या उमेदवारांना जाहिरातीमध्ये नमूद केलेला आहे तेवढाच पगार मिळेल.
- सदरील भरती करिता अर्ज करणाऱ्या उमेदवारा वरती कोणत्याही स्वरूपाचा फौजदारी गुन्हा नसावा. जर उमेदवारा वरती फौजदारी गुन्हा दाखल असेल तर त्याला अर्ज करता येणार नाही.
- www.gmcjalgaon.com या संकेतस्थळावरती अर्जाचा नमुना दिलेला आहे आणि उमेदवाराने त्याच्या नुसारच अर्ज करावा. उमेदवाराने अर्जासोबत जन्मतारखेचा पुरावा असलेले कागदपत्र, शैक्षणिक पात्रता संदर्भातील कागदपत्रे, आधार कार्ड जर नावात बदल केलेला असेल तर त्या संदर्भातील राजपत्र, पॅन कार्ड, आणि जाहिरातीत नमूद केलेली इतर कागदपत्रे यांच्या कॉपीज सेल्फ अटेस्टेड करून दिलेल्या पत्त्यावर पोहोचवाव्यात.
- दिनांक 4 मार्च 2024 ते दिनांक 11 मार्च 2024 या कालावधीत सकाळी 10 वाजल्यापासून ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत उमेदवारांनी आपले अर्ज पोचवावे. शासकीय सुट्टीच्या दिवशी अर्ज करू नये. अर्ज करण्याची शेवटची तारीख निघून गेल्यानंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
- सदरील भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांच्या अर्जांची छाननी 12 मार्च 2024 आणि 13 मार्च 2024 या दोन दिवशी करण्यात येईल. यानंतर पात्र उमेदवारांची यादी 13 मार्च 2024 रोजी संस्थेच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात येईल.
- संकेतस्थळावरती पात्र उमेदवारांच्या यादीत नाव असणाऱ्या उमेदवारांनी 14 मार्च 2024 रोजी सकाळी 11:00 वाजता मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे. मुलाखतीला ऐकताना नमूद सर्व कागदपत्रांच्या मूळ प्रती घेऊन यायचे आहे.
- सदरील भरती कंत्राटी पद्धतीद्वारे होणार आहे. त्यामुळे उमेदवाराने भरतीसाठी कोणत्याही प्रकारचा राजकीय दबाव आणला तर त्याकडे दुर्लक्ष करण्यात येईल.
- शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जळगाव यांच्याकडून उमेदवाराला कोणत्याही प्रकारचा भत्ता देण्यात येणार नाही. उमेदवाराने मुलाखतीला येताना स्वखर्चाने यावे.
- सदरील पदाची भरती रद्द करणे, भरतीतील जागा कमी जास्त करणे, भरतीची प्रक्रिया बदलणे याचा पूर्णपणे अधिकार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जळगाव यांच्या कडे राहील.
GMC Jalgaon Bharti 2024 | शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जळगाव येथील भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया खालील प्रमाणे.
- शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जळगाव येथील भरतीसाठी अर्ज करण्याकरिता अर्जाचा नमुना जाहिरातीच्या शेवट दिलेला आहे. उमेदवाराने तो अर्ज भरायचा आहे.
- उमेदवाराने अर्ज हा प्रति, माननीय अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव यांच्या कडे करायचा आहे.
- अर्ज करत असताना अर्जामध्ये सुरुवातीला पदाचे नाव विचारले आहे. यामध्ये उमेदवाराला डेटा एन्ट्री ऑपरेटर का ऑडिओलॉजिस्ट यापैकी कोणत्या पदासाठी अर्ज करायचा आहे. ते लिहायचे आहे. एका उमेदवाराने दोन पदासाठी अर्ज करायचे असेल तर त्यानेच दोन्ही अर्ज सेपरेट करावेत.
- अर्जामध्ये दुसऱ्या क्रमांकाला उमेदवाराने स्वतःचे पूर्ण नाव लिहायचे आहे. उमेदवारांनी स्वतःचे नाव लिहिताना आधार कार्ड प्रमाणे लिहावे.
- अर्जामध्ये तिसऱ्या क्रमांकावर उमेदवाराने स्वतःची जन्मतारीख जी दहावीच्या बोर्ड सर्टिफिकेट वरती आहे तशीच लिहावी.
- सदरील भरती मधील उमेदवारांनी पत्रव्यवहार करिता त्याचा पत्ता ज्या ठिकाणी तो सध्या राहत आहे तोच द्यावा.
- उमेदवाराचा कायमस्वरूपी चा पत्ता उमेदवाराने अर्जामध्ये पाचव्या क्रमांकावर लिहावा.
- अर्जामध्ये सहाव्या क्रमांकावती उमेदवाराने दूरध्वनी क्रमांक किंवा भ्रमणध्वनी क्रमांक काळजीपूर्वक लिहावा.
- उमेदवाराने स्वतःचा चालू ईमेल आयडी अर्जामध्ये सातव्या क्रमांकावरती भरावा.
- अर्जामध्ये आठव्या क्रमांकावर दिलेल्या तक्त्यामध्ये उमेदवाराने पूर्ण केलेला स्वतःचा शैक्षणिक अनुभव लिहायचा आहे.
- उमेदवाराने स्वतःचा शैक्षणिक तपशील लिहीत असताना सर्वप्रथम प्राप्त केलेली शैक्षणिक पदवी, विद्यापीठाचे नाव, प्राप्त केलेले गुण, टक्केवारी नीट लिहायचे आहे.
- यानंतर उमेदवारांनी स्वतःचा कामाचा अनुभव लिहायचा आहे. यामध्ये कोणत्या संस्थेने काम केले त्या संस्थेचे नाव. कोणत्या पदावर ती काम केले त्या पदाचे नाव. काम सुरू केलेल्या ची तारीख आणि कामावरून निवृत्त झालेली तारीख या दोन गोष्टी लिहायच्या आहेत.
- वरील सर्व माहिती उमेदवाराने भरून झाल्यानंतर घोषपत्र भरायचे आहे. या घोष पत्रामध्ये उमेदवारांनी कोणत्या पदासाठी आपण अर्ज करत आहोत त्या पदाचे नाव आणि किती महिन्याकरिता कंत्राटी पद्धतीने आपली नियुक्ती होणार आहे. तो कार्यकाल नमूद करायचा आहे. त्याच पद्धतीने ही भरती महात्मा फुले जन आरोग्य योजनेमार्फत होणार असल्याची माहिती उमेदवाराला माहीत आहे. प्रमाणे भरलेल्या अर्जामध्ये कोणत्याही प्रकारची चूक आढळली तर त्यास पूर्णपणे उमेदवार जबाबदार असेल असे लिहून घेतले जाते. त्यानंतर उमेदवाराने स्वतःचे नाव दिनांक आणि ठिकाण लिहून स्वतःची स्वाक्षरी करायची आहे.
- सदरील भरती करिता अधिक माहिती मिळवण्यासाठी www.gmcjalgaon.com या संकेतस्थळाला भेट द्या.
- अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी अर्जात सोबत सर्व कागदपत्रांच्या प्रती जोडाव्यात.
- उमेदवारांनी अर्जामध्ये कोणत्याही प्रकारची माहिती लिहिली नसेल. किंवा अपूर्ण माहिती लिहिली असल्यास अर्ज बाद केला जाईल.
- सदरील भरती करिता निवड झालेल्या उमेदवारांना प्रतिमहा 10,000 रुपये असे वेतन कंत्राट पूर्ण होईपर्यंत देण्यात येईल. कंत्राट पूर्ण झाल्यानंतर कोणत्याही प्रकारचा पगार उमेदवाराला देण्यात येणार नाही.
GMC Jalgaon Bharti 2024 | शासकीय महाविद्यालयातील विविध प्रकारच्या भरत्या, महाराष्ट्र शासन आणि भारत सरकार मधील विविध प्रकारच्या भरत्या यांच्या संदर्भातील माहिती मिळवण्यासाठी आमच्या नोकरी फस्ट या वेबसाईटला भेट द्या. भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.