MCGM Bharti 2024 | बृहन्मुंबई महानगरपालिका येथे भरती.

MCGM Bharti 2024 | बृहन्मुंबई महानगरपालिका येथे विविध पदांसाठी भरती घोषित करण्यात आलेली आहे. सदरील भरती करिता महानगरपालिकेत द्वारे जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. 15 मार्च 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. या भरती करिता उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. डेटा एन्ट्री ऑपरेटर आणि होमो डायलिसिस तंत्रज्ञ या पदाकरिता ही भरती होणार आहे. तरी पात्रताधारक उमेदवारांनी पत्राद्वारे अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि त्यापूर्वीचा अर्ज करावा. इच्छुक उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी.

MCGM Bharti 2024

 • बृहन्मुंबई महानगरपालिका येथील भरती ही 10 पदांकरिता होणार आहे.
 • या भरतीमध्ये डाटा एन्ट्री ऑपरेटर आणि होमोडायलिसिस तंत्रज्ञान या पदाच्या जागा भरायचे आहेत.

MCGM Bharti 2024 | बृहन्मुंबई महानगरपालिका येथील भरती करिता शैक्षणिक पात्रता आणि अटी खालील प्रमाणे आहेत.

 • डाटा एन्ट्री ऑपरेटर या पदाकरिता उमेदवाराचे उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असावा. त्याचप्रमाणे उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठातून कला/ वाणिज्य/ विज्ञान या शाखेतून पदवी प्राप्त केलेला असावा. उमेदवार एमएस-सीआयटी परीक्षा उत्तीर्ण असावा.
 • या भरती करिता अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे 18 वर्षे 33 वर्षापर्यंत पाहिजे.
 • सदरील भरती मधून डाटा एन्ट्री ऑपरेटर आणि होमो डायलिसिस तंत्रज्ञान या पदावर निवड होणाऱ्या उमेदवाराला 18000 रुपये ते 20,000 रुपये इतका पगार असणार आहे.
 • बृहन्मुंबई महानगरपालिका येथील भरती करिता निवड होणाऱ्या उमेदवाराचे नोकरीचे ठिकाण हे मुंबई असणार आहे.
 • बृहन्मुंबई महानगरपालिका येथील भरती करिता 756 रुपये इतके प्रवेश शुल्क असणार आहे.
 • सदरील भरती करिता पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्याद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात पहावी. जाहिरात क्रमांक.1 , जाहिरात क्रमांक.2 
 • या भरती करिता जाहिरातीमध्ये दिलेल्या पत्त्यावर ती उमेदवारांनी अर्ज करायचे आहेत.

MCGM Bharti 2024 | बृहन्मुंबई महानगरपालिका  भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खालील सूचना वाचा.

 • सदरील भरती करिता उमेदवारांनी पत्राद्वारे ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
 • भरतीसाठी पात्र उमेदवारांकरिता अर्ज करण्याची ऑनलाईन पद्धत महानगरपालिकेत द्वारे राबवलेली नाही.
 • बृहन्मुंबई महानगरपालिका येथील भरती करिता अर्ज करत असताना उमेदवारांनी स्वतःची वैयक्तिक माहिती जसे की जन्मतारीख, पूर्ण नाव, शैक्षणिक पात्रता, पत्ता, पिनकोड यासारख्या गोष्टी काळजीपूर्वक भरायचे आहेत. जर यापैकी कोणतीही गोष्ट भरताना उमेदवाराकडून चुकी झाली. तर त्याला बृहन्मुंबई महानगरपालिका जबाबदार राहणार नाही.
 • बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई येथील भरती करिता 15 मार्च 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
 • भरती करिता प्रसिद्ध केलेली जाहिरात उमेदवारांनी डाउनलोड करून काळजीपूर्वक वाचावी आणि त्यानंतरच अर्ज करावा.

MCGM Bharti 2024 | बृहन्मुंबई महानगरपालिका येथील भरती करिता अर्ज केलेल्या उमेदवारांसाठी खालील सूचना.

 • बृहन्मुंबई महानगरपालिका येथील भरती करिता पात्र होण्यासाठी उमेदवारांना अर्ज करणे बंधनकारक आहे.
 • बृहन्मुंबई महानगरपालिके द्वारे कोणत्याही प्रकारचा TA/DA उमेदवारांना देण्यात येणार नाही.
 • सदरील भरती मध्ये उमेदवाराकडून कोणत्याही प्रकारचा लहान मोठा अनुचित प्रकार घडल्यास त्या उमेदवारावर बृहन्मुंबई महानगरपालिकेत द्वारे कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
 • भरतीची प्रक्रिया कोणत्या पद्धतीने असेल यासंदर्भातील माहिती ठरवण्याचे काम हे बृहन्मुंबई महानगरपालिका कडे आहे.
 • सदरील भरती बाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी उमेदवाराने बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळाला भेट द्या.
MCGM Bharti 2024 | बृहन्मुंबई महानगरपालिका येथील भरतीसाठी सर्वसाधारण अटी खालील प्रमाणे.
 • सदरील भरतीतील पदे ही कंत्राटी तत्त्वावर ती भरलेली आहेत. नियमित योग्य उमेदवार जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत कंत्राटी तत्वावरील उमेदवार कामावरती राहतील.
 • बृहन्मुंबई महानगरपालिका येथील रिक्त होणाऱ्या पदांच्या आवश्यकतेनुसार नवीन उमेदवारांच्या नेमणुका केल्या जातील.
 • सदरील भरती मधील रिक्त जागा कमी-जास्त होऊ शकतात याची पूर्णपणे जबाबदारी बृहन्मुंबई महानगरपालिका यांची आहे.
 • उमेदवाराने स्वतःचा पत्रव्यवहाराचा पत्ता लिहिताना व्यवस्थित लिहावा आणि पुढील पत्रव्यवहार त्या पत्त्यावरून करावेत.
 • अर्ज केलेल्या उमेदवारांनी अर्जाबरोबर शैक्षणिक कागदपत्रे, व्यावसायिक कागदपत्रे आणि गुणपत्र यांच्या प्रती जोडाव्यात.
 • निवड झालेल्या उमेदवारांनी नोकरीला जॉइनिंग व्हायच्या आधी ₹500 च्या स्टॅम्प पेपर वरती करारनामा करून द्यायचा आहे.
 • निवड केलेल्या उमेदवारांनी ज्या पदावर नेमणूक केलेली आहे त्या पदावरील काम व्यवस्थित केले नाही किंवा कामचुकारपणा केला अथवा उमेदवाराची वागणूक व्यवस्थित नसेल. केलेल्या करारनाम्याची उमेदवाराकडून पालन न झाल्यास उमेदवाराला तात्काळ कामावरून कमी करण्यात येईल.
 • सदरील भरती मधील उमेदवारांची निवड ही कंत्राटी स्वरूपाची होणार आहे त्यामुळे कायमस्वरूपी कामावरती असलेल्या उमेदवारांना मिळणाऱ्या सुविधा या कंत्राटी स्वरूपाच्या कामगारांना मिळणार नाहीत. त्याचप्रमाणे निवड केलेल्या उमेदवारांची आवश्यकता संपल्यावर त्याला निलंबित करण्यात येईल.
 • भरती मधील उमेदवाराला ज्या पदावर नियुक्त केलेले आहे त्या पदावरून त्याला कधीही पूर्वसूचना न देता कामावरून कमी करण्याचा अधिकार बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्याकडे आहे.
 • रिक्त पदांकरिता भविष्यात कायमस्वरूपी उमेदवाराची नेमणूक करत असताना कंत्राटी पद्धतीने काम केलेल्या उमेदवाराला त्या पदावर ती कोणत्याही स्वरूपाचा हक्क सांगता येणार नाही. किंवा त्याचा अनुभव ग्राह्य धरला जाणार नाही.
 • उमेदवारांनी पोस्टाद्वारे केलेला अर्ज अंतिम तारखेनंतर महानगरपालिका येथे पोहोचला तर तो अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही. पोस्टाद्वारे अर्ज पत्त्यावरती पोहोचवण्यासाठी वेळ झाला तर त्याला महानगरपालिका जबाबदार राहणार नाही.
 • उमेदवाराची कामावरती नियुक्ती झाल्यानंतर कागदपत्रे पडताळणीच्या वेळी जर असे लक्षात आले की उमेदवाराने सादर केलेली प्रमाणपत्रे खोटी होती किंवा त्यामध्ये काही बदल करून सादर केली होती किंवा इतर कोणतीही माहिती उमेदवारा द्वारे लपवली गेलेली असेल तर त्या उमेदवाराला कधीही कामावरून कमी करण्यात येईल.
 • टो. रा. महाविद्यालय आणि बा.य.ल नायर धर्मा रुग्णालय यांना सदरील भरती कधीही थांबवण्याचा अधिकार आहे.
 • सदरील काम हे तीन पाळी मध्ये असणार आहे त्यामुळे निवड झालेल्या उमेदवाराला तीन पाळी मध्ये काम करावे लागणार आहे हे लक्षात ठेवूनच उमेदवारांनी अर्ज करावा.
 • दिनांक 7 मार्च 2024 ते दिनांक 15 मार्च 2024 या कालावधीपर्यंत उमेदवाराने आपला अर्ज “बा.य.ल. नायर धर्मा. रुग्णालय, डॉ. ए. एल. नायर रोड, मुंबई सेंट्रल, मुंबई- 400 008” या पत्त्यावर ती पाठवावा. उमेदवाराने शनिवार-रविवार आणि प्रशासकीय सुट्ट्या सोडून अर्ज करावा. शेवटची तारीख संपल्यानंतर मिळालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. अर्जाबरोबर उमेदवाराने सर्व कागदपत्रे आणि अलीकडे काढलेले पासपोर्ट साईज चे फोटो जोडायचे आहेत.
MCGM Bharti 2024 | बृहन्मुंबई महानगरपालिका भरती साठी आवश्यक कागदपत्रे खालील प्रमाणे.
 • सदरील भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी खालील कागदपत्रांच्या प्रती अर्जासोबत जोडावेत.
 1. आधार कार्ड
 2. पॅन कार्ड
 3. वास्तव्याचा पुरावा. यामध्ये आधार कार्ड, पासपोर्ट, वाहन चालक परवाना, लाईट बिल, फोन बिल यापैकी कोणतेही एक पुरावा असावा.
 4. ओळखीचा पुरावा. आधार कार्ड, वाहनचालक परवाना, पासपोर्ट, मतदान ओळखपत्र यांपैकी कोणताही एक पुरावा असावा.
 5. दहावीच्या बोर्डाचे मार्कशीट.
 6. 12 वी बोर्डाचे मार्कशीट
 7. डिग्री तील मार्कशीट आणि पास प्रमाणपत्र.
 8. 30 शब्द प्रतिमिनिट इंग्रजी आणि मराठी या वेगाचे परीक्षा उत्तीर्ण केलेल्याचे टंकलेखक म्हणून प्रमाणपत्र.
 9. MS-CIT परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र.
 10. अलीकडील काढलेले दोन पासपोर्ट साईज फोटो.
 11. शैक्षणिक पात्रता आणि अनुभव यासंदर्भातील प्रमाणपत्र.
 12. अनुभव प्रमाणपत्र

MCGM Bharti 2024 | बृहन्मुंबई महानगरपालिका येथील भरतीसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया खालील प्रमाणे.

 • सदरील भरती करिता उमेदवाराने अर्ज हे पत्राद्वारे किंवा समक्ष उपस्थित राहून भरायचे आहेत.
 • सदरील भरती चा अर्जाचा नमुना प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीच्या शेवटी दिलेला आहे.
 • सर्वप्रथम उमेदवाराला कोणत्या पदासाठी अर्ज करायचे आहे त्या पदाचे नाव लिहायचे आहे.
 • त्यानंतर उमेदवाराने उजव्या बाजूला दिलेल्या बॉक्स मध्ये स्वतःचा अलीकडे काढलेला आयडेंटिफाय फोटो चिकटवायचा आहे. या फोटोची साईज 2.5 सेमी X 3 सेमी इतकी असणार आहे.
 • उमेदवाराने अर्जामध्ये पहिल्या क्रमांकातील अ घटकात स्वतःचे पूर्ण नाव आडनाव प्रथम नुसार लिहायचे आहे.
 • पहिल्या क्रमांकाच्या ब घटकांमध्ये उमेदवाराने वडिलांचे पूर्ण नाव लिहायचे आहे. त्याचप्रमाणे जर लग्न झाले असेल तर पतीचे पूर्ण नाव लिहायचे आहे.
 • उमेदवार महिलांनी लग्नापूर्वी चे पूर्ण नाव लिहायचे आहे.
 • दुसऱ्या क्रमांकावरती उमेदवाराने स्वतःचा पूर्ण पत्ता आणि पिनकोड लिहायचा आहे.
 • तिसऱ्या क्रमांकावरती उमेदवाराने स्वतःचा चालू मोबाईल नंबर लिहायचा आहे.
 • चौथ्या क्रमांकावरती उमेदवारांनी स्वतःचे लिंग निवडायचे आहे.
 • पाचव्या क्रमांकावर अ घटकांमध्ये द्वाराने स्वतःची जन्मतारीख लिहायची आहे.
 • पाचव्या क्रमांकातील ब घटकांमध्ये उमेदवाराने स्वतःचे वय वर्षे, महिने, दिवस या स्वरूपात लिहायचे आहे.
 • सहाव्या क्रमांकावर ती उमेदवारांनी स्वतःचा शैक्षणिक तपशील लिहायचा आहे. यामधील अ घटकात. उमेदवाराने 10वी पास केलेल्या विद्यापीठाचे नाव, प्राप्त गुण, एकूण गुण आणि टक्केवारी लिहायचे आहे.
 • 10वी चे गुण ज्या पद्धतीने लिहिले त्याच पद्धतीने उमेदवाराने बारावी आणि पदवी तील विद्यापीठाचे नाव, प्राप्त गुण, एकूण गुण आणि मिळालेली टक्केवारी लिहायची आहे.
 • उमेदवाराने पाचव्या ब घटकात 10 वी किंवा 12 वीच्या बोर्ड परीक्षेला 100 मार्काचा मराठी विषय घेऊन उत्तीर्ण झाला आहे का याबद्दलची माहिती द्यायची आहे.
 • पाचव्या क घटकांमध्ये उमेदवाराने संगणकाचे ज्ञान किंवा MS-CIT किंवा शासनाने अन्यथा दिलेल्या संगणक कोर्सचे प्रमाणपत्र आहे का नाही ते लिहायचे आहे.
 • पाचव्या ड घटकांमध्ये उमेदवाराने स्वतःजवळ इंग्रजी आणि मराठी टंकलेखनाचे ज्ञान आहे का नाही याबद्दल माहिती द्यायची आहे.
 • पाचव्या ई घटकांमध्ये उमेदवारा जवळ बॅटरीचा अनुभव आहे का नाही याबद्दल माहिती द्यायची आहे.
 • सातव्या नंबरला उमेदवार ज्या ठिकाणी राहत आहे त्या ठिकाणच्या स्थानिक पोलीस स्टेशन चा पत्ता द्यायचा आहे.
 • सदरील भरती मधील सर्व अटी आणि शर्ती उमेदवाराला मान्य असतील तर उमेदवाराने दिनांक आणि ठिकाण लिहून स्वतःची स्वाक्षरी करून सहमती द्यावी.
 • लिहिलेल्या अर्जाला नमूद केलेली सर्व कागदपत्रे जोडावीत आणि अर्ज लिफाफा मध्ये बंद करून पत्राद्वारे किंवा समक्ष उपस्थित राहून जमा करावा.

महाराष्ट्र शासनाच्या सर्व संस्थांमधील भरती करिता आमच्या नोकरी फस्ट या संकेतस्थळाला भेट द्या. भेट घेण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a Comment